जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
आज सिटी बँकेचा हा मेसेज आला. एसबीआयचाही असाच आला आहे. त्यात त्यांनी हरियाना मधे ज्यांचे कार्ड आहे, त्यांना ९+९ असा १८ % सेवाकर लागेल असे लिहिले आहे. म्हणजे उद्या जर हरियानाने ९ ऐवजी कर ५ टक्के केला तर सगळीकडे एकच कर दर ही योजना फसली असे म्हणायचे का?आता अखंड भारतात सर्विस टॅक्स १८% झाला आहे. :)स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न बुडू नये म्हणून त्यांनाही सवलती दिल्या गेल्यालोकल बॉडीजचा कोणताही टॅक्स जिएसटीच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे त्यांना सवलती देण्याचा प्रश्नच नाही. २)तरीही बऱ्याच गोष्टी सर्व राज्यात एकाच दराने मिळू लागतील.जिएसटी रेजीममधल्या सर्व वस्तू (आणि सेवा) अखंड भारतात, त्यांच्यासाठी असलेल्या एकाच दरानं (रिस्पेक्टीव रेटस) टॅक्स होतील. हाच तर जिएसटीचा मूळ हेतू आहे. प्रतिसाद देण्याआधी विषय नीट समजावून घ्या. ३)आतापर्यंत यांचा सगळा व्यवहार रोखीत होत होता आता त्याला माल पुरवणारा त्यावर जी एस टी भरेल तर त्याचा "माग" काढणे सोपे जाईल. मग अशा व्यावसायिकांना आपले उत्पन्न लपवणे कठीण जाईल. बऱ्याच लोकांना म्हणून पोटात शूल झाला आहे.जो जिएसटी कक्षेबाहेर आहे त्याचा माग निघूच शकणार नाही ! जिएसटीवाल्याच्या सेल्समधे अशी सर्व विक्री,सेल टू नॉन-जिएसटी होल्डर्सया एकाच रकान्याखाली ग्रुप होईल. त्यामुळे नॉन जिएसटी होल्डर्स फक्त एकदाच जिएसटी भरुन मन मानेल तसे व्यावहार (सबजेक्ट टू मार्केट प्रायसिंग कंडीशन्स) करु शकतील. पोट शूळ वगैरे तुमचा पुस्तकी गैरसमज आहे. ४)ज्यांना टीका करायची आहे अशा छिद्रान्वेषी लोकांना फक्त महागाई झाली असेच म्हणायचे आहे. त्यांना सोडून द्या.तुम्हाला जमाखर्च ठेवायची सवय असेल तर जूनचा खर्च जुलैशी कंपेअर करा आणि मग प्रतिसाद द्या. ५)वर म्हटल्याप्रमाणे लहान व्यापाऱ्यांना (२० लाखापेक्षा कमी) जी एस टी रजिस्ट्रेशन अनिवार्य नाही पण धंदा मिळणार नसेल तर झक मारत ते रजिस्ट्रेशन करणार.अप्रत्यक्ष कराचा सर्व बोजा एंड कंझ्युमरवर पडतो ही बेसिक गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती दिसत नाही. एनी वे, आता त्याचं कारण जाणून घ्या. जिएसटी होल्डर त्यानं खरेदीवर भरलेल्या कराचा, ग्राहकाकडून वसूल केलेल्या कराच्या अगेंस्ट सेट-ऑफ क्लेम करतो आणि तो त्याचा फायदा होतो. पण एंड यूजर विक्रीच्या साखळीतल्या सर्वाधिक किंमतीवर लागलेला टॅक्स (झक मारत) स्वतः भरतो. कारण तो पुढे कुणाला विकणार नसतो. तस्मात, डायरेक्ट उत्पादकाकडून माल घेणं हा एंड यूजरला सर्वात फायदेशीर व्यावहार आहे. ते शक्य नसेल तर मधे नॉन-जिएसटी होल्डर असेल तेवढा टॅक्स कमी. कारण तो उत्पादकाच्या किंमतीवर फक्त स्वतःचं मार्जिन लावेल. पुन्हा जिएसटी लावू शकणार नाही. थोडक्यात,त्याच्या मार्जिनवरएंड यूजरला टॅक्स भरावा लागणार नाही. याउलट, उत्पादक ते एंड यूजर या साखळीत जेवढे जिएसटी होल्डर्स जास्त तेवढा त्यांच्या मार्जिनवरच्या टॅक्सचा बोजा एंड यूजरवर पडणार. तस्मात, ज्यांना ज्यांना शक्य आहे ते जिएसटीच्या भंपकपणात न पडता, जिएसटी होल्डर्सपेक्षा कमी किंमतीत वस्तू किंवा सेवा पुरवू शकतील. तेव्हा तुम्हाला देशभक्ती करायची का खर्च वाचवून संसार करायचा हे तुम्ही ठरवा. ५)भारतीय अप्रामाणिकपणासाठी केलेला हा एक उपाय आहे.हाच तो चष्मा ! प्रतिसाद कळला असेल तर आता तो काढून ठेवा. नाही तर तुम्ही `तुझ्याकडे जिएसटीएन नाही त्यामुळे मी तुझ्याकडून काही घेणार नाही' असा तोरा मिरवाल. आणि जे काम साधा गरीब मेकॅनिक २०० रुपयात करायला तयार होता, त्याचे कंपनीच्या सर्विस सेंटरला जाऊन ५०० रुपये मोजाल :)जकात OCTROI हा कुणाचा कर आहे हो? महा/नगरपालिकांचाच ना मग तो बंद होतो आहे म्हणजे काय?तो फक्त दिखावा आहे. फाईन प्रिंटमधे अशी गोची मारुन ठेवली आहे : Will states not charge octroi after GST is introduced ? All entry taxes, including octroi will be subsumed in GST from the start as they have a cascading impact. However, since it is estimated to account for nearly 14 per cent of the total tax collections by states of Rs 3,50,000 crore,the Centre has agreed for a special dispensation allowing states to levy an additional 1 per cent tax in lieu of entry tax.२)तुम्हाला माझ्यावर जे काही आरोप करायचे आहेत ते करा.मला कुणावरही आरोप करण्यात स्वारस्य नाही. मात्र जिएसटीनं मला (प्रोफेशनली) घंटा फरक पडत नाही, हे अनेक वेळा सांगून सुद्धा, तुम्ही आणि म्हात्रे `पोटशूळ', `हितसंबंधांना धक्का' `नाक दाबले की तोंड उघडते' वगैरे जे पहिल्यापासून चालू ठेवलं आहे ते गैर आहे. य उप्पर म्हात्रेंनी अरविंदला आणि तुम्ही प्युबिस रिंग मधे आणून जे आवांतर घडवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ तुमच्याकडे प्रतिवाद करायला काहीही उरलं नाही असा होतो. मी या पोस्टवर संपूर्णपणे विषयाशी संबंधित आणि उपयोगी प्रतिसाद दिलेत. तुम्ही दोघांनी अप्रत्यक्षपणे का होईना माझ्यावर हितसंबंध, तंतरली वगैरे बालिश आरोप केले नसते तर धागा पेटला नसता.VAT मध्ये या पेक्षा वेगळं काय होते ते सुद्धा सांगा?वॅटमधे सर्विस टॅक्स किंवा सिएसटीचा सेट ऑफ मिळायचा नाही. किंवा सर्विस टॅक्सच्या अगेंस्ट वॅट सेट ऑफ व्हायचा नाही. उदा. मी कंप्युटरवर भरलेली एक्साइज आणि वॅट; मला भराव्या लागणार्या सर्विस टॅक्सच्या अगेंस्ट सेट ऑफ करता यायची नाही. आता कोणताही जिएसटी कोणत्याही जिएसटीच्या अगेंस्ट सेट ऑफ होईल.याउलट, उत्पादक ते एंड यूजर या साखळीत जेवढे जिएसटी होल्डर्स जास्त तेवढा त्यांच्या मार्जिनवरच्या टॅक्सचा बोजा एंड यूजरवर पडणार.हे सिंपल आहे. समजा मी ५ लाखाची कार सरळ उत्पादकाकडून घेतली तर ती ६.४० ला पडेल. या उलट मधे डिस्ट्रीब्यूटर आला तर त्याला ६.४० मिळालेली कार तो त्याचा प्रॉफिट (से ५०,०००) अॅड करुन मला ५.५० + जिएसटी १.५४ = ७.०४ ला विकेल. हा डिफरंस, डिस्ट्रीब्यूटरचा प्रॉफिट (५०,०००) प्लस त्यावरचा जिएसटी (१४०००) = ६४,००० इतका आहे.२) जिएसटीमुळे स्वस्ताई येईल हे जनसामान्यांना दाखवलेलं गाजर फोल आहे.-- हे गाजर कुणी, कधी आणि कुठे दाखविले होते ??