श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?"
" दत्त मंदिरात जात आहे."
" पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे."
" अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! "
" गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?"
" अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले.
" गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो.
मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले,
" असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?"
" शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला.
" शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते.
" वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !"
ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता."
" रागावू नका. मी सत्य तेच सांगितले."
" आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले.
सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो.
हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे.
पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते.
समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते.
मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ?
या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात.
देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते.
यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ?
यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही.
पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो.
"आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे."
हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
****************************************************************
💬 प्रतिसाद
(285)
य
यश राज
Sun, 10/08/2017 - 14:03
नवीन
प्रचंड सहमत....
- Log in or register to post comments
य
यश राज
Sun, 10/08/2017 - 14:09
नवीन
वरील प्रतिसाद गुरुजींसाठी होता...
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 10/09/2017 - 06:57
नवीन
गुर्जींना दंडवत. शेवटच्या परिच्छेदात आख्या लेखाचा बाजार उठवला आहे. प्रतिक्रिया टंकायला घेतली होती पण आता ते कष्ट घेत नाही.
पण तुम्ही सांभाळुन असा. आता झुंडीन हल्ला होइल तुमच्यावर.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 11:03
नवीन
टेक्निकली १००%
===============================
त्या फ्रेमवर्कची मर्यादा अशी आहे कि ते असं करू पण शकत नाहीत.
- Log in or register to post comments
ह
हरवलेला
Fri, 10/13/2017 - 01:54
नवीन
+1
- Log in or register to post comments
D
Duishen
Sat, 10/14/2017 - 04:33
नवीन
समजा परमेश्वर नावाचे काही अस्तित्वातच नसेल तर निदान आस्तिकांना काही काळाने का होईना पण हे लक्षात येऊ शकते आणि त्यामागे त्यांचा स्वानुभव असेल कारण त्यांनी त्या मार्गाने स्वतः जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो.
असे फार क्वचित घडते आणि आणि ते स्वीकारण्याचे बळ आल्यावर नास्तिकतेकडे प्रवास सुरु होतो...(खूप कमी जणांचा)...
परंत परमेश्वर नावाचे काही अस्तित्वात आहे किंवा नाही हे नास्तिकांना कधीही समजणार नाही कारण तसे काही अस्तित्वातच नाही असा त्यांचा ठाम अंधअविश्वास आहे व हा अंधअविश्वास स्वतः कोणतेही प्रयोग न करता, स्वतः शोध न घेता किंवा स्वतः वैज्ञानिक मार्गाने प्रयत्न करून परमेश्वर या कल्पनेचे अस्तित्व खोडून न काढता सुद्धा मनात ठाम रूजलेला आहे. अशा लोकांनी आपल्याला बुद्धीवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन इ. असलेले समजणे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे.
स्वानुभवावरून खात्री आहे की जेव्हडे नास्तिक लोक देव या संकल्पनेचा विचार करतात तेव्हडे आस्तिक लोकही करत नसणार! कारण बालपणापासून देवासमोर हात जोडण्याचे संस्कार झाले की मग विचार करण्याची गरज उरत नाही ते यथास्तव वास्तव म्हणून स्वीकारले जाते. याउलट देव संकल्पनेचा विषय नास्तिक लोकांकडून अधिक विचारार्थ घेतल्या जातो कारण या संकल्पनेचे दृश्य भीषण परिणाम सतत विवेकबुद्धीने विचार करण्यास भाग पाडतात. आणि जिथे विवेकबुद्धी कृतीशील असते तिथे अंधश्रद्धा नसून श्रद्धा काम करीत असते. नास्तिक अश्रद्धेय असतात हे मिथक आहे. त्यांची श्रद्धा विचार, विवेकबुद्धी यावर आहे.
मी केवळ भारतापुरत बोलतो. भारतात अशी किती घरं आहेत जे स्वत:च्या मुलांना लहानपणापासून देव नाही या संकल्पनेला धरून वाढवतात? त्यांचे प्रमाण १% पेक्षाही कमी असावे. म्हणजे जवळपास प्रत्येक लहान मुल घरातून किंवा सार्वजनिक उपक्रमातून किंवा मित्र-मैत्रीण, शेजारी-पाजारी, शाळा, टीव्ही, वर्तमानपत्रे इ. माध्यमातून देव आहेच या संस्काराने मोठ होत असत. मग एखाद असा मुलगा किंवा मुलगी भावी वाटचालीत केवळ गंमत म्हणून नास्तिक होत असेल काय? ..का अचानक असे म्हणत असेल की ओके उद्या सकाळी ६ चा गजर झाला की मी नास्तिक बनणार आहे? ...किंवा आज कंटाळा आला बुवा, आता नास्तिक बनावे...
मुळात समाजाच्या रूढ विचारसरणीच्या विरुद्ध विचार करण्यासाठीही मोठी ताकद आणि धैर्य लागत. विचारांची प्रचंड घुसमट होत असते. नास्तिक विचारांचे प्रयोग करीत नाहीत किंवा शोध घेत नाहीत असे म्हणणे पूर्णत: अतार्किक आणि विवेकहीन जाणवते. मनाच्या जमिनीची मशागत करून संस्कार संकल्पनेचे तण उखडून नव्या विचारांचे बीजारोपण होते... आणि हे वैचारिक प्रयोगाशिवाय अशक्य आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 10/14/2017 - 11:51
नवीन
का? मानवाच्या स्वभावात खोट आहे? इगोमधे? कि मूळात सत्य कळायची अक्कलच मॅक्झिमम मानवांना नसते?
- Log in or register to post comments
D
Duishen
गुरुवार, 10/19/2017 - 17:57
नवीन
आयुष्यात आपणही अनेक निर्णय घेतले असणार! काही निर्णय घेतांना ओढाताण झालीच असणार..आयुष्यात काही निर्णय कधी कधी स्वत:च्या मनाविरुद्धही घ्यावे लागतात...हे प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी घडते. याचा अर्थ 'स्वभावात खोट, इगो किवा अक्कल नसणे' असे एखाद्याला वाटू शकते पण असे विचार करणे वैचारिक आणि भावनिक कुंठीतपणाचे लक्षात वाटते!!!
अनेक नास्तिक केवळ आई वा जोडीदाराला (पत्नीला / पतीला) आनंदित पाहावे यासाठी पूजा करतात किंवा देवळात जाऊन नमस्कार करतात.. याचा अर्थ हा नव्हे की त्यांच्या स्वभावात खोट आहे किंवा त्यांना आक्कल नाही; याचा अर्थ एव्हडाच की त्याचे स्वत:च्या आईवर, जोडीदारावर प्रेम आहे... पण जे असे करत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांचे आईवर वा जोडीदारावर प्रेम नाही; कदाचित व्यक्त करण्याचा मार्ग दुसरा असू शकतो!!!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 10/14/2017 - 12:17
नवीन
हा तर प्रचंड महान शोध आहे.
म्हणजे माणसाचे विचार बालपणी फ्रिज होतात?
मग नास्तिक हे केवळ जन्मजात (आणि जेनेटीक???) असतात कि काय?
किंवा जे अस्तिक मायबापांचे मूल नास्तिक बनते ते विचार न करताच बनते कि काय?
================================================================
लहानपणापासून माझ्यावर सिगारेट आणि दारू पिऊ नये असा ३६० डिग्री सज्जड संस्कार झालेला. आता मी दोन्ही पितो. प्रामाणिकपणे सांगायचं तर माझी विचार करायची शक्ती लहानपणीच होती*. आता गेली. किमान या बाबतीत.
---------------------------------
*कोणा मद्यप्रेमीच्या भावना आहत करायची इच्छा नाही. हा हा.
===================================================================
बालपणापासून देवासमोर हात न जोडण्याचा संस्कार होतो, तेव्हा त्या जागी जीवनात फक्त आणि फक्त उत्कर्ष आणि यश प्राप्त करण्याचा संस्कार होतो. आजचं जग हे अशाच यशाच्या शिखरावर जायला निघालेल्या सेमी-नास्तिक लोकांच्या हातात आहे. इतके बुद्धीमान, इतके संस्कारी, इतके विकसित, इतके व्यवस्थित, इतके अनुभवी, इ इ लोक सर्व सामाजिक संस्थांच्या उच्चपदी असून जो गोंधळ चालला त्याचं काय स्पष्टीकरण आहे? माणसं म्हणून आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्यापुढे आपल्या समस्या न के बराबर आहेत. मग प्रॉब्लेम काय आहे? तर आपली नवाविष्कृत नास्तिकता, क्वाझी-नास्तिकता, सेमी-नास्तिकता, स्युडो-अस्तिकता, इ इ.
- Log in or register to post comments
D
Duishen
गुरुवार, 10/19/2017 - 18:00
नवीन
"प्रामाणिकपणे सांगायचं तर माझी विचार करायची शक्ती लहानपणीच होती*."
सहमत आहे!!!
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 10/16/2017 - 16:04
नवीन
प्रतिसाद आवडला
- Log in or register to post comments
ब
बोलघेवडा
Sun, 10/08/2017 - 13:37
नवीन
श्रीगुरुजी साहेबांच्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल त्यांना माझ्याकडूनही साष्टांग दंडवत.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 10/08/2017 - 18:42
नवीन
म्हणतो
मी पुरोगामी सुधारक/नास्तिक आहे ही ओरडुन जगाला माहिती करून देण्याची गोष्ट नाही.
छ्या मोठ्या माणसांना नमस्कार करणार्या बालकांना जोपर्यंत मी यज्ञबळी, नरबळी देणार्यांचे रांगेत उभे करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Sun, 10/08/2017 - 14:16
नवीन
प्रा. यनावाला , तुम्ही लिहिलंय ते योग्यचं. आणि नास्तिकांना ते पटेलच पटेल. पण अस्तिकांना ते पटणे कठीण आहे. पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात फारसा अर्थ नाही, निदान सार्वजनिकरित्या तर नाहीच नाही.
मी माझ्या जवळच्या व्यक्तींना नास्तिकता कशी वैज्ञानिक, योग्य आणि माणसाच्या हिताची आहे हे समजवण्याचे प्रयत्न करुन पाहिलेत (खरे तर त्यांच्याच भल्याकरिता) पण काही उपयोग होत नाही. बर एक पाउल मागे सरकत त्यांनी निदान सगुण भक्ति टाळावी आणि त्या अनुषंगाने येणारे उपास (उपास करणे त्यांनाच शारिरिकदृष्ट्या त्रासाचे म्हणून), पूजापाठातील काही सोपस्कार (डॉक्टर म्हणतात उदबत्ती लावू नका म्हणून) ई टाळावेत याकरिता चर्चा करुन पाहिली. पण फारसे यश येत नाही हाच अनुभव.
म्हणून हे सर्व ज्याचे त्याचे मनोरंजनाचे साधन म्हणून आपण दुर्लक्ष करावे इतकेच आपल्या हाती. .. आता रजनीकांतच्या चाहत्यांना तरी त्याचा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो का बघायचा असतो ? जाऊद्या नास्तिक बुद्धिवादी लोक अल्पमतात असतात आणि त्यामुळे गप्प रहाणेच योग्य. मी ही तेच करतो. पण अर्थात वर अभिजीत यांनी म्हंटले तसे मी काही मुर्तीला नमस्कार वगैरे करत नाही.. नसतील भोक पडत माझ्या अंगाला नमस्कार करण्याने पण तरी मी का करावा ? अस्तिकांना आपली अस्तिकता जपण्याचा अधिकार आहे तर नास्तिकांनाही नास्तिकता जपण्याचा अधिकार आहेच. मी कुणाला (अगदी जवळच्या व्यक्ती सोडल्यास) उपदेश करत नाही पण त्याचवेळी अस्तिकांचा अनुनयही करत नाही.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Sun, 10/08/2017 - 19:01
नवीन
खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही कारण मी देवळात गेले की हाथ जोडु शकते पण स्वत: पुजा करत नाही. देव भक्ती करणारे नास्तिकांना तुम्हाला देव बघुन घेईल वैगेरे शिव्या शाप देतात. त्यांचा पत्रिका वैगेरे वर फार विश्वास असतो. पत्रिकेच्या नावावर ते चांगली स्थळे सोडुन देतात. मंगळ वैगेरे असणार्यांनी तर काय पाप केलेले असते कोणास ठाऊक पण ते पत्रिकेचा बळी ठरतात. साडेसाती तर महाभंयकर उपाय आणि भिती घालण्यायसाठीच असतें हे सर्व धर्मात आहेच. मुस्लीम दर शुक्रवारी ऑफिसात कितीही महत्वाचे काम असुदे तरी दुपारचा नमाज पढायला जातातच, ख्रिश्चन दर रविवारी चर्च मध्ये जातातच.
नास्तिकांपेका अस्तिक नास्तिकांना खुप छळतात. माझी आजी मी देव देव करत नाही म्हणुन पैशाच्या मागे लागलीय असे सारखे टोमणे मारते. काही बाका प्रसंग आला की तु देवाचे करत नागीस म्हणुन असे पालुपद चालु होते. मग सहस्त्र वेळा शनी महात्मय वाच, दर शनीवारी शनीला अभिषेक कर असे पालुपद चालु होते. नववी दहावीतच गुरू वैगेरे करायला लावले. पुजा शिकायला लावली.. आता नास्तिकतेकडे प्रवास चालु आहे..।
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Sun, 10/08/2017 - 19:42
नवीन
तुमचं निरिक्षण बहुतांशी खरं असेलही कदाचित पण त्यामागचं कारण नेहमीच पुर्णपणे धार्मिक आहे का हा एक प्रश्न आहे..
माझा याबाबतीतला एक अनुभव सांगतो.
मी एका मोठ्या कंपनीत नुकताच रुजू झालो होतो, तिथे मला जुन्या थोड्याफार ओळखीचा मुस्लिम मुलगा भेटला. तोही तिथे नवखाच होता, लवकरच आमची मैत्री झाली. रोज जेवायला वगैरे एका छोट्या कंपूत बरोबरच जात असू. पुढे काही महिन्यांनी तो शुक्रवारी आमच्यासोबत जेवायला न येता नमाजकरिता जावू लागला. त्याला मी विचारलं "अरे तु आधी तर नाही जायचास ना.. आता जावू लागलास"
या प्रश्नावर उत्तरला "अरे माझ्या लक्षात रहात नसे, पण आता मला या कंपनीत माझ्या दूरच्या नात्यातले (की ओळखीचे) एकजण भेटलेत , ते आठवण करुन देतात मग जातो"
त्याला स्पष्ट उत्तर देणे कठीण गेले तरी ..मी काय समजायचे ते समजलो :)
बाकी रोजाच्या उपासाबाबतही त्याचं म्हणणं "मी महिनाभर रोज नाही करत पण कधी कधी करतो..." ते कधी कधी आम्हाला कधी दिसलं नाही :)
पण तो भेटण्यापुर्वी इतर लोकांकडून ऐकून माझा असाच ग्रह होता की मुस्लिम हे अगदी १००% काटेकोरपणे रोजाचे उपवास करतातच.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 10:16
नवीन
छळ वेगळा असतो. टोमण्यांना छळ म्हणत नाहीत. शिवाय आजीचे मते ती टोमणे तुमचे नुकसान व्हावे या उद्देशाने मारायची का?
=================
नास्तिकांनी आजपर्यंत काही कोटी अस्तिकांना जीवे मारलं आहे.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 10/09/2017 - 10:19
नवीन
ऒ! ही काय भानगड आहे
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 10:33
नवीन
https://skeptoid.com/episodes/4076
सुरुवातीला हा अत्यंत न्यूट्रल, रादर नास्तिकांच्या बाजूचा, लेख देऊन पाहतो.
=======================
इथे अनेकांना असली चर्चा निरर्थक वाटते. पण तसं नाही. राजकारण, अर्थकारण, इ इ अस्तिकतता आणि नास्तिकता दोन्ही हॅक करतात नि स्वार्थ साधतात. पण अधिक भयानक कोणचं नि:संशय उत्तर नास्तिकता आहे. पुन्हा, तो विषय वेगळा आहे.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Mon, 10/09/2017 - 11:22
नवीन
तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण उपाय काय सांगायची हे वाचले नाही का? हिंदु धर्म स्त्रियांना सोशिकता शिकवतो ... त्यामुळे स्त्रियांनी नवरा मेल्यावर सुद्धा दुसरे लग्न करु नये .. असे बरेच महान तत्वे सांगितली जातात.. पत्रिकेच्या मुद्द्यावर पण तुम्ही काहीच बोलत नाही आहात... सोईचे तेवढे घ्यायचे... मुहुर्त चांगला नाही म्हणुन किती आणि काय प्रकार करतात ... असो
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/09/2017 - 12:34
नवीन
<<<पत्रिकेच्या मुद्द्यावर पण तुम्ही काहीच बोलत नाही आहात... सोईचे तेवढे घ्यायचे... मुहुर्त चांगला नाही म्हणुन किती आणि काय प्रकार करतात ... असो>>>
==>> परवाच आमच्या सासरे बुवांनी सातारच्या सुप्रसिद्ध "काकांकडून" माझ्या साडे तीन वर्षाच्या मुलीची रु. ९०० देऊन पत्रिका काढली. त्यात एका ठिकाणी नमूद केले आहे की " ही मुलगी आपल्या वडिलांना परदेशात राहायला नेईल."
कालपासून आमच्या मॅडम ना घोर लागलाय की फक्त वडिलांनाच घेऊन जाणार म्हणजे मी लवकरच एक्सिट घेणार आहे. समजावण्यात कालचा आखा रविवार पाऊसात गेला.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Mon, 10/09/2017 - 17:17
नवीन
हाहाहा...
तुला घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणावे...
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 14:28
नवीन
सोशिकता काही वाईट गुण नाही. तुम्ही नास्तिक देखील बायकांना तापटपणा शिकवू नकात.
लग्न ही संकल्पनाच अवैज्ञानिक आहे. नै का? त्यामुळे एक अवैज्ञानिक वर्तन करू दिले आणि दुसर्यांदा करू दिले नाही ही नास्तिकांकडूनची मागणी विचित्र आहे.
जगातल्या सर्व प्रकारच्या मूर्खांचा सर्व प्रकारचा मूर्खपणा मला मान्य आहे. अर्थात पत्रिका पाहणे, मला त्यात असलेल्या गतीनुसार, एक विशुद्ध मूर्खपणा आहे. जेव्हा आय कार्ड नव्हते तेव्हा नाव, लिंग, वय, जन्मस्थान, पालक, इ इतकी महत्त्वाची माहीती त्यात असायची तेव्हा त्याचा थोडा उपयोग देखिल असे.
त्यावेळेस प्रेमस्वातंत्र्य, साथीदारस्वातंत्र्य नव्हतं असं आपलं म्हणणं असेलच, तेव्हा पत्रिकेनुसार मिळाला काय आन बिनपत्रिकेचा मिळाला काय, जोडिदार मिळाला मंजे झालं. पत्रिका पाहणं कंपल्सरी असलं तरी पत्रिकेत पास झालेला पोरगा वरावाच असा कै नियम नव्हता.
शिवाय पत्रिका पाहिली की लग्न तुटतं असा काही नियम नाही.
----------------------------
आमच्या व्यक्तिगत निरिक्षणात पत्रिका मंजे काय ते माहित पण नसलेले ३५-३५ वर्षांचे झालेत, बिनलग्नाचे नि लग्नेच्च्छु. त्यामुळे बिनपत्रिकेचा वेळ वाचतो असंही नाही. लोकांनी आपल्याला हव्या असलेल्या "गुणांची" एक वेगळी पत्रिका बनवलेली आहे. अर्थातच ती कायदेशीर आणि आधुनिक आहे, मात्र अनेकदा मागची पत्रिका बरी वाटावी इतकी अनैतिक असते.
--------------------------------------------
तुम्ही तुमचं वय मोजता का? कशाला जन्मापासून पृथ्वीने सूर्याला प्रदक्षणा किती घातल्या ते मोजता? मागे सगळे लोक जसे पत्रिका पाहायचे, तसा आता सगळे लोक हा मूर्खपणा करत आहेत. आपण हे टाळाल?
- Log in or register to post comments
ज
जेडी
Mon, 10/09/2017 - 15:39
नवीन
>>>सोशिकता काही वाईट गुण नाही. तुम्ही नास्तिक देखील बायकांना तापटपणा शिकवू नकात.<<<
फक्त बायकांनीच सोशिकता शिकावी का? पुरुषांना सोशिकता गरजेची नसते का?
>>>लग्न ही संकल्पनाच अवैज्ञानिक आहे. नै का? त्यामुळे एक अवैज्ञानिक वर्तन करू दिले आणि दुसर्यांदा करू दिले नाही ही नास्तिकांकडूनची मागणी विचित्र आहे.<<<
"लग्न ही संकल्पनाच अवैज्ञानिक आहे. नै का?"-- मी असे म्हटलेले नाही.
>>तुम्ही तुमचं वय मोजता का? कशाला जन्मापासून पृथ्वीने सूर्याला प्रदक्षणा किती घातल्या ते मोजता?<<
काहीच अर्थबोध होत नाही बा..
>>> मागे सगळे लोक जसे पत्रिका पाहायचे, तसा आता सगळे लोक हा मूर्खपणा करत आहेत. आपण हे टाळाल?<<
का नाही टाळणार?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 10/13/2017 - 10:52
नवीन
वैज्ञानिकतेच्या नावाखाली १००% लोकांनी तापट असल्यापेक्षा धर्माच्या नावाखाली ५०% च लोक तापट असलेले बरे.
==============
विज्ञान असं अर्धवट नकात पाळू.
=============
याबद्दल आनंद आहे. सगळ्याच नास्तिकांनी टाळलं तर अजूनच आनंद आहे.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Mon, 10/09/2017 - 19:44
नवीन
आमच्या हजारो वर्षे जुन्या धर्माच्या परंपरांना नावे ठेवता?!
त्या परंपरा नक्कीच शास्त्रीय विचार करून केल्या असणार, त्याची "शास्त्रीय" उत्तरे इथल्या आयडी कडून मिळतीलच बघा लवकरच!
लेकिन जाव पेहले ऊस धरम को जाके पूछो जिसमे माणूस तीन चार बायका भी कर सकता हय... इधर कुच्च नई बोलणे का!
- Log in or register to post comments
D
Duishen
Sat, 10/14/2017 - 04:37
नवीन
स्वानुभवाने पूर्णत: सहमत... नास्तिकांचा मुद्दा समजून घेण्याची सहिष्णुता फारच कमी आस्तिक लोकांमध्ये आढळली.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 10/14/2017 - 11:47
नवीन
बाय द वे, काय मुद्दा आहे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/14/2017 - 17:31
नवीन
मुद्दा लेखकाने लेखात लिहिलेला आहे. आस्तिकांना वैज्ञानिक दृष्टी नाही, आस्तिकांची विचारशक्ती बधीर झाली आहे, आस्तिक स्वबुद्धीने विचार न करता शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य मानतात . . . आणि अर्थातच नास्तिक आस्तिकांच्या पूर्णपणे विरोधी स्वरूपाचे आहेत, हेच नास्तिकांचे (म्हणजेच लेखकाचे) मुद्दे आहेत.
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Sun, 10/08/2017 - 21:10
नवीन
यनावाला यांचा प्रयत्न असा दिसतो की, भोंदू बाबा, बुवा,गुरु यांच्या नादी लागून , काही लोकांचे म्हणजे तथाकथित " आस्तिक " यांचे जे अपरिमित नुकसान, त्या तथाकथित गुरुचा/बाबाचा/बुवाचा खोटेपणा आढळून आल्यावर / सिद्ध झाल्यावर होते, त्यापासून वेळीच सावध व्हावे.पण ज्यांना हे मान्य नाही व ' गुरुशिवाय तरणोपाय नाही ' असेच ज्यांचे ठाम मत आहे, त्यांच्यात ' जाग्रुती ' यावी म्हणून आपण कां धडपडावे ? " बापू " कित्येक महिन्यापासून जेल मध्ये आहे, म्हणून कोण्या भक्ताने उपोषण केल्याचे उदाहरण ऐकिवात नाही. दुसरे गुरु नुकतेच जेल मध्ये भाज्या पिकवत आहे,पण सरकारी दंडुका उगारताच, भक्त मंडळी फरार होण्यात गुंग झाली हे ही आपण प्रत्यक्ष पाहिलेच आहे ना ?
मला या विषयाबाबत एका प्रसंगाची तुलना करावीशी वाटते. क्रिकेट म्हणा किंवा निवडणूकीचे निकाल यावर लोक ज्यांच्याकडे सट्टा लावतात, त्या बेटींग घेणार्यांना पोलिस पकडतात. जुगार खेळणार्यांना पोलिस पकडतात.कां ? पैसे सट्टा खेळणार्यांचे असतात, नुकसान झाले तर त्यांचेच होईल, पैसे काही शासन वा पोलिस देत नाही, मग पोलिस त्यांना कां पकडतात ? जेथे शासनाचे पैसे लावले जात नाहीत तेथे असा कायदा कां केला गेला असावा ? याचे उत्तर मिळत नाही.
यनावाला,अशा " आस्तिकांबद्दल " जाने भी दो यारो " असेच धोरण ठेवावे असे मला वाटते.मी सुद्धा पुर्वी अशांवर , असाच प्रश्नांचा भडिमार करित असे, पण आता ज्यांना खड्ड्यातच जायचे आहे, त्यांना कशाला थांबवायचे ?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 10:08
नवीन
नैतिक वा तात्विक दृष्ट्या असो, तार्किक , व्यावहारिक दृष्ट्या भूमिका योग्य आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 10/09/2017 - 15:55
नवीन
आदुबाळ ची स्वाक्षरी वाली कविता आठवली
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध
~ रामधारी सिंह "दिनकर"
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 10/19/2017 - 18:17
नवीन
ते कविचे नाव वाचून "गँग्स ऑफ वासेपूर" मधला तिग्मांशू धुलियाचा रामाधीरसिंहच आठवतो.
- Log in or register to post comments
म
मारवा
Sun, 10/08/2017 - 21:47
नवीन
आर्ग्युमेंट्स मंथन अधिक खोलवर अधिक सर्जनशील होणे आवश्यक आहे तसे झाल्यासच काही अर्थपुर्ण हाती येइल.
अन्यथा.....
तर मागे राजु परुळेकरांनी एक प्रश्न उपस्थित केला होता तो असा कि, समजा एखाद्या मुलाला बालपणापासुनच देव मंदिर इ. बाबींविषयी काहीही सांगितल नाही. बोट धरुन शिकवलं नाही. कर्मकांड दाखवलीच नाही. कुठलीही कंडिशनींग न करता अगदी कोरी अशी त्याची पाटी धर्मईश्वर संदर्भात ठेवली.
तर तो मोठा झाल्यावर जे प्रश्न उपस्थित करेल ते जीवनाविषयी अस्तित्वाविषयी एक्झीस्टेन्शीयल स्वरुपाचेच केवळ राहतील.
या नव्या दिशेने केलेला विचार मोठा रोचक वाटला.
हे धर्म विहीन ईश्वर विहीन प्रश्न तरीही जीवनाचे मुलभुत असे मानवी प्रश्न नेमके कुठले कसे काय स्वरुपाचे असतील ?
या पडत असलेल्या प्रश्नाच्या खोलात जातांना व यांच्या सोडवणुकीतच धर्मईश्वर गुंता अर्थपुर्ण सोडवता येइल.
म्हणजे ही एक दिशा आहे विचार करण्याची
असे काहीसे करावे लागेल.
नेहमीचाच पठडीतील विरोध प्रतिसादाला यांत्रिक भावनिक करत जाईल व दोन्ही बाजुने होत असलेल्या अधिकाधिक यांत्रिक साद प्रतिसादात
अर्थपुर्ण संवाद हरवुन बसेल.
असो.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 09:57
नवीन
आपल्याला अनेक संकल्पना खूप खूप उशिरा कळतात. कधीच न कळताच जीवन संपतं. अन्य काही प्रस्थापित माहिती नसेल तर आपल्याला अनुभवास येणार्या जगाचे आपण आपल्या ज्ञानामाहितीनुसार "मत" बनवतो.
हा मुलगा अनेक विचित्र कार्यकारणभावांची लिस्ट देईल आपलिकडे काही अपेक्षित नाही.
================================
नास्तिकांनी अगोदर जगात एक अख्खी नास्तिक संस्कृती शोधली. मिळाली नाही. मग आदिवासी शोधले. मिळाले नाही. मग इतिहास खंगाळला. पुन्हा तेच. मग पुरातत्त्व पुरावे शोधले आणि किमान २ ते ७ हजार वर्षांपूर्वीचे लोक नास्तिक होते हे सिद्ध करायचा प्रयत्न केला. त्यात ही अपयश आलं. सध्याला त्यांची होप पाषाणयुग इ इ च्या लोकांवर आहे. पण ते काय मानायचे आणि काय नाही याचा काही पत्ता नाही.
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 10/09/2017 - 16:07
नवीन
हा मुलगा अनेक विचित्र कार्यकारणभावांची लिस्ट देईल आपलिकडे काही अपेक्षित नाही.
बहोत पोटेंशियल है साहब
बघा
१-- -=-==---- अशा मुलाला जीवन जगतांना दोन पर्याय संभवतात
एक- --- असा कि त्याला स्व---प्रयत्नाने स्वतर्काने स्वप्रयोगाने मुक्त रीतीने जगातील काही फॅक्ट्स चे आकलन होइल. त्यामागील कार्यकारण भाव गवसेल.
दोन वरील सर्व प्रयत्न करुनही काही बाबी काही गोष्टी काही रहस्ये ही रहस्येच राहतील तो त्याच्या अनेक मानवी मर्यादांमुळे कदाचित त्यांना कधीही आकलन करुन घेऊ शकणारच नाही.
आणि वरील दोन्ही बाबी स्वाभाविकच आहेत. त्यात वाईट बरे काहीच नाही.
मात्र मुलभुत पहीला फरक असा असेल की
ज्या दोन क्रमांकाच्या वर्गा तील बाबी रहस्ये त्याला उमगली नाहीत त्या रहस्यांविषयी त्या बाबींविषयी तो
निरागस असे कुतुहल केवळ बाळगेल
त्यांचा उलगडा करत राहण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहील. त्यात जरी अपयश आले तरी ते त्याला एखादा वैद्यानिक जसे एक सत्य उलगडत राहण्याच्या प्रयत्नात सत्याच्या अधिकाधिक जवळ जातो तसा तो जात राहील
सर्वात महत्वाचे तो ईश्वर नावाचा "डंपिंग फोल्डर जे जे मला समजु शकत नाही ते त्यात जसे आस्तिक लोक टाकतात तसा वापरुच शकणार नाही कारण ती मुभाच त्याच्याजवळ संस्कारमुक्त असल्याने कंडिशनींगलेस असल्याने होइल.
शिवाय त्याला स्वतःच्या कृत्यांची जबाबदारी स्वतःच्याच शिरावर घ्यावी लागेल. त्याला तो भार ईश्वर नावाच्या आरामलोडावर टाकता येणार नाही.
शिवाय त्याला प्रत्येक वेळेस स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल.
इ. इ
हा पहीला मुद्दा
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 10/09/2017 - 17:54
नवीन
मारावाजी प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 10/13/2017 - 12:16
नवीन
त्याला डंपिंग फोल्डरच नसेल का? डंपिंग फोल्डरचं नाव आणि काही संकल्पनात्मक गुणधर्म बदलल्याने फार काही फरक पडणार नाही. मूळात पिढ्यान पिढ्या या डंपिंग फोल्डरचं संकल्पनात्मक स्वरुप दृढ होतं नि त्यातनं देव, धर्म बनतात. मग हा निसर्गात झालेला प्रत्यक्ष इतिहास प्रयोगानं रिपिट करायची काय गरज आहे?
वन्य प्राणी, वनस्पती संस्कारशून्य आणि कंडीशनींगमुक्त असतात. शेवटी मानव एक प्राणी आहे. सदर मुलगा एका प्राण्याप्रमाणे वागेल. तुमच्या नागरी संस्कृतीतला ईश्वरच सोडा, त्याला प्रशासन, अर्थव्यवस्था, संस्कृती, राज्यव्यवस्था, कायदा, समाजव्यवस्था, शिक्षण, विज्ञान, मानवी मूल्यं, इ यांचे कुठलेही नियम, संकेत अमान्य असतील.
या सर्व व्यवस्थांत आपलं सौख्य, सर्वस्व, वेगळेपण आहे असं आपण मानतो. आणि यातलं काहीही "अस्तित्वात" नसतं. फक्त देवच पकडून नास्तिक अस्तित्वाच्या पुराव्याचा बाऊ कशाला करतात हे मला कधीच उमगलं नाही.
==============================
विज्ञानाचा बाऊ होण्यापूर्वी या सर्व प्रणालींना जोडणारी एक धर्मप्रणाली होती. तिच्या स्कोपबाहेर काहीही नव्हतं. आता ती प्रणाली त्याज्य मानली जात आहे. आणि बाकीच्या प्रणाली स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत. यातनं उत्पन्न होणार्या अनागोंदीची प्रचंड किंमत आजच आपण देत आहोत. नंतर काय होणार आहे याची कल्पना करवत नाही.
=====================================
तुम्ही जे दोन पर्याय दिलेत त्यामागे बहुतेक ईश्वर मानल्यानं कार्यकारणभाव हुकतो असं काहीतरी "मानलेलं" दिसतंय. प्रयोगाचा हा आधारच बिनबुडाचा आहे. (कोण्या एका शहरात ५०% लोक नास्तिक आहेत, मात्र शास्त्रज्ञ २५% नास्तिक आहेत!!! शास्त्रज्ञांत नास्तिक जास्त असतात अशी एक अवधारणा उगाच माजवून दिली आहे.)
मूळात कोणतंही एक विधान मांडताना, त्याचा कार्यकारणभाव पाहताना, हायपोथेसिस मांडताना, संदर्भ मांडताना, गृहितके मांडताना, व्याख्या मांडताना इतकं काही गृहीत धरावं लागतं कि विचारता सोय नाही. एक व्याख्या करायला पहिलेपासून माहित असलेले किति शब्द गृहित धरावे लागतात? खूप सारे! मग विज्ञानातली पहिली व्याख्या कशी करणार? तांत्रिकदृश्ट्या तुम्ही विज्ञानाचा अभ्यास देखिल "चार गोष्टी मानल्याशिवाय" चालू करू शकत नाही. अगदी न्यूटन महाराज पण पहिल्या लॉ मधे फोर्स शब्द वापरून घेतात आणि दुसर्या लॉ मधे त्याची व्याख्या करतात!!! असलं काय विज्ञान असतं का?
==========================
याचा फायदा काय? मूळात स्वतःची कृत्ये इतकी स्वतंत्र असतात का की त्याची जबाबदारी एकट्याने घ्यावी?
==============================
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 10/09/2017 - 05:15
नवीन
आता मला ६४ वर्षे पूर्ण होतील. इतके जगल्यावर मी एक निष्कर्ष काढला आहे. तो असा की " शहाणे करावे सोडूनी सकलजन " हे काही खरे नाही. आपण उत्तरोत्तर शहाणे बनण्याची प्रक्रिया चालू ठेवणेच इष्ट. या जगात मूर्ख लोक आहेत म्हणून हे जग चालले आहे. मूर्खपणा , प्रमादशीलता यानीच निम्मे जग , अर्थव्यवस्था चालते. श्रद्धा, यश,समाधान, मोठेपणा , देवाचे अस्तित्व हे विषय न चर्चिलेलेच बरे !
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 09:38
नवीन
ज्या व्यक्तिला आपले विचार चूक असू शकतात, आपणच इतरांना शहाणे करायचे नसते (ते म्यूच्यूअल असतं), लोक वाद हा जिंकण्यासाठी करतात असे नसते, मूळात हा एक बुद्धी सिद्ध करायचा वाद आहे असं मानू नये, समोरच्यांचा इगो अजिंक्य आहे असं मानू नये, आपण कोणीतरी रेअर नसतो, हाताशी घेतलेल्या मुद्द्याच्या आपण सुसुत्र आणि संपूर्ण विचार केलेला नसावा, चिंतनाची फ्रेमवर्क आपण माहीती करून घेतलेली नसू शकते, चर्चेत प्रारंभी एक बाजू सुरुवात म्हणून घ्यायची असते आणि त्यापलिकडे तिचं महत्त्व नसतं हे उमगलेलं नसतं .... त्याला हा प्रवास खडतर जातो.
=====================================================
यनावाला जर लातूरच्या संरपंचाच्या निवडणूकीत मतदान करायला जाणार्या आदिवासी म्हातारीला हटकून लोकशाही प्रकिया एक शासनपद्धती म्हणून अर्थहीन म्हणू लागले तर धन्य म्हणायचं. मुद्दा असा आहे कि चर्चा (वाद पण नाही) कशी करावी हाच विषय प्रचंड गहन आहे (चर्चेतला जो विषय आहे तो किती गहन आहे हे वेगळे). मी ६४ वर्षांचा होईपर्यंत तितकं जरी शिकलो धन्य मानेन.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 10/09/2017 - 10:14
नवीन
जो आपल्या विचारांचा नाही तो भरकटलेला. मग त्याला रुळावर आणण्याचे काम करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून प्रत्येक पंथ शहाणे करुन सोडावे सकल जन ही भुमिका जगत्तो
- Log in or register to post comments
त
तिमा
Mon, 10/09/2017 - 05:59
नवीन
माझा एक समविचारी मित्र आहे. त्याने एकदा, चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या होत्या.
' आस्तिकांना कधीही उपदेश करायला जाऊ नये. उलट त्यांच्या आस्तिक रहाण्यातच आपल्या सारख्यांचा फायदा आहे.
ते शनिवारी केस कापायला जात नसतील तर त्यादिवशी आपण जावे, गर्दीचा सामना करावा लागत नाही.
एखाद्या देवळातली नक्षी व कलाकुसर निवांतपणे पहायची असेल तर, त्यातल्या श्रद्धास्थानाचा जो वार आहे तो टाळून जावं. शंकराच्या देवळांत शनिवारी तर मारुतीच्या देवळांत सोमवारी जावं.
चतुर्थीला हे भक्त सिद्धीविनायकाला गर्दी करतील त्या दिवशी आपण मॉलमधे जावं, निवांतपणे.
या सर्वांनी जर सगळा वेळ विज्ञानाच्या अभ्यासात घालवायला सुरवात केली तर आपल्याला जास्त स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तेंव्हा जेवढा श्रद्धाळु समाज जास्त तितका आपल्या दृष्टीने चांगला.
देवाच्या भीतिने का होईना, ते वाईट कृत्ये करायला घाबरत असतील, तर समाजाच्या दृष्टीनेही चांगलेच!
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 10/09/2017 - 06:56
नवीन
जगातील गुन्हेगारांची जर यादी केली मानसिकता तपासली तर मला खात्री आहे त्यातील ९० टक्के लोक देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे असतात. वानगी दाखल, संजय दत्त , हर्शद मेहता, विजय मल्ल्या यांचा देवावर विश्वास आहे की नाही ते शोधल्यास समजेलच !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/09/2017 - 07:21
नवीन
आपण जो दावा केला आहे त्यामागे काही वैज्ञानिक संशोधन आहे का आणि हा दावा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झाला आहे का? आपण स्वतः याचा वैज्ञानिक कोनातून अभ्यास केला आहे का? तसे नसेल आपली त्याबद्दल इतकी खात्री कशामुळे आहे? कोणताही वैज्ञानिक आधार नसताना अशी खात्री होणे हे आस्तिकांच्या अवैज्ञानिक अंधश्रद्धेसारखेच नाही का?
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 10/09/2017 - 07:50
नवीन
माझ्या पुरती माझी खात्री आहेच. पण त्यासाठी संस्ख्याशास्त्रीय अनुमान काढायचे झाल्यास तीन नावे मी वानगी दाखल सुचविली आहेत. अर्थात तिघेही जर आस्तिक निघाले तरी ही माझे विधान सिद्ध होत नाही असे म्हणण्यास वाव आहे. कारण तिघेही अस्स्तिक असणे हा योगायोग ही असू शकतो. अगदी वैज्ञानिक रितीने सिद्ध व्हायला मानसिक कलाचे आकलन अशक्य आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय अनुमानच काढावे लागेल. चित्र्कलेची आवड असण्याचे प्रमाण, संगीताची आवड असण्याचे प्रमाण, वाचनाची आवड असण्याचे प्रमाण हे सारे विशूद्ध विज्ञानाद्वारे स्पष्ट करता येत नाहीच. अगदी तार्किक मुद्दा मांडायचा झाला तर आमच्या सोसायटीत मी जवळ जवळ ४०० व्यक्तीमधे एकटाच नास्तिक आहे. इतपत आकडेवारी माझ्याजवळ आहे. आता या आकडेवारीचा वरील विधानाशी संबंध काय असे म्हणायचे झाले तर एकच म्हणता येईल की मी घेतलेल्या नमुन्यात नास्तिकाचे प्रमाण अस्स्तिकाशी १: ४०० असे आहे. यावरून मला वाटते स्थूलमानाने समाजात हे प्रमाण असेच असावे. आता समजा जगातील गुन्हेगारांचा खरोखरच असा संख्याशात्रीय अभ्यास झाला व असे अनुमान निघाले की गुन्हेगारात ८० टक्के प्रमाण नास्तिकांचे आहे. तरीही ते वैज्ञानिक सत्य म्हणता येणार नाहीच.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 09:19
नवीन
डॉ. आंबेडकर, गांधीजी, डॉ. कलाम हे तिघे देशातले चिरंतन सर्वप्रिय नेते असावेत (क्लेम नाही).
हे तिघेही नास्तिक नव्हते असा माझा दावा आहे.
================================
https://en.wikipedia.org/wiki/Irreligion_in_India
योगायोगाने १:४०० हे बरोबर आहे. तुमची सोसायटी टिपिकल आहे.
==========================================
बादवे, नास्तिकता मंजे योगायोगवाद हे माहीत आहे का?
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 10/09/2017 - 09:53
नवीन
माझ्या पुरती माझी खात्री आहे याचा अर्थही असाच की मी अनुभवलेले आस्तिक व त्यांचे प्रमाण व त्यांच्या मधील एकूण नैतिकतेचे मला आढळलेले प्रमाण याचा सर्व साधारण निष्कर्ष इतकेच. दुसरे असे मी मी नास्तिक आहे म्हणजे नक्की काय ? असे मला आता पर्यंत कोणाही आस्तिकाने मित्राने व नातेवाईकाने व शेजार्याने विचारलेले नाही. इथेही तसे कोणी विचारलेले नाही तरी विशद करतो. लहान पणी एक गुणासाठी प्रशन असे नास्तिक म्हणजे काय ? आस्तिक म्हणजे काय ? त्याचे परिक्षकास अपेक्शित उत्तर असे की देवाच्या अस्तित्वावर विश्वास ज्याचा आहे तो आस्तिक. काही वाचले असता असे ही मिळाले की जे दिसत नाही व जाणवतही नाही ते आहे असे समजणे म्हणजे अस्तिकता. मला आढळलेल्या आस्तिकांमधे मला तरी ईशास घाबरण्याची प्रवृती आढळ्लेली नाही.
मी स्वतः नुसती पूजा करतो असे नाही तर पूर्ण गणपती प्रतिष्ठापनेची पूजा पुस्तकात पाहून का होईना सांगू शकतो. सांगितली आहेही. परंतू त्यामुळे " देव" पावतो व आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो असे मी मानत नाही. माझी आजी अगदी मी लहान असताना सांगत असे " देव आपल्यावर काही घेत नाही सारी आपल्या दैवाची व कर्माची फळे बरं ! माझे आस्तिक नातेवाईक देव व दैव एकच मानतात . मी नाही. दैव हे नास्तिकांच्याही पाचवीला पुजलेले असते. देव नावाची काही संस्था वा व्यक्ती अस्तित्वात नाही नक्की नाही असे मी मानतो ते माझ्या आयुष्यात समोर माझ्या बाबतीत वा इतरांच्या बाबतीतील परिणामांवरून. भक्ती केल्याने देव पावतो व आपल्या मनासारखे करतो ही अटकळ चुकीची आहे असे गोनिदा ही एकदा त्यानी केलेल्या ज्ञानेशवरीच्या अभ्यासाचा संदर्भ देउन म्हणाले होते. देव असेलच तर ती शक्ती आहे. तिच्याकडे तिची अशी विचारधाराच नाही जशी मनुष्याची असते. कारण देव इतका विशाल , पराकोटीचा महान आहे की तो भक्तीनेही निगोशिएबल नाही. अशी माझी नास्तिकता आहे. सबब ज्याला तो निगोशिएबल मानायचा आहे त्याने तो मानावा असे माझे मत आहे. वरील माझ्या विवेचना वरून एखाद्याला वाटले मी " अरे हा तर पक्का भ्रमिष्ट नास्तिक आहे तरी मला त्याचे की सोयरसुतक नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 10:04
नवीन
आपण एक अस्तिक आहात.
============================================
ईश्वराच्या स्वरुपावर आपली मतं सामान्य आहेत. ईश्वराच्या स्वरुपावर असलेल्या अस्तिकांमधील भेदांचा मुद्दा, बिनकामाचा असला तरी, एक वेगळा विषय आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 10/09/2017 - 10:23
नवीन
माझ्या थोरल्या बंधूनी रसायन शास्त्रात पी एच डी केली. त्याने सांगितलेले एक वाक्य मी आजही विसरलेलो नाही. ते असे " विज्ञानातील अनेक शोध हे एक शोधताना दुसरेच सापडले असे आहेत. काही शोध असे की त्याचे एक काल्पनिक विवेचन ( हायपोथेसिस ) मांडले जाते. कोणत्याही प्रायोगिक सिद्धतेशिवाय अशी अनेक विवेचने मांडली जातात पुढे कित्येक वर्षानी त्याचा स्वीकार त्याच वेळी केला जातो की काहीतरी प्रमाणात त्यात सत्यता आढळते. (आज गुरूत्व लहरीचे काल्पनिक विवेचन मांडणारे हयात नाहीत परंतू त्याचे प्रयोगसिद्ध स्वीकृती होण्यास इतकी वर्षे लागली. ) दुसरे असे की विमान का उडते याची एक चुकीचे हायपोथेसिस बरेच काळ सर्वमान्य होते पण पुढे जशी मोजणी शास्त्रात प्रगति झाली तसे ते हायपोथेसिस कसे चुकीचे होते हे ही आढळून आले. गुरूत्व लहरी हे मान्यतेचे तर ऐरोडायनामिक्स हे अमान्य हायपोथेसिस चे उदाहरण उदबोधक ठरावे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 10/09/2017 - 10:50
नवीन
गुरुत्व लहरींचं नक्की काय शोधलं गेलं आणि कसं ते कळलं तर बरं होईल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »