मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७
नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
💬 प्रतिसाद
(405)
फ
फेदरवेट साहेब
Fri, 01/27/2017 - 13:22
नवीन
ह्या महापालिकेत असलेला पैसा हे खरे दुखणे आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Fri, 01/27/2017 - 17:01
नवीन
पैसा हे एक दुखणे आहेच पण त्यापेक्षाही मुंबईसारख्या भारतातील एका अतिमहत्त्वाच्या शहरावर कोणाची सत्ता राहते हे सगळ्याच पक्षांना जास्त महत्त्वाचे वाटते.
शिवसेनेसाठी मुंबई / ठाणे जिंकणे म्हणजे महाराष्ट्राचे राज्य मिळविण्यासारखे आहे तर भाजपाला राज्य मिळुनही मुंबई नाही मिळाली तर बरेच काही गमावल्यासारखे वाटेल. तर राष्ट्रवादीला / काँग्रेसला मागील निवडणूकीपेक्षा १ ही सीट जास्त मिळणे ही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नवसंजिवनी फुंकण्यासारखे आहे. रिपाईंना त्यांचे ठराविक पॉकेट सोडले तर कोठेही वाव नाही. यात सगळ्यात जास्त मज्जा आहे ती एमआयएमची. काँग्रेसची / सपाची जागा ते घेऊ शकतात. अर्थात मुंबईतील मुस्लीम मतदारांची आणि तुलनेने एखाद्या छोट्या शहरातल्या मुस्लीम मतदारांचे विचार सारखेच असतात असे म्हणणे चुकीचे ठरेल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 01/27/2017 - 16:24
नवीन
मलाही. उद्धव ठाकरे म्हणत आहेत की युतीमुळे शिवसेनेची २५ वर्षे सडली. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा मतीतार्थ हा की युती झाली त्यावेळी शिवसेनेपेक्षा भाजपचे अस्तित्व नगण्य होते आणि शिवसेनेमुळेच भाजप महाराष्ट्रात फोफावला. हे म्हणणे अर्धसत्य नसून पूर्णच असत्य आहे.या उधोजीरावांच्या समर्थकांना काहीही वाटत असले तरी आकडे काहीतरी वेगळेच बोलत आहेत.
१९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती?
१९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती?
इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा दिला.इतकी वर्षे भाजपने शिवसेनेला इतके मोठे स्थान का दिले हे कोडेच आहे. शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड कसा होता? युतीच्या काळातही प्रत्येक वेळी भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त होता.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये २००२ चा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेने भाजपने उभ्या केलेल्या उमेदवाराविरोधात मत दिले आहे.शरद पवार जर पंतप्रधान होणार असते तर मराठीपणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पवारांनाही पाठिंबा दिला असता यात अजिबात शंका नाही.पुण्यातील शिवाजीनगरसारखा भाजपचा हक्काचा मतदारसंघ युतीत असताना शिवसेनेने दादागिरी करून इतकी वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवला होता.पण २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर या मतदारसंघात भाजपने अगदी आरामात विजय मिळवला.
इतकी वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ मध्ये शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा मिळविल्या या कारणावरून लगेचच १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितला.रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे ज्या मतदारसंघातून निवडून येत असत तो मतदारसंघ भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या 'राजहट्टाखातर' सोडून द्यावा लागला होता.तसे असेल तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेमुळेच इतके मोठे यश मिळाले होते हे अगदी कोणीच नाकारू शकत नाही.तरीही शिवसेना भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये ४ जागाही जास्त द्यायला तयार नव्हती.भाजपने यांची दादागिरी का सहन केली हा प्रश्नच आहे.
१९९० मध्ये विधानसभेच्या १७४ जागा शिवसेनेने तर उरलेल्या ११४ जागा भाजपने लढविल्या होत्या. अगदी २००९ पर्यंत भाजपने लढविलेल्या जागांचे प्रमाण जवळपास तितकेच राहिले. फार तर ३-४ जागा जास्त मिळाल्या. तर लोकसभेत मात्र शिवसेनेला मिळालेल्या जागांचे प्रमाण लक्षणीय वाढले. १९८९ मध्ये शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना तर धनुष्यबाण हे चिन्हही मिळालेले नव्हते. १९८९ पासून २०१४ पर्यंत शिवसेनेला लोकसभेच्या जागा मात्र वाढवून मिळाल्या पण भाजपच्या विधानसभेच्या जागा मात्र फार वाढल्या नाहीत.
काल उद्धव ठाकरे म्हणाले की १९९८-९९ मध्ये जयललिता आणि ममता बॅनर्जी वाजपेयींना त्रास देत असताना शिवसेना मात्र वाजपेयींच्या पाठीशी खंबीरपणे होती आणि शिवसेनेने कधीच वाजपेयींना त्रास दिला नाही. उलट आपल्या कोट्यातली मंत्रीपदे जयललितांना द्यायची तयारीही बाळासाहेबांनी दाखवली होती. हे बोलताना उध्दव एक गोष्ट सोयीस्करपणे विसरले.आणि ती म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रातले मनोहर जोशींचे सरकार भाजपबरोबर होते आणि दिल्लीत वाजपेयींना त्रास दिला असता तर त्याचे परिणाम मुंबईत भोगावे लागले असते. मुंबईतील सत्ता गेल्यावर शिवसेना तितकी सज्जन राहिली होती का? वाजपेयींची १९९९ नंतरची टर्म त्यापूर्वीच्या टर्मपेक्षा बरीच जास्त स्थिर होती. तरीही केंद्राच्या 'जागतिकीकरणाच्या' धोरणामुळे कामगारांपुढच्या अडचणी वाढत आहेत असे म्हणत त्याविरूध्द एप्रिल २००१ मध्ये शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचवेळी मनोहर जोशी अवजड उद्योगमंत्री होते याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. सुरेश प्रभू हे वाजपेयींच्या मर्जीतले मंत्री होते. त्यांना बाळासाहेबांनी राजीनामा द्यायला लावला होता.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने जास्त जागांची मागणी केली (ज्या आधारावर १९९६ मध्ये शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला होता) तेव्हा शिवसेना अजिबात तडजोड करायला तयार नव्हती. मग प्रचारात "नरेंद्र मोदींचे मंत्रीमंडळ म्हणजे अफझलखानाचे सैन्य","जसे आदिलशहा, कुतुबशहा तसे अमित शहा" असे मोती त्याच उध्दव ठाकरेंनी काढले होते. नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांचा उल्लेख प्रचारसभेत करून खास शिवसेना स्टाईल असंस्कृतपणाचे प्रत्यंतर आणून दिले. त्यानंतर सत्तेत असून शिवसेना विरोधी पक्षांपेक्षाही वाईट पध्दतीने वागत आलेली आहे. दिल्लीत केजरीवाल जिंकल्यावर मुद्दामून केजरीवालांचे अभिनंदन करायचा फोन उध्दव ठाकरेंनी केला. आता गोव्यामध्ये भाजपमधून बाहेर पडलेल्या गटाबरोबर युती करून भाजपचा पराभव करायची कारस्थाने चालू आहेत.
असला बेजबाबदार मित्रपक्ष दूर झाला हे चांगलेच झाले. असे म्हणतात की पाठीत खंजीर खुपसणार्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला.शिवसेनेविषयी नेमके हेच मलाही वाटत आहे. ही गोष्ट बरीच आधी व्हायला हवी होती ती आता झाली आहे. अपेक्षा एकच की शिवसेना बाहेर पडल्यावर त्याजागेवर राष्ट्रवादी काँग्रेस नको. तसे झाले तर विधानसभा निवडणुकांमध्ये तरी माझे मत भाजपला नक्कीच नाही.गरज पडल्यास सत्ता गेली तरी हरकत नाही पण शिवसेना नको आणि राष्ट्रवादीही नको.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 01/27/2017 - 17:27
नवीन
फार छान प्रतिसाद गॅरीभाऊ!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 01/27/2017 - 18:09
नवीन
जबरदस्त प्रतिसाद आहेत ट्रुमन यांचे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 01/28/2017 - 17:42
नवीन
मिसळपाववर एखादा आयडी फॉलो कसा करतात?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 01/27/2017 - 16:37
नवीन
मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील असे वाटते. याचे कारण म्हणजे महापालिका निवडणुका स्थानिक पातळीवरच लढविल्या जातात. त्यामुळे स्थानिक पातळीवर लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे इत्यादी गोष्टी महापालिका निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त महत्वाच्या ठरतात. मुंबईत या दोन्ही गोष्टींमध्ये शिवसेनेचा हात इतर कोणता पक्ष धरू शकणार नाही. एक उदाहरण द्यायचे झाले तर मी शाळेत असताना ठाण्याला राहायला होतो. आमच्या भागातून १९८६ पासून शिवसेनेचे विलास सामंत हे महापालिकेवर निवडून जात आहेत. आमच्या भागात अनेक नागरीकांना ते नावाने ओळखतात. असाच जनसंपर्क मुंबईतही शिवसेनेच्या नगरसेवकांचा, कार्यकर्त्यांचा आहे हे नक्कीच. त्याचा फायदा महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला होईलच. भाजपने कितीही जोरदार टक्कर दिली तरी या बाबतीत शिवसेनेचे पारडे जड असेल असे वाटते.
त्यातूनही शिवसेनेविरूध्द "अॅन्टी इन्कबन्सी" येऊ शकेल ही शक्यता आहेच. १९८५ पासून १९९२ ते १९९६ हा अपवाद वगळला तर शिवसेनेची सत्ता मुंबईत राहिली आहे. मुंबईतले रस्ते, झोपडपट्ट्या इत्यादी गोष्टी कशा आहेत हे मुंबईकरांना चांगलेच माहित आहे. आणि निवडणुका जवळ आल्यावर शिवसेनेला पंचवार्षिक मराठी उमाळे येतात तसे यायला लागलेही आहेत. पण त्यातून निष्पन्न काही होत नाही हे लक्षात येऊन पूर्वीइतक्या प्रमाणावर लोक त्या उमाळ्यांना भूलले नाहीत तर मात्र शिवसेनेला जास्त नुकसान होऊ शकेल.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 01/28/2017 - 17:44
नवीन
मुंबई मधे मराठी भाषिकांची संख्या २७ % आहे. भाजपाशी युती होती तेंव्हा इतर भाषीय मते त्यांना मिळत होती. आत्ता ही शक्यता कमी. २७% मराठी मते चार पाच पक्षात विभागली जाणार . शिवसेनेने सुरवातीच्या दिवसात लुंगीवाल्यांचा ( दाक्षिणात्य ) मंडळींचा आणि नन्तरच्या काळात भय्या ( उत्तर भारतीय ) मुंबईकरांचा विरोध केला. गुजराती, जैन, मारवाडी हे नेहमी भाजपाच्या बाजूने असतात. बाळासाहेब आता नाहीत. या सर्व गोष्टी शिवसेनेचा मुंबईत मोठा पराभव दर्शवितात.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Fri, 01/27/2017 - 17:06
नवीन
आजचा प्रवाह असेच सांगतो, मात्र यावेळेस खरोखरीच चुरशीची लढाई असल्यामुळे काही सांगणे शक्य होणार नाही. माझ्या एका मित्राने मागील निवडणुकांत एक सॉफ्टवेअर बनविले होते त्यात प्रत्येक वॉर्डाची लोकसंख्या, धर्माप्रमाणे लोकसंख्या, भाषेप्रमाणे लोकसंख्या, त्या त्या वार्डातील गेल्या काही निवडणुकींचे निकाल, प्रत्येक वेळ प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते असा बराच विदा होता. इतके सुक्ष्म काम बघून मी थक्कच झालो होतो. अर्थात प्रत्येक वॉर्डातील उमेदवार जाहिर होईपर्यंत काही अंदाज लावणे अवघड आहे.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Fri, 01/27/2017 - 17:11
नवीन
निश्चितच चांगला नाही . भ्रष्टाचाराचा बोलायचं तर भाजप पण सत्तेत होती . आजही असलेल्या ३५ नागरसेवकांपैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत भाजप चे नगरसेवक कार्यक्षम आहेत. अमराठी वस्तीत किंवा गुजराती बहुल भागात मिळणारी मत आणि तिथल्या कामाची टक्केवारी टेंडर ह्यात अमराठी कंत्राटदार जास्त आहेत . आज केवळ मोदींच्या नावावर सगळीकडे मत मागणं चालू आहे. कोणीही पक्षात या पावन करून घ्या चालायचा .वैयक्तिक मत म्हणाल तर भाजप बिलकुल स्वच्छ नाही. त्यामुळे माफियाराज वैग्रे बाता त्यांनी बंद कराव्यात . दुसरा असा आपण जे पूर्वीचे मतदारसंघ म्हणत आहेत तिथे जनसंघाची विचारसरणी पूर्वीपासून रुजलेली होती . त्यामुळे त्यांचे हक्काचे मतदार संघ होते. १९९६ ला ठाण्यात आनंद दिघ्यांचा खूप प्रस्थ होता त्यामुळे ती जागा सोडावी लागली पण त्यानंतर गेल्या २१ वर्षात एक अपवाद वगळता शिवसेना ती जागा हरलेली नाही . रामभाऊंना नंतर राज्यसभेवर पाठवण्यात आलं. लोकसभेसाठी एकही जागा मिळाली नाही का रामभाऊंसाठी भाजप ला? . तेव्हाच भाजप आणि आताचा ह्यात खूप फरक आहे . प्रश्न मोठ्या भावाचा तर निश्चित पणे ठाकरे आणि दुसरी गोष्ट १९९५ ला सिंगल पार्टी म्हणून काँग्रेस च्या जागा जास्त होत्या मतांची टक्केवारी पण जास्त होती तरी युती होती म्हणून सत्ता आली आणि मा=हत्वाचा म्हणजे कधी नव्हे ते ४५ अपक्ष आमदार निवडून आले . ते सर्व युतीत सहभागी झाले कारण बाळासाहेब ठाकरे . त्यामुळे मोठा भाऊ छोटा हे सर्वं चालू झालं. पुढे शिवसेनेतली फाटाफूट आणि ४-२ जागा वरखाली इतकाच भाजप सेनेचा चालू होता आता जे आहे भाजप ते मोदींची कृपा . भाजप नेतृत्व मुंबईतला तर हास्यास्पद आहे . देशपातळीवर आणि महानगर पालिकांसारख्या ठिकाणी वेगळा विचार होत असतो त्यामुळे सगळीकडे मोदींच्या नावावर मत मागणं भाजप ला परवडणार नाही भविष्यात .
अवांतर - आजच संघाच्या मा गो वैद्यांनी सांगितलं कि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यात चूक काय ?? तस पाहता बरोबर आहे कारण राष्ट्रवादीतले अनेक भाजपात आहेत सध्या :)))
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 01/27/2017 - 17:24
नवीन
मनसेने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याचा बातम्या माध्यमे दाखवत आहेत. विनाशर्त युतीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्या दाखवत असल्यामुळे माध्यमांची "सूत्रे" विश्वसनीय वाटत नाहीयेत. जर युतीची चर्चा सुरु असेल तर दादरच्या जागांच्या पुढे कशी सरकणार हाच प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
ज
जानु
Fri, 01/27/2017 - 17:52
नवीन
मुंबई सेनेकडे रहावी हे मला देखील वाटते. भाजपा त्या बाबत महाराष्ट्राच्या मताशी फारशी प्रामाणिक नाही असे दिसते. भाजपाला सेना नको आहे. कारण हिंदु मतात सरळ भागीदार त्यांना नको आहे. आता युती तुटलीच आहे. सेनेला मागील कारभाराचा परीणाम आणि सत्तेविरोधी मतांचा सामना करावा लागेल. त्यातच राष्ट्रवादीशी चोरुन चाललेले प्रकरण लोकांपासुन लपुन नाही. मराठा समाजाला सत्तेपासुन फारकाळ लांब राहणे शक्य होणार नाही. ही मंडळी भाजपाकडे जाण्यासाठी एक कारण शोधत आहेत. ते या निवडणुकीने मिळु शकते. मनसे आणि राष्ट्रवादी युती न करता भाजपाला मदत करतील, असे झाले तर सेना मागे पडते. मनसे आणि राष्ट्रवादीला असे केले तर भविष्यात उभे रहायला जागा राहिल. दोघांना गमवण्यासाठी काही नाही. मदत केली तर काही हातात पडण्याची शक्यता. सेनेला जागा दाखवली की त्यांची वायफळ बडबड बंद होईल. पण जर का यातुन सेना मोठी झाली तर मग मात्र बरीच खळबळ होणार हे नक्की.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 01/27/2017 - 19:20
नवीन
मुंबई आणि ठाण्यातील निवडणुका युती तुटल्यामुळे खूप रोचक झाल्या आहेत. अर्थात सगळेच पक्ष बेईमान आणि भ्रष्ट असल्यामुळे कोण जिंकेल यात जास्त इंटरेस्ट नाहीये, पण मुंबई आणि ठाण्यात ताकद कोणाची हे जाणून घ्यायची मात्र उस्तुकता आहे. भाजप हा संधिसाधू लोकांचा पक्ष झाला आहे, आयाराम आणि गयाराम यांना महत्व देवून हा पक्ष स्वताचा जनाधार तात्पुरत्या लाभासाठी गमावून बसणार आहे. शिवसेनेची अवस्था तर अवघड वाटत होती, शिवसेनेत दोन गट असल्यासारखे वाटत एक ज्यांना सत्तेची फळे मिळतात तो आणि दुसरा ज्यांना मिळत नाही तो. उध्दव ठाकरेंनी युती तोडून शिवसेनेतील मोठ्या अस्वस्थेला मोकळी वाट करून दिली अस वाटतय, आता शिवसेना मराठी मते एकवटेल आणि भाजप विरोधी जागा व्यापून घेयील. मात्र सरकार मध्ये राहून हा स्वाभिमान तकलादू आहे हे हि दिसून येतंय. कॉंग्रेस ला युती तुटल्यामुळे मोठा तोटा होईल असे दिसतंय, कॉंग्रेस ने समाजवादी पक्षाबर आघाडी करायला हवी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष खायाला फार आणि भुई ला भार आहे. जर मुंबई आणि ठाणे निवडणुका शिवसेना जिंकली तर सरकार मधून बाहेर पडणार नाही मात्र आक्रमक होईल. पण जर निवडणूक हरली तर मात्र रडीचा डाव करून सरकार मधून बाहेर पडू शकते (अंदाज).
मला ह्या निवडणुकीत उस्तुकता मनसे किती जागा मिळवतेय ह्यावर आहे, कारण ह्या पक्षाच भविष्याच एकप्रकारे ह्या निवडणुकीवर अवलंबून आहे. खर तर राज ठाकरे नि मोदी वर जपून टीका करायला हवी कारण शिवसेना पेक्षा मनसे ला भाजप बरोबरची युती फायद्याची होईल. भाजप ला एक मराठी पक्ष चेहरा म्हणून सोबतीला लागणार आहे भविष्यात, यामध्ये मनसे अगदी फिट्ट बसतोय. शिवसेना-मनसे युती मला तरी प्रोमिसिंग वाटत नाही कारण दोघांचा मतदार एकच आहे. त्यात उध्दव ठाकरेंना राज ठाकरे बद्दल असुरक्षिता वाटत असणार कि मनसे बर युती केल्यास शिवसेना हि राज यांच्या प्रभावा खाली येयील (माझा अंदाज). पहिल्यांदा राज ठाकरे यांचाविषयी विरोध वाटायचा कारण त्यांची भाड्खावू भाषणे आणि फक्त भावनिक आवाहने, नंतर जेंव्हा राज ठाकरे यांनी बनवलेली ब्लू प्रिंट पहिली तेंवा मात्र आपुलकी वाटू लागली, आज मनसेची दयनीय अवस्था पाहून सहानभूती वाटतेय.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 01/27/2017 - 21:40
नवीन
गॅरी ट्रुमन,
त्याचं काय आहे की शिवसेना हा भाजपप्रमाणे राजकीय पक्ष नाही. ती एक चळवळ आहे. १९८० च्या मध्यावर राजीव लाट जोरात होती. तेंव्हा काँग्रेसविरोधी जागा पुलोदने व्यापलेली होती. मात्र पवारांनी काँग्रेसविरोधी भूमिका सोडून राजीव गांधींच्या पायी विलीन होणं पत्करलं. मग काँग्रेसविरोधी राजकीय अवकाश उत्पन्न झाला तो व्यापण्यासाठी भाजपकडे ना मनुष्यबळ होतं, ना धडाडी. नेमक्या याच पोकळीत शिवसेना लहानाची मोठी (म्हणजे मुंबईठाण्यातून बाहेर पडून राज्यव्यापी) बनली. आमदार खासदारांचा हिशोब नंतर चित्रात येतो.
भाजप जर मोठा भाऊ असेल तर मोदी येईपर्यंत स्वबळावर सत्तेत का येऊ शकला नाही?
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : युती भाजपने तोडली आहे, शिवसेनेने नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 01/28/2017 - 06:44
नवीन
हो शरद पवार १९८७ मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यावर शरद पवारांच्या कंपूतील काँग्रेसविरोधी मतदार शिवसेनेकडे गेले. शिवसेनेला हा फायदा विशेषतः मराठवाड्यात झाला. जयप्रकाश मुंदडा हे पवारांकडून शिवसेनेत आलेले नेते मला नक्कीच माहित आहेत. इतरही असतील. अशा तरूण नेत्यांना बाळासाहेब ठाकर्यांची आक्रमक आणि खळ ख्ट्याक शैली अधिक आकर्षक वाटली. आजही मनसेला तरूणांचा अधिक पाठिंबा मिळतो त्याचे कारणही हेच आहे--तरूणांना आक्रमकपणा जास्त आकर्षित करतो. भाजपकडे त्या अर्थी धडाडी नव्हती असे म्हणता येईल पण मनुष्यबळ नव्हते हे म्हणणे तथ्याला धरून नाही.
हा प्रश्न समजला नाही. भाजप शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष असला तरी काँग्रेसपेक्षा नक्कीच मोठा नव्हता. त्यामुळे १९८० च्या दशकात थोडीच सत्तेत येऊ शकणार होता?
हो भाजपनेच तोडली.पण ती शिवसेनेने आडमुठेपणा दाखविल्यामुळे. जर कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या या कारणावरून १९९६ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने मागून घेतला असेल तर त्याच न्यायाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणे शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे आणि शिवसेनेला कधी नव्हे एवढ्या १८ जागा मिळाल्या त्या मोदीलाटेमुळे हे स्पष्ट झालेले असतानाही शिवसेनेने भाजपला जास्त जागा द्यायची तयारी दर्शवायला हवी होती. ते न झाल्यामुळे युती तोडली. एक भाजपसमर्थक म्हणून त्याचे अजिबात वाईट मला वाटत नाही. पण उद्या तिथे राष्ट्रवादी येऊन बसला तर नक्कीच वाईट वाटेल.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sat, 01/28/2017 - 07:34
नवीन
बाकी सत्तेत कोणीही येवो, मी त्या 'खंजीर' नावाच्या हत्यारावर कायमची बंदी घालणारे निवेदन सरकारला द्यायचा विचार करतोय. नेहमीच कोणता तरी पक्ष, नेता आपल्या मित्रांच्याच पाठीत खंजीर खुपसतो म्हणजे काय ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 01/28/2017 - 07:52
नवीन
चीनने भारतावर १९६२ मध्ये हल्ला केला तेव्हा चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले गेले होते. पाकिस्तानने १९९९ मध्ये कारगील घडवून आणले तेव्हाही पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला (पीठ मे छुरी की असे काहीतरी) म्हटले गेले होते. १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे महाराष्ट्रातील सरकार पाडले तेव्हाही "शरद पवारांनी माझ्या पाठित खंजीर खुपसला" अशी प्रतिक्रिया वसंतदादांनी दिली होती.
तेव्हा सांगायचा उद्देश हा की खंजीर खुपसणे या वाक्प्रचाराचा राजकारणात केला जाणारा उपयोग बराच जुना आहे :)
हे बाकी खरे. महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी बिल्डरकडून पैसे खाऊन अनधिकृत बांधकामे उभी करून देणे, कंत्राटदारांकडून टक्केवारी वसूल करून कंत्राटे देणे इत्यादी प्रकार थांबणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेत सत्तेत कोणीही आले तरी सामान्यांना फार फरक पडणार नाही. राज्यात किंवा केंद्रात कोणी सत्तेवर आले तर आपल्या आयुष्यात थोडा तरी बदल घडायची शक्यता असते.पण महापालिकेत अगदी कोणीही आले तरी त्यामुळे काही फरक पडेल असे वाटत नाही.
तरीही शिवसेनेचा राज्यपातळीवरच्या माजाचा स्त्रोत मुंबई महापालिका या देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेतील सत्तेत आहे. तो शिवसेनेच्या माजाचा स्त्रोत मात्र बंद व्हावा असे फार वाटते.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Sat, 01/28/2017 - 08:23
नवीन
१९९६ चा उदाहरण द्यायचा आणि आता मोदीलाट मुळे सगळं मलाच वाढवून द्या असा नसता . युती आहे कित्येकदा एकमेकांची मदत होत असते एकमेकांना ,. ह्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी हुशार . भाजप आणि सेनेच्या काही वाचाळ लोकांना आवरला असता तर नीट जमलं असतं. पण कधी काहीतरी करून मोदींना दाखवतो अशी घाई झालीये भाजपाला . बहुमत कोणालाच मिळणार नाहीये .पण भाजप च्या हातात मुंबई नको असे मनापासून वाटते कारण त्यांचे अर्थकारण आणि गुजराती समाजाच्या सुप्त इच्छा संदर्भ अनेक आहेत कधी विषय निघाला तर सांगेन. मुंबई महानगरपालिकेसारखा अजस्त्र कारभार सांभाळणं खायचं काम नाही आहे . त्यातकेंद्र सरकार च्या परवानग्या ,एमएमआरडीए ,राज्य सरकार परवानग्या, महापौरांना असलेले कमी अधिकार अश्या एक ना दोन अनेक कटकटी आहेत. अजूनतरी भाजप ने पूर्ण बहुमतात एकतरी महानगर पालिका चांगली चालवली आहे असं उदाहरण नाही . दिल्ली महानगर पालिकेत १४ वर्ष सत्तेत असलेल्या भाजपने मुबई पेक्षा अधिक भ्रष्टाचार करून ठेवलाय .
राज ठाकरेंना सध्यातरी सेनेसोबत जुळवून घ्यावा लागणार आहे .कारण नाशिक मध्ये त्यांना मदत होऊ शकते त्याची आणि इथे आता पर्यायच नाहीये त्यांना.आहेत तितक्या जागा वाचल्या तरी पक्षाला संजीवनी मिळेल . काय होता पाहणं रोचक आहे . कारण अनेक वॉर्डांची पुर्नरचना झालेली आहे . एमायएम ला जागा निश्चित मिळेल एक दोन तरी .
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 01/28/2017 - 17:19
नवीन
God save me from my friends, I can take care of my enemies.
- Log in or register to post comments
N
NiluMP
Mon, 02/06/2017 - 15:57
नवीन
निवडणुकीत उभा राहलेला प्रत्येक उमेदवार म्हणतो
मी मुंबईचा विकास करणार
मी म्हणलो ५ वर्षानी या
माझं मत तुमालाच
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 02/07/2017 - 10:35
नवीन
गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलन फेम हार्दिक पटेल मातोश्रीवर उध्दव ठाकरेंना भेटायला जाणार आणि शिवसेनेला पाठिंबा देणार अशा बातम्या आहेत. स्वतः बाळासाहेबांनी आयुष्यभर कधी जातीवर आधारीत आरक्षणाला पाठिंबा दिला नव्हता आणि अशा जातीवर आधारीत आरक्षणाची मागणी करणारा आज शिवसेनेला पाठिंबा द्यायला मातोश्रीवर येणार हे बघून बाळासाहेब "कुठे नेऊन ठेवलीय शिवसेना माझी" असे म्हणाले असते की काय असे वाटू लागले आहे.
हार्दिक पटेलच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेला किती गुजराती मते मिळतात हे बघायचे. पण शिवसेनेच्या मतदारांमध्ये 'भय्यां'प्रमाणेच 'गुजर**' चाही राग आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी शिवसेनेकडून त्या निवडणुकीला मराठी विरूध्द गुजराती असा रंग द्यायचाही प्रकार झाला होता. तेव्हा शिवसेनेच्या कट्टर समर्थकांना हा निर्णय रूचतो का हे बघायचे.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 02/07/2017 - 17:20
नवीन
हार्दिक आणि उद्धव यांच्या भेटी नन्तर हार्दिक हे गुजरात मधे शिवसेनेचा प्रचार करतील असे जाहीर झाले आहे. याचा अर्थ हार्दिक हे जरी भाजपाचे विरोधी असले तरी त्यांच्या मुंबईतील प्रचाराचा गुजराती मते शिवसेनेकडे वळवण्यासाठी उपयोग होईल असे या दोघांनाही वाटत नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 02/07/2017 - 10:35
नवीन
भाऊ तोरसेकर म्हणत आहेत की अमराठी मतांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली तर शिवसेना ही निवडणुक स्वबळावरही जिंकू शकेल. मला इन जनरल भाऊंचे लेख आवडतात पण त्यांची शिवसेनेविषयीची मते पटत नाहीत.बहुदा ते मार्मिकचे उपसंपादक असताना त्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केले होते त्याचा परिणाम असावा. तरीही सगळी मराठी मते एकगठ्ठा शिवसेनेकडे गेली आणि अमराठी मतांमध्ये फाटाफूट झाली तर हा परिणाम बघायला मिळू शकेल. प्रश्न हा की सगळी मराठी मते एकगठ्ठा शिवसेनेकडे जातील का? मनसेने काही भागांमध्ये हजार-दोन हजार मते घेतली तरी तो निकाल फिरवू शकेल. तसेच आज मुंबईत पराग आळवणी,आशिष शेलार, अतुल भातखळकर असे मराठी आमदारही आहेतच.तेव्हा भाजपलाही काही प्रमाणावर मराठी मते मिळतीलच. त्याचप्रमाणे सर्वच पक्षांनी थोड्याबहुत प्रमाणावर मराठी उमेदवार उभे केले आहेत. अशावेळी मराठी मतांवर शिवसेनेची मोनोपॉली असेल हे १००% खात्रीने सांगता येणार नाही. तसेच काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली असल्यामुळे अमराठी मतेही काँग्रेसकडे तितक्या प्रमाणावर जातील का हा पण प्रश्नच आहे. एकूणच रंगतदार परिस्थिती असणार आहे असे दिसते. शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला व्यक्तिशः कितीही वाटत असले तरी शिवसेनेच पारडे इतरांपेक्षा जड आहे असे दिसते.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 02/07/2017 - 13:09
नवीन
बऱ्याच जणांना आपण फेकींग न्युज तर वाचत नाही ना याचा प्रत्येय येईल पण....
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस धक्कादायक विजय नोंदवणार असे वाटते.
त्याची कारण मीमांसा अशी आहे-
१) गेली २ वर्षापासून शरद पवार "गोविंद बाग" येथे जास्त राहत नाहीत. ते मुंबईमध्ये राहण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. भले वैद्यकीय उपचार हे कारण दिले असलेले तरी पवार साहेब तिथे स्वस्त बसले नसणारच. संघटन अधिक मजबूत कशी होईल यावर नक्कीच काम केले असणार. (वांगी आणि डाळिंबाची बाग बघायला येतात कधी कधी)
२) मुंबई आणि विदर्भात कधीच आपले बस्तान मांडता आले नाही, ही खंत या आशावादी आणि महत्वाकांक्षी नेत्याला स्वस्त बसून देणार नाही.
३) नवी मुंबई मध्ये केलेला विकास जुन्या मुंबईतील जुन्या खोडांच्या डोळ्यासमोर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे करायचे याचा हातखंडा फक्त पवारांकडे आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यासारख्या येड्या गबाळ्याचे ते काम नाही. काँग्रेस, मनसे आणि एम आई एम सारखे चुटुरफुटूर पक्ष विकासाच्या बाबतीत खिजगिणतीत पण नाही.
४) सचिन अहिर सारख्या तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात संघटनेचे नेतृत्व ही सुद्धा जमेची बाजू आहे.
५) माथाडी कामगार, गिरणी कामगार, गोदी कामगार आणि त्यांच्या संघटनांवर पवारांचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. त्याचा देखील फायदा होऊ शकतो.
६) पवार स्पर्श म्हणजे मिडास टच...जैन, गुजराती आणि सिंधी समाज हे जाणून आहेत. त्यांच्या जुन्या मित्रांची पण आता चांगली बैठक बसत असेल.
७) परप्रांतीय लोकांना पवारांनी नेहमीच आधार दिला आहे. निरूपमला त्यांनी मुर्खात काढून त्याचे महत्व कमी करून टाकले आहे.
८) आता राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा. त्यांच्याकडे कोणताच चांगला पर्याय नाहीये. एम आई एम थोडीफार वळवळ करेल पण राष्ट्रवादीसाठी ते लाभदायक असेल.
एक राहिलं आहे मराठा मोर्चा, पण पवारांचा त्यासंबंधी किती हात आहे हे मला माहित नाही.
(अवांतर: पवार एवढं नाव वाचल तरी नेटकरी चवताळून उठतील. १९८० पासून चे खंजीर, एन्रॉन, मैद्याचा पोतं, दाऊद, लवासा, क्रिकेट, न सिद्ध झालेले घोटाळे, वगैरे वगैरे चालू होईल. पण त्याच्या आधी मी माझ्या घरला पळालेलो असेल)
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 02/07/2017 - 13:19
नवीन
विशुमित भाऊ..
जिथे कुठे असतील तिथे पवार साहेब स्वस्थ तर बसले नसतीलच ह्याबद्दल सहमत आहे.
साहेब बहुमत किंवा गेलाबाजार किंगमेकर तरी बनतील असे आपल्याला म्हणायचे आहे का ?
मुंबईत दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. पण तो किती आणि कोणाचा हा प्रश्न महत्वाचा आहे.
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Wed, 02/08/2017 - 09:13
नवीन
राष्ट्रवादी ने उभे केले? कधी?
इतिहास चाळता नवी मुंबई ही 'प्लॅन सिटी' उर्वरित मुंबई वरील ताण कमी करायला सिडको ने विकसित केल्याचे माहिती होते. त्याचे काम काँग्रेस/युती काळात झालेले असल्यामुळे श्रेय काँग्रेस अन युतीचे असेल पण खरे कौतुक सिडकोचेच व्हायला हवं की साहेब. शिवाय, मध्यंतरी नवी मुंबई महापालिका भवनावर संगमरवर लावायचे एक भ्रष्टाचाराचे उदाहरण आहेच की.
शिवाय विकास हे ध्येय असणाऱ्या पक्षाने तुकाराम मुंढे ह्यांच्यासारख्या सक्षम आयएएस अधिकाऱ्याला नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून घालवायला केलेला आटापिटा काय सांगतो ?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 02/08/2017 - 09:23
नवीन
श्रीकर परदेशीपण!
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 09:54
नवीन
श्रीकर परदेशींना पिंपरी चिंचवड मधील जनतेने घालवले आहे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 10:00
नवीन
कैच्या कै! श्रीकर परदेशींना "घालवल्या"वर जनतेसकट इतर सर्व विरोधी पक्षांनी केलेले आंदोलन विसरलात कि काय?
http://indianexpress.com/article/cities/pune/pcmc-chief-shrikar-pardeshi-shunted-out-pimpri-erupts-in-anger/
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 02/08/2017 - 10:10
नवीन
हा हा हा. पण लक्ष्मण जगताप एका अर्थी जनताच म्हणा =))
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 10:31
नवीन
जे इतर पक्ष होते त्यात जगताप साहेब गेले आहेत, हे कृपया विसरू नका.
सगळे माहिती आहे हो पिंकरी चिंचवडकरांना. जाऊ द्या तुम्ही वृत्तपत्रिकेवरच विश्वास मंदिरी मंडळी आहेत म्हंटल्यावर काय बोलायचं ?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 10:33
नवीन
जे इतर पक्ष होते त्यात जगताप साहेब गेले आहेत, हे कृपया विसरू नका.
सगळे माहिती आहे हो पिंपरी चिंचवडकरांना. जाऊ द्या तुम्ही वृत्तपत्रिकेवरच विश्वास ठेवणारी मंडळी आहेत म्हंटल्यावर काय बोलायचं ?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 02/08/2017 - 13:46
नवीन
जगताप आता भाजपात गेले म्हणून परदेशींना हटवलं ते बरोबर?? काय राव...
अनधिकृत बांधकामं पाडायला सुरूवात केली म्हणून परदेशींना हटवलं हे अगदी उघड आहे. तुम्ही करत बसा समर्थन.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 06:02
नवीन
<<<<अनधिकृत बांधकामं पाडायला सुरूवात केली म्हणून परदेशींना हटवलं हे अगदी उघड आहे.>>>
-- मग मी काय वेगळं म्हणालो. अनधिकृत बांधकामे फक्त काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नव्हती, सामान्य माणसांची बांधकामे सर्वात जास्त होती आणि अजून ही बऱ्याच ठिकाणी चालू सुद्धा आहेत. जी बांधकामे पाडण्याचे काम परदेशींनी चालू केले होते ते सामान्य जनेत्याच्या घरांनाच प्राधान्य दिले होते. म्हणून जनतेच्या रेट्याने परदेशींची गच्छन्ती झाली होती. या साठी राष्ट्रवादीने उघड समर्थन दिले नव्हते.
विधान सभेच्या निवडणुकीमध्ये पार्टी विथ डिफरेन्स वाले शास्तीकर करवी प्रश्न सोडवणार होते, याला तुम्ही सोयीस्कर बगल दिली आहे.
तसं परदेशी साहेबांचं उलट चांगलंच झालं PMO मध्ये जाऊन. आता समस्त भारतीयांना त्यांच्या सक्षम आणि कर्तव्यनिष्ठेचा फायदा होईल. होतं ते चांगल्यासाठीच होता, असं कुठेतरी वाचलं होतं.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 06:42
नवीन
<<<जी बांधकामे पाडण्याचे काम परदेशींनी चालू केले होते ते सामान्य जनेत्याच्या घरांनाच प्राधान्य दिले होते.>>>
-- कृपया वरील प्रतिसादातील हे वाक्य असे बदलावे.
"" जी बांधकामे पाडण्याचे काम परदेशींनी चालू केले होते त्यामध्ये सामान्य जनतेची घरे होती.""
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 14:24
नवीन
विशुमतीसाहेब, डोळ्यांनी पहिले आहे ते आंदोलन! त्यामुळे, असो!
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 06:07
नवीन
<<<<विशुमतीसाहेब, डोळ्यांनी पहिले आहे ते आंदोलन! त्यामुळे, असो!>>>
-- हप्र साहेब दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं..!!
आम्ही पण असली मेणबत्ती वाले आंदोलने खूप पाहिली आहेत.
(अवांतर: तुमच्या आंदोलनातील सहभागाने थांबले का हो परदेशी साहेब ? आमच्या "मूक मोर्चाने" तरी कुठे काय मिळाले?)
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 07:47
नवीन
आंदोलनांनेही परदेशी थांबले नाहीत म्हणजे? परदेशींच्या हातात होते का ते? आंदोलन आणि तीव्र विरोध असूनही ज्यांचा हातात होते त्यांनी परदेशींना हलवले हाच तर मुद्दा आहे. आणि विशुमती साहेब, दिसतं तसं खरंच नसतं हे वेगळे सांगणे न लागो!
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 12:22
नवीन
<<<परदेशींच्या हातात होते का ते?>>>
-- हेच म्हणालो मी माझ्या प्रतिसादात.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 10:16
नवीन
सिडको च कौतुक नक्कीच व्हायला हवं. पण कोणी सांगू शकेल जुन्या मुंबई मध्ये पवारांना कधीच आपलं बस्तान मांडता आलं नाही पण १० वर्ष पासून नवी मुंबई मध्ये राष्ट्रवादीला का बरं निर्विवाद यश मिळत असेल ? पूर्वग्रहदूषित विचार ठेवून उत्तर दिलं तरी चालेल.
तुकाराम मुंढे ना हटवण्यासाठी राष्ट्रवादी बरोबर शिवसेना आणि काँग्रेस पण अग्रेसर होती.
नुसता सक्षम अधिकारी असून चालत नाही. लोकप्रतिनिधींकडून जास्तीत जास्त लोक कल्याणाची कामे करून घेण्याचं कसब पण हवे असते.
असले स्टेण्टबाज अधिकारी फक्त प्रसिद्धीच्या झोतात असतात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/08/2017 - 10:24
नवीन
शहराच्या बाहेर असलेल्या ग्रामीण भागात काँग्रेस पूर्वीपासूनच होती. त्यातले बरेचसे शिलेदार राष्ट्रवादीत गेल्याने जरी शहरात नाही तरी शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीला बर्यापैकी यश मिळते.
पुणे शहराचा विचार केला तर शहराच्या मुख्य भागात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही. पुण्यात पूर्वी फक्त ८५ प्रभाग होते. परंतु १९९९ नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर विशेषतः अजित पवारांनी जाणीवपूर्वक पुणे शहराच्या सीमेवर असलेली अनेक छोटी गावे महापालिका हद्दीत भरती केली (उदा. कळस, धानोरी, वडगाव शेरी, पाषाण इ.) त्यामुळे आता तब्बल १६२ प्रभाग झाले आहेत. या गावातून जास्त प्रमाणात राष्ट्रवादीचेच नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काँग्रेसला मागे सारून पुण्यात राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर आली.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 10:36
नवीन
गावाकडची माणसं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला का बरं मानत असावीत? हे मोठं कोडं पडलंय मला.
मला वाटतं गावाकडच्या लोकांचा IQ कमी असावा बहुतेक शहरी लोकांपेक्षा.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 02/08/2017 - 13:43
नवीन
मोदी भक्त हा प्रकार तयार व्हायच्या बराच आधी महाराष्ट्रात पवार-भक्त हा प्रकार तयार झाला आहे. म्हणूनच "शेतकर्याकडे दुर्लक्ष!!", "शेतकरी आत्महत्या करतायत!!!" हे ओरडणारे लोक पवार महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री, केंद्रात १० वर्ष कृषीमंत्री, राज्यात १५ वर्ष सरकारात होते हे विसरून त्यांना शेतकर्यांचे कैवारी वगैरे म्हणत असतात.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 06:21
नवीन
<<<म्हणूनच "शेतकर्याकडे दुर्लक्ष!!", "शेतकरी आत्महत्या करतायत!!!" हे ओरडणारे लोक पवार महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री, केंद्रात १० वर्ष कृषीमंत्री, राज्यात १५ वर्ष सरकारात होते हे विसरून त्यांना शेतकर्यांचे कैवारी वगैरे म्हणत असतात.>>>
--
कृपया हा ऍग्रोवन चा लेख वाचा. म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांसाठी पवारांनी काय केले ते कळेल. फक्त म्हणू नका ऍग्रोवन पवारांचा पेपर आहे.
तुमच्याकडे काही आकडेवारी असेल तर त्याने ती खोडून टाकली तर मला खूप आनंद होईल. कारण पवारांना आणखी भरीव कामगिरी करता येऊ शकेल.
http://www.agrowon.com/Agrowon/20170131/4998508586890975862.htm
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/08/2017 - 13:59
नवीन
खेड्यापाड्यातील सरंजामशहा सुरवातीपासूनच काँग्रेस समर्थक होते. पवारांनी वेगळा पक्ष काढल्याबरोबर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील बरेचसे सरंजामशहा पवारांबरोबर गेले. त्यामुळेच शहराच्या सीमेवरील खेडी शहराच्या महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी जोरदार प्रयत्न करीत होती.
- Log in or register to post comments
श
शलभ
Wed, 02/08/2017 - 13:38
नवीन
-१
राष्ट्रवादीला साथ नाही तर लगेच स्टंटबाज..
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 02/08/2017 - 09:25
नवीन
शरद पवार म्हणजे कोणीतरी जादूगार, अगदी काहीही करु शकतील असं कसब अंगी असणारी व्यक्ती अस मानणार्या काही लोकांपैकी तुम्ही दिसता (निदान प्रतिसाद तसा वाटतो)
पवारांची ताकद इतकी अफाट असती तर ते पंतप्रधानपदी पोहोचू शकले असते. फार काय काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापल्यावर त्यांना स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 10:27
नवीन
<<<शरद पवार म्हणजे कोणीतरी जादूगार, अगदी काहीही करु शकतील असं कसब अंगी असणारी व्यक्ती अस मानणार्या काही लोकांपैकी तुम्ही दिसता >>
-- बिलकुल नाही. शरद पवारांना कधीच मी जादूगार किंवा कोणी मसीहा किंवा कोणी अवतार मानत नाही. ज्या व्यक्तीनेच कधी असल्या अंध श्रद्धाळू कल्पनांना थारा दिला नाही.
<<<पवारांची ताकद इतकी अफाट असती तर ते पंतप्रधानपदी पोहोचू शकले असते>>>
-- खंत वाटते की गुदगुल्या होतायत ? त्या पण बऱ्याच अंशी आपली महाराष्ट्रीय खेकडी विचारसरणी कारणीभूत आहे. (मला माहीतच होतं बरेच जण ९० च्या दशकात जाणार ते ). एका दृष्टीने बरंच झालं पवार पंतप्रधान झाले नाही ते. त्यांचा पण कधीच नरसिंह राव आणि मनमोहन सिंग झाला असता.
<<<<फार काय काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापल्यावर त्यांना स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही.>>>
-- लागा तयारीला मग. पुढची विधान सभा राष्ट्रवादीच्या गळयात टाकुयात.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 02/08/2017 - 09:32
नवीन
आपण कशाला घरला पळताय?
कुणी आले तरी आपल्याला काही फरक पडत नाय. रस्त्यातले खड्डकाविशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून हळूच पाडणार नाहीत, की ट्राफिक ठराविक पक्षाच्या लोकांना ज्याम करणार नाही.
बाकी मुंबईत निकालाचा ढोबळ अंदाजच व्यक्त करायचा तर
७०, ५५, ४५.४०,१७ असे लागतील असे वाटते. त्यातले कुणाला किती मिळतील अंदाज ठरवा.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 10:40
नवीन
<<<७०, ५५, ४५.४०,१७ असे लागतील असे वाटते. त्यातले कुणाला किती मिळतील अंदाज ठरवा.>>>
-- तुमचा हा आकड्यांचा अंदाज जर खरा ठरला तर हि सिरीज अशी असावी.... राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस , भाजप, इतर
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »