Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान

य
यनावाला
Sat, 10/07/2017 - 18:12
🗣 285 प्रतिसाद
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?" " दत्त मंदिरात जात आहे." " पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे." " अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! " " गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?" " अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले. " गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो. मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले, " असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?" " शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला. " शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते. " वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !" ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता." " रागावू नका. मी सत्य तेच सांगितले." " आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले. सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो. हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे. पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते. समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते. मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात. देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते. यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ? यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही. पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो. "आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे." हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे. ****************************************************************
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
89545 वाचन

💬 प्रतिसाद (285)
A
arunjoshi123 Sat, 11/04/2017 - 17:01 नवीन
पण आपल्या दोन्ही वाक्यात विसंगती आहे असे मला जाणवते. जो कट्टर असतो तो आपलं तेच खरं मानतो आणि असा कट्टरतावाद अतिरेकी विचारांना खतपाणी घालतं.
धर्म पाळणं ही भयंकर मोठी किटकिट आहे. तरिही लोक निष्ठेने धर्म पाळतात. असं मला म्हणायचं होतं. ======================== कट्टर शब्दाला फक्त निगेटिव अर्थ असेल तर तो शब्द मागे. मला वाटलं त्याचा अर्थ निष्ठेची अति तीव्रता असा होतो. उदाहरणार्थ, चांगुलपण हा नास्तिकतेचा अविभाज्य भाग असला नि नास्तिक कट्टर नसले तर ते यनावाला वर्णित बुद्धीहिन अस्तिकांना अन्याय्यपणे पिळून खातील. ढिलाई, संतुलन, कट्टरता प्रसंगाप्रमाणे कामाचे असू शकतात. ============================ लेखनावरील अभिप्रायासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
ट
ट्रेड मार्क Mon, 10/30/2017 - 22:12 नवीन
हिंदू धर्मांतर्गत हे म्हणणे बरोबर आहे. ज्याला वाटेल त्याने त्या देवाची उपासना करावी किंवा करू नये. पण दुसऱ्या धर्माचे लोक ते मानत नाहीत त्याचं काय? दिवसातून ५ वेळा भोंग्यावरून अज़ान म्हणायची, नमाज पढायचा त्याआधी वझू करायचा, रोजे पाळायचे, कितीही त्रास झाला तरी मक्केला जायचंच हे तसं म्हणलं तर अनावश्यक गोष्टीच आहेत. पण तरीही बहुसंख्य मुस्लिम ते कटाक्षाने करतात. अगदी तरुण सुद्धा करतात. यातल्या गोष्टींचा इतरांना त्रास पण होतो उदा. रोजची अज़ान किंवा सार्वजनिक ठिकाणी जागा अडवून नमाज पढणे. कितीही महत्वाची मीटिंग असली तरी टी सोडून नमाज पढायला जाणे. एवढंच कशाला, अमेरिकेत ऑफिसच्या वॉशरूम मध्ये एकजण एक पाय वर करून बेसिनमध्ये पाय धूत होता, दुसरा पाय बुटावर. एक धुवून झाला की मग तो परत बुटात घालणार. त्याला मी विचारलं काय करतो आहेस तर म्हणजे वझू करतोय. म्हणलं इथे नमाज पढायला जागा आहे का? तर म्हणे नाही मी ५-६ मैलावर एक मशीद आहे तिथे जाणार आहे. मग ऑफिस मध्ये कशाला वझू करायचा? त्याला म्हणलं तळमजल्यावर अंघोळ करता येईल अशी बाथरूम आहे, तर म्हणे नाही इथेच ठीक आहे. याउलट हिंदू बघा. नुसता घरातल्या घरात देवासमोर दिवसातून हात जोडायचे म्हणले तर नाराज होतात. वर हे तथाकथित विचारवंत देव कसा नसतो, मंत्रपठण कसा मूर्खपणा आहे ईई सांगत बसतात. मुळात माझं म्हणणं तेच तर आहे "आंम्ही काय पाळावे, हे आमचे आम्हाला ठरवू द्या". एखादा रोज देवळात जात असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? रोज सकाळी पूजा करत असेल तर कोणी कशाला विरोध करावा? यातला मोठा धोका तुमच्या लक्षात कदाचित आला नसावा. पण मुस्लिम मोठ्या संख्येने एकजूट होतात. तसेच ख्रिश्चन पण होतात. पण हिंदूमध्ये मात्र कायम फूट पडलेली असते. मी दिलेल्या लिंक मधला लेखक तेच तर म्हणतोय. सन २०५० मध्ये जरी मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त नसली तरी धर्म मानणाऱ्यांची संख्या मात्र जास्त असेल. त्या दृष्टीने ते हिंदूंना डोईजड होऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
व
विशुमित Tue, 10/31/2017 - 07:10 नवीन
<<< पण मुस्लिम मोठ्या संख्येने एकजूट होतात. तसेच ख्रिश्चन पण होतात. पण हिंदूमध्ये मात्र कायम फूट पडलेली असते. मी दिलेल्या लिंक मधला लेखक तेच तर म्हणतोय. सन २०५० मध्ये जरी मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त नसली तरी धर्म मानणाऱ्यांची संख्या मात्र जास्त असेल. त्या दृष्टीने ते हिंदूंना डोईजड होऊ शकतात.>>> ==>> मी म्हणतो भारतामध्ये सरकारी सुरक्षा यंत्रणा सक्षम असताना कुठे सगळ्या हिंदूंना लढायला जायचे आहे ? सतत हिंदू मुस्लिम लढाईच्या पवित्र्यात असायला २०५० हा काय मध्ययुगीन रानटी काळ असणार आहे का ? (२०५० चा आकड्याला काही आधार आहे का ?) उच्च कीर्तीच्या (?) विचारवंतांनी हिंदूंमध्ये अशी भीती पसरवणे अनाठायी आहे. बादवे अशा विचारवंतांनी संघटित होऊन किती मुस्लिम/ख्रिश्चन लोकांची डोकी फोडली आहेत किंवा २०५० मध्ये फोडायला काट्या हातात घेतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 10/31/2017 - 19:08 नवीन
२०५० मध्ये कोणी काट्यांनी लढणार नाही. तुम्ही हे वाचलं असावं अशी अशा करतो, नसेल तर वाचावं अशी विनंती करतो. हे कोणी विचारवंताने सांगितलेलं नाहीये. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य (मुस्लिम) माणसाने एका प्रश्नाला उत्तर दिलं आहे. याच प्रश्नावर दिलेली बाकी उत्तरं पण वाचा अशीही विनंती करतो. युद्ध फक्त शास्त्रांनी, लाठ्याकाठ्यांनीच होतात असा बहुतेक सर्वांचा भाबडा समज असतो. पण अश्या पारंपरिक लढायांपेक्षा विचारांनी, म्हणजे विचारधारा/ मत बदलून जे युद्ध खेळलं जातं ते जरी वेळखाऊ असलं तरी अतिशय धोकादायक असतं. कुठलाही लोकांचा समुदाय बांधून ठेवायला काहीतरी बाह्यघटक लागतो. जसं राष्ट्र म्हणा किंवा धर्म म्हणा, ह्या जरी संकल्पना असल्या तरी लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करतात. याच दोन महत्वाच्या गोष्टींवर सध्या इतर लोकांचा फोकस आहे. "भारत तेरे तुकडे होंगे" अश्या घोषणा कॉलेजमध्ये सहज ऐकू येतात आणि फक्त जनेयुच नाही तर मुंबईत राहणारा आमच्या नात्यातला एका कॉलेजयुवकाला त्यात काही वावगे वाटत नाही. तो सहजपणे मला म्हणाला ते नुसते घोषणाच तर देत आहेत. बाकी चर्चेतून समजलं की त्याच्या बऱ्याच मित्रांना अश्या राष्ट्रविरोधी घोषणेत काही चुकीचं वाटत नाही. शाळेच्या पुस्तकात औरंगजेब आणि टिपू सुलतान बद्दल भरभरून धडे होते पण शिवाजी महाराज फक्त दीड पानात होते (ज्यात आत्ता नुकताच बदल करून शिवाजी महाराजांवर जास्त फोकस आहे). दुसरं म्हणजे धर्म. सध्याच्या आधुनिक घरांमध्ये पूजा पाठ होत नाहीत, लोक देवळात जाणं डाऊनमार्केट समजतात. त्याच घरातली मुलं मात्र रोज मशिदींवरून दिल्या जाणाऱ्या अज़ान ५ वेळा ऐकतात. इतर वेळेस त्याच भोंग्यावरून दिली जाणारी भाषणं ऐकतात. त्यात आपलेच तथाकथित विचारवंत देव मानणं, मंदिरात जाणं, मंत्र म्हणणं, पूजापाठ करणं कसं मूर्खपणाचं आहे हे सांगतात. या मुलांबरोबर सोसायटीमध्ये किंवा शाळेत जे मुस्लिम मित्र असतात ते मात्र त्यांच्या धर्माबद्दल बरंच काही चांगलं बोलत असतात. हळू हळू आपल्या मुलांच्या मनावर हिंदू धर्मात कश्या वाईट चालीरीती होत्या आणि इतर धर्मात कश्या चांगल्या गोष्टी आहेत हे बिंबवलं जातं. मग हाच मुलगा थोडा मोठा झाल्यावर मुस्लिमांना बीफ आवडतं म्हणून गाय मारण्याचं समर्थन करू लागतो पण डुक्कर इस्लाममध्ये निषिद्ध आहे म्हणून पोर्क खाऊ नये असं म्हणतो. चिकन फक्त हलाल असावं असं मानू लागतो. बघा कुठे लागल्या काठ्या? सगळे बदल हळूहळू होत गेले ना? अजून ३० वर्षांनी सध्या ७४% हिंदू आणि १५% मुस्लिम हे प्रमाण कसे असेल याचा विचार करा. जिथे जिथे मुस्लिमांचं प्रमाण वाढलं आहे (साधारण २०% पेक्षा जास्त आहे तिथे) इतर धर्मियांची काय स्थिती आहे बघा. जम्मू काश्मीर आणि भारत जरी बाजूला ठेवलं तरी जगात इतर देशांत काय परिस्थिती झालीये? चार-पाच वर्षांपूर्वी डेन्मार्क, नॉर्वे सारख्या देशांनी तरुणांनी आमच्या देशात स्थलांतरित व्हावे आणि ३ वर्षात सिटिझनशिप देऊ असे ओपन इन्व्हिटेशन दिले होते. काही महिन्यापूर्वी त्यांनी इमिग्रेशनचे नियम एकदम स्ट्रिक्ट केले आहेत. युरोपमधील बेल्जीयम, इंग्लंड, फ्रांस सारख्या देशात शाळांमध्ये पोर्क वर बंदी आणायला लावली. जर्मनीसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देशात शेकडो मुलींचा घोळक्याने विनयभंग केला जातो. इंग्लंडमध्ये मुस्लिमबहुल भागात राहणाऱ्या १४०० शाळेत जाणाऱ्या ब्रिटिश व इतर वंशांच्या मुलींवर जवळपास १५ वर्ष वारंवार बलात्कार केला जातो. तरीही मुस्लिम नाराज होतील म्हणून आणि काही स्थानिक मुस्लिम नेत्यांच्या दबावामुळे हे प्रकरण बऱ्याच आधीपासून माहित असूनही दडपायचा प्रयत्न होतो. हे देशसुद्धा अगदी ओपन कल्चरचे होते/ आहेत. पण जेव्हा मध्ययुगीन रानटी संस्कृतीचे नियम पाळणारे लोक २१ व्या शतकात ते नियम लागू करायला बघतात तेव्हा काय होतं हे गेल्या काही वर्षात बघायला मिळालेलं आहे. सध्या तर असं ऐकायला येतंय की भारतात (मोठ्या शहरात तरी) हॅलोविन पार्टीज जोरात आहेत. म्हणजे लोक पितृपक्ष पाळण्याला, श्राद्ध करायला मूर्खपणा म्हणतात पण पाश्चात्यांचा त्याच धर्तीवरचा (तसाच नव्हे) सण मात्र साजरा करायला लागलेत. तथाकथित पुरोगाम्यांना होळी, रंगपंचमी बद्दल आक्षेप आहेच, दिवाळी, पाडव्या बद्दलसुद्धा आहे. पण वॅलेंटाईन डे, थॅंक्सगिविंग, हॅलोविन, ३१ डिसेंबर मात्र साजरे करायलाच पाहिजेत. बैलपोळ्याला किंवा जलिकट्टू मध्ये प्राण्यांना त्रास होतो पण बकरी ईद, रमज़ान मात्र पारंपरिक पद्धतीने प्राण्यांना कापून साजरे केलेच पाहिजेत. गणपती व नवरात्रामध्ये लाऊडस्पीकर चा त्रास होतो (मलाही होतो) पण रोज पहाटे ५ ला आणि दिवसातून ५ वेळा मशिदीत बांग दिली जाते ती मात्र आवश्यक आहेच आणि त्याचा त्रास झाला नाहीच पाहिजे. असो, प्रतिसाद जरा मोठाच झाला. २०५० मध्ये काय होतंय ते बघायला बहुतेक मी तरी नसेन. पण म्हणून जे चाललं आहे त्याकडे कानाडोळा का करावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ट
ट्रेड मार्क Tue, 10/31/2017 - 19:13 नवीन
एकविसाव्या शतकाचा मध्य आहे आणि २०१७ पासून ३१ वर्ष तरी लांब आहे. एवढ्या काळात लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतात. म्हणून ते साल प्रश्नकर्त्याने घेतलं असावं. या वाक्यावरून मला वाटतंय की तुम्ही मी दिलेलया मूळ लिंक मधील प्रश्न आणि उत्तर वाचलं नसावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सचिन७३८ Sat, 10/28/2017 - 05:25 नवीन
देव मानणे न मानणे अथवा अज्ञेय असणे याने हिंदुत्व संकोचत नाही. पुराण, वेदोपनिषदे, गीता यांना न मानणारा ही हिंदु असू शकतो. तसाच एखादा कट्टर नास्तिकही हिंदु असू शकतो. नाही पाळणार मुहूर्त-तिथ्या, नाही करणार व्रत-वैकल्ये. नको आम्हां ती पूजा, नको भटजी कर्मकांडे. तरी आमच्या हिंदु म्हणून जगण्याचे, ना आम्हांकोणा वावडे. आरंभ है, प्रचंड है …………….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
त
तिमा Sat, 10/28/2017 - 16:35 नवीन
अनेक वर्षांपूर्वी, पुरीच्या जगन्नाथ मंदिरात टुरिस्ट म्हणून गेलो होतो. हॉटेलच्या जवळच्या एका छोट्या दाराने आंत प्रवेश केला. दाराजवळ जे बारीक अक्षरांत लिहिलेले नोटिसबोर्ड होते, त्याजवळ विक्रेत्यांचा वेढा होता. म्हणून नोटिसा वाचता आल्या नाहीत. आंत गेल्यावर, अनेक बडवे पूजा करण्यासाठी गळ घालू लागले. त्यांना आणि बाजूला जमिनीवरच जेवायला बसलेल्या हत्तीरोगी भिकार्‍यांना टाळत आम्ही मुख्य मंदिरात पोचलो. नियमांची काहीच कल्पना नसल्याने मी गळ्यांत अडकवलेला कॅमेरा हातात घेतला. फोटो काढण्याआधीच सिक्युरिटीच्या शिट्ट्या वाजल्या. सिक्युरिटीवाले आम्हाला गराडा घालून कॅमेरा मागत होते. त्यांतला रोल बाहेर काढून नष्ट करा, असे ओरडून सांगत होते. पूजेला नाही म्हणणारे म्हणजे हे नास्तिकच असणार, याची खात्री पटल्याने, बडवे आमच्या अंगावर धावून येत होते. तशा स्थितीतही मी कॅमेरा द्यायला नकार दिल्याने, आमची शोभायात्रा मुख्य सिक्युरिटी ऑफिस पर्यंत आली. सिक्युरिटीचा मुख्य शांत स्वभावाचा वाटला. त्याला मी समजावून सांगितले की मला नियम माहीत नव्हता, मी एक टुरिस्ट आहे आणि मी एकही फोटो काढलेला नाहीये. माझा रोल नष्ट केला तर माझे आधीचे कित्येक फोटो वाया जातील. त्याने त्या बडव्या जमावाला शांत रहायला सांगितले आणि आमच्याकडून रीतसर पावती देऊन दंड घेतला. बरोबरच्या एका सिक्युरिटीवाल्याला आम्हाला मंदिराबाहेर सोडायला सांगितले. नाहीतर त्या बडव्यांनी आम्हाला मारहाण केली असती. त्यांचे शिव्याशाप खातच आम्ही मंदिराबाहेर पडलो. दर्शन न होण्याचे दु:ख अजिबातच नव्हते कारण मी नास्तिकच होतो. त्यावरुन कायमचा धडा घेतला. आता कुठल्याही मंदिरात स्थापत्य बघायला आंत गेलो तरी नियमांची आधीच खात्री करुन घेतो. आमच्यातला एक आस्तिक मात्र फारच दुखावला गेला होता. सर्व दोष माझ्या पदरी घालून त्याने शेवटी जे वाक्य उच्चारले त्याने करमणुक झाली. आज, त्या जगन्नाथानेच आपल्याला वाचवले. त्याचे आभार माना. मला वाटतं, सिक्युरिटी चीफच्या वेषांत, तो प्रत्यक्ष जगन्नियंताच असावा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 10/28/2017 - 17:23 नवीन
तिमा, सगळा दोष तुमच्या पदरी घातला हे उचित नसावं. पण त्याच्या श्रद्धेला नाकं मुरडण्यात अर्थ नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
A
arunjoshi123 Mon, 10/30/2017 - 15:17 नवीन
दाराजवळ जे बारीक अक्षरांत लिहिलेले नोटिसबोर्ड होते, त्याजवळ विक्रेत्यांचा वेढा होता. म्हणून नोटिसा वाचता आल्या नाहीत.
एखादी पॉलिसी घेताना वा साईटचा मेंबर बनताना असं होतं. छोट्या अक्षरातलं वाचता येत नाही, आलं तरी कळायची या जन्मी शक्यता शून्य! म्हणून ना-सायटी आणि ना-पॉलिसी वादी विचार येतात का?
पूजेला नाही म्हणणारे म्हणजे हे नास्तिकच असणार, याची खात्री पटल्याने, बडवे आमच्या अंगावर धावून येत होते.
दारु पिणार्‍यांच्या हातची दारु काढून घेऊन त्यांना दूध देणं शोभतं का तुम्हाला? का लोकांची पार्टी खराब करता? बडवे कस्टमर सोडून तुम्हाला एंटरटेन करत होते म्हणजे कलियुग अजून आलं नाही म्हणायचं.
तशा स्थितीतही मी कॅमेरा द्यायला नकार दिल्याने,
पॉलीसी रिलेटेड चूकून चुकीचं डिडक्शन होताना, डेबिट पडताना जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन होतं त्यावेळी तशाही स्थितीत तुम्ही ते ट्रान्झॅक्शन पूर्ण करणारे इलेक्ट्रॉन रोखून धरता का?
सिक्युरिटीचा मुख्य शांत स्वभावाचा वाटला.
वाटला का होता? तुमच्या निरिक्षणात? कि मंदिरात दिसणारी लोकं फार तर फार शांत "वाटू शकतात" असं काही गणित आहे?
माझा रोल नष्ट केला तर माझे आधीचे कित्येक फोटो वाया जातील.
तुम्ही एक फोटो चोरून काढलेला असेल तर मंदिराचे नुकसान होणारच ना? अजिंठ्यासारखं, किंवा दुसरं काही कंसिडरेशन असेल त्यांचं. तुमच्या विमा पॉलिसीवर मोठ्या नि लहान अक्षरांत ४० पानं भरून जी जी वाक्य लिहिलेली असतात, त्यांचं स्पष्टिकरण असतं का कि का लिहिलंय. त्यांचा पर्स्पेक्टिव लक्षात घ्या ना राव.
नाहीतर त्या बडव्यांनी आम्हाला मारहाण केली असती.
तुमचं वरचं डेबिट जेव्हा क्रेडिट होतं तेव्हा खालचे क्लर्क पुन्हा ते १० दा डेबिट मारणार याची इतकी हमखास खात्री असते का तुम्हाला? मंदिरात लोक ज्याला पक्के मारणार आहेत त्याच्या विनम्रतेची कल्पना करता येते.
दर्शन न होण्याचे दु:ख अजिबातच नव्हते कारण मी नास्तिकच होतो.
जगन्नाथाला तुमचं दर्शन होतं ते काय कमी आहे का?
आता कुठल्याही मंदिरात स्थापत्य बघायला आंत गेलो ...
स्त्री पाहताना तिचं वस्त्र, दागिने पाहावेत नि स्त्रीत्व पाहू नये हा प्रकार नास्तिकच यशस्वीरित्या करू शकतात.
सर्व दोष माझ्या पदरी घालून त्याने शेवटी जे वाक्य उच्चारले त्याने करमणुक झाली.
दोष असणे हा गुण देवाने नास्तिकांसाठी बनवलेलाच नाही.
मला वाटतं, सिक्युरिटी चीफच्या वेषांत, तो प्रत्यक्ष जगन्नियंताच असावा.
तुम्हाला अस्तिक आहोत असं सांगायचं व्यावहारिक (मंजे खोटं) ऑप्शन होतं. जगन्नियंत्याने तुमचा नास्तिकपणा वाचवला. प्रभु, तेरी महिमा अपार है।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सतिश गावडे Tue, 10/31/2017 - 06:48 नवीन
तुम्ही एक फोटो चोरून काढलेला असेल तर मंदिराचे नुकसान होणारच ना?
काय नुकसान होते? हल्ली जवळपास सर्वच मंदिरात फोटो काढण्यास मनाई असते. मात्र त्याच मंदिराच्या आवारात त्या मंदिरातील मूर्तीचे फ्रेम केलेले फोटो विकत मिळतात. हे अर्थकारण तर यामागे नसावे? माझा प्रश्न फक्त या आणि याच मुद्द्यापुरता आहे. इतर वादात भाग घेऊन वाचनमात्र वाचक म्हणून मिळणारी मजा मला घालवायची नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गामा पैलवान Sun, 10/29/2017 - 16:16 नवीन
एस,
arunjoshi123, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बेसिक अक्कल नव्हती असे फार गंभीर आणि वादग्रस्त विधान तुम्ही केले आहे.
माझ्या मते देश विज्ञानावर चालवावा अशी घटनेत कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे अरुण जोशींचं विधान वस्तुस्थितीचं निर्देशक न धरता केवळ गृहीतकीय (=हायपोथेटिकल) म्हणून धरावं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 10/30/2017 - 08:17 नवीन
थांबा जरा. arunjoshi123 यांना बोलू द्या. ही इज इन बिग ट्रबल. होप ही नोज दॅट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Mon, 10/30/2017 - 14:43 नवीन
खालील एक विधान आपणांस पूर्णतः कळेल इतक्यांदा वाचा: माझा हा प्रतिसाद (वा सर्वांचे सारे प्रतिसाद) या लेखाच्या नि त्यावरच्या प्रतिक्रियांच्या संदर्भात दिलेला आहे. सदर संदर्भ प्रत्येक वेळी काटेकोरपणे द्विरुक्त केलेला नाही. ================================================= आपण "घटनाकारांचा" शब्दातला आदरार्थ वा अनेकवचक मान्य वा अमान्य करू शकता. पण चूकून मान्य केलेत तर घटनाकार चिक्कार होते. २५० च्या वर होते. http://parliamentofindia.nic.in/ls/debates/facts.htm त्या अर्थाने घटनाकार त्यांना निवडणारे, समित्या स्थापणारे, समित्यांतले लोक, ती घटना मान्य करणारे, तिच्या प्रमाणे मान्य असणारे, तिच्यात बदलाची (आत्ता पूर्ती तरी) आवश्यकता नाही असे मानत आलेले इ इ सर्व मोडतात. तरी सर्वप्रथम तुमच्या सोयीसाठी त्यातला एकारार्थ मान्य करू. तरीही घटनाकार असं कोणतं घटनात्मक पद दिसत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Constituent_Assembly_of_India यानुसार -
Dr. Sachchidananda Sinha was the first chairman (temporary) of Constituent Assembly. Later Dr. Rajendra Prasad was elected as the president and Its vice-president was Harendra Coomar Mookerjee, a Christian from Bengal and former vice-chancellor of Calcutta University. Also chairing the assembly's Minorities Committee, Mookerjee was appointed governor of West Bengal after India became a republic.
यात मला कुठे आंबेडकरांचं नाव दिसत नाही. दुसर्‍या अर्थानं जेव्हा Constituent Assembly स्थापन झाली तेव्हा इथले व्हॉईसराय, ब्रिटनचे पंतप्रधान वा राणी यांना देखील एका अर्थानं हा शब्द लागू होतो. Constituent Assembly जेव्हा भारताची प्रोविजनल संसद झाली तेव्हा राजेंद्र प्रसार वा कार्यकारी सत्ता असलेले म्हणून पंडित नेहरू यांना घटनाकार म्हणता येईल. तिथे देखील मला आंबेडकरांचं नाव दिसत नाही. पण कुठंही घटनेत वा बाहेर घटनाकार असं आंबेडकरांचं "कायदेशीर" वर्णन नसताना, हे सर्वविदित सत्य आहे कि घटनेला आत्मा, गाभा नि स्वरुप आंबेडकरांनी दिले म्हणून मी तुम्हाला असलेला अर्थ मान्य करून चालतो कि सबब अनादरवाचक विशेषण त्यांनाच संबोधलं आहे असा अर्थ काढला तर काही अवाजवी नाही. ================================================== लेखात यनावाला यांनी नास्तिकतेचं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचं संवैधानिक अधिष्ठान सांगीतलं आहे. यनावाला धरून इथल्या अनेक नास्तिकांनी देव व धर्म यांना विज्ञानात स्थान सांगीतलं आहे. काहींनी सामोपचाराच्या भूमिका मांडल्या आहेत, हे मान्य. मग अनेक नास्तिकांनी ईश्वराची कल्पना नि धर्म कसे समाजविघातक होते, आहेत, असतील हे सांगीतले आहे. त्याच घटनेत घटनाकारांनी धर्म (चर्चेतील, लेखातील नास्तिकांचे धर्मांचे वर्णन डोळ्यासमोर आणा) पाळण्याचे स्वातंत्र्य दिले आहे हे देखील वादातीत सत्य आहे. तेव्हा निरुपद्रवी तसेच अ‍ॅक्चूअली, पोटेंशियली हानिकारक अशा देव आणि धर्म या संकल्पनांना "त्यांच्या मते" त्या संकल्पनांच्या विपरित सुयोग्य अशी वैज्ञानिक दृष्टिकोनाची संकल्पना उपलब्ध असताना मान्यता देणे बेअक्कलपणाचे आहे. असं कोण लिहितो हे महत्त्वाचं नाही, हे विसंगत आणि चूक आहे, बेअक्कल आहे, इतकाच मुद्दा आहे. ========================================================== आता आपण मी तुम्हाला एक वाक्य कळेपर्यंत पुनश्च वाचायला का सांगीतलं त्याकडे वळू. यनावालांनी मूळ लेखात वैज्ञानिक दृष्टीकोन, देव, धर्म, अस्तिकता, नास्तिकता, समाजाचे हित, अहित, संविधान, बुद्धी, बुद्धिहिनता, घातकता, नागरिकाचे कर्तव्य, इ इ संकल्पना एकत्र एका विशिष्ट प्रकारे मांडल्या आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्यांचं नास्तिकी लॉजिक संविधानकारांना मूर्ख ठरवतं. मी कोणतीही संपूर्ण, सुसंगत, लॉजिकल, सज्जन आर्गुमेंट स्वीकारायला तयार आहे. पण घटनाकारांचा हवाला देऊन आम्हाला नास्तिक बनायला सांगत असले तर एक तर यनावाला बेअक्कल आहेत नैतर घटनाकार बेअक्कल आहेत असंच निघतं. लक्षात घ्या कि मी तर कोणाचंही ऐकायला तयार आहे (त्यातल्यात्यात तर्कापेक्षा सज्जनपणाकडे माझा फोरगॉन बायस आहे, पण एक वेळ तुमच्या समाधानासाठी तो पण मी बाजूला ठेवायला तयार आहे.) , पण ते विसंगत नसावं ना? ======================================================= तुम्हा "कठोर तसेच विमूढ" नास्तिकांची समस्या ही आहे कि विज्ञान आणि घटना या दोहोंच्या ठायी असलेली ह्यूमिलिटि, विनम्रता आणि सत्याचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती तुमच्या ठायी नाही. घटना कुठे कुठे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरते याचा तुम्ही लोक काय अर्थ काढता? तर जिथे जिथे संभव असेल तिथे तिथे कोणताही अपवाद न ठेवता! याचा अर्थ काय होतो? घटनाकारांना ब्रह्मांडाचे केवळ भौतिक स्वरुप मान्य होते. भौतिकतेच्या पलिकडचे त्यांना काही मान्यच नव्हते! विश्वाचे स्वरुप केवळ भौतिक आणि भौतिकच आहे हा विचार नास्तिकी आहे, संवैधानिक नाही, घटनाकारांना अभिप्रेत असलेला नाही, घटनेचे अनेक स्टेकहोल्डर्स आहेत त्यांचा नाही, वैज्ञानिक नाही, भौतिकशास्त्राचा पण नाही! घटनेच्या अन्य तत्त्वांच्या अंमलबजावणीत जोपावेतो भौतिक गोष्टींचा अंतर्भाव आहे तोपावतो वैज्ञानिक दृष्टीकोन अवलंबला जाईल असं काहीसं त्यांना अभिप्रेत आहे. नाहीतर निकाल प्रयोगशाळांत दिले गेले असते, न्यायालयं कशाला हवीत? त्या आधारहिन "इदम् सर्वम् भौतिकम्" विचारांचे मालक फक्त आणि फक्त तुम्ही नास्तिक आहात. का आहात ते तुमच्यापैकी कोणालाच माहीत नाही. https://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/scientific-method10.htm इथे विज्ञानाच्या मर्यादा दिलेल्या आहेत. बाकीच्या मर्यादा अफाट आहेतच पण हे विधान रोचक (तुमच्यासाठी थेट निवाडाच आहे, पण तितका क्रूर शब्द नको) आहे. :
Clearly, the scientific method is a powerful tool, but it does have its limitations. These limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity.
घटना म्हणत नाही मी सर्वस्पर्शी आहे आणि विज्ञान म्हणत नाही मी सर्वज्ञानी आहे, पण तुम्ही मात्र त्यांचा परस्पर हवाला देऊन पापभीरु अस्तिकांना निर्बुद्ध ठरवता. त्याचीच मी हजेरी इथल्या सर्व प्रतिसादांत घेतली आहे. या लेखाचं जे सार आहे, ते ज्या ज्या (विशेषण वापरायचा मोह आवरतो) लोकांना पटलं आहे, ते सार किती फोल आहे हे मी अनंत प्रकारे सांगायचा प्रयत्न शेकडो प्रतिसाद देऊन केला. तरीही नास्तिकत्वाचं संवैधानिक समर्थन चालूच. मग मला यनावालांना, नास्तिकांना घटनाकार मूर्ख निघतात असं अभिप्रेत आहे असं सांगावं लागलं. लेखाचं सार जितक्या लोकांना आवडलं आहे ते पाहता कोणत्याही रॅशनल माणसाचं डोकं ठणकेल!!!! ====================================================== अस्तिकांना भौतिकतेच्या पलिकडे बरंच काही असतं असं वाटतं. म्हणून ते वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अस्तिकता कंपॅटिबल मानतात. अस्तिकांना घटनेच्या बाहेर बरंच काही असतं असं वाटतं. घटनेला देखील "लोक आणि सरकार" इतक्या सिमित विषयावरच आपला अधिकार चालतो हे मान्य असतं. फार खासजी गोष्टींत घुसत नाही. (मिसळपाव आवडणारे आणि वडापाव आवडणारे असे दोन कितीही प्रबल समाजप्रवाह असले तरी घटनेची प्रावधानं मोडत नाहीत तोपर्यंत घटना मधे येत नाही आणि आल्यावरही मिसळपाव बरी कि वडापाव बरा हे सांगतच नाही!!!) म्हणून अस्तिक आणि घटना हे देखील कंपॅटीबल असतात. सबब यनावालांचा लेख, त्याचे सार सर्वांगाने अर्थहिन, शास्त्रहिन, घटनाहिन, विज्ञानहिन तसेच बुद्धिहिन पण साज्जन्यपूर्ण (म्हणूनच मी इतका लिहितोय) आहे. लक्षात घ्या इथल्या अनेक अस्तिकांप्रमाणे मी त्यांच्यावर व्यक्तिशः घसरलो नाही, त्यांनी खोडसाळपणा म्हणून लेख टाकला असण्याची शक्यता शून्य नाही हे ठामपणे माहित नसताना. ==================================================== हे झालं तुमच्या प्रश्नाचं तात्विक उत्तर. शेवटी येता येता मनात "व्यावहारिक" विचार आला कि अलिकडे गढूळ झालेल्या सामाजिक वातावरणाचा परिपाक म्हणून "जोशी नावाच्या अस्तिक (मानलेल्या) ब्राह्मणाने" जाहीरपणे पण अप्रत्यक्षरित्या "दलितांचे कैवारी असलेल्या (मनातल्या मनात ब्राह्मणांचे अप्रिय) आंबेडकरांच्या बाबतीत बेअक्कल म्हणून घ्यायची एक अप्रत्यक्ष संधी साधली" असा विचार तुम्हाला आला असल्यास (तुम्ही स्वतः काही का असेनात) सांगा. त्या प्रश्नाचं उत्तर लेखाचा मूळ विषय नसलं तरी तुमच्या समाधानासाठी द्यायला मला हरकत नाही. मात्र ज्यांना वरील स्पष्टीकरणाशी देणं घेणं नाही, गैरसमज आहे, त्यांना सांगू इच्चितो कि मी आंबेडकारांना "भारताचे पहिले पंतप्रधान" "आंबेडकरांनंतर कोण" इ इ प्रकारे फार उच्च अंगानं पाहतो. अशा प्रकारची "गैरसमज दूर करणारी" वाक्यं द्यावी लागणं मी एका भिकार समाजाचं चरित्र समजतो म्हणून मी कध्धीच देत नाही. अर्थात यातलं तुम्हाला काही अपेक्षित नसावं (नसेलच), मात्र खाली मी अडचणीत आलो आहे इ इ म्हणून लिहिल्यामुळं एकवाक्यीय व्यक्तिगत स्पष्टीकरण दिलं आहे. तसा माझ्या हिशेबानं "घटनाकारांच्या" दयेने मी ते देऊ लागत नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 10/30/2017 - 23:40 नवीन
माझेही एक विधान तुम्हांला नीट समजेल इतक्यांदा वाचा आणि मग पुढचे लिहिलेले पहा. प्रति श्री. arunjoshi123, आपलं सदस्यनाम arunjoshi, arunkamble, arundisouza, arunhabibulla, arunmombasa, arunvonrhein किंवा अन्य काहीही असते तरी मी घेतलेल्या आक्षेपाची धार यत्किंचितही बोथट झाली नसती. =============================================== तर, मूळ मुद्द्याकडे पुन्हा येऊ. मुद्दा क्र. १: 'घटनाकार' या शब्दात तुम्हांला एकाहून अधिक व्यक्ती, जे जे घटना समितीत म्हणजेच स्वतंत्र भारताची राज्यघटना बनविण्यात सामील होते असे लोक, म्हणजेच घटनासमितीचे सदस्य वगैरे अपेक्षित होते असे समजून चालूयात. असे असेल तर मग माझा आक्षेप अजूनच विस्तृत होतो. या सर्व लोकांना, ज्यात डॉ. आंबेडकरही आले, यांना 'बेसिक अक्कल' नव्हती असे तुमचे विधान बनतेय आणि तुमच्या या प्रतिसादावरून त्यावर तुम्ही ठाम आहात असे दिसतेय. त्यातही, धर्म आणि विज्ञान या परस्परविरोधी गोष्टी शेजारीशेजारी मांडण्यावर तुम्हांला सर्वात जास्त खटकण्यासारखी बाब वाटतेय, ह्याचा दोष मसुदा समितीकडे इतर समित्यांपेक्षा जास्त प्रमाणात (तुमच्या मते) जातोय. ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते, त्यांना तुमचे 'बेसिक अक्कल'रुपी गंभीर विधान जास्त लागू होतेय. तरीही सर्वसामान्य सुलभतेसाठी तुमचे विधान घटना समितीच्या सर्वच सदस्यांना सारख्याच प्रमाणात लागू होतेय असे समजून चालू. याचा अर्थ, 'घटना समितीच्या सदस्यांना बेसिक अक्कल नव्हती' असे तुमचे विधान अंतिमतः होते आहे. डू यू अॅग्री ऑर नॉट? मुद्दा क्र. २: वरील मुद्द्याला अनुसरून, तुमच्या मते भारताची सध्याची राज्यघटना 'बेसिक अक्कल' नसलेल्या लोकांनी लिहिलेली असल्याने तुम्ही तुमच्या स्वबुद्धीच्या मगदुरानुसार तुम्हांला अपेक्षित असलेल्या आणि आदर्श वाटणाऱ्या घटनेचा मसुदा इथे लिहून प्रसिद्ध कराल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
शब्दबम्बाळ Tue, 10/31/2017 - 01:39 नवीन
आता ते वाक्य वादग्रस्त आहे हे खरेच आहे. मुळात अशी विधाने जबाबदारीने वापरावीत कारण मग आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून त्यांची अक्कल "बेसिक"(कमी या अर्थाने) सिद्ध करता येईल. आता arunjoshi123 हे कोणकोणत्या उदाहरणावरून दाखवणार आहात? घटना परिपूर्णच आहे असे कोणी म्हणत नाही त्यामुळे घटनादुरुस्ती होत असतात. त्यामुळे ते लिहिणार्यांना "इतकं" तरी माहित असावं कि हे जे काही आपण तयार करतोय ते काळानुसार परिवर्तनीय आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे एस भाऊ तुम्ही किंवा आणखी कोणी आपला वेळ या एका वाक्यावर खर्च करू नये असे वाटते. कोणाला काहीही वाटते म्हणून तशा वाटण्याने घटनाकार बेसिक अकलेचे होणार नाहीत हे हि सत्यच आहे! इग्नोर मारावा... त्यांचे मत (चुकीचे का असेना) त्यांच्यापाशी! किंवा मग arunjoshi123 यांनी खरोखरच मग आदर्श घटना वगैरे लिहायला घ्यावी! :) मला जे वाटले ते लिहिले कोणाला पटावे असे नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Tue, 10/31/2017 - 09:48 नवीन
शंभरदा सांगीतलं संदर्भासहित वाचत चला. भावनाबंबाळ होऊन नका वाचू. ते वाक्य मूळ कुठे आहे तिथून सगळं पुन्हा वाचा आणि मग बोला. वादग्रस्त विधानं करायला मी काय साक्षी महाराज, संगीत सोम आहे का? ==================================
घटना परिपूर्णच आहे असे कोणी म्हणत नाही त्यामुळे घटनादुरुस्ती होत असतात. त्यामुळे ते लिहिणार्यांना "इतकं" तरी माहित असावं कि हे जे काही आपण तयार करतोय ते काळानुसार परिवर्तनीय आहे.
मला काय माहित आहे आणि काय नाही हे अगोदर विचारून घेत चला. "इतकं" तरी माहित असावं. "घटना कशी बनली" या घटनेच्या एका छोट्या उपमुद्द्यावरच मी आपणांशी २-३ तास गप्पा मारू शकतो. घटनेच्या प्रत्येक सेशनची एका चॅनेलवर संविधान नावाची सिरियल आली होती. ती मी ६०-७०% पाहिली आहे. त्याच्याशिवाय पूर्णत्व येत असा आपला आग्रह असेल तर उरलेले इपिसोडही पाहून घेतो. (विशेषणाचा मोह आवरत) काहीही गृहित धरून काहीही अर्थ काढणारे लोक नास्तिक कधीपासून झाले म्हणे? ===========================
त्यांचे मत (चुकीचे का असेना) त्यांच्यापाशी!
पण प्रांजळ चर्चा करावी ना? ३०० प्रतिसाद होणं आणि फर्नेसचं तापमान ३००० होणं वेगळं. आपण लोक लांब चर्चा शांतपणे का करू शकत नाही. रेडिटवर कितितरी गहन विषयांवर विरोधी लोक किती सखोल, प्रचंड लांब चर्चा शांतपणे करतात. आपण मराथी लोक का नाही करू शकत? थोडी खोली वाढली कि चर्चक हे कर्मठ, जहाल, विखारी आणि प्रेमाने बोलायच्या लायकीचे नसलेले आहेत असं का मानायचं? गैर अर्थ काढून गैर आरोप करण्यापेक्षा विचारून घ्यावं. "धागा असू द्या बाजूला, एरवी तुम्ही आंबेडकरांच्या बुद्धीबद्दल काय मानता?" असं विचारावं. ज्या देशात ब्राह्मणांना इतरांना अशिक्षित मानायची (कि ठेवायची?) सवय होती/आहे नि इतरांना ब्राह्मणांच्या या वर्चस्वाला धक्का देणारी एक मोठी लॉबी आहे त्या देशात "अस्तिकांनी अस्तिकपणा सोडून संवैधानिक नास्तिकताप्रणित वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा" असं (काहीही) सांगणार्‍या धाग्यात "अरुणजोशी१२३ (विशेषण १, विशेषण २, विशेषण ३, ...., ...., ..., ) या आयडीने भारतीय संविधानसभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना (विशेषण अ, विशेषण आ, विशेषण इ, ...., ...., ..., ) वादग्रस्तपणे बेअक्कल म्हटले का?" असा (पुन्हा काहीही, साधं वाचायची तसदी न घेतलेला) विषय कसा येऊ कसा शकतो याला म्हणावं?? माझी टेस्ट होत आहे का? देशात जे वातावरण आहे त्यातला मी एक क्षुद्र पार्टिझॅन आहे का एका साईडचा हे चेक करायला?
arunjoshi123 यांनी खरोखरच मग आदर्श घटना वगैरे लिहायला घ्यावी! :
मानवजातीच्या पुढच्या पिढ्या राजकारण, अर्थकारण, विज्ञान, धर्मकारण, तत्त्वज्ञान, समाजकारण, विधी, कुटुंबकारण, अध्यात्म, इ इ ची फार सुंदर पुस्तकं लिहिणार आहेत अशी मला आशा आहे. ही पुस्तकं आजच्या पुस्तकांपासून आमूलाग्र बदल असलेली असतील तर असतील पण त्यांच्यात शाश्वत अशा महान मानवी मूल्यांचा पाया तोच राहिला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Tue, 10/31/2017 - 19:58 नवीन
इतका मोठा प्रतिसाद देण्यापेक्षा माझी वाक्य नीट वाचली असतात तर बरे झाले असते. एक तर माझ्या प्रतिसादात ना आंबेडकर आहेत ना प्रतिसाद देणारा कोणी ब्राम्हण का आणि कोणी आहे याबद्दल काही आहे(आंतरजालावर कोणाची खात्री, मला तुम्ही जातीने कोण आहेत यांच्यात काही इंटरेस्ट नाही) ना तुम्हाला कुठली विशेषण वापरली आहेत ना कर्मठपणे काही कमेंट दिल्या आहेत. इतकी तणतण कशाला मग? एका वाक्यासाठी "कोणीही" आपला वेळ खर्चू नये हे लिहिलं होत. तुमचं मत तुमच्यापाशी! तुम्ही तसे बोललात म्हणून तुम्हाला अक्कल नाही वगैरे काहीही लिहिलेलं नाहीये तिथे. फक्त लिहिणार्यांना "बेसिक अक्कल" नव्हती अशी वाक्य जबाबदारीने वापरावीत हे लिहिले होते. शांतपणे वाचा!
मानवजातीच्या पुढच्या पिढ्या राजकारण, अर्थकारण, विज्ञान, धर्मकारण, तत्त्वज्ञान, समाजकारण, विधी, कुटुंबकारण, अध्यात्म, इ इ ची फार सुंदर पुस्तकं लिहिणार आहेत अशी मला आशा आहे.
यासाठी शुभेच्छा! चर्चा जरूर व्हाव्यात मनुस्मृती वरती नुकतीच चांगली चर्चा झालेली आणि अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद आले होते. जहाल्पणा कमी राहिला तर पुढचा माणूस पण विरोधी मतांवर विचार करू शकतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 11/02/2017 - 09:43 नवीन
@एस, @शब्दबंबाळ
माझ्या प्रतिसादात ना आंबेडकर आहेत ना प्रतिसाद देणारा कोणी ब्राम्हण का आणि कोणी आहे याबद्दल काही आहे.
ते मला मान्य आहेच. अगदी एस यांच्या प्रतिसादात पण असं काही नाही असं ते म्हणत आहेत. पण धाग्यावर अनेक लोकांनी अनेक लोकांच्या अनेक अस्मिता दुखावल्या असताना, नेमका मीच ज्या संविधान समितीच्या ३०० सदस्यांच्या, त्यांना नेमणारांच्या, त्यांना निवडणारांच्या, त्यांना मानणार्‍यांच्या, घटनेची जिथून कुठून आली आहे त्यांना निवडणारांच्या अस्मिताच कशा नेमक्या हायलाईट झाल्यात याचा विचार करतोय.
ना तुम्हाला कुठली विशेषण वापरली आहेत ना कर्मठपणे काही कमेंट दिल्या आहेत.
हा तुमचा उद्देश आहे याचा आत्यंतिक आनंद आहे. तुम्ही म्हणताय म्हणून मी हे सत्य मानतो.
तुम्ही तसे बोललात म्हणून तुम्हाला अक्कल नाही वगैरे काहीही लिहिलेलं नाहीये तिथे.
माहिताय हो. ------------ आपल्यात एक बेसिक बॉनहॉमी झाल्यावर तुम्ही असं म्हणू, सुचवू, सिद्ध करू शकता. मला काय प्रॉब्लेम नाही.
फक्त लिहिणार्यांना "बेसिक अक्कल" नव्हती अशी वाक्य जबाबदारीने वापरावीत हे लिहिले होते.
बेसिक अकलेचे डिपार्टमेंट यनावाला यांच्याकडे आहे. मी काही कोणाला बेसिक अक्कल नव्हती अशी माझी अक्कल पाजळलेली नाही. धार्मिक, अस्तिक, इ लोकांना बेसिल अक्कल नसते असं लेखात लिहिलं आहे. मी लिहिलेलं नाही. http://www.misalpav.com/comment/965184#comment-965184 http://www.misalpav.com/comment/965247#comment-965247 http://www.misalpav.com/comment/967472#comment-967472 असं ते डिस्कशन आहे. त्यात मी यनावालांना प्रश्न केला आहे. घटना - वैज्ञानिक दृष्टिकोन - श्रद्द्धा - अस्तिकता - नास्तिकता - समाजविधातकता - बुद्धिमत्ता - साधी अक्कल यांच्यातले सुसंगत आंतरसंबंध सांगा असा. सबब आतातरी यनावालांना जबाबदारीने लिहायला सांगा. मी बेजबादरपणे वागलो आहे असं म्हणायचा कोणालाही अधिकार आहे. पण किमान त्यानं संवाद, लेख वाचला असला पाहिजे. लेखाचं सार मान्य करणं आपल्याला कोणत्या कंक्लूजनला नेतं ते मी दुशेन यांना सांगत होतो. माझ्या लेखातली सबंध बाजू धर्म पाळणार्‍या आंबेडकरांच्या बाजूने अतिशय तीव्रतेने असताना आणि यनावाला अशा सर्व धर्म पाळणार्‍या लोकांना बेअक्कल म्हणत असताना मी आंबेडकरांना बेअक्कल म्हणतोय हा काय विचित्र (विशेषण आवरतो, नाहीतर पुन्हा बेजबाबदारपणाचा आरोप व्हायचा!) आरोप आहे? --------------------------------- आणि मी कितीदा स्पष्टीकरण दिलं आहे कि "मला" कधीही असं म्हणायचं नव्हतं. का मी चुकलो असं म्हटल्याशिवाय मी "जबाबदार" सिद्ध होणार नाही? मला जे म्हणायचं नव्हतं तेच मला म्हणायचं होतं असं मानून मी क्षमा मागावी अशी मागणी असेल तर तसं सांगा. त्यांच्यानं आपला संवाद सुरळीत चालणार असेल तर मला हरकत नाही. --------------------
इतकी तणतण कशाला मग?
तणतण नाय राव. गैरसमज करून घेऊ नका. मी एकच धाग्यावर सगळी एनर्जी घालतो. आपण दोघेही माझ्या रडारवर नाहीत, फक्त माझ्या मते सज्जन आणि त्यांचे मते संसदीयवचनी असे नास्तिक यनावाला आहेत. ============================================= यनावालांना तुम्ही काय करावं हे आपण अनुत्तरीत ठेवलंत तरी याविषयावरच्चा हा माझा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ए
एस Tue, 10/31/2017 - 12:34 नवीन
अगदी बरोबर शब्दबंबाळजी. एरवी त्यांचे प्रतिसाद मनोरंजक आणि विनोदीच असतात. पण ह्या एका वाक्यात भाषेची सभ्यपणाची पातळी घसरली आहे, हेच मला दाखवून द्यायचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
A
arunjoshi123 गुरुवार, 11/02/2017 - 08:32 नवीन
माझ्यामुळं कोणाचं तरी मनोरंजन होतं ही आनंदाची बाब. पण अख्ख्या लेखात भाषेची सभ्यपणाची पातळी (या हिशेबानं) प्रचंड हिन दर्जाची आहे हे काही मी तुम्हाला दाखवून देऊ शकलेलो नाही. तुम्ही नास्तिक असाल म्हणून कदाचित. तुमच्या श्रद्धास्थानाला देखिल याच हिशेबाने लेखातले सर्व विशेषणप्रयोग लागू आहेत हे तुमच्या गावीही नाही. मला मात्र त्याचं अतीव दु:ख आहे, हे दु:ख तुमच्याकरिता एक विनोद असला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Tue, 10/31/2017 - 09:00 नवीन
मुद्दा क्रमांक १- मला काहीही म्हणायचं नाही. यनावालांचा लेख मानला तर (मानावा का नाही आणि का हे तुम्ही सांगा. मी मानत नाही.) 'घटना समितीच्या सदस्यांना बेसिक अक्कल नव्हती' असे तुमचे विधान अंतिमतः होते. यस, आय अ‍ॅग्री. ==================================== मुद्दा क्रमांक २ - यनावालांचा लेख तुम्हाला मान्य असेल तर तुमच्या मते बेसिक अक्कल नसलेल्या लोकांनी घटना लिहिली असं होतं. म्हणून अस्तिक, धर्म, देव यांचा बंदोबस्त करणारी, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित घटना तुम्ही लिहा वा यनावालांकडून लिहून घ्या. त्यानंतर मी माझा ड्राफ्ट लिहिन धर्माधारित घटनेचा. पण जोपर्यंत अस्तिक-नास्तिकपणाचा प्रश्न आहे, असलेली घटना ओके आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Tue, 10/31/2017 - 08:49 नवीन
आपलं सदस्यनाम arunjoshi, arunkamble, arundisouza, arunhabibulla, arunmombasa, arunvonrhein किंवा अन्य काहीही असते तरी मी घेतलेल्या आक्षेपाची धार यत्किंचितही बोथट झाली नसती.
आनंदाची गोष्ट आहे.
त्यातही, धर्म आणि विज्ञान या परस्परविरोधी गोष्टी शेजारीशेजारी मांडण्यावर तुम्हांला सर्वात जास्त खटकण्यासारखी बाब वाटतेय, ह्याचा दोष मसुदा समितीकडे इतर समित्यांपेक्षा जास्त प्रमाणात (तुमच्या मते) जातोय.
धर्माला मूलभूत अधिकार असे स्वरूप देणारे मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल, उपाध्यक्ष जे बी कृपलानी आहेत. आंबेडकरांचा संबंध नाही. -------------------------------- पण एकूण घोळात ते सहभागी आहेत, धर्मविरोधी आहेत, विज्ञान एकं विज्ञान एकं विज्ञानवादी आहेत म्हणावं तर ते हिंदूचे बुद्ध झाले १९५६ मधे. म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यांना धर्म हि संकल्पना मान्य होती. सबब पटेल, कृपलानी नि आंबेडकर यांच्यात धर्माविषयी काही विशेष विसंगती नव्हती, दुमत नव्हते. घोळ फक्त यनावालांसारख्या नास्तिकांचा होत आहे. हा घोळ सोडवा नैतर अस्तिकांना सुखानं जगू द्या, बुद्धीहिन म्हणू नका असं मी मूळ विधानात लिहिलं आहे. अस्तिक चूक, नास्तिक बरोबर आणि घटनाकार बरोबर का तर मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा आहेत??? नास्तिकांनी मनोविज्ञानाचा हवाला देऊन विसंगतीतून पळवाट काढली म्हणून त्यांना धर्म मान्य करणार्‍या घटनाकारांना मूर्ख म्हणा नाहीतर नीट स्पष्टिकरण द्या अशी भूमिका पुनश्च पेस्टवत आहे.
घटनाकारांना मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा माहिती होत्या दोन परस्परविरोधी विधाने एकाच पुस्तकात, शेजारी शेजारी, ती ही प्रत्यक्ष राबवायचे कायदे म्हणून लिहिणारांना बेसिक अक्कल नव्हती हे सुस्पष्ट आहे. ------------------ मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा म्हणून असल्या विसंगती मान्य केल्या तर सगळी अनागोंदी माजेल. तुम्ही शासन एकतर विज्ञानानं चालवा नैतर धर्मानं. विज्ञानानं चालवलं तर धर्म केवळ एक मूर्ख कल्पना मानून घटनेतल्या अन्य तत्त्वांसाठी कसेही पायदळी तुडवा. धर्म मानला तर विज्ञानाची जी काही अंतिम सत्ये धर्माच्या अंतिम सत्यांच्या आड येतात त्यांना कायद्याने अमान्य करा. धर्म आणि विज्ञान यांत कशाला प्राधान्य आहे हे माहित नसेल तर माहित करून घ्या. जे काही आहे ते सुसुत्र, संपूर्ण, कंपॅटिबल बनवा. घटनेत काही तसं लिहिलं नसताना यनावाला सारख्यांनी घटनेचा हवाला देऊन विज्ञानप्रसाराच्या नावाखाली धर्महनन करू नये.
हे माझं मूळ लिखाण पुन्हा लिहित आहे. -------------------------------------- व्यक्तिशः यनावाला नि घटनाकारांनी पाडलेल्या या घोळात तुम्हाला रस दिसत नाही. नविन घटना लिहिण्यात मला रस नाही. मी लिहिली असती तरी धर्माला निसंदिग्ध प्राधान्य स्थान दिलं असतं. पण तरी १९४७ मधे जे होतं ते मला आजच्या पेक्षा स्वीकार्य आहे. http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/1936/8/08_chapter%203.pdf
Constitutionally, India is a secular country and has no State religion. However, it has developed over the years its own unique concept of secularism that is fundamentally different from the parallel American concept of secularism requiring complete separation of church and state, as also from the French ideal of lacite - described as 'an essential compromise whereby religion is relegated entirely to the private sphere and has no place in public life whatsoever'. Despite the clear incorporation of all the basic principles of secularism into various provisions of the Constitution when originally enacted, its preamble did not then include the word 'secular' in the short description of the country which it called a 'Sovereign Democratic Republic’. This was not an inadvertent omission but a well-calculated decision meant to avoid any misgiving that India was to adopt any of the western notions of a secular state.
======================================================== मी कोणालाच बेअक्कल वा दुष्ट म्हटलेलं नाही. (मात्र "काही" बेअक्कल विज्ञानवादी नास्तिक कमालीचे अधम होते असं माझं मत आहे पण त्यात मी, तुम्ही, यनावाला, घटनाकार, आंबेडकर, पटेल, नेहरू, कृपलानी, इतर प्रतिसादक, इ इ कोणी नाही. आंबेडकर अस्तिक होते म्हणून मला आवडतात. त्यांनी सुसुत्र, सुसंगत घटना लिहिली आहे म्हणून त्यांना बेअक्कल म्हणायचा प्रश्न येत नाही.). हिंदू आणि बुद्ध हे दोन धर्म मानणार्‍या आंबेडकरांना यनावालांनी खालील विशेषणे वापरली आहेत - हास्यास्पद, असत्यवादी, श्रद्धाळू, बुद्धीहीन, तर्कहिन, कॉमनसेन्स नसलेले, विचारशक्ती बधिर असलेले, बुद्धाला अतींद्रीय शक्ती आहे असे मानणारे, मेंदू कुंठीत झालेले, बुद्ध भिक्षूंकडून धूळफेक करून घेतेलेले, फसवले गेलेले, बनवले गेलेले, सुबुद्ध नसलेले, तर्कबुद्धी नसलेले, वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले स्वत:ची बुद्धी न वापरणारे,अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर न करणारे, शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता मानणारे, स्वबुद्धीचा न वापरणारे, माणुसपणाचा खरा सन्मान न करणारे. मी विचारतोय असं कसं? तुम्हाला आंबेडकरांचा एवढा पुळका असेल तर तुम्ही देखील यनावालांना विचारायला पाहिजे कि धर्म पाळणार्‍या आंबेडकरांना असले शब्द कसे काय वापरू शकता? मी यनावालांना विचारलेला प्रश्न (उगाच आंबेडकरांना मधे घुसवून) वादग्रस्त आहे आणि यनावालांनी धर्म पाळणार्‍या आंबेडकरांवर थेट घाणेरडे आरोप केले तिथे गप्प बसता. असो, धारदार पातं एक विशिष्ट दिशा सोडून बोथटच असतं.
  • Log in or register to post comments
य
यनावाला गुरुवार, 11/02/2017 - 09:03 नवीन
भारताचे संविधान" :-संपादक/प्रकाशक प्रदीप गायकवाड , नागपूर [9890105900] या ग्रंथाची प्रत (२३वी आवृत्ती २०१४, मूल्य २००/रु.) मजजवळ आहे. या प्रतीत पृ.१४२ वर "मूलभूत कर्तव्ये" , ५१(क) मध्ये पुढील विधान आहे:--- (ज) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे , हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. .....यनावाला
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/02/2017 - 09:40 नवीन
"लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण" असे तुमचे वर्तन आहे. आधी स्वतःच्या जीवनातील अंधश्रद्धा दूर करून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करा आणि नंतरच इतरांना शहाजोगपणे सल्ले द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/02/2017 - 15:13 नवीन
श्रीगुरुजी हे बहुतेक तुम्ही चिडल्यामुळे म्हणत आहात. सुधारकांना अशा टीकांना सामोरे जावे लागतेच. सुप्रसिद्ध शब्दकोडीकार प्रा.य.ना.वालावालकर. अनेक श्रद्धांध व श्रद्धाळू लोकांना विचार करायला प्रवृत्त करणारे लेखन ते करतात.मते मान्य नसू द्यात पण विचार तर करायला लावतात की नाही? http://mr.upakram.org/user/78/track इथे त्यांचे लेखन वाचता येईल लोका सांगे..... असे ते नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/02/2017 - 19:08 नवीन
सुधारकांना अशा टीकांना सामोरे जावे लागतेच. सुप्रसिद्ध शब्दकोडीकार प्रा.य.ना.वालावालकर. अनेक श्रद्धांध व श्रद्धाळू लोकांना विचार करायला प्रवृत्त करणारे लेखन ते करतात.मते मान्य नसू द्यात पण विचार तर करायला लावतात की नाही? ते सुधारक नसून सुधारक असल्याचा फक्त आव आणणारे व आस्तिकांना निर्बुद्ध समजणारे आहेत. इथे अनेकांनी विचारलेल्या एकाही प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही. ते स्वतःला वैज्ञानिक विचारसरणीचे समजत असले तरी इतरांप्रमाणे ते सुद्धा सर्व गोष्टींवर अंधविश्वास ठेवतात, फरंतु आव बरोबर उलटा आणतात. त्यांचे लेखन म्हणजे फक्त स्वत:ची लाल करणे आहे. विचार करायला प्रवृत्त करणारे असे ते लेखन नाही. मते मान्य नसू द्यात पण विचार तर करायला लावतात की नाही? छे. काहीतरीच काय. लोका सांगे..... असे ते नाहीत. लोका सांगे असेच ते आहे. दुसरे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 गुरुवार, 11/02/2017 - 09:54 नवीन
इथे अस्तिक एकाही व्यक्तिला १. तुमच्याकडे संविधान नाही. २. त्यात पान १४२ नाही ३. त्यात मूलभूत कर्तव्ये नाहीत. ४. त्यात ५१ वे क्लॉज नाही, सी हे सबक्लॉज नाही, ज हा आयटम नाही ५. त्यात वरील विधान नाही ६. हे विधान घटनेत असले तरी पाळू नये इ इ म्हणायचे नाही. ===================== देव, धर्म, श्रद्धा, इ संकल्पना घटनाबाह्य, समाजविघातक, निर्बुद्ध, गुन्हेगारी, अमानवी, प्रतिगामी, शोध बुजवणार्‍या असताना घटनेत ते सर्व पाळायचं स्वातंत्र्य का आहे असा स्न्मान्य, संसदीय भाषेतला, आपणांस सज्जन मानून, कदाचित आपणांस जसे समाजाचे हित साधायचे तसेच आपले हित आम्हाला साधायचे आहे या भावनेतून, उत्तर द्याच अशी अपेक्षा न ठेवता केला आहे. ============================ तुमचं ऐकायला जावं तर आमचे घटनाकार तुमच्याच लॉजिकने बेअक्कल ठरतात, असं कोड्यात आम्हाला पाडू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/02/2017 - 10:03 नवीन
भलत्याच अपेक्षा तुमच्या. ते उत्तर वगैरे देणार नाहीत. आस्तिकांची अक्कल काढणे, माझीच कशी लाल असे मिरविणे एवढेच त्यांना येते (कारण ते बुद्धीप्रामाण्यवादी आहेत). अजून एक पिंक टाकून ते पळाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 11/02/2017 - 10:19 नवीन
१. अस्तिक लोकांनी, घटनेत अपमार्गाने आणीबाणित "वैज्ञानिक दृष्तीकोनाचे पालन" अनिवार्य केले गेले असले तरी, कधी हू कि चू केले नाही. त्याविरुद्ध मोर्चा काढला नाही. २. जेव्हा घटनेत "वैज्ञानिक दृष्टिकोन" बिनडोकपद्धतीने शब्द घुसडला गेला तेव्हा जो माणूस जिवंत पण नव्हता त्याच माणसाला मला बेअक्कल म्हणायचं आहे असं मानणारे "जब्बाबदार" नास्तिक देखील जगात आहेत. आपल्याला काय सांगायचं असतं आणि लोकांना काय पडलेलं असतं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 गुरुवार, 11/02/2017 - 10:22 नवीन
एवढेच त्यांना येते
एवढेतरी त्यांना आले असते तर संतोष असता. ==================== नास्तिक म्हणवून घेतलं कि काही न यायची खालची पातळी कितीही खाली असली तर चालते हे चित्र काही योग्य नाही. कधी काळी नास्तिक म्हणजे लोक घाबरून असत त्यांच्या बुद्धीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/02/2017 - 10:41 नवीन
इथे सुद्धा त्यांची अंधश्रद्धा व अवैज्ञानिक वर्तन दिसते. आपल्या कडे असलेले पुस्तक हे घटनेच्या मूळ प्रतीचीच कॉपी आहे किंवा त्यात मुद्रणदोष नाही या अंधविश्वासावरच ते इतरांना वैज्ञानिक होण्याचे शहाजोग सल्ले देत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 11/02/2017 - 14:20 नवीन
ते असोच. ब्राह्मणानं मंत्र कोणत्या ग्रथांत कोणत्या अध्यायात आहे कोणत्या ओवीत हे सांगणं आणि यनावालांनी असं सांगणं यात काही फरक नाही. ============================ यनावाला असोत, माझं लेखन बर्‍याच आत्मघोषित नास्तिकांसाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रविकिरण फडके गुरुवार, 11/02/2017 - 19:11 नवीन
लेख आणि त्यावरच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया वाचल्या. प्रतिसाद देताना थोडे थोडे असे करीत चर्चा मूळ मुद्द्यापासून बरीच दूर जाते तसे इथेही झाले आहे हे साहजिकच. माझा हा प्रतिसाद फक्त मूळ लेखावरच आहे. त्यात उपस्थित केलेला प्रश्न (मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. मलाही पडायचा, पडतो. (आणखी असेच इतर काही प्रश्नही, म्हणजे भूत असते का, अतींद्रिय शक्ती अशी काही असते का, दुसऱ्याच्या मनातील विचार वाचणे शक्य असते का, इ. इ.) माझ्यापुरता हा प्रश्न मी सोडवला, त्याला निमित्त झाले Arthur Koestler लिखित Roots of Coincidence हे अनेक वर्षांपूर्वी वाचनात आलेले पुस्तक. आता मी 'do not rule out any possibility; do not accept anything without evidence', हे तत्व पाळतो/ पाळायचा प्रयत्न करतो. ह्याशिवाय, निखळ सत्य असे बऱ्याचदा काही नसते (अगदी लहानसहान गोष्टीतही), हाही धडा इतक्या वर्षात शिकलो. आपण आपल्या कुवतीप्रमाणे, जमेल तसे, आपल्याला रस असेल त्या विषयात, जाणून घायचा प्रयत्न करायचा (आणि थोडेसे कळल्यानंतर आपल्याला किती कमी समजले आहे ह्याची खंत वाटून घ्यायची!) इतकेच मी करतो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 11/03/2017 - 05:18 नवीन
निखळ सत्य याचा अर्थ मी त्रिकालाबाधित सत्य असा घेतो. आणि त्रिकालाबाधित असे सत्य काही नसते असे मीही मानतो. एखाद्या गोष्टीला पुरावा नाही म्हणजे ती गोष्टच अस्तित्वात नाही असे जरी नसले तरी आजमितीस ती गोश्ट विज्ञानमान्य नाही असे म्हणता येते. आणि विज्ञानमान्य नसले तरी अनेक गोष्टी तुमच्या जीवनात महत्वाचा रोल करतात. पहा या ज्योतिषाच काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
D
Duishen Sat, 11/04/2017 - 03:31 नवीन
हिंदू आणि बुद्ध हे दोन धर्म मानणार्‍या आंबेडकरांना... १९९० च्या दशकात श्री. प्रमोद महाजन यांची मुलाखत माझ्यासाठी एका वेगळ्याच विचारांना खतपाणी देऊन गेली. त्यांनी मुलाखतीत "रिलीजन म्हणजे धर्म नव्हे; या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत' असे विधान केले. त्यावयात हे विधान समजण्यासारखे नव्हतेच. पण विचारांची खलबते आणि शोध चालू झाला. तोच शोध "रिलीजन म्हणजे धर्म नव्हे आणि धर्म म्हणजे धम्म नव्हे" या मुद्यापर्यंत येऊन पोहोचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मात जन्माला आले, हिंदू धर्म जाणत होते पण हिंदू धर्म मानत होते का किंवा पाळत होते का यासाठी काही मुलभूत वाचन करून ज्यांना ज्यांना शंका असेल त्यांनी अभ्यासातून स्व-मत तयार करावे. 'दोन्ही धर्म मानणारे' हे काही अभ्यासू मत नव्हे! त्यांनी धर्म नाकारून धम्म स्वीकारला. डॉ. आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तीसाठी धर्म बदल म्हणजे पूजेसाठी आवश्यक असणारी मूर्ती बदल इतका तर नक्कीच नसावा पेक्षा बाह्यस्वरूपापेक्षा वैचारिकदृष्ट्या त्यांना बुद्धिझम गाभ्यातून वेगळा असणार याची खात्री असणार! तो ही असा धम्म जो नास्तिकवादी असल्याचे गणल्या जाते. शिवाय माझ्या अल्प वाचनात गौतम बुद्धाने 'ईश्वर आहे का?' या प्रश्नाचे हो असे उत्तर दिले नाही किंवा नाही असेही उत्तर दिले नाही.त्यामुळे कदाचित बुद्धिझम नास्तिकवादी असण्यात गणल्या जातो! आता प्रश्न आहे तो बुद्धांना भगवान शब्द का वापरल्या जातो... सध्याच्या प्रचलित मान्यतेनुसार देव, ईश्वर आणि भगवान या संकल्पना समानार्थी घेतल्या जातात पण देव/ईश्वर आणि भगवान या दोन्ही संकल्पना मुळातून वेगळ्या आहेत... ;आस्तिकता म्हणजे देवावर विश्वास असणारी' अशीच व्याख्या करावयाची असल्यास डॉ. आंबेडकर आस्तिक होते का हे अधिक सुज्ञ अभ्यासक सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा