Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शृंगापत्ती

स
सुबोध खरे
Fri, 08/19/2016 - 06:25
🗣 413 प्रतिसाद
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

प्रतिक्रिया द्या
92497 वाचन

💬 प्रतिसाद (413)
प
पिशी अबोली Fri, 08/19/2016 - 12:40 नवीन
एक रूपालीच्या पिढीची प्रतिनिधी म्हणून सांगते. १.लग्नाआधी दुसर्‍या मुलीशी संबंध असले, म्हणून माझ्या समोरच्या मुलाला मी स्वतः जज करणार नाही. त्याने मला प्रामाणिकपणे सर्व सांगितलं असेल, तर काय हरकत आहे? पण मी स्वतःच्या आई-बाबांना हे सगळं सांगणार नाही. कारण तो आम्हा दोघांमधला पर्सनल मॅटर असेल. त्याच्या आई-बाबांनाही माहिती नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मागच्या पिढीला हे पचवणं कठीण जात असेल हाही मुद्दा आहेच. मग या वरच्या उदाहरणात असंच काही झालं नसेल कशावरून? तिने तिच्या नवर्‍याला विश्वासात घेतले नसेल कशावरून? फक्त ती मुलगी होती आणि तिने गर्भपात केला म्हणून आक्षेप आहे का? २.जास्त पैसे कमावणारा मुलगा पाहिजे असं तिचं वैयक्तिक मत असेल, तर मला त्यात काही गैर वाटत नाही. जर ही तिची अपेक्षा असेल तर लग्न ठरवताना तिने ते स्पष्ट सांगितलेही असेल. अशा गोष्टी स्पष्ट आणि राजरोस बोलल्या जातातच आणि त्यात जुन्या पिढीला भरपूर इंटरेस्ट असतो. त्यामुळे इथेही काही फसवणुकीचा भाग नाही. ३. त्या मुलीने त्या प्रियकरासोबत संबंध तोडले असंही तुम्ही नमूद केलंय. म्हणजे लग्न करून ती नंतर काही फसवणूक करतेय अशातला भाग नाही. मग नक्की फसवणूक कसली वाटतेय?
क
किंबहुना Fri, 08/19/2016 - 12:50 नवीन
जनरेशन गॅप आहे हो.. पण राहून राहून एक प्रश्न मनात येतो - जर एखाद्या मुलाने अश्या प्रकारे गर्भधारणा झाल्यावर तिला गर्भपात करायला लावला तर त्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? इथे तुम्ही म्हणजे केवळ तुम्ही नव्हे तर इन जनरल लोक काय म्हणतील असा प्रश्न आहे.
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पैसा Fri, 08/19/2016 - 12:56 नवीन
प्रतिक्रिया अपेक्षित लायनीने आल्यात. लेख वाचला तेव्हा एक जाणवले की
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
हा डॉ खरे यांच्या मित्राचा प्रॉब्लेम आहे. माझा असा समज झाला की ती मुलगी जर खरेंच्या मित्राशी घरी आल्यावर व्यवस्थित वागली असती तर त्याला या सगळ्याचे एवढे टेन्शन झाले नसते. त्यानी त्या सुनेला किंवा तिच्या नवर्‍याला किंवा तिच्या प्रियकराला नीतिमत्तेबद्दल प्रवचन दिल्याचे कुठे दिसले नाही. दोन्ही डॉक्टरांच्या वयानुरुप त्यानी आपली मते लेखात आणि प्रतिक्रियातून व्यक्त केली आहेत. ते ठीक आहे. नाहीतर लेख टाकून पळून गेले म्हणायलाही लोक तयार असतात. मात्र डॉक्टरांच्या मित्राच्या ज्या प्रॉब्लेमबद्दल त्यानी लिहिले आहे त्याबद्दल ६०/६५ पैकी फक्त २/३ प्रतिक्रियांमधे थोडीफार चर्चा झाली आहे! =))
ब
बाळ सप्रे Fri, 08/19/2016 - 13:05 नवीन
हे ठीक वाटतय. जर मुलीने सर्व बोलून नवर्‍याला विश्वासात घेतले असेल तर डॉक्टरना बघितल्यावर तिरस्कार करण्याची गरज नाही. तितक्याच आश्वासकपणे 'आमचं आम्ही जमवलय' हे डॉक्टरनाही सांगायला हरकत नाही. आणि जर डॉक्टर सांगतील या भितीने तिरस्कार असेल, तर डॉक्टरना लागलेली फसवणूक माहिती असल्याची टोचणीदेखिल रास्तच असेल.
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/19/2016 - 13:10 नवीन
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो..... गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे. ती मुलगी जर खरेंच्या मित्राशी घरी आल्यावर व्यवस्थित वागली असती तर त्याला या सगळ्याचे एवढे टेन्शन झाले नसते. ती व्यवस्थित वागत नाही कारण डॉक्टरांच्या मित्राच्या येण्याने आपले गुपीत उघड होण्याची भिती तिला वाटते आहे, असे मला वाटते. जर हेच कारण असेल तर तिने नवर्‍यापासून 'ती' घटना लपवून ठेवलेली आहे हे उघड आहे. त्यामुळे फसवणूकीचा मुद्दाच सिद्ध होतो. जर दोघांमध्ये ह्या विषयावर चर्चा होऊन 'आपण लग्न केल्यापासून आपला एकमेकांशी संबंध आहे गत आयुष्याशी आपला संबंध नाही' असे स्विकारलेले असेल तर डॉक्टरांच्या मित्राच्या येण्याने ती अस्वस्थ होणार नाही.
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खटपट्या Fri, 08/19/2016 - 19:00 नवीन
काका, क्राइम पेट्रोल बघता का तुम्ही :)
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
श
शाम भागवत Sat, 08/20/2016 - 08:12 नवीन
कदाचित सूनेला पूर्वीचे सगळे विसरायचे असावे. जे पूर्वी घडले त्याबद्दल अपराधीपणाची भावना असणेही शक्य आहे. बोल्डनेसच्या कल्पनांच्या नादात बऱ्याच वेळेस अशा चुका झाल्यावर मुलीं बदलतात. लग्न हा खरोखरच मुलीचा पुनर्जन्म असतो. पूर्वीचे सर्व विसरून नव्याने सर्व सुरवात करायची इच्छा असू शकते. डॉ. बद्दल राग नसला तरी ते उपस्थीत नसले तर बरे झाले असते असे वाटत असावे. तीच नापसंती डॉ. चे मन मोठी करून त्याला ते तिरस्कार समजताहेत. असेच असेल असे काही मला म्हणायचे नाही. फक्त माझे मत मांडले. जर असे काही असेल असे वाटत असेल तरच.... मी येऊ नये असे वाटते का हे डॉ. नी सुनेशी स्पष्ट बोलून विचारले पाहिजे. तसेच तिने येऊ नका असे स्पष्ट शब्दात सांगितले तर तसे करणे शक्य होणार नाही. उलट त्यामुळे घरातील सगळ्यांच्या मनात संशय निर्माण होण्याची भिती आहे हेही स्पष्ट केले पाहिजे. जव्हेरगंज स्टाईल ऑन (म्हणजे लग्न झाल्यापासून डॉ. घरी येण्याचे टाळताहेत. वगैरे वगैरे. ते तर गायकॉनॉलॉजिस्ट आहेत. वगैरे वगैरे. सूनबाई पेशंट होती का? वगैरे वगैरे.) जव्हेरगंज मोड ऑफ
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 13:19 नवीन
अच्छा, ले केवळ डॉ खऱयांच्या डॉ मित्राच्या परसेप्शनबद्दलय होय! म्हणजे त्या मुलीच्या नजरेत तिरस्कार वगैरे नसण्याचीही शक्यता गृहीत धरायची का?
↩ प्रतिसाद: पैसा
उ
उडन खटोला Fri, 08/19/2016 - 12:58 नवीन
शृंगापत्ती चा नेमका अर्थ काय? बाकी चालू आहेच.
श
शरभ Fri, 08/19/2016 - 13:35 नवीन
ते लिहायचं कसं ते पण सांगा राव. मी चोप्य पस्ते केल तरी श्रीखंडातला श्र येतोय... :) तस्मात तुर्तास आमच्यासमोरील श्रुंगापत्ती ही आहे.. - शरभ
↩ प्रतिसाद: उडन खटोला
आ
आदूबाळ Fri, 08/19/2016 - 14:48 नवीन
shRu = शृ
↩ प्रतिसाद: शरभ
श
शरभ Fri, 08/19/2016 - 14:53 नवीन
- शरभ
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
साहेब.. Mon, 08/22/2016 - 08:37 नवीन
बाकी चालू द्या.
↩ प्रतिसाद: उडन खटोला
न
निओ Fri, 08/19/2016 - 13:40 नवीन
तुमच्या मित्राच्या दृष्टिकोनातून, तो नकळत काही अप्रिय गोष्टींचा साक्षीदार झाला आहे. ज्यावेळी हि गोष्ट समजली त्यावेळेस लग्न थांबवणे त्याला अथवा सर्वानाच जमलं असतं असं नाही. कालाय तस्मे नमः म्हणून नव्या पिढीच्या गोष्टी सोडून द्याव्यात. घडायच्या त्या घटना घडून गेल्या म्हणून विचार करणे थांबवावे. मित्राचे महत्व जाणून आहेत तर आपल्या मैत्रीकडे लक्ष द्यावे.
अ
अभ्या.. Fri, 08/19/2016 - 13:43 नवीन
हा राव. हे शृंगापत्तीवर प्रॉपर सोल्युशन आहे. बाकी सगळा टाइमपास आहे.
↩ प्रतिसाद: निओ
स
सुबोध खरे Fri, 08/19/2016 - 14:45 नवीन
काही लोकांचे प्रतिसाद आकसाने दिलेले आहेत किंवा स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत असे वाटते. असो माझा स्त्रीरोग तज्ञ मित्र मराठी नाही तर गुजराती आहे आणि त्याचा मित्र कोणत्या प्रांतातील( मराठी गुजराती कि सिंधी इ) आहे हे मला माहित नाही किंवा मी त्याला पाहिलेला नाही. मला स्त्रीरोग तज्ञ मित्राने "जसे सांगितले तसेच लिहिलेले" आहे. यात "कोणाचेही नाव घेतलेले नाही" तेंव्हा यात "वैयक्तिक किंवा व्यवसायिक गोपनीयतेचा" कोणताही भंग होत नाही. लग्ना आधी गरोदर राहणाऱ्या मुली आम्ही (क्षकिरण तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ) वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. गणेशोत्सव आणि गरबा या कालावधीत यात बऱ्याच प्रमाणात वाढ होते. तेंव्हा त्याबद्दल दोघांना अप्रूप किंवा वाईट वाटण्याचे काही कारण नाही. आम्ही समाजसुधारक नाही जे आहे जसे आहे तसे स्वीकारायचे हे व्यवसायात शिकवले जाते आणि कोणालाही एक रुग्ण/ व्यक्ती म्हणूनच वागणूक द्यायची असते. रुपाली जोवर तृतीय व्यक्ती होती तोवर तिच्याबद्दल बरे किंवा वाईट वाटण्याचे कारण नाहीच. पण जेंव्हा ती मित्राची सून म्हणून समोर आली तेंव्हा हा चमकला हि नैसर्गिक प्रतिक्रिया होती. नंतरही जे त्याला वाटले( रुपालीच्या डोळ्यात तिरस्कार) आणि त्याने मला जे सांगितले ते तसेच लिहिले आहे. त्याला काय वाटले हे त्याने बोलून दाखविले. ते बरोबर कि चूक हि कोणतीच टिप्पणी मी देऊ शकत नाही. रुपालीने काय करायला हवे होते कि नव्हते हे सांगणारा मी कोण? मी जजमेंटल झालो किंवा या धाग्याचे प्रयोजन काय हा विषय ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ठरवायचा आहे.
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 14:54 नवीन
कमॉन डॉक्टर! कोणीही तुमच्या विचारांच्या विरुद्ध काही लिहिले की तुम्हाला त्यात आकस कसा दिसतो हो? जवळ जवळ दर वेळी तुम्हाला असेच म्हणताना बघते.. आश्चर्य वाटते..
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वामन देशमुख Fri, 08/19/2016 - 18:49 नवीन
1. काही लोकांचे प्रतिसाद आकसाने दिलेले आहेत किंवा स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत असे वाटते. 2. मी जजमेंटल झालो किंवा या धाग्याचे प्रयोजन काय हा विषय ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ठरवायचा आहे.
This is not digestible, doc. Not worth reading YOU. Excuse me for writing in English, Marathi Keyboard not accessible.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:21 नवीन
Not worth reading YOU. आपली मर्जी
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
र
राजेश घासकडवी Fri, 08/19/2016 - 14:54 नवीन
अतिशय विलक्षण घटना. वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंध हे परस्परविरोधी कसे असू शकतात याचं उत्तम उदाहरण. शक्ती या हिंदी सिनेमातही बापाची वर्दी आणि त्याचं बाप असणं यांचा संघर्ष दाखवला आहे. सर्वप्रथम तुमच्या मित्राचं अभिनंदन. त्याने आपली व्यावसायिक निष्ठा पुरेपूर पाळलेली आहे. त्यापोटी त्याला मानसिक घालमेलही सोसावी लागलेली आहे. मात्र लेखातल्या काही गोष्टी खटकल्या.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना
फसवलं जाणं हा फारच लोडेड शब्दप्रयोग आहे. जणू काही सर्व लग्नांच्या बाबतीत स्त्रीची योनिशुचिता ही वचन देऊन लग्नाच्या पदराबरोबर बांधलेली असते. आणि आधी गर्भपात झाला आहे म्हणजे काहीतरी 'डिफेक्टिव्ह माल' मिळाला आहे! गंमत म्हणजे तुमच्या मित्राने हा व्यवसाय स्वीकारला तेव्हा असले अनेक डिफेक्टिव्ह माल सुधारून देण्याचं कंत्राट घेतलं. त्यातून पैसे मिळवले, चरितार्थही चालवला. इतर तरुणींनाही त्याने गर्भपाताची औषधं दिली असतील तर यात काहीच अनैतिक नाही, हे त्याने मान्य केलेलं आहे. जर त्याला ही फसवणूक वाटत असेल तर अशी फसवणूक करून देण्यात त्यानेच हातभार लावलेला आहे. मग आता हे उमाळे का? म्हणजे हा धंदा गैर नाही म्हणून करायचा आणि पैसे मिळवायचे, आणि तरीही मूल्यं जपायची भावना ठेवायची हे एकाच वेळी केक खाणं आणि ठेवणं आहे. 'ही मुलगी माझ्याकडे काविळीचा रोग घेऊन आली होती, तिला मी बरी केली. पण हे तिच्या सासऱ्याला मी सांगू शकत नाही.' या परिस्थितीत जितकी बोच असावी तितकीच तुमच्या मित्राने ठेवावी.
आ
आदूबाळ Fri, 08/19/2016 - 14:59 नवीन
सर्वप्रथम तुमच्या मित्राचं अभिनंदन. त्याने आपली व्यावसायिक निष्ठा पुरेपूर पाळलेली आहे.
असहमत आहे. लग्नाला गेल्यानंतर तिथे रूपाली भेटल्याची गोष्ट डॉ खर्‍यांना सांगायचं काही कारण नव्हतं. विशेषतः डॉ खरे रूपालीला ओळखत असताना ही घटना सांगणं चूक होतं.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Fri, 08/19/2016 - 15:21 नवीन
ओह, रुपालीला डॉक्टर खरे ओळखतात ही गोष्ट माझ्या ध्यानात आली नव्हती. तरीही डॉक्टर पेशंट प्रीव्हिलेज जर दोन्ही डॉक्टरांना लागू असेल तर त्यात नक्की काय हरकत आहे? केस स्टडीजबद्दल एकमेकांशी बोलणं अयोग्य आहे का? इथे मला एक तांत्रिक खुसपट दिसतं - ते म्हणजे खरेंचा मित्र खरेंकडे सायकिअॅट्रिस्ट म्हणून पाहात असेल तर सगळंच कोशर आहे.
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. Fri, 08/19/2016 - 15:26 नवीन
म्हणजे हैसियत मामला म्हणा की, एक डॉक्टरकी हैसियतसे नही तो एक दोस्त की हैसियत से वगैरे. आदुबाळा तर प्रोफेशनल हैसियत सगळ्यात अव्वल म्हणतोय.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
आ
आदूबाळ Fri, 08/19/2016 - 19:57 नवीन
एकदम करेक्ट. हैसियतचा मामला. ... आणि प्रोफेशनल हैसियत सगळ्यात अव्वल असायलाच पाहिजे. बिकॉज दॅट डिफाईन्स यू अ‍ॅज अ प्रोफेशनल. बाकी डिग्र्या आणि सर्टिफिकिटांना अर्थ नसतो. त्याशिवाय त्या प्रोफेशनचा सभासद म्हणवून घेण्याची पात्रता नसावी. हे आपण काय विकतो त्याच्याशी संबंधित आहे. उदा० एखादा वकील फक्त कायद्याचं ज्ञान विकत नसून तो आपल्या अशिलाने दिलेल्या माहितीची गोपनीयता राहील हा विश्वासही विकत असतो. चितळे बंधू बाकरवडीचा दर्जा विकतात. उद्या दुकान बंद केल्यानंतर काका हलवाई बरोबर गलासभर बियर मारता मारता दुकानात आलेल्या जाड्या माणसाचा किस्सा सांगितला तर त्याचा प्रोफेशनल एथिक्सशी संबंध नाही. पण आपल्या अशिलाबद्दल एखादा वकील आपल्या दुसर्‍या वकील मित्राशी गॉसिप करायला लागला तर त्याचा जरूर संबंध आहे.
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:26 नवीन
गॉसिप एकाच केस दोन वकील हाताळत असतील तर त्यांच्यात केस बद्दल विचार विनिमय किंवा विचारांची देवाण घेवाण झालेली पण आपल्याला अमान्य आहे का? यात एका वकिलाला माहित नसलेली गोष्ट दुसऱ्या वकिलाला त्याने सांगितले तर लगेच गॉसिप. हां, त्या दुसऱ्या वकिलाचा त्या केसही संबंध नसेल तर गोष्ट वेगळी आहे.
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 08/23/2016 - 18:04 नवीन
राईट. सिनारियो बघू. व्यावसायिक नीतिमत्तेचं पालन झालेला सिनारियो: [मूळ लेखातून सुरू] रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) ... आणि सर्व आलबेल झालं. [मूळ लेखातून समाप्त] इथे स्त्रीरोगतज्ञ मित्र आणि डॉ खरे यांच्यातला व्यावसायिक संबंध - या केसपुरता - संपला. पुढची घटना घडली आणि "एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले" ही परिस्थिती आली. आपला मित्र डॉ खरे - जो या केसशी आधी रेडियॉलॉजिस्ट म्हणून संबंधित होता - त्याच्याकडे मन मोकळं करावं असं त्या मित्राच्या मनात आलं. पण मग त्या मित्राच्या लक्षात आलं, की आपली मनस्थिती, आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही. याचाच अर्थ, ही घटना डॉ खर्‍यांना सांगायचं कोणतंही वैद्यकीय (व्यावसायिक) कारण आपल्याकडे नाही. या परिस्थितीत आपण डॉ खर्‍यांना ही घटना सांगितली, तर हा व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग होईल. तस्मात आपण सांगितली नाही पाहिजे. ___________________________ हे घडलं का? ही घटना डॉ खर्‍यांना सांगितली जाण्याचं कारण ते डॉक्टर आहेत हे नसून ते मित्र आहेत हे आहे. डॉ खरे रेडियोलॉजिस्ट असण्याऐवजी इस्त्रीवाले असते तरी मित्र या नात्याने ही घटना सांगितली गेली असतीच. ___________________________ तुमच्या प्रश्नाचं उत्तरः एकाच केस दोन वकील हाताळत असतील तर त्यांच्यात केस बद्दल विचार विनिमय किंवा विचारांची देवाण घेवाण अर्थातच मान्य आहे. पण त्या विचारविनिमय / देवाणघेवाण / माहितीचा संबंध (रिलेव्हन्स) "केस इन हँड" शी असावा. इन्कम टॅक्सची केस, आणि वकील अ वकील ब ला आपल्या अशिलाचा नवरा कसा बाहेरख्याली आहे हे सांगत असेल तर ते नक्कीच गॉसिप.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/23/2016 - 18:51 नवीन
आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही. ब्वॉर
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 08/23/2016 - 19:38 नवीन
खरेसाहेब, मला तुमच्याविषयी अतीव आदर आहे. मिपावर "reasonable people" हा जो गट आहे त्यात तुमचं नाव वरच्या पाच नंबरांत असेल. त्याच नात्याने माझ्या मताचा उलगडा केला. तुमच्याकडून "ब्वॉर" या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. मी चुकत असेन (आणि ती शक्यता बरीच आहे) तर मला हक्काने उलगडून सांगा. माझी चूक मान्य करायला आणि सॉरी म्हणायला मला कधीच किंचितही लाज वाटलेली नाही. असो.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Tue, 08/23/2016 - 19:43 नवीन
ब्वॉर. (ह्ये आदूबाळ मारतंय आता..!!)
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 08/23/2016 - 19:52 नवीन
=))
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Tue, 08/23/2016 - 20:26 नवीन
आदू बाळ साहेब आपण पहिल्या प्रतिसादापासून व्यायसायिक नीतिमत्तेबद्दल बोलत आहात. मुलगी लग्न गरोदर झाली हि गोष्ट चूक आहे कि तिने मित्राच्या मुलाबरोबर लग्न केले हि चूक झाली? पहिली गोष्ट तर मला माहित होतीच दुसरी गोष्ट त्यांनी कधीही कोण मित्र ते नाव न सांगता फक्त मला सांगितली. त्यांच्या स्वतः च्या विचारसरणी प्रमाणे विवाह पूर्व संबंध हे त्यांना अमान्य असावेत. यामुळे ते अपसेट झाले आणि त्यांनी मला त्याबद्दल फोन केला मी त्यांचे सांत्वन केले इतकी साधी सरळ गोष्ट असताना यात व्यावसायिक नीतीचा भंग कसा होतो हे समजत नाही. त्यांनी मला तिचे माझ्या मित्राच्या मुलाबरोबर लग्न झाले एवढीच माहिती दिली. तिचे लग्न होणारच होते आणि मला जर रुपालीची पुढची माहिती काढायचीच असेल तर ती मला सरकारी दप्तरात मिळणार नाही का? तुम्ही एवढे व्यावसायिक नीतीमत्तेबद्दल डांगोरा का पिटत आहेत ते समजले नाही. त्याचा भंग कसा होतो हे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही. आणि शेवटी "पण मग त्या मित्राच्या लक्षात आलं, की आपली मनस्थिती, आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही" असे लिहिता. मित्राच्या दोलायमान परिस्थिती मूळच जर रुपालीचा गर्भपात आहे, जी गोष्ट मला नक्कीच माहित आहे. कारण गरोदर असताना आणि गर्भपात झाल्यावर मी तिची सोनोग्राफी केली आहे तर त्या दोन्हीचा संबंध नाही असे तुम्ही कसे म्हणू शकता? म्हणून मग वितंडवाद घाला ऐवजी मी "बरं" म्हणून सोडून दिले.
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 08/23/2016 - 20:45 नवीन
मी डॉक्टरच्या professional ethics बद्दल बोलतो आहे. तुमच्या मित्राने त्यांच्या नितीमूल्यांप्रमाणे अपसेट होणं स्वाभाविक आहे. पण त्यांनी तुम्हाला ही गोष्ट non-professional capacity मध्ये सांगायला नको होती - कारण ते professional ethics ची पायमल्ली करणारं आहे असं मी म्हणतो आहे. प्रत्येक व्यावसायिकासमोर त्याच्या व्यवसायिक capacityमध्ये अनेक अनैतिक गोष्टी येत असतात. (अनैतिक - बेकायदेशीर नव्हे.) नीतिमत्ता अंडरवेअरसारखी असते - प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न. जे पेशंटसाठी नैतिक ते डॉक्टरसाठी अनैतिक असू शकतं. डॉक्टरला एखादी गोष्ट अनैतिक वाटते म्हणून त्याने ती गावभर publicise करू नये. किंबहुना आपल्या चड्डीदोस्तालाही सांगू नये. अर्थात - तुम्हाला तुमच्या मित्राने फोन करून रूपालीचं लग्न आपल्या मित्राच्या मुलाशी झाल्याचं सांगणे यात काही गैर आहे असं वाटत नसेल तर माझा मुद्दा निव्वळ अरण्यरुदन समजा.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आजानुकर्ण Tue, 08/23/2016 - 19:07 नवीन
कहानीमे नया मोड! :)
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
संदीप डांगे Tue, 08/23/2016 - 19:16 नवीन
=)) =)) =)) हसून फुट्लो राव..
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सूड Tue, 08/23/2016 - 21:07 नवीन
=))
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शरभ Fri, 08/19/2016 - 15:06 नवीन
आणि थोडी Empathy असू द्यात लोकहो, नुस्तीच Sympathy नको. अशी परिस्थिती कुणाच्याही मुलीवर येऊ शकते. // ...( रुपालीच्या डोळ्यात तिरस्कार)... // नक्की तिरस्कार आहे की "Feeling of awkwardness" आहे ? तुमच्या मित्राने मुलीला तसं काहीही जाणवुन दिलं नाही म्हणजे झालं. Anyway, खरे काकांनी सर्व वाचकांवर सोडले आहे, तेव्हा आण़खीन चर्चेत कोणालाही रस नसावा. -शरभ
प
पिलीयन रायडर Fri, 08/19/2016 - 15:29 नवीन
रुपालीने काय करावं हा तिचा प्रश्न आहे. काही मत व्यक्त करण्या इतपत मुळातच माहिती आपल्या हातात नाही. पण तुमच्या मित्राची परिस्थिती समजु शकते. मागच्या पिढीच्या लोकांना काही गोष्टी पचवायला जड जातातच. पण मुळात तुमच्या हातात कधी काही कंट्रोल नसतोच, तेव्हा उगाच हळहळ करण्यात काय हशील? वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे मुलीने मुलाला आधीच सगळे नीट सांगितले असेलही. तेव्हा कुणी फसवलं गेलं असेलच असंही नाही. तेव्हा तुमच्या मित्राला काहीच विचार करण्याची गरज नाही. त्या मुलीच्या नजरेत तिरस्कार किंवा आणखी काही दिसत असेलही.. पण कदाचित त्या मुलीलाही तुमच्या मित्राच्या डोळ्यात तिरस्कार दिसत असेल.. मला वाटतं झाल्या प्रकरणाची ओळखही न दाखवुन मित्राला नेहमीसारखे भेटत रहाणे हेच सर्वांसाठी उत्तम असेल. आणि खरंच.. शृंगापत्ती म्हणजे काय? (ती शिंगे अडकल्याची एक गोष्ट आहे... तिच्याशी काही निगडीत आहे का?)
च
चंपाबाई Fri, 08/19/2016 - 15:45 नवीन
पटला नाही. १ . रुपालीने लgnaa आधी काय करायचे , हा तिचा प्र्श्न आहे. २. मेडिकल एथिक्स नुसार हे डॉक्टरला उघड न करण्याचे बंधन आहे. जर नॉन डिस्क्लोजरमुळे समोरच्या व्यक्तीला धोका असेल तरच डॉक्टर उघड करु शकतो. उदा. एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती स्टेटस दडवुन निगेटिव्ह व्यक्तीशी लग्न करत असेल तर डॉक्टर त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी माहिती उघड करु शकतो. पण अ‍ॅबॉशन चा इतिहास असणे यात असे काही नसल्याने अशी माहिती उघड केल्यास डॉक्टरच गुन्हेगार ठरेल.
स
सुबोध खरे Fri, 08/19/2016 - 15:56 नवीन
माहिती कुठे, कुणी आणि कुणाला उघड केली हे समजेल का? कि असंच?
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Fri, 08/19/2016 - 16:38 नवीन
पण उघड न केल्याची बोच असणे आवश्यक नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 08/19/2016 - 17:02 नवीन
बोच कुणाला आहे?
↩ प्रतिसाद: चंपाबाई
र
राजेश घासकडवी Fri, 08/19/2016 - 17:38 नवीन
बोच कुणाला आहे?
अहो तुमच्या मित्राला बोच आहे, त्याला चार दिवस अस्वस्थ वाटलं असं तुम्हीच लिहिलं आहे ना! जर त्याला कसली बोच नसेल तर या लेखाला काय अर्थ राहातो? मग मूळ लेख आणि बहुतांश प्रतिसाद बादच होतात की.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:34 नवीन
मेडिकल एथिक्स नुसार हे डॉक्टरला उघड न करण्याचे बंधन आहे. पण अ‍ॅबॉशन चा इतिहास असणे यात असे काही नसल्याने अशी माहिती उघड केल्यास डॉक्टरच गुन्हेगार ठरेल. चंपाबाई / मोगा / जामोप्या/ हितेश राव यांनी पहिल्यांदा असे बेलगाम बेदरकार आरोप केले. त्यात कुठे आणि कसे हे विचारल्यावर सिद्ध करणे शक्य नाही. म्हणून "बोच असल्याबद्दल" लिहितात. म्हणून ते विचारले.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Sat, 08/20/2016 - 22:21 नवीन
चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला कुठचेच आरोप दिसत नाहीत. त्यांनी 'तुमच्या मित्राने बोच ठेवून घेऊ नये' असं म्हटलेलं आहे. त्यावर तुम्ही अचानक 'बोच आहेच कुणाला' असा प्रश्न विचारला आहे. असो. मला असं वाटतं आहे की या लेखापोटी तुम्ही अपसेट झालेला आहात. तसं करून घेण्याची गरज नाही असं मनापासून वाटतं. तुम्ही जो प्रश्न मांडलात त्याच्या अनेक वेगवेगळ्या पैलूंचा विचार करून मिपाकरांनी आपापली मतं मांडलेली आहेत. प्रत्येकच मत प्रत्येकाला पटायला हवं असं नाही. मात्र या चर्चेकडे थोडं त्रयस्थपणे एक चर्चा म्हणून पाहा, आणि वैयक्तिक घेऊ नका ही विनंती करतो. मला आणि बहुतांश इतर मिपाकरांना तुमच्याबद्दल आदरच आहे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sun, 08/21/2016 - 04:23 नवीन
ब्वॉर
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
व
वरुण मोहिते Fri, 08/19/2016 - 17:12 नवीन
अहो साधा अनुभव आहे डॉक खरे यांचा ..त्यात इतका काय ...कुठेही त्यांनी नाव घेतला नाही त्यांना इतक्या अश्या कंमेंट चा कारण कांय
आ
आजानुकर्ण Fri, 08/19/2016 - 17:26 नवीन
'ती' मुलगी आणि तिचा नवरा यांचा संसार सुखाने चाललाय! तुमच्या मित्राचे सदर कुटुंबाशी खरंच जवळचे संबंध असते तर लग्नापूर्वी हे नाते जुळवण्याच्या प्रक्रियेत तुमच्या मित्राचा सल्ला त्या कुटुंबाने घेतला असता. मात्र त्याला चारचौघांसारखं डायरेक्ट लग्नात जेवायलाच बोलावलंय. त्यामुळं तुमच्या मित्राचा सल्ला कितपत महत्त्वाचा आहे हे त्या कुटुंबाने यापूर्वीच दाखवून दिलंय. आता उगीच चहापाण्यापुरते संबंध असल्यानंतरही ह्या प्रसंगाबद्दल मित्राला टोचणी लागते आहे म्हणजे त्या कुटुंबाच्या संदर्भात त्याने स्वतःची प्रतिमा विनाकारण महत्त्वाची असल्याचा गैरसमज करुन घेतलेला दिसतोय. तुमच्या मित्राला काय वाटतंय याचा त्या कुटुंबाला काडीचाही फरक पडत नाहीये. मात्र निव्वळ आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आहोत या गैरसमजात त्याने विनाकारण संशयाची काडी घालू नये ही एक माफक अपेक्षा आहे.
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 07:08 नवीन
हे काहि पटले नाही. सर्व साधारणपणे मुलगा/ मुलगी बघायला जाताना फक्त जवळचे नातेवाईकच जातात. बहुसंख्य मित्रांना थेट लग्नालाच बोलावले जाते. निर्णय प्रक्रियेत या डॉक्टरांचा सहभाग नव्हता यात नवल नाही परंतु म्हणून त्यांना वाईटही वाटू नये हे पटत नाही. यात स्वतःची प्रतिमा मोठी करून घेण्याचा काय संबंध आहे. त्याने "संशयाची काडी" घालू नये. यात या डॉक्टरांनी काहीच केलेले नाही कि त्याने मित्राला मुलीबद्दल काही सांगितले आहे असेही नाही. एकदा लग्न "झाल्यावर" दुधात मिठाचा खडा घालण्याला काही अर्थ नाही हे त्यालाही समजते .
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 08/22/2016 - 04:23 नवीन
हे मान्य!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राजेश घासकडवी Fri, 08/19/2016 - 17:40 नवीन
मला आणखीन एक प्रश्न पडतो तो म्हणजे ज्या पुरुषामुळे रुपालीला गर्भधारणा झाली होती त्याच्याबद्दल. या कथेत कोणालाच त्याची ओळख नाही. पण त्याचंही कदाचित दुसऱ्या मुलीशी लग्न होईल. मग तोही डिफेक्टिव्ह माल समजला जाईल का? बीज सोडणारा पुरुष नामानिराळा, आणि क्षेत्र असलेली स्त्रीच बदनाम हे अन्याय्य आहे.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा