जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
अरविंदच्याबाबतीत अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि माझ्यासारख्या अनेकांना त्याचा खेद आहे.म्हणजे, तुमचे अंदाज अज्जिबात म्हण्जे अज्जिबातच चुकले नाहीत... तुमच्या अपेक्षा सिद्ध करण्याची केजरीवालांवर जबाबदारी होती, ते न केल्याने सगळी चूक केजरीवालांची. केजरीवालांनी चूक केली त्याचा तुम्हाला फक्त खेद ! भले शाबास ! मनोरंजक आहे ! =))तुमच्या अपेक्षा सिद्ध करण्याची केजरीवालांवर जबाबदारी होती, ते न केल्याने सगळी चूक केजरीवालांची.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जवाबदारी नेत्यावर असते का मतदारावर ? शिवाय मी निवडून द्यायला केजरीवाल पुण्यातून उभे नव्हते इतपत तरी माहिती तुम्हाला असायला हरकत नाही.म्हणजे, तुमचे अंदाज अज्जिबात म्हण्जे अज्जिबातच चुकले नाहीतमी त्यांच्या विचारांशी सहमत होतो पण त्यांचे विचार आणि आचार यात नंतर समन्वय दिसला नाही. याला व्यक्ती ओळखण्यातली चूक (एरर ऑफ जजमेंट) म्हणतात आणि सद्य स्थितीत तरी ती मला मान्य आहे.केजरीवालांनी चूक केली त्याचा तुम्हाला फक्त खेद !समजा निवडून दिलेला उमेदवार अपेक्षा पूर्ती करु शकला नाही तर मतदारांनी काय करावं अशी आपली प्रगल्भ बुद्धी सांगते ? ______________________ बाय द वे, सध्या २४.५% टॅक्स असलेली वस्तू, जिएसटीमधे १२% टॅक्सला वर्गिकृत करुन, स्वस्ताई आली म्हणणं या भोंगळ चुकीला काय प्रायश्चित्त असावं ? का त्याबद्दल खेद सुद्धा नसावा ? हे देखिल कळवावे.तेव्हा, मी माझे अंदाज दिले आहेत व तुमचे अंदाज त्यांच्या जागी आहेत.तुमचे अंदाज आहेत. माझा अनुभव आहे. जिएसटी नवा आहे हा प्रश्नच नाही. सर्व करदात्यांवर एकजात अविश्वास दाखवून काही बेईमान लोकांपायी देशाच्या सर्वच्या सर्व ट्रेड अँड कॉमर्सला वेठीला धरणं गैर आहे. त्यासाठी देशाची संपत्ती, सुविधा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षावधी मॅन अवर्स अनाठायी कामाला लावणं अत्यंत क्षोभजनक आहे.पण, आताचा एक बाजू पकडून दुसरी साफ चूक असे म्हणण्याची वेळ अजून आलेली नाही, इतकेच मी म्हणेनइतक्या उघड गोष्टीवर जर तुम्हाला सरकारची बाजू समर्थनीय ठरायला अजून वाट पाहावी लागणार असेल तर मुद्दाच कळला नाही असा अर्थ होतो.तुमचे अंदाज आहेत. माझा अनुभव आहे.भविष्यातल्या गोष्टींबद्दल केवळ अंदाज लावता येतात व अनुभव केवळ भूतकालातल्या गोष्टींचाच शक्य असतो, हे तुमच्या जगावेगळ्या तर्कात बसणार नाही, हे माहीत झाले आहे. अजून आस्तित्वात न आलेल्या जीएसटीचा "अनुभव" घेण्यासाठी तुम्ही टाईम मशीन घेऊन भविष्याची चक्कर मारून आला असलात तर मात्र गोष्ट वेगळी ! ;) =)) माझ्या प्रथम प्रतिसादातील टेबलांबद्दल जर काही शंका असल्या तर कंपन्यांच्या करांची उलाढाल सांभाळणार्या एखाद्या (ज्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल अश्या) तज्ञाशी चर्चा करून पहा *. कारण ती दोन्ही टेबले मोठ्या कंपन्यांना करविषयक सल्ला देणार्या एका वरीष्ठ तज्ञाच्या बरोबरच्या चर्चेतून निर्माण झालेली आहेत. * : तसेही तुम्ही कंपन्यांच्या करसल्लागाराचे काम करत नाही असे एका प्रतिसादात लिहिले आहेच ! ============================ अगदी अर्थशास्त्रातलेच काय जगातल्या सगळ्या विषयांतले तुम्ही तज्ञ, व्यासंगी वगैरे आहात असे इथे सारखे ओरडून सांगत असता व त्यामुळे तुमचेच्च म्हणणे बरोबर असते व सगळ्यांनी बेशर्त मानावे असे तुमचे म्हणणे असते; यासाठी काही महत्वाची माहिती... इथे बरेच मिपाकर आपल्या शिक्षण, व्यवसाय, ज्ञानाची आणि व्यासंगाची जाहिरात न करता संवाद साधत असतात. त्यांचे ज्ञान, व्यवसायविश्व, भावविश्व आणि विशेषतः माणूसपण इतके प्रगल्भ आहे की त्यांना आक्रस्ताळे आणि उद्धट शब्दप्रयोग करून इतरांना उगाचच कमी लेखण्याची किंवा आपली जाहिरात करण्याची गरज वाटत नाही. किंबहुना, तसे करणे नागरी सभ्यतेप्रमाणे प्रशस्त नाही हे "सुजाण" मिपाकरांना माहीत असल्यामुळे ते तसे करत नाहीत. यासंबंधात, तुम्हाला (दरसल्ला/दरदिवस/दरमहिना असा आकार न लावता एकदम फुकट) सल्ला आहे... एखाद्याच्या शिक्षण, अनुभव, इत्यादींची माहिती https://www.linkedin.com या किंवा तत्सम व्यावसायिक संस्थळावर मिळण्याची शक्यता असते आणि ती मिळाल्यावर कदाचित गर्वाने फुगलेल्या छातीला टाचणी टोचेल (विंचू चावला हे लोकप्रिय भारूड ऐकले असेलच). अन्यथा... राहूंदे !कारण ती दोन्ही टेबले मोठ्या कंपन्यांना करविषयक सल्ला देणार्या एका वरीष्ठ तज्ञाच्या बरोबरच्या चर्चेतून निर्माण झालेली आहेत.सध्या २४.५०% टॅक्स असलेली वस्तू जर जिएसटीमधे १२% टॅक्सला वर्गिकृत होत असेल तर तुमच्या त्या `वरीष्ठ तज्ञांना' इथे त्यांच्या नांवासकटसदर वस्तुचा फक्त HSN Codeद्यायला सांगा. एका झटक्यात निर्णय होईल. साधा सर्विस टॅक्स, काही कारण नसतांना १५% वरुन १८% झाला आहे. याला स्वस्ताई आली म्हणतात का ? हे तुमच्या त्या तज्ञांना विचारुन पाहा किंवा १ तारखेला कुठलीही टॅक्सेबल सर्विस घेऊन पाहा.तुम्हीटाकली आहेत आणि तीतुम्हालाजस्टिफाय करायची आहेत ! टेबल छान आहे म्हणून एखादा खुर्ची सरकवून बसायला जातो आणि कुणी तरी मागनं हळूच खुर्ची काढून घेतल्यावर होते तशी ही अवस्था आहे. माझी हिंमत अशी आहे की तुमच्या वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञांना विचारुन सदर वस्तू किंवा सेवांचाएचसएन कोडमागितला आहे. तुम्ही एचसएन कोड देऊ शकला नाहीत तर तीन निष्कर्श निघतीलः १) टेबलात नमूद केल्य्याप्रमाणे कोणतीही वस्तू किंवा सेवा नाही २) `वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञ' ही थाप आहे किंवा त्या सो कॉल्ड तज्ञांना देखिल पुरेशी माहिती नाही. २) टेबल फेल गेल्यामुळे `वस्तू आणि सेवा स्वस्त होतील' हे विधान निखालस चुकीचं आणि सदस्यांची दिशाभूल करणारं आहे. आणि माझं सुरुवातीपासून एक्झॅक्टली तेच म्हणणं आहे वाचा : 23 Jun 2017 - 10:58 pm | संजय क्षीरसागर सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ?काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहे.तुमच्या टेबलमधल्यावस्तूचाHSN Code द्याम्हणजे एका मिनीटात सगळं क्लिअर होईल :) ......आणि जीवाचा इतका आटापिटा करावा लागणार नाही.@म्हात्रे जी, HSN नंबर द्यायला काय हरकत आहे ? संक्षी जी चे GST बाबत तुलनात्मक विचार समजतील आणि विषय समजून घेण्यात आणखी उपयोग होईल.तोही मिळेल. पण आत्ता नाही, योग्य वेळी होईल. त्यांच्या इशार्यावर नाचायला इथे कोणी बांधील नाही. इतरांच्या प्रतिसादांवर गरज आहे तेथे मी लिहितोच आहे. पण, मूळ मुद्दा असा : दुसर्यांवर सतत उद्धट टीका करत फिरणारे हे कोण टिकोजीराव ?! हा काही त्यांचा खाजगी क्लास/घर/ऑफिस नाही. खुल्या संस्थळावर सभ्यतेच्या मर्यादा पाळायला पाहिजेत हे त्यांना वारंवार खूप जणांना सांगायला लागते, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. शिवाय, दुर्लक्ष केले की "जितं मया" म्हणायलाही ही आयडी पुढेच असते :) हे खुले संस्थळ आहे. हिंमत असल्यास, एखादे "आकडे आणि विश्लेषणांसह एक मस्त मोठे टेबल" टाकून स्वतःचे दावे त्यांनी सिद्ध करावे आणि त्याचे श्रेय घ्यावे. तसेच, लोकांनाही जरा त्यांना प्रश्न विचारायची संधी मिळू दे ना. खर्या तज्ञाला याची कधीच भिती वाटत नाही. तसे करायची भिती वाटत असली आणि फक्त दुसर्याच्या लेखनाबद्दल हवेतले शेरे मारण्याची इच्छा असली, तर लोक काय समजायचे ते समजतीलच.सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ? काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहे.नक्की ???!!! नक्कीच कठीण आहे ! या दोन वाक्यांवरूंच तुमच्या जीएसटीबद्दलच्या आकलनाची आणि करांच्या जुन्या/नव्या दरांबद्दलच्या माहितीची पूर्ण कल्पना दिलीत. कोणता करदर किती बदलला आणि त्याचा कोणावर किती परिणाम होईल यावर तर सद्या इथे आणि सर्व भारतभर जोरदार चर्चा चालू आहेत. तरी तुम्हाला त्याची कल्पनाच नाही ???!!! गुगलवर "Tax Rates Before And After GST" अशी विचारणा केली तरी सरकारी आणि मान्यवर खाजगी संस्थांनी प्रसिद्ध केलेली करबदल दाखवणारी भाराभर टेबले आणि विश्लेषणे मिळतील !नेक्स्ट बेस्ट रेटहा GST चा रुल माहिती करुन घ्या. थोड्याफार वस्तू इकडे-तिकडे होतील पण सामन्यांच्या जीवनमानात त्या प्लस-मायनसनी काहीएक फरक पडणार नाही. शिवाय सगळ्या सेवा सरसकट ३% टक्यांनी महाग झाल्यात हे कळायला फारसा व्यासंग लागत नाही. त्याला `महागाई वाढली' असं म्हणतात.यावरून असे दिसेल की कर पूर्वीपेक्षा कमी झाला आहेहा मुद्दा साफ हुकला आहे कारण १२.५% एक्साइज +१२% वॅट लागणारी वस्तू १२% जिएसटीमधे येऊच शकत नाही. ती २८% जिएसटीतच जाईल. निअरेस्ट नेक्स्ट हा रुल आहे. २४.५% ऐवजी सरकारनं १२% टॅक्स घेतला तर एकाच वर्षात ते दिवाळखोरीत निघेल. याच रुल प्रमाणे सर्विस टॅक्स १५% वरुन सरसकट १८% वर गेला आहे ही सुद्धा उघड गोष्ट आहे. एक जुलैपासून सर्व भारतीयांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे. आता चूक दुरुस्त होत नाही तेव्हा असं चालायचंच.एक कर म्हणजे सरसकट अमुक % कर अशी समजुत होते. प्रत्यक्षात विविध वस्तूंसाठी विविध % आहेत. हे नको होते.हे म्हणणे कळले नाही. सगळ्या वस्तूंना एकच एक कर% ठेवले तर जीवनावश्यक आणि चैनीच्या वस्तूंवरील कर सारखाच राहील. हे कसे योग्य होईल ? उदा : "अन्नधान्य आणि एसयुव्ही / सौंदर्यप्रसाधने यांच्यावरचा एकच करदर"; किंवा "एकाच वस्तूगटातल्या वस्तूंवर, म्हणजे गरीबांना परवडणारे साधे कापड आणि श्रीमंती बडेजाववाले ब्रँडेड लक्झरी कापड या दोघांवरचा एकच करदर" हे योग्य होईल का ? जीएसटीच्या बाबतीत "एकच करदर" याचा अर्थ, सर्व भारतभर सर्व वस्तूंना एकच कर असा नसून तो "सर्व देशात एकाच प्रकारच्या एकाच प्रतिच्या वस्तूसाठी एकच करदर" असा आहे. पूर्वी उद्योगधंद्यांना आपल्या उत्पादनाची निर्मितीच्या जागेवरील आणि विक्री करायच्या दर राज्य/केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या करदराचा विचार करावा लागत असे आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या मी तुम्हाला सांगायची गरज नाही. भारतातले उद्योग ही समस्या आपल्या पाचवीला पुजलेली आहे असे समजून तिला सहन करत असत... दुसरा उपायच नव्हता ! एकदा सहन करायची सवय लागलेली प्रणाली नवीन बदलापेक्षा जास्त सुकर वाटते हा मानवी स्वभाव आहे ! २. राज्ये आणि देशाच्या सीमा ओलांडून जाणार्या मोठ्या उत्पादन-विक्री गुंतवणूकीसाठी ही "राज्यवार निराळे करदर" समस्या वर वर वाटते त्यापेक्षा खूप कटकटीची असते... २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश असलेल्या भारताला व्यवसाय ३६ स्वतंत्र देशांतर्गत केलेल्या व्यापाराइतका डोकेदुखीचा ठरतो; त्यातच भारतातले उत्पादन निर्यात करायचे असले तर ते अधिकच्या डोकेदुखीचे कारण बनते. आता ध्यानात यायला हरकत नाही की EU(युरोपियन युनियन)ची सुरुवात प्रथम European Coal and Steel Community अशी व नंतर तिचा European Economic Community असा विस्तार झाला त्यामागे "बॉर्डरलेस कॉमर्स" हेच तत्व होते. त्यानंतर त्यात राजकिय व चलन एकीकरणाची घिसाडघाई केल्याने बरीच समस्या निर्माण केली गेली, हा वेगळा विषय आहे. पण, "बॉर्डरलेस कॉमर्स" हे तत्व आजच्या घडीलाही EU सभासद देशांना जितके फायदेशीर ठरले आहे आणि तेवढेच जगातल्या इतर देशांनाही फायदेशीर ठरले आहे. केवळ एक सामयिक करार करून ४३.८१ लाख चौ किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या ५१ कोटी लोकसंख्येच्या व २० ट्रिलियन डॉलर्स जीडीपी असलेल्या २८ देशांशी व्यापार करणे किती सोईचे आहे हे सांगणे नकोच. अर्थातच तिथे मोठी परदेशी गुंतवणूक सहजपणे झाली. (तुलनेसाठी : भारताचे क्षेत्रफळ ३२.८७ लाख चौ किमी, लोकसंख्या १२५ कोटी आणि जीडीपी २ ट्रिलियन डॉलर्स आहे. या परिस्थितीत, जर ३६ वेगळे कायदे व करप्रणाली, त्याही दर वर्षीच्या बजेटमध्ये बदलणार्या असल्या, तर कोण सहजपणे गुंतवणूक करेल.) (अ) राज्याची सीमा ओलांडली की नवीन कायदे व नवीन करदर लागू होणे आणि (आ) दर बजेटमध्ये बदलणारे करदर यामुळे व्यावसायिकाला दूरगामी नियोजन करणे किती कठीण होते हे सांगायला नकोच. यामुळे, पुढच्या ५-१०-१५ वर्षांत गुंतवणूकीच्या परताव्याची गणिते मांडणे जवळ जवळ अशक्य होते. अनेक बिलियन्सची डॉलर्सची गुंतवणूक करणार्या परदेशातल्या गुंतवणूक्दारांना/उद्योजकांना हा व्यवहार धोक्याचा वाटला तर आश्चर्य नाही. अर्थातच, ही समस्या भारतातील परदेशी गुंतवणूकीसाठीही एक फार मोठा अडथळा होता. आता हा अडथळा दूर झाल्याने आता FDI ची $बिलियनची आश्वासने मोठ्या प्रमाणात वास्तवात उतरायला मदत होईल. याचा फायदा उच्चतांत्रिक उद्योग, संरक्षण खात्याशी संबंधित उद्योग, पायाभूत व्यवस्थांमधिल नवीन प्रकल्पांना (रस्ते, रेल्वे, विमानसेवा, जलवाहतूक, मालवाहतूक, इमारत / पूल / धरणे बांधणी, इ) होईल... यात आर्थिक गुंतवणूकीबरोबरच तांत्रिक ज्ञान (टेक्निकल नोहाऊ) भारतात येऊन "मेक इन इंडिया" ला मदत होईल. असे मोठे उत्पादन प्रकल्प सुरू होण्याने त्याचा रिपल इफेक्ट म्हणून त्यांना सप्लाय, सपोर्ट आणि अॅन्सिलरी असलेल्या अनेक छोट्या मोठ्या स्थानिक उद्योगांची निर्मिती होते व अगोदरपासून आस्तित्वात असलेल्यांना चालना मिळते. असो. समतोल प्रतिसाद आवडला. फक्त हे दोन मुद्दे जरासे विशद करावेसे वाटले म्हणून हे लिहिले आहे. *************** अवांतर : टॅलीच्या (किंवा इतर अकाऊंटींग प्रणालिंच्या) जीएसटी-रेडी नवीन व्हर्शनची किंमत रु१८,००० च्या आसपास आहे. मात्र, तुमच्याकडे अगोदरपासून टॅलीची लायसेन्स्ड कॉपी असेल तर तिचा जीएसटी-अपग्रेड त्याहून खूप कमी किंमतीत मिळेल. तुमच्या व्हर्शनचे तपशील टॅलीच्या (किंवा इतर अकाऊंटींग प्रणालिंच्या) संस्थळावर दिल्यास तुमच्या व्हर्शनसाठी योग्य अपग्रेड बर्याच कमी किंमतीत मिळेल.केंद्र सरकार आणि राज्य सरकारे अर्धा अर्धा पैसा वाटून घेणारच आहेत तर पेट्रोलियम, मद्य उद्योग जीएसटीच्या बाहेर ठेवण्याचे कारणच कळत नाहिये.यासंबंधी मुख्य मुद्दा असा : जीएसटी कायदा व करप्रणाली (अ) घटनादुरुस्ती केल्यावर, (आ) केंद्रसरकार व सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची सरकारे यांच्या सर्वसंमतीने बनवलेला कायदे व प्रणाली आहे व (इ) केंद्र सरकारने पारीत केल्यावर तेच कायदे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांतून पारीत करून घेतलेले आहेत. (ई) त्यांच्यात कोणताही महत्वाचा बदल करण्यासाठी सर्वसंमतीने हा सर्व सोपस्कार परत करावा लागेल... कदाचित एखाद्या मुद्द्यावर घटनादुरुस्तीही. त्यामुळे, अत्यंत विषम स्थानिक परिस्थिती व त्यावर आधारीत राज्यस्तरीय कायदे असलेल्या गोष्टींबाबत राज्यांचा एकजिनसीपणाला सहाजिकच विरोध असतो व तो व्यवहार्यही असतो. १. पेट्रोलियम प्रॉडक्टस् : या जीवनावश्यक व इतर पदार्थांच्या वाहतूक-वितरणासाठी आणि शेतीसाठी आवश्यक वस्तू आहेत. याचमुळे, काही काळापूर्वीपर्यंत डिझेलचे भाव पेट्रोलच्या मानाने जवळ जवळ निम्मे असायचे. आता ती तफावत कमी झाली असली तरी (इतर बहुतेक देशांप्रमाणे) पेट्रोल व डिझेलचे भाव एकच नाहीत... त्या दिशेन मार्गक्रमण मात्र चालू आहे. यांचे भाव वाढले की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात हे तर आपण नेहमी बघतो. शिवाय खनिज तेलाचे भाव अचानक एखाद्या घटनेने (उदा: युद्ध) कमालिच्या दराने बदलू शकतात. त्यांना जीएसटीमध्ये आणल्यास एखाद्या आणिबाणीच्या काळात सरकारला त्यांच्या भावावर नियंत्रण ठेवता येणार नाही... किंवा ठेवायचे म्हटले तर सर्व राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सहमती घ्यावी लागेल, हे वेळखावू आणि धोक्याचे आहे. २. वीज : वीज मानवी जीवनात इतकी महत्वाची झाली आहे की तिला जीवनावश्यक गोष्ट म्हणणे फार चूक ठरणार नाही. वीज नसेल तर घर चालवणे, नोकरीला जाणे (लोकल रेल्वे), घरात राहणे (आजकालची घरे नैसर्गिक वायुविजनापेक्षा पंखा/एसी अश्या वीजेच्या उपकरणांवर चालतील असाच विचार करून बांधलेली असतात), इ दुष्कर होईल. (त्यांमध्ये, घरातला / ऑफिसमधला ब्रॉडबॅड बंद पडणे जोडल्यास वीजेच्या जीवनावश्यकतेची निकड जास्त स्पष्ट होईल :) ) वीजेवरच पाणी (शुद्धीकरण व वितरण) , मलःसरण, इत्यादी सरकारी यंत्रणा चालतात. दर राज्याच्या वीज निर्मिती (जल/औष्णिक/अणु/ई व्यवस्था असणे/नसणे) आणि वहनाच्या (भौगोलिक घटक) खर्चात तेथिल परिस्थितीप्रमाणे फरक असतात. जीएसटीमध्ये अंतर्भूत झाल्यास, राज्यांना शेती अथवा उद्योगधंद्यांना स्वतंत्रपणे कायदे करून वीजेच्या दरात बदल करून मदत करणे शक्य होणार नाही. अजूनही बरेच काही. वस्तू जेवढी जास्त जीवनावश्यक बनते तेवढे तिचे नियोजन कठीण बनते व त्याला एका साच्यात बांधून ठेवणे धोक्याचे होते. ३. दारू : घटनेच्या सातव्या कलमाप्रमाणे दारू हा विषय पूर्णपणे राज्यांच्या अख्त्यारीत येतो. त्याचमुळे, त्याबाबतीत राज्यांमध्ये अत्यंत विषम कायदे आहेत. अनेक राज्यांच्या उत्पन्नात दारूवरच्या कराचा मोठा वाटा असतो तर इतर काही राज्यांत पूर्ण दारूबंदी (कायद्याने तरी) आहे आणि त्यामुळे दारूवरची करआकारणी शून्य आहे अनेक राज्यांत दारूची दुकाने, रेस्तराँ, हॉटेल, बार, पब, डिस्को, इत्यादी अनेक ठिकाणी परवाना घेऊन दारू विकता आणि / किंवा सर्व करता येते. केरळ व तमिळनाडूमध्ये खाजगी व्यवसायांना दारू विकता येत नाही व दारूची दुकाने फक्त राज्य सरकार चालवू शकते. काही पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या राज्यांत / ठिकाणांत दारूच्या विक्रीबद्दलचे नियम खूप शिथिल केलेले आहेत. दिल्लीत बियर आणि वाईन घरपोच पुरवणे कायद्याला मान्य आहे पण इतर अल्कोहोलचे जास्त प्रमाण असलेली पेये घरपोच पुरवणे बेकायदेशीर आहे. अश्या, अत्यंत विषम अवस्थेतील पदार्थाचा जीएसटीसारख्या समान करप्रणालीत प्रवेश होणे कठीणच आहे. त्याशिवाय, दारू ही जीवनवश्यक वस्तू नसून चैनीची वस्तू असल्याने, प्रत्येक राज्याने आपापल्या वस्तूस्थितीप्रमाणे तिच्यावर कर लावले, नाही लावले किंवा करबदल केला तरी स्थानीक सरकार सोडून इतरांना तसा फारसा फरक पडणार नाही. हे झाले माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चटकन सुचलेले मुद्दे. इतर काही घटक / मुद्दे असू शकतात.