जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
💬 प्रतिसाद
(361)
र
रामदास२९
Tue, 11/14/2017 - 11:41
नवीन
या वर आता पुन्हा आढावा घेऊ शकता का कोणी??
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 11/16/2017 - 12:28
नवीन
संक्षींनी कायतरी क्लासिफिकेशनचा नंबर मागितलेला; तो मिळाला का?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 03/28/2020 - 18:24
नवीन
याच धाग्यामुळे ३ वर्षापूर्वी माझा आयडी ब्लॉक केला होता. आता जिएसटीची परिस्थिती सर्वांसमोर आहे आणि ती माझी सर्वच्या सर्व विधाने खरी ठरवते.
१) टॅक्सवर टॅक्स लागणार नाही आणि इन-पुट क्रेडीटचा फायदा व्यावसायिक ग्राहकांना देतील, या दोन कारणांमुळे देशभरातल्या वस्तू आणि सेवा स्वस्त होतील हा सरकारचा दावा संपूर्णपणे फोल ठरला आहे.
२) तीन वर्ष होऊनही सरकारला जिएसटीमधली काँप्लिकेशन्स सोडवता आली नाहीत त्यामुळे व्यावसायिकांसकट सर्व जिएसटी प्रॅक्टीशनर्स एकजात त्रस्त आहेत.
३) जिएसटी हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असल्यानं अर्थव्यवस्थेची आधीच वाट लागली होती; त्यात कोरोनामुळे लॉक-डाऊन झाला आणि परिस्थिती आता आणखी गंभीर होईल. कोरोना निस्तरला तरी ती सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही.
४) या सर्व अपयश आणि अनागोंदीचं खापर सरकार आता सोयिस्करपणे कोरोनानी झालेल्या हानीवर फोडेल आणि देशाची जनता ते मान्य करेल.
५) थोडक्यात, स्वातंत्रोत्तर काळात देशाचा फार मोठा फायदा घडवणारी अत्यंत महत्वाकांक्षी सुधारणा म्हणून प्रचंड गाजावाजा करुन आणलेली ही योजना संपूर्णपणे फसली आहे.
- Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे
Sat, 03/28/2020 - 19:10
नवीन
मध्यरात्री (१२ वाजता ) स्पेशल सेशन घेऊन घोषणा केली होती जीएसटी ची.
योजनेचे बारा वाजणार हे माहीत असणार बहुतेक सरकारला.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 03/29/2020 - 01:30
नवीन
तक्रार नक्की कसली? १)जिसटि हा प्रकारचं मुळात असू नये कि २) त्याची अंमलबाजवणी नीट झाली नाही याबद्दल?
जिथे काही टॅक्स भरल्याचा जात नवहता तिथे यामुळे सरकारला टॅक्स मिळू लागला तर मग तक्रार कसली?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 03/29/2020 - 04:15
नवीन
१) करप्रणाली म्हणून जिएसटी हा पर्याय योग्य असू शकतो पण कोणत्याही करप्रणालीचा पाया हा करदात्यांवर विश्वास हाच असावा लागतो, कारण कर शेवटी तेच भरणार असतात. उदा. इन्कमटॅक्स हा जिएसटीपेक्षा कैक पटीनं क्लिष्ट अॅक्ट आहे पण त्याचं डिजीटलायजेशन अत्यंत उत्तम झालेलं आहे कारण ते करतांना करदात्यांवर विश्वास टाकला गेला, अन्यथा पेपरलेस रिटर्न ही संकल्पना केवळ असंभव होती. गेल्या तेरा वर्षात इन्कमटॅक्स अॅक्टच्या इंप्लीमेंटेशनमधे काहीही अडचण आलेली नाही. सध्या तर इ-असेसमंट ही अत्यंत प्रोफेशनल सिस्टम इंप्लीमंट झाली आहे आणि आता अपिलेट टॅक्सेशनही फेसलेस होईल.
२) जिएसटी ही संकल्पनाच नवी होती पण करदात्यांवर विश्वास न टाकल्यानं; करदाते चोर आहेत या मानसिकतेतून ड्राफ्टींग केलं गेलं आणि ते करसंकलन सुलभ करण्याऐवजी करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून केलं गेलं त्यामुळे अत्यंत क्लिष्ट आणि तद्दन भिकार झालं. अर्थात, सरकारला आपण करदात्यांवर अविश्वास दाखवतोयं ही गोष्ट उघड होण्यात फार मोठा धोका होता आणि आहे, त्यामुळे त्याच ड्राफ्टींगला जसे फटके बसतील त्याप्रमाणे रिपेअरींग चालू झालं. परिणामतः जिएसटीमधे क्लॅरिटी येण्याची शक्यता शून्य झाली आणि करदाते आणि प्रोफेशनल्स यांचा छ्ळ सुरु झाला, तो आता थांबणं अशक्य आहे.
३) जिएसटीमुळे करचुकवेगिरीला आळा बसेल ही संकल्पना वृथा आहे कारण तो इंडिरेक्ट टॅक्स आहे आणि त्याचा भार एंड यूजरवर पडतो. त्यामुळे टॅक्स जितका जास्त तितकी तो चुकवला जाण्याची शक्यता जास्त. थोडक्यात, बील केलं तर जिएसटी, नाही केलं तर शून्य जिएसटी.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 03/29/2020 - 07:23
नवीन
मग इतर देशात हो का याविरुद्ध आरडाओरड नाही?
मला अजून मूळ हेच काळात नाही कि विरोध नक्की कशाला?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 03/29/2020 - 07:30
नवीन
जिएसटी ही संकल्पनाच नवी होती पण करदात्यांवर विश्वास न टाकल्यानं; करदाते चोर आहेत या मानसिकतेतून ड्राफ्टींग केलं गेलं आणि ते करसंकलन सुलभ करण्याऐवजी करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून केलं गेलं त्यामुळे अत्यंत क्लिष्ट आणि तद्दन भिकार झालं
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 03/29/2020 - 05:07
नवीन
सोसायटीत एखादा कार्यक्रम - सभासदांकडून पैसे जमा करून खर्च केला आणि बिलं लागतात. मांडव, केटरिंग वगैरे. सर्विसेस आली ट्याक्स आला.
पर्याय- परस्पर रोख जमा करून समारंभ करून टाकतात.
जीएसटी गेला.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 03/29/2020 - 05:39
नवीन
त्यामुळेच सरकारचं करसंकलन आणि खर्च यात ज्याम मेळ बसत नाहीये. पण पाशवी बहुमतामुळे, आपण करतो ते सगळं बरोबरच आहे आणि काही झालं तरी माघार घ्यायची नाही हे धोरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कुणीही कल्पना सुद्धा न केलेली गोष्ट सरकारनं करून दाखवली आहे, रिजर्व बँकेच्या गंगाजळीतून ३.६० कोटी सरकारी खर्चासाठी उपलब्ध करून घेतले आहेत.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 03/29/2020 - 09:49
नवीन
संजय क्षीरसागर,
तुम्ही म्हणालात :
एक प्रश्न असा की राखीवपेढीची गंगाजळी इतकी फुगली कशी? गेल्या सत्तर वर्षांत कोणी अशी बातमी ऐकलेली काय? ९ लाख कोटी रुपये जमा झाले ते भ्रष्टाचार थांबवल्यानेच ना? ते श्रेय नि:संशय मोदींचं आहे.
मात्र तरीही वसेकच्या रूपरेखेविषयी तुम्ही मांडलेली मतं ग्राह्य आहेत.
माझ्या मते वसेकमध्ये घिसाडघाई झाली आहे व त्यामुळे शासनाचं जे नुकसान होतंय ते अतिरिक्त गंगाजळीच्या जोरावर धकवून नेण्याचा मोदींचा मानस आहे. मोदी हे बरोबर करताहेत की चूक ते माहीत नाही. त्याचप्रमाणे माझं हे आकलन देखील बरोबर की चुकीचं तेही माहीत नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8