जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
RCM च्या अंतर्गत तुमच्या कस्ट्मरने GST भरला तर तुमच्या कडून वसूल करण्याचा प्रश्नच येत नाही.रिवर्स चार्ज नेहेमी सर्विस प्रोवायडरकडून वसूल केला जातो. पूर्वी त्याला युआरडी पर्चेसेस म्हणायचे. फक्त टर्मिनॉलॉजी बदलली आहे.तुमच्या वतीने भरलेल्या GST चा त्याला सेट ऑफ मिळणार आहे.सर्विस प्रोवायडर कडे जिएसटीएन नसल्यानं कोणताही सेट ऑफ मिळणार नाही. कारण सर्विस प्रोवायडर कोणतंही रिटर्न अपलोड करणार नाही.अर्थातच, हा उद्येश भारताला नवीन व अनपेक्षित असल्याने हितसंबधियांची तंतरली आहेहा घरबसल्या काढलेला निष्कर्श आहे. `रिकवर केलेल्या टॅक्समधून भरलेला टॅक्स वजा करायचा आणि नेट टॅक्स भरायचा' या मॉडेलला फारशी बुद्धि लागत नाही. त्यामुळे त्यात तंतरण्यासारखं काही नाही. २)२. दुसरा टीकाकारांचा गट आहे भाजप/मोदी विरोधकांचाही एक चुकीची मानसिकता संपूर्ण देशात पसरवली गेली आहे आणि दुर्दैवानं ती या संकेतस्थळापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यात कहर म्हणजे चूक कबूल करण्यापेक्षा दडपशाही करुन मुद्दा रेटण्याचा सरकारी प्रकार इथे ही चालू झाला आहे. HSN Code देता येत नाही म्हटल्यावर चूक मान्य करण्यापेक्षा, `तंतरली आहे', `हितसंबंधाना धक्का लागला आहे' आणि शेवटी `मोदीविरोधी आहे' अशी मखलाशी चालू आहे. ३)३. या वरच्या गटांतील अनेकजण आणि सर्वसामान्य जनता जीएसटीचे उद्येश आणि ते कायदे व करप्रणाली बनवताना वापरलेली प्रक्रिया याबाबत माहिती घेण्याची ससदी घेतलेली नाहीहा मुद्दा, ज्यांनी आयुष्यात कधीही इनडिरेक्ट टॅक्सच्या क्षेत्रात काम केलं नाही अशा व्यक्तीनं, केवळ स्वतःची बाजू सावरण्यासाठी मांडायचं धाडस करावं, हे कौतुकास्पद आहे. ४)४. अनाकलनामुळे निर्माण होणारी भिती (फिय ऑफ द अननोन) अणि हितसंबंधी तिचा सर्वसामान्यांना घाबरवण्यासाठी घेत असलेला फायदा.हा बिनबुडाचा युक्तीवाद आहे. सामान्यांना ना रिटर्न्स भरायची ना सेट ऑफ घ्यायचा. त्यांना फक्त लागेल तो जिएसटी भरायचा आहे. तिथे कसली आलीये भीती ? आणि इथल्या ज्या ( तीन/चार) व्यावसायिकांना ही उस्तवार करायची आहे ते असल्या निरुपयोगी प्रतिसादाकडे बघतही नाहीत. त्यामुळे सर्व सामान्यांची काही घबराट होत नाही. सगळी घबराट HSN Code देता येत नाही म्हणून झाली आहे. प्रतिसादाचा एकूण उद्देश महागाई हटणार नाही हे सर्वांना उघड झालं आहे आणि HSN Code देता येत नाही हे लपवणं आहे. त्यामुळे पुढच्या लांबणीला उत्तर देण्यात वेळ घालवणं निरर्थक आहे. तरीही एक मुद्दा फेटाळतो ज्यामुळे सर्व भ्रमनिरास होईल अ)सगळे काम संगणकीय असल्याने, त्यामध्ये महागड्या करतज्ञांची गरज दूर होईल... ही एक महत्वाची दुखरी नस बर्याच विरोधामागे असावी.कुणीही तज्ञ असली डिटेलवार रिटर्न्स भरणं, दर महिन्याला ठराविक वेळेत इतरांची पर्चेस रजिस्टर चेक करणं, स्वतःच्या सेल रजिस्टरला इतरांनी केलेल्या अमेंडमेंटस निस्तरणं असली घोडेछाप कामं करत नाही. ती सगळी उस्तवार व्यावसायिकांनाच करावी लागणार आहे. जिएसटीचं ड्राफ्टींग इतकं भिकार आहे की त्यातून अनेकानेक तंटे उद्भवणार आहेत. सर्विस कोणत्या वेळेला दिली ? मूळात सर्विस दिली का नाही दिली ? इथे दिली का तिथे दिली ? इतक्या किंमतीलाच का दिली ? अमकी एंट्री इथे बसते का तिथे बसते ? हितसबंधी कंपन्यांच्या व्यावहारात काय झोल झालेत ? परदेशी कंपन्यांनी इथे मजा केली, तिकडे मजा केली, का आकाशात (क्लाऊड) मजा केली ? आकाशात केली असेल तर बसल्या जागी केली त्या राज्याचा टॅक्स ? का ज्यानी मजा घेतली त्याच्या राज्याचा टॅक्स? का आकाशातून खाली लंब पडतो त्या राज्याचा टॅक्स ? .......असले अनेकानेक वाद निर्माण होणार आहेत आणि त्यातून तज्ञांची मुबलक कमाई होणार आहे. तज्ञांना असली भिकार ड्राफ्टींगज म्हणजे फुलटॉस आहे. ________________________________ थोडक्यात, जिएसटीनं महागाई हटणार नाही हे सदस्यांना आता कळून चुकलं आहे आणि तेवढ्यासाठी पहिल्यापासूनचा प्रतिसाद प्रपंच केला. माझी भीती, कमाई किंवा कामाचा त्रास याचा प्रतिसादांशी काहीएक संबंध नाही कारण मी इनडिरेक्ट टॅक्सेशन बघत नाही. ( हे सुद्धा अनेकवेळा सांगून झालं आहे.) विद्यमान सरकारच्या विरोधात असणं आणि इश्यूचा विरोध करणं हे ज्यांना एकच वाटतं त्यांना काहीही कळणं शक्य नाही. त्यामुळे सामान्यांनी जिथे स्वस्त मिळेल तिथून वस्तू किंवा सेवा घ्यावी (हे काम आता नॉन जिएसटीवाले जोमानं करायला लागतील.) या निमित्तानं देशाच्या ट्रेड अँड कॉमर्समधे जिएसटी होल्डर्स (मोठे लोक्स) आणि नॉन-जिएसटी होल्डर्स (छोटे लोक्स) अशी नवी दुफळी माजणार आहे. त्यातून छोट्या लोकांना जगण्यासाठी प्राणांतिक लढा द्यावा लागणार आहे. भारतीय लोक जात्याच जिनिअस आहेत. या नव्या लफड्यात देशाच्या व्यावसायीची काय प्रगती होते आणि काय अधोगती होते ते आता भगवान भरोसे आहे.त्यांना तुमच्या क्लासला बोलवून, तुमच्याच दाव्याप्रमाणे, पाच मिनिटात तुमचे म्हणणे पटवून द्या.HSN Code वरुन तुमचा एका क्षणात धुव्वा उडवला आहे. तो केव्हा निस्तरणार ?ते टाकायची हिम्मत दाखवली तर मग काही थोडातरी दम आहे असे म्हणता येईल.कसली टेबलं मागतायं ? तुमची खुर्ची काढून घेतल्यानं तुमची टेबलंही कोसळली आहेत. न तुमच्या स्वस्ताईच्या विधानांना अर्थ, न तुमच्या मोदींच्या तळी उचलण्याला कुणी जुमानत.बिनबुडाच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद देऊ नये असा तुमचा घरगुती नियम आहे काय ?सारसारविवेकबुद्धी बाळगून असलेल्या माणसे बर्याचदा तसे करतात. त्यामुळेच, मी तुमच्या तसल्या प्रतिसांदांवर बर्याचदा प्रतिसाद देत नाही. अर्थात, तो नियम तुम्हाला माहीत नाही यात आश्चर्य नाहीच. :)न तुमच्या मोदींच्या तळी उचलण्याला कुणी जुमानत.असं कसं, असं कसं ? मनमोहन सिंग, अमर्त्य सेन, डॉ वाय व्ही रेड्डींसारख्या जागतिक किर्तीच्या तज्ञांनीही जीएसटीला जोरदार पाठींबा दिला आहे... यातले पहिले दोन तर आतापर्यंत मोदींचे कट्टे विरोधक होते. यावेळेस, ते तुमचा भ्रमनिरास का करत असावेत बरे ?! ;) =)) *************** आणि हे शिल्लक राहिले आहेच ... http://www.misalpav.com/comment/945141#comment-945141 इतक्या हिरीरीने दुसर्यांना उद्धट उत्तरे देणार्या एका अकाउंटींग प्रोफेशनलने, इतक्या साध्या गोष्टीबाबत, सतत टाळाटाळ करायचे काय कारण असावे बरे ???!!! *secret*मनमोहन सिंग, अमर्त्य सेन, डॉ वाय व्ही रेड्डींसारख्या जागतिक किर्तीच्या तज्ञांनीही जीएसटीला जोरदार पाठींबा दिला आहेतुम्ही आधीचे प्रतिसाद वाचलेलेच दिसत नाहीत त्यामुळे तुम्हाला मुद्दाच लक्षात आलेला नाही. त्यातून तुम्ही नोकरदार दिसता त्यामुळे व्यावसायाचा तुम्हाला गंध नसावा. आता नीट वाचा : इन्कमटॅक्स डिजीटलाइज झाला त्यामुळे सगळ्यांची सोय झाली. इन्कमटॅक्समधे करदात्यांवर विश्वास टाकलेला आहे. तुम्ही योग्य माहिती द्याल आणि टॅक्स भराल. त्यामुळे फक्त ५% केसेसची स्कृटिनी होईल ही ग्वाही आहे. तिथे बँकेची प्रत्येक ट्रांझॅक्शन अपलोड करा आणि संबंधित व्यक्तींचे पॅन नंबर भरा असला भंपकपणा नाही. विरोध जिएसटी ज्या प्रकारे राबवला जातोयं आणि त्यामुळे सगळे व्यावसायिक वेठीला धरले गेलेत त्याला आहे. जर समरी सेल्स आणि पर्चेसेस अपलोड करायचे असते तर हा गोंधळ झालाच नसता. पण ९० लाख करदात्यांनी २७५ कोटी व्यावहार अपलोड करायचे आणि त्यातून ३७ रिटर्न्स भरायची याचा अर्थ करदाते बेईमान आहेत. त्यांचा प्रत्येक व्यावहार तपासलाच गेला पाहिजे, या अविश्वासाला विरोध आहे. राजकीय अंधत्व सोडून तुम्हाला थोडा जरी विचार करता आला तर बघा. यासाठी होणारा देशाच्या साधन संपत्तीचा प्रचंड अपव्यय, मनुष्य बळाचे हाकनाक वाया गेलेले तास, आणि देशाच्या ट्रेड अँड कॉमर्सला व्यावसाय सोडून करावी लागणारी उस्तवार नाहक आहे. अर्थात, तुम्हाला इतका विचार मानवेल की नाही हा प्रश्न आहेच. पण मी एक प्रामाणिक प्रयत्न करुन पाहिलायं ज्याचा इतरांना तरी उपयोग होईल. बाकी तो टेबलाचा बालीशपणा आता सोडा. कारण HSN Code न देता आल्यामुळे तुमचे सर्व मुद्दे धुळीला मिळाले आहेत. आणि या प्रतिसादानी (अर्थात, तो तुम्हाला कळला तर) तुमची प्रतिवादाची सर्व आशा संपुष्टात आली आहे .मिपावर किंवा जगात इतर कुठेही तुमच्याशी संवाद साधण्याची अजिबात इच्छा नाही ! कायमचा राम राम ! शुभेच्छा !
गाजरआहे आणि करप्रणाली सुलभ होईल हा सरकारचाभ्रमआहे. फक्त नांवं बदलून जनतेला लुटणं आणि व्यावसायिकांना नडणं चालू आहे.थोडक्यात काय तर मेरे करण अर्जुन आयेंगे ! अलग अलग नामों में आते रहेंगे ! उन्हे आने से दुनिया की कोई ताकत नही रोक सकती.हेच मी एका वाक्यात लिहीलं होतं : फक्त नांव बदललंय कर तोच आहे :) त्यामुळे स्वस्ताईचं गाजर पाहाणं लोक्स जेव्हा सोडतील तेव्हा त्यांना वस्तुस्थिती दिसायला लागेल !