Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट

स
सन्घमित्रा
Fri, 06/23/2017 - 17:00
🗣 361 प्रतिसाद
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
वर्गीकरण
फिनान्स

प्रतिक्रिया द्या
124754 वाचन

💬 प्रतिसाद (361)
स
सुबोध खरे Tue, 06/27/2017 - 21:14 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/india/manmohan-singu-lends-strong-support-to-gst-bills/articleshow/58056828.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Tue, 06/27/2017 - 21:15 नवीन
http://m.thehindubusinessline.com/economy/gst-will-help-curb-black-money-says-yv-reddy/article7790338.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 06/27/2017 - 21:23 नवीन
http://m.thehindubusinessline.com/opinion/letters/gsts-time-has-come/article6698058.ece हे श्री अमर्त्य सेन म्हणतात संक्षी साहेब डॉ मनमोहन सिंह वाय व्ही रेड्डी आणि अमर्त्य सेन हे कदाचित आपल्यापेक्षा जास्त शिकलेले आणि हुशार नसतील पण जास्त प्रथितयश नक्की आहेत. आणि हे तिन्ही अर्थ तज्ञा G S T चे जोरदार समर्थन करत आहेत म्हणजे त्यात काही तरी चांगले नक्कीच असावे. आपल्याला पटत नसेल ठीक आहे आपल्या मताचा आदर आहे शेवटी काय आहे मी आपला एक साधा डॉक्टर आहे तेंव्हा अर्थतज्ज्ञ परिषदेत काही जात नाही पण चार शिकलेली माणसे चांगलं म्हणताहेत तर त्यात काही तरी असेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 06/27/2017 - 21:26 नवीन
आणि हो हे तिघेही मोदी सरकार सत्तेत असताना असे बोलले आहेत. म्हणजे विरोधी बाजूला सुद्धा G S T चांगला आहे असंच वाटतय. बघा बुवा तुम्हालाही बाजू बदलायची असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 06/27/2017 - 21:33 नवीन
http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/gst-to-raise-returns-across-economy-raghuram-rajan/articleshow/53612371.cmsरघुरामन राजन साहेब सुद्धा G S T च्या बाजूने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चिनार गुरुवार, 06/29/2017 - 07:55 नवीन
खरे सर, तुमच्याविषयी आदर आहे. हा प्रतिसाद काडी टाकण्यासाठी नाही. पण ज्या तीन तज्ज्ञांचा आधार तुम्ही घेताय त्या मनमोहन सिंग, अमर्त्य सेन आणि रघुराम राजन या तिघांनीही नोटबंदीला विरोध केला होता. मग त्यावेळी ते अर्थ तज्ज्ञ नव्हते का?? म्हणण्याचा उद्देश असा की नोटबंदी, GST हे खूप मोठे आणि गहन विषय आहेत. त्यात हा काय म्हणतो किंवा तो काय म्हणतो या पेक्षा मार्केट आणि सामान्य जनता त्याला कशी सामोरी जाते, रिऍक्ट होते हे जास्त महत्त्वाचे आहे. GST मागे सरकारचा उद्देश प्रामाणिक असेलही किंवा नसेलही पण जनता त्याला कशी स्वीकारते ह्यावर यशापयश अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित गुरुवार, 06/29/2017 - 08:01 नवीन
+11111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
सुबोध खरे गुरुवार, 06/29/2017 - 09:01 नवीन
चिनार साहेब जी एस टी यशस्वी होतो कि नाही हा मुद्दा अलाहिदा आहे. संक्षी हे इतर सर्व "मूर्ख" आहेत असे गृहीत धरून प्रतिसाद देतात कि जी एस टी आणणे हे मूर्ख पणाचे आहे आणि फक्त अर्थतज्ज्ञांना त्याबद्दल कळते.माझ्या प्रतिसादांना त्यांनी वापरलेली भाषा तुम्ही पाहिलीत तर हे लक्षात येईल. किंवा त्यांच्या प्यूबिक रिंग च्या धाग्यावर त्यांची वक्तव्ये वाचली तरहि तुम्हाला लक्षात येईल. त्यांना फक्त एवढेच सांगायचे होते कि प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे/ नोबेल पारितोषिक मिळवलेले अर्थतज्ज्ञ ज्यांनी निश्चलनीकरणालाहि विरोध दाखवला होता आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी सुद्धा जी एस टी चे जोरदार समर्थन केले आहे. मी एक यःकश्चित माणूस आहे. मला समजते कि नाही हा मुद्दा इथे नाहीच. "मीच काय तो शहाणा" याबद्दल त्यांना फक्त दाखवायचे होते कि इतरही प्रख्यात अर्थतज्ज्ञ लोक बोलतात ते काही कमी शहाणे नाहीत. कोणत्याही पक्षीय दृष्टिकोनातून याकडे पाहू नका. मोदी भक्त कि मोदिरुग्ण हा मुद्दा येथे नाहीच. तसे असते तर विरोधी पक्षांनी सुद्धा एकमताने जी एस टी विधेयक पस केले असते का? व्यवसाय करणे हो सुलभ आणि सहज व्हावे आणि भ्रष्टाचार कमी व्हावा हा जी एस टीचा मूळ हेतू आहे. भारतीय मनोवृत्ती पाहता तो किती सफल होईल कि नाही हे मी कसे सांगू शकेन? एवढेच आहे कि मी एक आशावादी माणूस आहे त्यामुळे जसे नोटबंदीचे मी स्वागत केले तसेच जी एस टी चे करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे गुरुवार, 06/29/2017 - 09:23 नवीन
चिनार साहेब धागा प्रकाशित झाल्या झाल्या संक्षींनी दिलेला "दुसराच" प्रतिसाद जिएसटी हा विषय..... 23 Jun 2017 - 11:45 pm | संजय क्षीरसागर सामन्यांना कळला नाही तरी चालेल, तो कळण्यासारखाही नाही आणि कळून उपयोग ही नाही. व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही Smile हा त्यांचा प्रतिसाद त्यांची वृत्ती स्पष्टपणे दाखवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
I
IT hamal गुरुवार, 06/29/2017 - 11:12 नवीन
तिच्यामायला ते जीएसटी - फियेस्टी गेलं उडत...मी कुठे कडमडलो होतो त्या धाग्याच्या दिवसात माहित नाही...बट फीलिंग व्हेरी अशेम्ड ऑफ myself ....लिंक द्या हो कृपया त्या "प्यूबिक रिंग " च्या धाग्याची..असे इंटरेस्टिंग धागे नजरेतून कसे निसटतात काय माहित ? लवकर द्या हो कुणी तरी ती लिंक !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चिनार गुरुवार, 06/29/2017 - 11:48 नवीन
जी एस टी यशस्वी होतो कि नाही हा मुद्दा अलाहिदा आहे.
सर माफ करा..पण माझ्यासाठी जी एस टी यशस्वी होतो कि नाही हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. बाकी सगळं अलहिदा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Tue, 06/27/2017 - 21:44 नवीन
रिटर्न्स भरतांना काय छळ होणारे ते कळायला अ‍ॅक्च्युअल काम करणारे लोक काय म्हणतात ते बघायला हवं ! मी वर बरोब्बर म्हटलंय : हे कळायला जिएसटीचे प्रोफेशनल सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य . आणि पुन्हा सांगतो, मला यात शून्य त्रास आहे कारण मी जिएसटीसारखी घोडे छाप कामं करत नाही. आणि नुकसान तर काहीच नाही. मी माझी रिटर्न्स भरली की झालं. तेव्हा तुमचा गैरसमज काढा म्हणजे त्या अँगलनं वारंवार प्रतिसाद देण्याचे कष्ट वाचतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 06/28/2017 - 07:34 नवीन
संक्षी तुम्ही टोपी पण फिरवू लागलात. मूळ प्रतिसाद आणि त्याचे उत्तर असे आहे १)कोणताही प्रख्यात (स्वघोषित नव्हे) अर्थ तज्ज्ञ सुद्धा त्याला विरोध करताना आढळला नाही हा योगायोग तर नक्कीच नाही. हे कळायला जिएसटीचे प्रोफेशन सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य . यावर मी सर्वसामान्य लोकांना माहित असलेले आणि प्रख्यात अर्थ तज्ज्ञ ( श्री रघुरामान राजन, वाय व्ही रेड्डी, डॉ मनमोहन सिंह) काय म्हणतात ते दुव्यासकट दिले आहे. या कोणत्याही वाक्यात जी एस टी भरताना होणाऱ्या छळाचा काहीही संबंध नाही आणि कोणत्याही प्रख्यात अर्थतज्ञाने असा छळ होणार आहे असेही म्हटलेले नाही. उगाच संदर्भहीन वाक्ये टाकून टोपी फिरवू नका. जाता जाता -- जी एस टी मुले भाव कमी होतील असे मी कुठे म्हटले आहे ते दाखवून द्या उगाच दुसऱ्यांची वाक्ये माझ्या तोंडी टाकून मुद्दा भरकटवू नका. या धाग्याची "प्यूबिक रिंग" होते आहे असे वाटू लागले आहे. सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 06/28/2017 - 10:12 नवीन
जी एस टी मुले भाव कमी होतील असे मी कुठे म्हटले आहे ते दाखवून द्या उगाच दुसऱ्यांची वाक्ये माझ्या तोंडी टाकून मुद्दा भरकटवू नका. तुम्ही स्वतःचे प्रतिसाद वाचत नाही का हल्ली विस्मरण होतंय ? हा पाहा तुमचा प्रतिसाद ! मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Wed, 06/28/2017 - 10:42 नवीन
कधीपासून होतंय असं..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Wed, 06/28/2017 - 10:42 नवीन
सं क्षी शुद्ध मराठीत सरळ शब्दात लिहिले आहे की जी एस टी मुळे महागाई कमी होणार नाही म्हणजेच वस्तूंच्या किमती आहेत त्याच राहतील किंवा वाढतील. अजून फोडून सांगायला हवे का? माझ्या लेखनाला साधा अर्थ असतो वाच्यर्थ व्यंगार्थ असं काही नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 06/28/2017 - 12:36 नवीन
शुद्ध मराठीत सरळ शब्दात लिहिले आहे की जी एस टी मुळे महागाई कमी होणार नाही म्हणजेच वस्तूंच्या किमती आहेत त्याच राहतील किंवा वाढतील हे तुम्हीच म्हणातायं ना ? आणि ते तर मी सुरुवातीलाच सांगितलंय :) 23 Jun 2017 - 10:58 pm | संजय क्षीरसागर सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ? काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 06/29/2017 - 09:18 नवीन
संक्षी तुम्ही बधिर आहात कि तसे सोंग घेताय. मी तुमचा "भाव कमी होणार नाही"त हा मुद्दा कधी खोडलाय कि त्यावर वाद घातलाय. हा वाद तुमचा आणि डॉ म्हात्रे यांचा चालला होता आणि त्याचे प्रतिसाद तुम्ही अजूनही माझ्या नावाने का देता आहेत ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
द
दशानन Wed, 06/28/2017 - 10:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/27/2017 - 17:34 नवीन
इथे जे व्यावसाय करतात आणि जे जिएसटीच्या जाचात अडकणार आहेत त्यांना याविषयी लिहू देत. सामान्यांना त्याची काही कल्पना येणार नाही. तरीही थोडक्यात सिच्युएशन अशी : १) हसमुख अधिया सरकारी नोकर आहेत आणि त्यांना सरकारची तळी उचलणं भाग आहे. कारण तो शेवटी त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. २) Those with a turnover below Rs 20 lakh need not file any return. Their life will not change at all after July 1. यात काही विशेष नाही. हे म्हणजे तुमचं उत्पन्नच २.५० लाखाच्या आत आहे, तुम्ही रिटर्न भरायची गरज नाही. पण अशा लोकांची मोठे व्यावसायिक ठासणार आहेत कारण छोट्या व्यावसायिकांकडून घेतलेल्या मालावर त्यांना सेट ऑफ मिळणार नाही. शिवाय रिवर्स चार्जची प्रोविजन आहे. म्हणजे वस्तूच्या किंमतीत जिएसटी आहे असं गृहित धरुन तितके कमी पैसे मिळतील आणि सदर रक्कम मोठे व्यावसायिक सरकारला भरतील. थोडक्यात छोटे व्यावसायिक मरणार आहेत. ३) If your turnover is more than Rs 20 lakh and below Rs 75 lakh, you can plain ignore all the details. ही काँपोझिशन स्कीम आहे आणि ती पूर्वीही होतीच. पण अशा लोकांची वर सांगितल्याप्रमाणे, सेट-ऑफ न मिळाल्यामुळे मोठे व्यावसायिक कोंडी करणार आहेत. तिथे फक्त रिवर्स चार्जपासून सुटका असू शकते. ४) ७५ लाखांच्यावर टर्न ओवर असणारे कशाला सामोरे जाणारेत ते मी वर एका प्रतिसादात सविस्तर लिहीलं आहेच. ते सर्वस्वी इंटरनेटची इफिशियंसी, इलेक्ट्रीसिटी अ‍ॅवलेबिलीटी, ९० लाख व्यावसायिकांची सुमारे २.७५ कोटी ट्रांझॅक्शन्स हँडल करण्याची जिएसटी सिस्टमची क्षमता, तुमच्या सप्लायर्सची रिटर्न्स अपलोड करण्याची अचूकता आणि नियमितता (कारण त्यावर तुमचा सेट-ऑफ अवलंबून आहे) ...थोडक्यात, तुम्ही कितीही कंप्लायंट असला तरी जिएसटीच्या तालावर नाचण्यापलिकडे काही करु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
म
मोदक Tue, 06/27/2017 - 17:49 नवीन
याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल ! चि. राहुल गांधी पण असेच म्हणाले होते की नोटबंदीवर ते बोलले तर भूकंप होईल. भूकंप काय झाला नै आणि तुम्ही काय झोप उडवणार नै - उगाच कशाला कंदील जाळताय..? जे लिहायचे ते स्वच्छ लिहा. तुमच्यामते सरकार हुकुमशाही राबवत आहे का..? २०१९ ला तुमच्यासोबत आणखी १० लोकांना मतदान केंद्रावर घेऊन जा आणि भले मोदीविरोधी का असेना पण मत द्यायला लावा - हाच शेवटचा पर्याय सुचवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/27/2017 - 18:58 नवीन
वाचता येत असेल तर बघा आणि विषयाशी संबधित काही लिहीता आलं तर बघा नाही तर गप बसा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अभिजीत अवलिया Tue, 06/27/2017 - 18:29 नवीन
२.७५ कोटी ट्रांझॅक्शन्स
२.७५ नाही २७५ कोटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/27/2017 - 18:53 नवीन
यू कॅन इमॅजिन द वॉल्यूम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिदेश Tue, 06/27/2017 - 17:54 नवीन
आधी लिहिले होते किती ३७ रिटर्न भरावे लागतील , ते चुकीचे नव्हते का मग ? आता तुम्ही प्रतिसाद वेगळ्या विषयावर लिहिताय... ३७ रिटर्नचे काय झाले ?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/27/2017 - 18:53 नवीन
७५ लाखांच्या वर व्यावहार असणारे अशा अडचणीत सापडणारेत : १) त्यांना स्वतःच्या पर्चेस रजिस्टरसाठी सप्लायर्सच्या अचूक आणि वेळेवर भरलेल्या रिटर्न्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. (जिएसटी २) सप्लायरनं गोची केली (रिटर्न किंवा टॅक्स भरला नाही, चुकीच्या डिटेल्स भरल्या किंवा चुकीचा जिएसटीएन भरला) तर त्याची जवाबदारी खरेदी करणारा उचलणार आहे. (जिएसटी २ए) २) शिवाय तुमच्याकडून खरेदी करणारा जर तुमचा सेल चुकीचा अमेंड करत असेल तर त्यावर तुम्हालाच लक्ष ठेवावं लागणार आहे. (जिएसटी १ अँड १ए) ३) कितीही वेळेवर काम केलं तरी जिएसटीनं डेटा प्रोसेस केल्याशिवाय रिटर्न भरता येणार नाही. (जिएसटी ३). म्हणजे प्रत्येक महिन्यात १० ते २० तारखेला हा उद्योग रोज करावा लागणार आहे ४) अशी ३६ रिटर्न्स भरुन ही शेवटी एक वार्षिक रिटर्न (जिएसटी ९) भरावं लागणार आहे (३७ वं रिटर्न !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
स
सुबोध खरे Wed, 06/28/2017 - 07:23 नवीन
शून्य अनुभव, खयाली पुलाव सुतराम कल्पना नाही. हे सर्व बोलुन झालं. आता "७५ लाखांच्या वर व्यावहार असणारे अशा अडचणीत सापडणारेत". एकंदर व्यावसायिकांच्या संख्येत असे व्यावसायिक( ७५ लाखाच्या वर उलाढाल) नक्कीच टक्क्याने बरेच कमी आहेत. बहुसंख्य लहान व्यावसायिक दुकानदार स्वयंरोजगार वाले याच्या बरेच खाली आहेत. ७५ लाखाच्या वरची उलाढाल करणारा कमीत कमी १५ % नफ्यावर धंदा करतो म्हणजेच जवळ जवळ १२ लाख रुपये नफा. आता जो माणूस १ लाख रुपये महिना मिळवतो त्याला केवळ रिटर्न भरण्यासाठी दोन अडीच हजारात मिळणाऱ्या सॉफ्टवेअर वर काम करणारा एक अर्ध वेळ कारकून मिळणार नाही? चार पाच हजारात. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी राईचा पर्वत करायचा असेच झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सतीश कुडतरकर Wed, 06/28/2017 - 06:42 नवीन
३७ आकडा बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
द
दशानन Tue, 06/27/2017 - 17:57 नवीन
कलगीतुरा संपला असेल तर मुळ मुद्यावर या हो!!!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 06/28/2017 - 07:58 नवीन
पण अशा लोकांची मोठे व्यावसायिक ठासणार आहेत कारण छोट्या व्यावसायिकांकडून घेतलेल्या मालावर त्यांना सेट ऑफ मिळणार नाही. शिवाय रिवर्स चार्जची प्रोविजन आहे. म्हणजे वस्तूच्या किंमतीत जिएसटी आहे असं गृहित धरुन तितके कमी पैसे मिळतील आणि सदर रक्कम मोठे व्यावसायिक सरकारला भरतील. थोडक्यात छोटे व्यावसायिक मरणार आहेत. >>> हाच गोंधळ आहे जो छोट्या व्यवसायिकांना फेस करावा लागणार आहे. रिटर्न्स फाइल करायचे नाहीत म्हणजे धंदाच नसेल तर कुठले रिटर्न्स आणि कसलं काय? जरी छोट्या व्यावसायिकाने धंदा केला तरी त्याचे किमान १० टक्के कायमस्वरुपी प्रत्येक व्यवहारातून सरकारकडे जात राहतील, ते परत मिळण्याची शक्यता काय , कशी याबद्दल माहिती नाही. ---------------------------------------- दुसरे महत्त्वाचे असे. इथे सरकारची तळी उचलणारे 'मोदीद्वेषातून, भाजपद्वेषातूनच जीएसटीला विरोध होत आहे' असा जावाइशोध लावत आहेत. त्यांच्या अशा बिनबुडाच्या विधानांनी बुद्धीभ्रम होऊ नये म्हणून इतर वाचकांना विनंती. फार काही करायची गरज नाही. इथले प्रतिसादही वाचू नका. फक्त आपआपल्या संपर्कात जे कोणी व्यवसायिक, जसे किराणावाले, इत्यादी आहेत त्यांना याबद्दल विचारा. इथल्या अमूकतमूक ने सांगितलेलं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यावसायिकांचे अनुभव व मतं जाणून घेणं जास्त सोपं व उपयोगी आहे. अनेक भाजपसमर्थक पारंपारिक मतदार व्यावसायिक जीएस्टीच्या गोंधळाने वैतागलेले आहेत हे लक्षात येईल. अनेक डिस्ट्रीब्युटर्स नी मालाचा पुरवठा बंद केला आहे. गुजरातमध्येच कित्येक व्यापारी संघटनांनी यशस्वी बंद घडवून आणले आहेत. हे सगळे मोदीद्वेषातून करणारे पारंपरिक भाजपचेच मतदार आहेत. आता बघा काय ते. जीएसटीला विरोध होत नसून जी घिसाडघाई होत आहे, जी बळजबरी होत आहे, जो गोंधळ आहे त्याला विरोध आहे. तसे नसते तर आजवर जीएसटीसाठी आग्रही असणारी व्यावसायिक, व्यापारी मंडळी इतकी आक्रमक का झाली असती? म्हणजे जीएसटी आणा म्हणून घोषा लावणारे आज जीएसटी येत आहे तर बोंबा मारतील? व्यापार्‍यांच्या प्रमुख मागण्या ह्या जीएसटीच्या विरोधात नाहीत तर त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यानुसार यंत्रणेच्या अंमलबजावणीतल्या तृटींबद्दल आहेत. हे एकदा लख्ख समजून घ्यावे. राजकीय हेतूने प्रेरीत विधाने केल्याने सुर्य उगवायचा राहणार नाहीच. जे काय आहे ते समोर असेल. बाजार सत्तेत कोणता पक्ष आहे हे बघत नसतो. त्याला आपल्या पैशाशी मतलब असतो. आणि पैशाला धर्म, जात, राजकारण वगैरे काही नसते. राजकीय भांडणे तर होतंच राहतील. उगाच बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न होऊ नये. आजकाल देशातल्या कुणाही घटकाने आपल्या समस्या मांडल्या म्हणजे मोदीविरोधातले षडयंत्रच आहे असे अंधभक्तांना वाटत राहते.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Wed, 06/28/2017 - 08:36 नवीन
फक्त आपआपल्या संपर्कात जे कोणी व्यवसायिक, जसे किराणावाले, इत्यादी आहेत त्यांना याबद्दल विचारा. इथल्या अमूकतमूक ने सांगितलेलं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यावसायिकांचे अनुभव व मतं जाणून घेणं जास्त सोपं व उपयोगी आहे. व्यापार्‍यांच्या प्रमुख मागण्या ह्या जीएसटीच्या विरोधात नाहीत तर त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यानुसार यंत्रणेच्या अंमलबजावणीतल्या तृटींबद्दल आहेत. हे एकदा लख्ख समजून घ्यावे. १ जुलै येण्याआधीच अंमलबजावणीतल्या त्रूटी कशा काय कळल्या. किराणावाले, व्यावसायिक यांना तरी कुठे अनुभव आहे. सगळे जण स्पेक्युलेशनच करत आहेत. त्रुटी, अनुभव, फायदे वगैरे कळण्यासाठी १ जुलै २०१९ पर्यंत वाट बघावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 06/28/2017 - 09:20 नवीन
१ जुलै येण्याआधीच अंमलबजावणीतल्या त्रूटी कशा काय कळल्या. किराणावाले, व्यावसायिक यांना तरी कुठे अनुभव आहे. सगळे जण स्पेक्युलेशनच करत आहेत. >> हे विधान माहितीच्या अतिशय अभावाचे द्योतक आहे. ह्यावर उत्तर देण्याआधी हसावं की रडावं असा फील आला... :-) अहो आप्पा, जीएसटीच्या व्यवस्थेने नवीन करआकारणी १ पासून सुरु आहे. पण त्यासाठी आधी नोंदणी करावी लागते, आपल्याकडच्या व्यवहाराच्या नोंदी करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करावे लागतात, नवीन कर द्यायची सुरुवात ग्राहकांना एक तारखेपासून होईल, पण ते होण्याआधी सर्व व्यावसायिकांना नवीन यंत्रणा आपल्या जागी फिट बसायला हवी आहे, हे एवढं तरी कळतं की नाही? तुम्ही जिथे कुठे काम करत असाल तिथल्याच अकाउंटविभागाला भेट देऊन जरा माहिती काढा, मागच्या महिन्याभरात त्यांनी काय काय केलं ते. किराणावाले, व्यावसायिक याआधी जणू कर भरतच नव्हते असे काहीसे तुमचे विधान आहे. सगळ्याप्रकारचे कर डिसॉल्व करुन एकच कर बसणार आहे, त्याची तयारी करण्यात गोंधळ आहे, अंमलबजावणीतल्या तृटी दिसत आहेत, याचा त्यांना आताच अनुभव येत आहे. म्हणून म्हटले वॅट्+सर्विसटॅक्स भरणार्‍या व्यावसायिकांना भेटून विचारा. तुमच्याकडे माहिती नाही हे समजू शकतो पण कॉमनसेन्सच्या अभावात काहीही विधाने इथे करु नका. लोकांच्या गैरसमजात अजून भर घालू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Wed, 06/28/2017 - 11:01 नवीन
<<< अकाउंटविभागाला भेट देऊन जरा माहिती काढा, मागच्या महिन्याभरात त्यांनी काय काय केलं ते.>> ==> आमच्या कंपनीत एक वर्षा पासून GST ची तयारी चालू आहे आणि आज २८ जून २०१७ असून, ५० % तयारी झाली आहे असे अजून कोणी ही ठामपणे सांगायला तयार नाही आहे. सगळे आता म्हणायला लागलेत जे पुढे होईल ते बघू. आपल्याच कंपनीची थोडीच तारांबळ उडणार आहे. सगळेच असणार आहेत. हा अटीट्युड निर्माण झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर Wed, 06/28/2017 - 11:32 नवीन
मला जीएसटीची काहीच माहिती नाही आणि मी त्यासंबंधी काही दावे सुद्धा केले नाहीत. आणि अकाउंट विभागाला भेट देणे हे माझे काम नाही. माझे काम निराळ्या स्वरुपाचे आहे. तुम्ही माहितीचा अभाव आहे लिहिले इथपर्यंत ठीक होते. माझ्याकडे जीएसटी बद्दल माहितीचा अभाव आहे हे खरेच आहे. आणि नोकरदार असल्यामुळे मला त्या माहितीची फारशी गरज आजतरी नाही. 'हसाव की रडाव, कॉमन सेन्सचा अभाव' वगैरे बाष्कळ टिप्पणी आणि तुच्छतावाद कशासाठी. आत्महत्या करावी की करु नये याचा वैयक्तिक सल्ला घेण्यासाठी तुम्हाला मिपासारख्या जाहीर फोरमचा आधार घ्यावा लागला होता. हे विसरलात का. तेंव्हा कॉमन सेन्स कुठे गेला होता ? यापुढे कॉमन सेन्स वगैरे वैयक्तिक टिप्पणी करण्याआधी २० लाख वेळा विचार करा. नाहीतर उगाच बेअब्रू होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 06/28/2017 - 11:42 नवीन
आपले संस्कार कळले. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
उ
उपेक्षित Wed, 06/28/2017 - 13:29 नवीन
अतिशय साधा सिम्पल आणि उत्तम प्रतिसाद संदीप संजय क्षीरसागर आणि म्हात्रे साहेबाना विनंती बाकीची दंगल खफ वर चालू ठेवा आता कारण आता खूपच अति झालेय असे वाटत आहे... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Wed, 06/28/2017 - 08:18 नवीन
डांगे अण्णा व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही. हा मूळ संक्षींचा प्रतिसाद आहे. यावर झालेला काथ्याकूट आहे. उगाच भक्त आणि रुग्ण हा वाद उकरून काढायला कुणालाच हौस नाही. व्यावसायिकांना त्रास होणार आहे यात शंका नाही पण त्यातही काही लोक आपलं धुणं धुवून घेत आहेत किंवा बागुलबुवा उभा करत आहेत
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 06/28/2017 - 09:23 नवीन
संक्षी बोलतायत त्यात काही खोटं नाही. हां, आता मी नेहमीचा मोदीविरोधक आहे म्हणून कानफाट्या म्हणून माझ्या म्हणण्याला तुम्ही लोक किंमत देणार नाही हे माहित आहे. पण भाजपचे पारंपरिक मतदार असलेले व्यापारी जे म्हणत आहेत आणि संक्षींचे तुम्ही उल्लेखित केलेले विधान याच्यात फार काही फरक नाही. बाकी, जीएसटीला होणारा विरोध राजकीय किंवा मोदीद्वेषातूनच होतोय, ह्या म्हात्रेंच्या म्हणण्याबद्दल आपले काय मत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 06/28/2017 - 10:53 नवीन
डांगे अण्णा माझे सर्व प्रतिसाद चष्मा काढून शांतपणे वाचा. त्याचा डॉ म्हात्रे यांच्या प्रतिसादाशी काहीही संबंध नाही. व्यापाऱ्यांना जी एस टी हवा आहे पण आपले उत्पन्न सरकारच्या *नजरेत* यायला नको आहे म्हणून हा आटापिटा चालू आहे. सुवर्ण व्यापाऱ्यांनी 1% अबकारी कराल कसून विरोध केला होता तो याच्याच साठी. सरकार त्याला बांधले नाही ही चांगली गोष्ट आहे. बाकी संक्षी काही व्यापारी नाहीत पण त्यांनी "झक मारली" सारखे शब्द वापरले करण कुठेतरी काहीतरी जळतंय. व्यापाऱ्यांच्या आणि त्यांच्या विधानात तुम्हाला साधर्म्य आढळलं तर त्यांच्यात काही लागे बांधे आहेत असे तर तुम्हाला सुचवायचे नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 06/28/2017 - 11:40 नवीन
आता पेड ट्रोलांच्या आणि तुमच्यासारख्या विचारवंत, अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍यांच्या विचारांत साधर्म्य आढळलं तर तुमचेही काही लागेबांधे आहेत असे समजायला हरकत नाही असे तुम्हीच स्वतः स्पष्ट केले हे फार बरे झाले. जे लोक विरोध करत आहेत ते चोरच आहेत हा तुमचा चष्मा तुम्हीही काढलेला बरा. कारण इथे वाचणारे बहुतेककरुन सगळे नोकरदार आहेत, आप्पांसारख्यांच्या प्रतिसादावरुन तर ते किती किती अनभिज्ञ आहेत हेही दिसत आहेच. त्यांना तुम्ही हे गैरसमज पसरवून द्वेषाचे विष पाजू नका उगाच. समजले तर अगदी सिम्पल आहे, वॅट,सर्विस टॅक्स व इतर टॅक्स पुर्वीही भरायचेच होते, आताही नाव बदलून एकत्र भरायचेच आहेत. जे कर चोरी करत होते, ते आताही करणारच आहेत, नवीन मार्ग काढणारच आहेत. चोरांच्या टोळ्या कधीही पोलिसांच्या विरोधात मोर्चे काढत नसतात. जेवढे नियम जाचक होतात ते त्यातून शांतपणे मार्ग काढत राहतातच. हा उंदरा-मांजराचा खेळ आहे. पण या सर्वात जे प्रामाणिक आहेत त्यांचीच त्यांचीच काही तृटींमुळे फरफट होत आहे, व तेच विरोध करत आहेत इतके लक्षात असलेले बरे. आता प्रामाणिक कर भरणार्‍यांनाही 'फक्त विरोध केला' म्हणून चोर म्हणायची तुम्ही फॅशन आणत आहात ही चुकीची आहे. तेवढे मांडण्यासाठी इथे प्रतिसाद दिला. कारण नोटाबंदीच्या वेळेसही हेच लॉजिक लावून जे नोटाबंदीला विरोध करत आहेत ते काळेपैसे वालेच आहेत, त्यांच्या बुडाला आग लागली आहे असे म्हटल्या गेले आहे. काळेपैसेवाल्यांचे तर सर्व पैसे पांढरे झाले बिनभोबाट पण जे नोटाबंदीच्या संकल्पनेविरोधात बोलत होते त्यांच्या विश्वासार्हतेचे मात्र हनन करण्यात आले. ही एक घातक प्रवृत्ती आहे. उद्या भाजप सरकार जाऊन दुसरे कोणतेही सरकार आले आणि त्यांनी जाचक नियम केले तर त्याविरुद्ध बोलणारांसाठी आपण आजच खड्डा खणून ठेवत आहोत याचे भान भाजपच्या आंधळ्या भक्तांना राहिलेले नाही. तुम्ही आज जे करत आहात तेच तुम्हाला उद्या भोगावे लागू शकते. तेव्हा आज काय पेरत आहात त्याकडे लक्ष द्या. माझे म्हणणे चूक असेल तर आपले उत्पन्न सरकारच्या *नजरेत* यायला नको आहे म्हणून हा आटापिटा चालू आहे हे तुमचे विधान पुराव्यांनिशी सिद्ध करावे लागेल तुम्हाला. कोणत्या व्यापार्‍यांना तुम्ही भेटलात ज्यांनी तुमच्याकडे हे सर्व कबूल केले आहे, 'उच्चपदस्थ' इन्टेलिजन्स अधिकारी जो तुमचाच योगायोगाने मित्र निघतो त्याच्याकडून आलेल्या काही गुप्तवार्ता त्याने तुमच्याशी शेअर केल्या असतील, इत्यादी माहिती तुमच्याकडे असेलच. तेव्हा ती सविस्तर इथे मांडावी. म्हात्रे साहेब म्हणतात तसे "हवेत बाण" चालवू नये. चष्मा काढायचा सल्ला उठसूट देत असता, म्हणजे मी चष्मा घालूनच बघत आहे असे तुम्ही ठरवून ठेवलेलंच आहे. तेच तर मी वर बोललो. की तुम्ही मला कानफाट्या घोषित केलेच आहे तेव्हा मी बोलणार त्यावर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. हे पक्कं सिद्ध केलंच तुम्ही. त्यामुळे तुम्ही कितीही म्हटलं की संदीप डांगे भाजपविरोधाचे चष्मे घालून इथे लिहित आहे तर हसे माझे नाही तुमचे होइल. मी बोलतोय ते खरं खोटं करायला बाहेर मार्केट उभंच आहे. मार्केटात काय चालू आहे ते दिसत आहेच. त्यासाठी कुठल्याच चष्म्याची कोणालाही गरज नाही. मला काही वैयक्तिक कलगीतुर्‍यात इन्टरेस्ट राहिला नाही. इथल्या कलगीतुर्‍यात भाग घेऊन तुमच्यासारख्या कंपूबाजांमुळे झपाट्याने ढासळत चाललेला या संस्थळाचा टीआरपी फुकाफुकी वाढवण्यात तर मला अजिबात रस नाही. पण गैरसमज पसरवू नये म्हणून जाणूनबूजून लिहिले आहे. धन्यवाद. (मी इथे आता वारंवार येत नाही, तेव्हा चर्चेत पुढे लिहिनच असे नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Wed, 06/28/2017 - 12:02 नवीन
समजले तर अगदी सिम्पल आहे, वॅट,सर्विस टॅक्स व इतर टॅक्स पुर्वीही भरायचेच होते........................................................................ ............................................. .............उद्या भाजप सरकार जाऊन दुसरे कोणतेही सरकार आले आणि त्यांनी जाचक नियम केले तर त्याविरुद्ध बोलणारांसाठी आपण आजच खड्डा खणून ठेवत आहोत याचे भान भाजपच्या आंधळ्या भक्तांना राहिलेले नाही. तुम्ही आज जे करत आहात तेच तुम्हाला उद्या भोगावे लागू शकते. तेव्हा आज काय पेरत आहात त्याकडे लक्ष द्या. ------------------------------------------------------------------------------------xxxxxxxxxxx----------------------------------------------------------------- डांगे जी हा छान मजकूर मांडलात ...!! या चर्चे मध्ये २०० च्या वर प्रतिसाद होऊन देखील GST सारख्या महत्वाच्या विषयावर संक्षी व्यतरिक कोणी ही माहितीपूर्ण योगदान देऊ शकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उपेक्षित Wed, 06/28/2017 - 13:34 नवीन
उत्तम प्रतिसाद संदीप भावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Wed, 06/28/2017 - 14:37 नवीन
डांगे अण्णा आपले उत्पन्न सरकारच्या *नजरेत* यायला नको आहे म्हणून हा आटापिटा चालू आहे याचे मी सुवर्ण व्यापाऱ्यांनी १ % अबकारी कराला कसून केलेला विरोध हे उदाहरण दिले होते. ते तुम्ही वाचले नाही का? जरा शांत डोक्याने प्रतिसाद वाचत जा. डांगे अण्णा माझे सर्व प्रतिसाद चष्मा काढून शांतपणे वाचा. त्याचा डॉ म्हात्रे यांच्या प्रतिसादाशी काहीही संबंध नाही. तो(संबंध) तुम्ही लावून घेत आहात. का ते तुम्हालाच माहित. परत सांगतो जी एस टी हे सर्व पक्षीय संमतीने पारित केलेले विधेयक आहे. त्याचा सध्याच्या सरकार इतकाच पूर्वीच्या सरकारांशी संबंध आहे आणि मी पक्षीय दृष्टिकोनातून याचा विचार केलेला नाही. जी एस टी विसधेयक हे स्वस्ताइ आणण्यासाठी नाहीच तर उद्योग आणि व्यापार सुलभ व्हावा यासाठीच आहे. मूळ पहिला संक्षींचा प्रतिसाद हा मोदी सरकारच्या विरोधातील होता. पक्षीय दृष्टतिकोनातून संक्षींनी सुरुवात केली आहे उगाच भक्त आणि रुग्ण हा वाद उकरून काढायला कुणालाच हौस नाही. हे माझे वाक्य आहे आणि यावर तुमचा प्रतिसाद हां, आता मी नेहमीचा मोदीविरोधक आहे म्हणून कानफाट्या म्हणून माझ्या म्हणण्याला तुम्ही लोक किंमत देणार नाही हे माहित आहे. पण भाजपचे पारंपरिक मतदार असलेले व्यापारी जे म्हणत आहेत आणि संक्षींचे तुम्ही उल्लेखित केलेले विधान याच्यात फार काही फरक नाही. तुम्ही तुमचे कानफाट्या हे नाव सिद्ध करत आहात एवढेच मी म्हणेन. कुठेतरी माझ्या प्रतिसादात भाजप विरोध किंवा त्याला पाठिंबा असे शब्द दिसत आहेत का? मी अनेक दुवे दिले आहेत ज्यात अमर्त्य सेन, रघुरामन राजन, वय व्ही रेड्डी आणि डॉ मनमोहन सिंह असे अनेक बिगर भाजप नेते किंवा भाजप विरोधी अर्थतज्ज्ञ यांनी जी एस टी ला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. आपण स्वतः या प्रश्नाचा पक्षीय दृष्टिकोनातून"च" विचार करत असल्याने इतरांचे प्रतिसाद माझ्या प्रतिसादात घुसडून नको ते वक्तव्य करीत आहात. 'उच्चपदस्थ' इन्टेलिजन्स अधिकारी जो तुमचाच योगायोगाने मित्र निघतो त्याच्याकडून आलेल्या काही गुप्तवार्ता त्याने तुमच्याशी शेअर केल्या असतील, इत्यादी माहिती तुमच्याकडे असेलच. असे मी कुठे आणि केंव्हा लिहिले आहे ते दाखवा. हसे कुणाचे होईल ते लोक पाहतीलच. बाकी मार्केटात काय तुम्ही एकटेच उभे नाहीत. आता तीन प्रश्नांची सरळ उत्तरे द्या-- १)माझ्या कोणत्या प्रतिसादात भाजपची तळी उचललेली दिसली २) कोणत्या प्रतिसादात असे लिहिले आहे कि जे लोक जी एस टी ला विरोध करत आहेत ते चोरच आहेत? बरेच लोक अज्ञाताची भीती(fear of unknown) मुळे याचा विरोध करत आहेत असे लिहिले आहे ३)आता पेड ट्रोलांच्या आणि तुमच्यासारख्या विचारवंत, अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍यांच्या( हे आपले शब्द आहेत. मी कुठेही कधीही या विषयातील तज्ज्ञ किंवा अभ्यासू किंवा विचारवंत असा दावा केलेला नाही) विचारांत साधर्म्य तुम्हाला कुठे आढळलं. आणि माझा कोणता कंपू आहे ते सिद्ध करून दाखवा. झेपत नसेल तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Wed, 06/28/2017 - 14:45 नवीन
१) "काळेपैसेवाल्यांचे तर सर्व पैसे पांढरे झाले बिनभोबाट" हे तुमचे वाक्य पुराव्यानिशी सिद्ध करू शकता का..? २) जे नोटाबंदीच्या संकल्पनेविरोधात बोलत होते त्यांच्या विश्वासार्हतेचे मात्र हनन करण्यात आले. ही एक घातक प्रवृत्ती आहे. याबाबत - "ज्या लोकांनी विरोधी मते मांडली" त्यांची नाही तर "स्वतःच्या अजेंड्याच्या सोयीनुसार खोट्या प्रतिसादांचे ट्रक फिरवून गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांची विश्वासार्हता त्यांच्याच लेख / प्रतिसादामुळे गेली" हे माझे मत आहे - याबाबत कांही शंका असली तर जरूर सांगा. आत्ता तरी वरील दोन मुद्द्यांविषयी बोलूया. तुम्ही संस्थळाविषयी गैरसमज पसरवू नये म्हणून सध्यातरी दोनच मुद्दे लिहिले आहेत - बाकीचे मुद्दे टप्प्याटप्प्याने घेऊ चर्चेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उपेक्षित Wed, 06/28/2017 - 16:13 नवीन
१) "काळेपैसेवाल्यांचे तर सर्व पैसे पांढरे झाले बिनभोबाट" हे तुमचे वाक्य पुराव्यानिशी सिद्ध करू शकता का..? >>>>>>>>>>>> अशा गोष्टी पुरावा ठेवून करतात लोक मोदक भाई आणि हे तुम्ही बोलताय ? कान्ट बिलिव :( काळे पैसेवाल्यांचा पैसा बिनबोभाट पांढरा झाला हे मी सुद्धा माझ्या वयक्तिक अनुभवानुसार सांगत आहे, नोटबंदच्या ५/६ व्या दिवशी माझ्या सप्लायर कडे २००० च्या नोटांची ६/७ पुडकी दिसली होती मला. तुमच्यावर वयक्तिक राग नाहीये मोदक पण काही गोष्टी या facts म्हणून तरी आपण निदान मान्य करायची तयारी दाखवली पाहिजे. कधी पुण्याच्या कट्ट्याला भेटलात तर नोटाबंदीच्या काळातील काही अनुभव नक्कीच शेयर करील (विना-पुरावा) बाकी तुम मनो या ना मनो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 06/28/2017 - 16:15 नवीन
कधी पुण्याच्या कट्ट्याला भेटलात तर नोटाबंदीच्या काळातील काही अनुभव नक्कीच शेयर करील (विना-पुरावा) बाकी तुम मनो या ना मनो... नक्की भेटू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
स
संजय क्षीरसागर Wed, 06/28/2017 - 09:53 नवीन
१) महागाई हटणार नाही हे तुम्ही कबूल केलंय. त्यामुळे तुम्ही आणि म्हात्रे एकमेकांना टाळ्या देत जी मजा करत होता ती आता हास्यास्पद ठरली आहे. ...... आणि पहिल्यापासून माझा एकच मुद्दा होता की महागाई कमी होणार नाही. २) व्यावसायिकांचा छळ होणारे हेच मी सुरुवातीपासून सांगतोयं ! आणि आता तुम्ही पण म्हणतायं व्यावसायिकांना त्रास होणार आहे यात शंका नाही सो इट इज ऑल डन ! त्यामुळे तुमचा हा मुद्दा : `काही लोक आपलं धुणं धुवून घेत आहेत किंवा बागुलबुवा उभा करत आहेत' सर्वस्वी बाद ठरतो. त्याला काही अर्थच उरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 06/28/2017 - 11:04 नवीन
संक्षी परत गोल प्रतिसाद फेऊ नका. डॉ म्हात्रे यांच्या प्रतिसादाशी माझा कोणताही संबंध नाही. साम्य असेल तर एकच ते म्हणजे तुमचे असंबद्ध प्रतिसाद उघडे करून दाखवणे आणि "मीच हुशार"या पालूपदाला असलेला आक्षेप. व्यावसायिकांना होणार *त्रास*( माझे शब्द)आणि त्यांचा *छळ*(तुमचे शब्द) यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सरकारबद्दल आकस आहे म्हणून तुम्ही सरकार व्यापाऱ्यांचा छळ करीत आहे असे भासवताय. इतर मुद्दे बाद वगैरे तुम्हीच रचलेले जड जंबाल आहे स्वतःचा मुखवटा उघड पडल्याबद्दल. बाकी डॉ मनमोहन सिंह किंवा राजन साहेब यांनी जी एस टी ला खुल्या दिलाने पाठिंबा दिला आहे याबद्दल आपल्या सारख्या विद्वान माणसाचं काय म्हणणं आहे? की ते तिघे मुर्खच आहेत आणि त्यांनाही काही कळण्याची सुतराम शक्यता नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अमर विश्वास Wed, 06/28/2017 - 11:31 नवीन
आमच्या कंपनीत GST ची तयारी पूर्ण झाली आहे. IT कंपनी असल्याने आमचे ERP सॉफ्टवेअर अम्हीच मॉडिफाय केले आहे. आमच्या फिनान्स च्या मते "ऑल इज सेट" ... GST साठी काय चेंजेस केले याची पूर्ण यादी माझ्याकडे आहे कारण माझ्या टीमनेच चेंजेस केले आहेत .. सर्व येथे देऊ शकत नाही .. पण एव्हडा बाऊ करायचे काही कारण वाटत नाही
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 06/28/2017 - 11:35 नवीन
वेल डन..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा