जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
@संक्षी जी तुम्हीच एखादा HSN नंबर उदाहरणासाठी घ्या आणि त्याचे तुलनात्मक विश्लेषण करा. आमच्या ज्ञानात भर पडेल.GST ही संपूर्णतः कंप्युटराइज्ड सिस्टम असल्यामुळे अक्षरशः प्रत्येक वस्तू आणि सेवेला एक स्वतंत्र HSN (Harmonized System of Nomenclature) Code देण्यात आला आहे. या कोडचं तुलनात्मक विश्लेषण वगैरे काही करायचं नाही किंवा करताच येणार नाही. म्हात्रेंनी जे टेबल लावलं आहे त्यात सध्याच्या २४.५% दरावरुन, ती वस्तू GST मधे १२% वर आणून ठेवली आहे आणि आभासी स्वस्ताईची निर्माण केली आहे. वास्तविकात GST मधे प्रत्येक वस्तू (किंवा सेवेवरचे)सर्व प्रचलित टॅक्सेस एकत्र करुनती वस्तू (किंवा सेवा) ५% - १२% - १८% किंवा २४% या चार पैकी कोणत्या तरी एका बास्केटमधे बसवली आहे. हे वर्गिकरण करतांनानेक्स्ट बेस्ट रेटहा (सरकारी दडपशाही) रुल लावला आहे. याचं उघड कारण म्हणजे सरकारला स्वतःचा तोटा करुन घ्यायचा नाही. उदा. सध्या सर्विस टॅक्स१५%आहे पण वरच्या चार दरात तो बसत नाही म्हणून सरळ पुढे ढकलून१८%केला आहे. म्हात्रेंना मी विचारतोयं की तुमच्या सध्याच्या २४.५% वरुन GST मधे १२% वर गेलेल्या वस्तूचाHSN Codeद्या ! कारण त्यांनी लावलेलं टेबल हे `वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञानी' केलं आहे. म्हात्रे HSN Code कोड देऊच शकत नाहीत कारण अशी कोणतीही वस्तू नाही :) त्यामुळे तीन गोष्टी होतात : १) सदर टेबल वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञानी केलं हा पोकळ दावा आहे किंवा सदर तज्ञ अनभिज्ञ आहे. २) टेबलमधे दाखवलेली स्वस्ताई ही दिशाभूल आहे. ३) मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे कर-दर आणि जिएसटीचे कर-दर जवळजवळ सारखेच असल्यामुळे सामान्यांसाठी स्वस्ताईचं गाजर बघणं सोडून द्या. वरच्या प्रतिसादात म्हात्रे `मी कुणाला बांधील नाही, योग्य वेळ आल्यावर देईन' वगैरे टिपी करत आहेत. त्यांनी कितीही वेळ घेतला तरी ते HSN Code कोड देऊच शकत नाहीत.मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे कर-दर आणि जिएसटीचे कर-दर जवळजवळ सारखेच असल्यामुळे ...२.हे वर्गिकरण करतांना नेक्स्ट बेस्ट रेट हा (सरकारी दडपशाही) रुल लावला आहे. याचं उघड कारण म्हणजे सरकारला स्वतःचा तोटा करुन घ्यायचा नाही.हा हा हा... इंग्लिश आकडे वाचता येणार्या कोणालाही खालील टेबले पाहून वरची वाक्ये सत्यापासून किती दूर आहेत हे कळणे सहज शक्य आहे. जर नवीन जीएसटी प्रणालीने हितसंबंधाना धक्का बसल्याने सत्याचा विपर्यास करायचा असला तर गोष्ट वेगळी... (स्त्रोत : https://www.bloombergquint.com/gst/2017/05/19/tax-rates-before-and-after-gst वरून साभार) माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, "नवीन कर ठरवताना, जीवनावश्यक, नेहमीच्या गरजेच्या, सर्वसामान्य वापराच्या, चैनीच्या, इत्यादी प्रकारच्या वस्तूंचे कर ०% पासून सर्वसाधारणपणे चढत्या भाजणीने वर जात कमाल २८% पर्यंत ठरविलेले आहेत. (http://www.thehindu.com/business/Economy/article18514302.ece/BINARY/Sche...) यामुळे काही वस्तूंचे अंतीम करदर कमी-जास्त झाले असले तरी ते ग्राहकांच्या फायद्याचे व्हावे अशी काळजी घेतली गेली आहे.इंग्लिश आकडे वाचता येणार्या कोणालाही खालील टेबले पाहून वरची वाक्ये सत्यापासून किती दूर आहेत हे कळणे सहज शक्य आहे.डोळे उघडे ठेवून दर पाहिलं तर : अ)यात एकही वस्तू किंवा सेवा २४.५% वरनं १२% वर आलेली नाही !थोडक्यात, म्हात्रेंनी स्वतःच्या प्रतिसादानं स्वतःलाच अडचणीत आणलं आहे :) ब) ओवर ऑल सर्व दर एकतर वाढलेले आहेत किंवा जैसे थे आहेत आणि कमी झालेले दर हे क्वचित लागणार्या वस्तू आणि सेवांवरचे आहेत . क) सर्विस टॅक्स सरसकट ३% वाढला आहे ही गोष्ट म्हात्रेंच्या अजून लक्षात आलेली दिसत नाही २)जर नवीन जीएसटी प्रणालीने हितसंबंधाना धक्का बसल्याने सत्याचा विपर्यास करायचा असला तर गोष्ट वेगळी...हा सुद्धा फसलेला डाव आहे. कारण मी जिएसटीकडे सामान्य नागरिक म्हणून पाहातो. इनडिरेक्ट टॅक्सेशनची प्रॅक्टीस मी करत नाही हे सुरुवातीलाच क्लिअर केलं आहे. तस्मात, व्यावसायिक दृष्टीनं मला, असल्या घोडे छाप कामाचा ना ताण, ना प्रोफेशनल रिसीट्सवर काही परिणाम. .......आणि ज्या टेबलपायी म्हात्रेंना इतका आटापिटा करावा लागतोयं तो HSN Code कोड ते अजूनही देऊ शकत नाहीत.द कॅट इज आऊट ऑफ द बॅग !:)ज्याला साधे छापील इंग्लिश आकडे दिसत नाहीत / वाचता येत नाहीत अशा माणसाला काय म्हणावे बरे ?!
*dash1* *yahoo*HSN Codeद्यायचा आहे :) तो तुम्हाला देता येत नाही म्हणजे तुमचा सगळा पसारा फेल गेला आहे. आणखी कोणत्याही टेबलची अपेक्षा करणं म्हणजे उगीच टिपी करणं आहे.चुकीची टेबल्स पाहिली आहेतहे प्रथम मान्य करा !त्यांना फक्त दुसरा कसा चुकीचा हेच दाखवणे "आवडते"१००% सहमती. नुसते आवडत नसून तेवढेच जमते, कारण कुठल्याच प्रश्नाचे आणि त्यांनीच उकरून काढलेल्या वादांचे त्यांना नीटसे उत्तर देता आले नाहीये."काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?"यावर दुसराच प्रतिसाद संक्षींनी काय दिलाय बघा."सामन्यांना कळला नाही तरी चालेल, तो कळण्यासारखाही नाही आणि कळून उपयोग ही नाही. व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही". त्यापुढे ही ते फक्त ते ढोबळ विधानं करत जातात. ग्राहकांना फारसा काही फरक पडणार नाही या पासून ते स्लॅब १२% ची १८% झाल्याने महागाई वाढेल. तसेच व्यापाऱ्यांना ३७ रिटर्न भरायला लागल्याने त्रास होईल हे परत परत सांगितलंय जातंय. काही सदस्यांनी उदाहरणे देऊन सांगितल्यावर ते नुसतं बरोबर आहे का चूक आहे ते सांगतात पण मग नक्की काय चूक आहे ते सांगत नाहीत. एकीकडे म्हणतात की ते अप्रत्यक्ष करांशी ते संबंधित नाहीत मग दुसऱ्यांना म्हणतात प्रत्यक्ष प्रोफेशनल सेमिनार मध्ये भाग घेतल्याशिवाय कळणार नाही. संपूर्ण धाग्यात संक्षींचा एक तरी प्रतिसाद दाखवा ज्यात त्यांनी उदाहरण देऊन कुठल्या वस्तूंचे भाव वाढणार/ कमी होणार हे स्पष्ट केलंय. असं गृहीत धरलं की काही वस्तूंचे भाव वाढणार आणि काहींचे कमी होणार, त्यामुळे सरासरीने सामान्यांना फारसा फरक पडणार नाही. तर व्यापारी व कारखानदार यांच्या कामकाजात काय फरक पडणार हे उदाहरणाने दाखवलाय का? नुसतं ३७ रिटर्न्स भरायचे एवढं सांगतात, पण मग सध्या किती रिटर्न्स आहेत, सध्याची प्रोसेस वि. नंतरची प्रोसेस अशी तुलना कुठे केली आहे का? विविध दुवे, एखादी वस्तू घेऊन उदाहरण वा टेबल्स देऊन, अर्थक्षेत्रात नसलेल्या बऱ्याच मंडळींनी आपापल्या परीने माहिती द्यायचा प्रयत्न केला. पण सी.ए. असूनही संक्षींनी असा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यात जीएसटी मध्ये सर्विस टॅक्स आणून अजून आमच्या मनातला गोंधळ वाढवतात. मग इतरांना दूषणे देऊन अज्ञानी, काही कळत नाही ई विशेषणे कशाला द्यायची? बाकी जीएसटी लागू होण्याची तारीख एक वर्ष आधीपासूनच जाहीर केली होती. मग तयारीला पुरेसा वेळ नाही अशी आरडाओरड का होतेय? समजा १ एप्रिल २०१८ पासून लागू करायचं ठरवलं तर तेव्हा तरी समस्त जनतेची तयारी पूर्ण होईल याची खात्री काय?ज्या टेबलपायी म्हात्रेंना इतका आटापिटा करावा लागतोयं तो HSN Code कोड ते अजूनही देऊ शकत नाहीत.आणि आजचा प्रतिसाद पाहाता, आता म्हात्रे तो कोड देण्याची शक्यताच संपली ! :) २)HSN Code शिवाय सामान्य जनतेवर काय परिणाम होईल ह्यासाठी नंतर दिलेली टेबलं पण कुचकामी ठरतात.सांगा म्हात्रेंना !डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर :डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर नि:शब्द व्हायला झाले ना ?! बघा हेच सांगत होतो मी केव्हापासून. =)) =)) =))कोणताही प्रख्यात (स्वघोषित नव्हे) अर्थ तज्ज्ञ सुद्धा त्याला विरोध करताना आढळला नाही हा योगायोग तर नक्कीच नाही.हे कळायला जिएसटीचे प्रोफेशन सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य . २)मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाहीकळलं ना ? इथल्या जिएसटीएन नसलेल्या सदस्यांचा खरं तर तेवढाच संबंध आहे.... आणि आता हे तुमच्या व्यासंगी मित्राला सांगा !