Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 05/16/2017 - 10:44
🗣 253 प्रतिसाद
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
73332 वाचन

💬 प्रतिसाद (253)
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/16/2017 - 10:52 नवीन

तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. ???

एकच लेखन अनेक संस्थळांवर कॉपी करण्यापूर्वी निदान योग्य ते बदल करण्याची खबरदारी घेतलेली बरी असते ;) :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/16/2017 - 10:53 नवीन
मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
हीहीहीहीही, तिकडं काय ठरलंय?
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/16/2017 - 10:55 नवीन
तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
पावनं, गल्ली चुकलासा जनु?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 10:57 नवीन
काय राव, तिकडचे पार्सल इकडे आले. तिकडे कोणते पार्सल पाठवलेत?
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 05/16/2017 - 11:01 नवीन
आपण अवतारी पुरुष आहात माहित होते . पण दारू ,बाया हे नाद करताना बुद्धी शाबूत असावी लागते . असो कधीतरी लेक्चर ला या आमच्या .कॉपी पेस्ट करून थकतो माणूस .
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 05/16/2017 - 11:43 नवीन
@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी मिसळपाव करावे.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 05/16/2017 - 11:43 नवीन
@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी मिसळपाव करावे.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 05/16/2017 - 11:49 नवीन
मराठी संस्थळावरचा सर्व्हे करायला ? दिवाळीच्या फराळाची ताटं फिरवल्यासारखे लेख फिरवताय . . . . ईगल गँग, बिच्छू गँगची गोष्ट माहिती आहे का???
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 05/25/2017 - 09:17 नवीन
येऊ द्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
प्रसन्न३००१ Tue, 05/16/2017 - 11:54 नवीन
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? प्रत्येकाने आपापली सोय बघावी... दुसर्यांना कशाला विचारत फिरायचं :-P
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 05/16/2017 - 14:30 नवीन
मुद्दा रोजच्या जगण्यातला आहे हे नक्की. सदस्यांनी चर्चा व्यक्तिगत न होऊ देता मुद्यावर आधारित ठेवली तर ती विवाहित, उलटसुलट विचारांचा गोंधळ झाल्यानं लग्न करु की नको या द्विधेत सापडलेले अविवाहित, चुकीची विचारसरणी पसरवणारे राजवाडे (पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले), तितकीच चुकीची धारणा असलेले टफि (मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते ) आणि एकूणात भारतीय विवाह संकल्पनेमागचा विचार या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा उहापोह होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/16/2017 - 15:02 नवीन
मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो
सर यावर तुम्ही एक धागा काढत नाही? अशा ज्ञानदायी धाग्यांची मिपाला गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 17:47 नवीन
मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते
वरच्या प्रतिसादात हे वाचलं नाही वाटतं तुम्ही. शोधा तो धागा आणि वेचा ते ज्ञानकण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 05/16/2017 - 19:51 नवीन
अरेरे, सरांच्या ज्ञानाचे कण वेचायचे म्हणजे मज पामराला होणे नाही. त्यांनी बैजवार धागा काढावा आणि सर्वांना उपकृत करावे. समस्त मानव प्रजाती त्यांची ऋणी राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
द
दीपक११७७ Tue, 05/16/2017 - 14:58 नवीन
@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी मिसळपाव करावे.
तिकडे काय नाव आहे आपले :-) ;-)
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 05/27/2017 - 13:40 नवीन
आणि ऐसी अक्षरे वर ग्रेट थिंकर धागे मात्र सेम असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Sun, 05/28/2017 - 09:32 नवीन
ती कडे पण मिपा करांना नावे ठेवतात का हे महाशय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
स
सुबोध खरे Tue, 05/16/2017 - 15:21 नवीन
हा फार मोठा आणि गहन विषय आहे. तरीही १) मुक्त शरीर संबंध असणे हे पुरुषाच्या दृष्टीने फायद्याचे असले तरी स्त्रीच्या दृष्टीने ते तितके फायद्याचे नाही. आणि बालकांच्या दृष्टीने नक्कीच नाही कारण मातृत्व हे असंदिग्ध आहे( आई कोण हा प्रश्न उद्भवत नाही) पण पितृत्व संदिग्ध आहे त्यामुळे मूल हे आपले नसेल तर पुरुष त्याच्या प्रतिपाळासाठी किती कष्ट घेईल हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. २) पुरुषाची कामेच्छा हि स्त्रीपेक्षा जास्त असते आणि जास्त काळ टिकणारी असते. त्या तुलनेत स्त्रीची कामेच्छा हि बरीच हेलकावे खाणारी असते म्हणजे पाळीच्या वेळेस, गरोदरपणात रजोनिवृत्तीनंतर बरीच कमी झालेली आढळते. यामुळे एक पत्नी व्रत यात पुरुषाला कामेच्छा मारायला लागते आणि त्याची कुचंबणा होते हि वस्तुस्थिती असली तरी स्त्रीआणि मुलाच्या दृष्टीने एक पत्नीव्रत हे अंतिमतः फायदेशीर ठरते. ३) लग्न बाह्य संबंध हे बहुसंख्य वेळेस कामवासना शमवण्यासाठी उपयुक्त होतात. हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने उपयुक्त असले तरीही समाजास्वास्थ्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही त्यामुळे जगभर बहुसंख्य समाजात लग्न संबंधांना जितकी मान्यता आहे तितकेच लग्नबाह्य संबंधांबद्दल तिरस्कार आहे. ४) पुरुषाची कामेच्छा जास्त का असते या बद्दल मी एका धाग्यात शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे याचा विस्तृत उहापोह केला होता परंतु माझे लेखन यावर टिचकी मारली असता दुसरेच काही तरी येत आहे. आणि आता तेच परत टंकायचा मूड नाही. जेंव्हा माझे लेखन उपलब्ध होईल तेंव्हा पुढच्या भागाची चर्चा करता येईल.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 05/16/2017 - 15:55 नवीन
छान प्रतिसाद सुबोधजी,पुरुषाचं टेस्टेस्टिरॉन उतारवयात बरचं कमी होत तरीही त्याचं कामेच्छा कमी होत नाही याच रहस्य काय? नातीच्या वयाच्या तरुण मुलींकडे वखवखलेल्या नजरेने बघणारे म्हातारे बघितले की हा प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Tue, 05/16/2017 - 17:15 नवीन
अतृप्त कामेच्छा ! त्यातून हे सगळे उपप्रश्न निर्माण होतात : १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? नाही. लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. अतृप्त कामेच्छेमुळे विवाहाकडे संभोगाची सोय म्हणून पाहिलं जातं. २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? अतृप्त कामेच्छा ! ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? अशा बाता किती जणांशी (जणींशी) करणार ? कामतृप्ती विवाह सार्थक करुन जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/16/2017 - 17:59 नवीन
लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. ???!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 18:21 नवीन
त्यांनी म्हटलंय म्हणजे असणार. त्यांचे मत नेहमी परिपूर्ण, निर्विवाद, परफेकट असते याची त्यांना तीळमात्रही शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
द
दशानन Tue, 05/16/2017 - 18:26 नवीन
देवाला, गुरूला, आईला आणि अतीज्ञानीला प्रतिवाद करू नये नाहीतर थोबाड फुटते अशी म्हण आहे म्हणे हिब्रू मध्ये! ;) येथे तर देवांचे देव प्रतिसाद देत आहेत, किमान होय म्हराज!!! म्हणून गप्प व्हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बांवरे Tue, 05/16/2017 - 23:26 नवीन
त्यांनी फक्त यादी दिली आहे. कालक्रमणेनुसार यादी नसावी .... कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कुटस्थ Wed, 05/17/2017 - 00:11 नवीन
"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे." संक्षी, तुम्हाला येथे अपत्याचा विवाह असे म्हणायचे आहे का? असल्यास त्याचा योग्य खुलासा करा नाहीतर वेगळाच अर्थ निघतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
द
दशानन Wed, 05/17/2017 - 04:30 नवीन
होतो शब्द'छळ' त्यांच्याकडून कधी कधी एवढे मनावर नका घेऊ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुटस्थ
द
दीपक११७७ Tue, 05/16/2017 - 15:54 नवीन
http://www.maayboli.com/node/62593 @ सिंथेटिक जिनियस
विषयाला धरुन चर्चा करा. मायबोलीचा मिपा करु नका
http://www.maayboli.com/node/62593
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 05/16/2017 - 15:56 नवीन
काय चुकलं त्यात,मिपावर चार प्रतिसाद देणारे जेन्युन आहेत बाकी धाग्याचा खरडफळा करायला बसतात म्हणून ती कमेंट दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
अ
अभ्या.. Tue, 05/16/2017 - 16:19 नवीन
त्या चार जणांना व्यनि करायचा. ना बनेगा खरडफळा, ना बनेगा कचरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
द
दशानन Tue, 05/16/2017 - 16:26 नवीन
जेवत असलेल्या ताटाबद्दल / ताटामध्ये असे "शेण" का हो कालवले? मिपाच्या विरुद्ध बाजूला कधीकाळी मी पण उभा होतो, पण असा प्रकार... नाही पटला! माफी मागावी मिपाची तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अ
अभ्या.. Tue, 05/16/2017 - 16:29 नवीन
कल्लुळाचं पाणी.... कल्लुळाचं पाणी.... कल्लुळाचं पाणी.... कशाला ढवळिलं.. नागाच्या पिलाला का गं खवळिलं ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
क
कपिलमुनी Tue, 05/16/2017 - 17:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 17:50 नवीन
ते कमरेला लटकलं आहे ते खांद्यावर असलेल्या सापाचे पिल्लू आहे की त्या सापाची शेपटी आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Tue, 05/16/2017 - 18:04 नवीन
उत्तर मिळाल्यावर त्या माहितीचा कसा उपयोग करणार हाहात सर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 18:13 नवीन
अभ्याभाऊ सोलापूरकर चटणीवाले यांचे "नागाच्या पिल्लाला का गं खवळीलं" हे मत योग्य आहे की नाही याचा उलगडा होईल या माहितीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/17/2017 - 06:40 नवीन
कसे? तुमच्याकडे नाग आहे की नागाचे पिल्लू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Wed, 05/17/2017 - 08:02 नवीन
विषय चित्रातील बाईच्या अंगावरील नागाचा चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अभ्या.. Wed, 05/17/2017 - 08:18 नवीन
ते चित्र नव्हे तर चित्रपट्टिका आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभ्या.. Wed, 05/17/2017 - 08:18 नवीन
ते चित्र नव्हे तर चित्रपट्टिका आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सूड Wed, 05/17/2017 - 08:31 नवीन
तुमच्याकडे नाग आहे की नागाचे पिल्लू?
तुम्हाला दोन्हीपैकी काय हवं आहे ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दशानन Wed, 05/17/2017 - 08:34 नवीन
आवरा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Wed, 05/17/2017 - 08:45 नवीन
काहीही नको...सर नर्तकी ऐवजी नागाचीच इतकी का चौकशी करत होते ते समजले नव्हते म्हणून विचारले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 05/17/2017 - 09:09 नवीन
ज्याची त्याची आवड..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
N
Nitin Palkar गुरुवार, 05/25/2017 - 09:21 नवीन
खिक.... असभ्य! असभ्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आदूबाळ Tue, 05/16/2017 - 15:58 नवीन
वा सिंजि वा! दुसरीकडे जाऊन मिपाच्या नावाने खडे फोडायचे, आणि मग मिपावरच चर्चेचा जोगवा मागत यायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दशानन Tue, 05/16/2017 - 16:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Tue, 05/16/2017 - 16:27 नवीन
कुणाची म्हस कुणाला उठबस सिंजी हे इथे बसेल ना चपखल.+11111111111111
ती कडुन ईकडे
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 08:41 नवीन
"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृद्धापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे." यात न समजण्यासारखं किंवा गैरसमज होईल असं काय आहे ? विवाहितांच्या जीवनात ही सर्व परिमाणं याच क्रमानं दिसत नाहीत काय ? प्रतिसाद देणारे सदस्य (कुणा दांपत्याचा) विवाह झाल्याशिवाय कौतुकाचा जन्म घेऊ शकले असते काय ? शिवाय योग्य संगोपनाशिवाय त्यांच्या सांप्रत जीवनाची जी काय घडी बसली आहे ती तशी बसली असती काय ? जर विवाह संस्थाच अस्तित्त्वात नसती तर त्यांचे विवाह झाले असते का ? आणि जेव्हा वृद्धापकाळ येईल त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली कुटुंबव्यवस्था त्यांना उपयोगी ठरणार नाही का ? सरते शेवटी, मृत्यूसमयी आप्त जवळ असतील तर तो, एकट्यानं कुठे तरी (बहुदा कुणी जीवलग जवळ नसतांना), आलेल्या मृत्यूपेक्षा, सुखाचा होणार नाही काय ? आता चर्चाविषय पाहा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय?????? एकवेळ विचार न करु शकणारे सदस्य काहीही प्रतिसाद देतात ते ठीके पण ज्यांची जवाबदारी चर्चा लाईनवर ठेवण्याची आहे ते सुद्धा काहीही प्रश्न निर्माण करायला लागले तर चर्चेतून काय निष्पन्न होणार ?
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 05/17/2017 - 08:51 नवीन
तुमची टांग दुखत नाही का हो आजोबा? दर वेळी गिरे भी टांग के उपरच तुमचे सुरू असते, कधी तर सज्जनपणे झालेली चूक मान्य करुन माघार घेत जावा की राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अद्द्या Wed, 05/17/2017 - 09:09 नवीन
प्रयत्न चांगला होता तुमचा.. पण वेळ वाया जातोय एवढ्यात ते एलियन केप्लर वरून इथे येऊन सात बारा पण करून घेतले असते .. तेवढं बघा काय ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा