ताज्या घडामोडी - भाग २५
लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
💬 प्रतिसाद
(265)
M
manguu@mail.com
Sun, 03/11/2018 - 00:55
नवीन
निवडणुकीआधी डरकाळ्या फोडणारे वाघ गादी मिळाली की मांजर होतात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 03/11/2018 - 07:26
नवीन
सत्ता मिळवताना आणि नंतर ती चालवताना दोन्ही वेळी प्रॅक्टीकलही असावे लागते
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 03/11/2018 - 09:40
नवीन
ट्रंपूबाबांनी अशी कोणती निवडणूक लढवली की जिच्यानंतर ते एकदम म्यावम्याव झाले? उद्धव ठाकरे हे भारतीय राजकारणांत आहेत तर पुतीन, ट्रंप व किम हे आंतरराष्ट्रीय राजकारणातले भिडू आहेत.
-गा.पै.
- Log in or register to post comments
आ
आलमगिर
Mon, 03/12/2018 - 06:04
नवीन
बहुदा ट्रंपपण खिशात राजिनामे घेऊन हिंडतात.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/13/2018 - 12:44
नवीन
हत्यारे, तानाशाही कम्यूनिस्ट होण्यापेक्षा बरं
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 03/11/2018 - 07:36
नवीन
शब्द वाचून अणूरेणू शहारला
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 03/11/2018 - 08:51
नवीन
अच्छे दिन' वास्तवात नसतात, मानण्यावर असतात: गडकरी
- Log in or register to post comments
श
शलभ
Sun, 03/11/2018 - 14:55
नवीन
मला तर ठीक वाटलं गडकरींच बोलणं. जे आहे त्यात समाधानी कुणीच नसतं.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sun, 03/11/2018 - 16:18
नवीन
वरीलप्रमाणे, या बातम्या नकारात्मक प्रचारासाठी वापरणाऱ्यांसाठीच तर गडकरीचं वक्तव्य आहे. चुकलंच भाजपचं, आधी नीट लिहून घ्यायचं ना अंधविरोधकांकडून कि नक्की काय मिळालं की अच्छे दिन म्हणणार.
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Sun, 03/11/2018 - 18:09
नवीन
पण एकंदरीत गडकरींचे बोलणे वावदूक असते असा माझा समज आहे.
कारणे?
आज (११ मार्च २०१८) ची बातमी आहे ती अशी: गडकरींनी (डोंबिवलीत बोलताना) म्हटले की डोंबिवली हे सर्वात जास्त घाणेरडे शहर आहे, आणि ते सुधारावयाचे असेल तर तेथील नागरिकांनी महापौर किंवा पालिकेकडे धरणे धरले पाहिजे! ते असेही म्हणाले की सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या स्वार्थासाठी शहराकडे दुर्लक्ष करतात म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे! अरे व्वा! ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आम्ही आमची कामे करणार नाही, पैसे खाणार, आणि लोकांनी आपले कामधंदे सोडून धरणे धरावयाचे, आम्ही कामे करावीत म्हणून!
ह्या महाशयांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत असे म्हटले की, भारतात खूप मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात व त्यात माणसे दगावतात. ते पुढे म्हणाले की चालक दुचाकी चालविताना हेल्मेट घालीत नाहीत त्यामुळे अपघात होतात. क्या बात है; किती सोपा उपाय आहे ना रस्ते अपघातातील बळींची संख्या कमी करण्याचा?
नेव्हीतील अधिकार्यांबद्दल ह्यांनी असेच गैरलागू उद्गार मुंबईत काही दिवसांपूर्वी काढले. खरे तर, आपल्या राजकारण्यांना नको तिथे, संबंध नसता, पिचकाऱ्या टाकण्याची सवय आहे. गडकरी त्यास अपवाद नाहीत.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sun, 03/11/2018 - 19:11
नवीन
काहीच्या काही, स्वतःच्या पक्षाचे प्रतिनिधी असतानाही त्याची तमा न बाळगता गडकरी त्यांचे कान टोचत होते हे उलट कौतुकास्पद आहे असे मला वाटते. स्वतःच्या 50 वर्षाच्या हुकलेल्या गोष्टींचे गोडवे गाणाऱ्यांपेक्षा हे बरे आहे.
---------------------------------
हेल्मेटबाबतीत पण तेच! विरोधाला विरोध म्हणून काहीही. काय चुकीचे आहे त्यांच्या वक्तव्यात? भारतात होणारे अपघात हे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे होतात या भ्रमात मी तरी नाही.
----------------------------------
नेव्हीचे प्रकरण जाणून घ्या. त्यांच्या खात्याच्या दृष्टीकोनातुन ते योग्यच बोलले.
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Mon, 03/12/2018 - 02:48
नवीन
पण कुठेही जबाबदारीने बोलायला हवे. किती टक्के मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे होतात? हेल्मेट (न घालणे) हे रस्ते अपघाती मृत्यूचे क्रमांक एकचे कारण आहे काय? आणि मुदलात, हेल्मेट न घालून अपघात टळत नाही; फक्त संभाव्य मृत्यू टळतो. तुम्हाला अपघात कमी करावयाचे आहेत, की अपघात झाले तरी चालतील पण माणसे मरता काम नयेत असे तुमचे म्हणणे आहे?
तीच गोष्ट डोंबिवलीतील भाषणाची. जर KDMC चे कर्मचारी कामे करीत नसतील, ते आणि लोकप्रतिनिधी मिळून जनतेला लुबाडीत असतील, तर तुमच्या monitoring systems काय करताहेत? लोकांनी दबाव टाकायचा म्हणजे काय करावयाचे? गडकरी प्रामाणिक आहेत हे मान्य केले तरी, त्यांची systems या विषयाची एकूण समज कमी आहे असेच त्यांचे बोलणे असते. कारण, कोणत्याही सिस्टिममध्ये leadership महत्वाची असते. त्या सिस्टिमच्या आत काम करणारे घटक त्यांची कितीही इच्छा असली तरी काहीही बदल घडवून आणू शकत नाहीत हे सत्य त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही - जसे ते अनेक इतरांपर्यंत पोहोचलेले नाही.
म्हणून वावदूक म्हटले.System Thinking या विषयावर स्वत्रंतपणे लिहिणार आहे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 03/12/2018 - 02:52
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 03/12/2018 - 05:57
नवीन
तुम्ही त्यांचे अपघातावरचे भाषण पूर्ण ऐकले होते का? नसावे असे मला वाटते, खालील लिंकवर पाहू/ऐकू शकता. ते स्वतःचे मत सांगत नसून आकडे सांगत आहेत. माझ्या अतिसामान्य आकलनशक्तीला त्यांचा मतितार्थ - हेल्मेट न घालण्यामुळे अपघात नाही तर मृत्यू होतात - लक्षात आला. टिकाच करायची असेल तर - शुभेच्छा!
https://youtu.be/pJcxMGwLMCQ
======================
सिस्टमची पूर्ण जाण असल्यामुळेच त्यांनी डोंबिवलीतील वक्तव्य केले आहे असे माझे मत आहे. जर अधिकारी सजग असते लीडर चांगले असते तर शहरे अशी बकाल झाली नसती. नागरिक सजग असतील तर सिस्टिमवर दबाव असेल नाहीतर गेली अनेक वर्षे काय चालले आहे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचे डोंबिवली बद्दलचे पूर्ण भाषण ऐकण्याचीही विनंती!
======================
कर्मचारी अधिकारी वर्ग हा समान्य जनतेतच मोडतो असे मला वाटते.
======================
माध्यमांनी त्यांचा २४X७ वेळ काढण्यासाठी संदर्भविराहित काढलेले एक वाक्य ऐकून मते बनवण्यात काहीच अर्थ नाही, त्यामुळे असे काही चालू असेल तर मी संपूर्ण भाषण ऐकतो. मग ते कोणाचेही असो.
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Mon, 03/12/2018 - 08:41
नवीन
धन्यवाद, तुम्ही दिलेल्या लिंकवरील भाषण ऐकले. आपणही पुन्हा एकदा नीट ऐकावे ही विनंती.
गडकरी म्हणतात (१:०८ मिनिटे), "मॅडम, करीबन ६८% ऍक्सिडंट्स जो होते है वो हेल्मेट न पेहननेके कारण बाईकपर से होते है". ते लगेच पुढे असेही म्हणतात की हेल्मेटके बारेमे जैसा हमने कहा, हम लगातार उसके लिये प्रचार कर रहे है.
(हिंदी लिहिताना झालेल्या चुका कृपया माफ कराव्यात.)
म्हणजेच, हे माध्यमांनी संदर्भविरहित काढलेले एक वाक्य नाही. आता, हेल्मेट न घातल्यामुळे अपघात कसे होतात मी समजलो नाही.
बाकी, डोंबिवलीबद्दल बोलायचे झाले तर, KDMC मधील २७ गांवे का वगळली, नंतर ती पुन्हा कशासाठी अंतर्भूत केली गेली, आणि ह्या मधल्या काळात तेथे काय झाले, हे सर्वज्ञात आहे. त्यात (जागरूक वगैरे) नागरिक काय करू शकले असते हे तुम्हीच सांगावे.
त्यांच्या वक्तव्यानंतर आता जो शिमगा सुरु झाला आहे - आजच्या वर्तमानपत्रातील शिवसेनेच्या प्रतिक्रिया वाचाव्यात - तीच फलश्रुती त्यांना अभिप्रेत होती का? प्रॉब्लेम हा आहे की सगळ्यांनाच फक्त brownie point स्कोअर करण्यात रस आहे.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 03/12/2018 - 08:52
नवीन
गडकरी अपघातांची नाही तर मृत्यूंची आकडेवारी सांगत आहेत हा मुद्दा लक्षात घ्यावा एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो.
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Mon, 03/12/2018 - 09:31
नवीन
विडिओमधील वाक्य मी चुकीचे कोट केले आहे, की वाक्य बरोबर आहे पण मी त्याचा अर्थ चुकीचा लावला आहे, ते कृपया सांगावे.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 03/12/2018 - 10:20
नवीन
१. विडिओमधील वाक्य तुम्ही बरोबर कोट केले आहे.
२. गडकरी मृत्यूंचीआकडेवारी सांगत आहेत त्यामुळे त्यातील ६८% मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे हे संयुक्तिक आहे, ६८% अपघात नाही. गडकरी अनावधानाने अपघात म्हणून गेले असे माझे मत आहे. यातून तुम्हाला काय अर्थ काढायचा आहे तो तुम्ही काढू शकता.
३. हेल्मेट घातल्याने अपघात थांबतील असं गडकरी म्हणतील किंवा त्यांना म्हणायचे असेल हे अजिबात पटत नाही. अपघात झाला आणि हेल्मेट नसेल तर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असा सरळ सरळ अर्थ मलातरी लागतो.
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Mon, 03/12/2018 - 13:17
नवीन
"गडकरी अनावधानाने अपघात म्हणून गेले..."
प्रत्येक बाईकच्या अपघातात काही बाईकस्वार मृत्युमुखी पडत नाही. मला अनेक अपघात माहीत आहेत - आणि तुम्हालाही माहीत असतील - ज्यात स्वाराला गंभीर दुखापत झाली, हाडे मोडली, पण तो जीवानिशी बचावला. असे मानले की बाईकच्या दोन अपघातात एक मृत्यू होतो तर बाईकच्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या १३६ टक्के भरते असा तुमच्या अर्थाचा अनर्थ होतो. अपघात व मृत्यूंचे प्रमाण गडकरींनी दिल्याप्रमाणे साधारण ४:१ असे पडते. म्हणजे बाईकचे अपघात एकूण अपघातांच्या ३००% होतात.
ह्यालाच मी 'वावदूकपणे' (म्हणजे बेजबाबदारीने) बोलणे म्हटले होते.
मजा अशी की लोकसभेतही कुणी फारसे गाम्भीर्यने घेत नाही कुणाचेच भाषण. त्यामुळे सगळे चालून जाते. असो!
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 03/12/2018 - 17:58
नवीन
तुम्ही गडकरींच्या आकड्यांचा अर्थ लावण्याआधी त्यांचे आकडे इथे टाकाल का? मीही आकडे कुठून मिळाले तर टाकतो. उगाच वांझोटी चर्चा नको.
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Mon, 03/12/2018 - 18:09
नवीन
गडकरींच्याच भाषणात त्यानी दिले आहेत.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/13/2018 - 12:46
नवीन
आपला टोटल पास.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/13/2018 - 12:50
नवीन
मुंबई पुणे एक्सप्रेसवेची "सिस्टिम पद्द्धत" आणि "गडकरी पद्धत" कधी वाचलीय का?
=========
हे मान्य केले तरी मंजे काय?
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Tue, 03/13/2018 - 18:23
नवीन
"मुंबई पुणे एक्सप्रेसवेची "सिस्टिम पद्द्धत" आणि "गडकरी पद्धत" कधी वाचलीय का?"
माफ करा, मी नाही वाचलेली. कृपया संदर्भ दिलेत तर अवश्य वाचीन.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 03/11/2018 - 15:58
नवीन
नाशिकमधून मंगळवारी ६ मार्च निघालेला किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. मोर्चात शेतकऱ्यांची असलेली संख्या वाढत असल्याचा दावा मोर्चेकरी करत असून मोर्चाला भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. हा लाँग मार्च सोमय्या मैदानात रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मोर्चा सोमय्या मैदानातच अडवण्याचे प्रयत्न सरकारकडून होणार असून परिस्थितीचा अंदाज घेत हा मोर्चा आझाद मैदानाकडे जाण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दक्षिण मुंबईत हा मोर्चा आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मोर्चेकरी विधान भवनाकडे जाणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पोलीस यंत्रणांनी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. आज शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाहूरजवळ आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी किसान सभेच्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली. चर्चेत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याच बरोबर किसान सभेच्या शिष्टमंडळाला सोमवारी चर्चेचे निमंत्रण दिले. तर, दुसरीकडे चर्चा आणि मोर्चा सुरू राहणार असल्याचे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले. सरकारने चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे स्वागत असून मागण्या मान्य होईपर्यंत विधानसभेला घेराव घालणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Sun, 03/11/2018 - 17:25
नवीन
विद्यमान सरकारला महागात पडू शकते. मी सरकारचा हितचिंतक नाही, पण जे आहेत त्यांच्या माहितीसाठी हा प्रतिसाद.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/11/2018 - 18:00
नवीन
शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत. मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा फडणवीस बळाचा अजिबात वापर न करता चातुर्याने आंदोलन थंड करतील.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 07:12
नवीन
<<<शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>>
==>> अगदी सहमत. काही मिळणार नाही. गाजरच दाखवले जाईल.
<<<मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा फडणवीस बळाचा अजिबात वापर न करता चातुर्याने आंदोलन थंड करतील.>>>
==>> ह्यात चातुर्य वगैरे काही दिसत नाही. मागील जे काय मोर्चे (मराठा मोर्च्यापासून सुरु झालेले) होते हे अहिंसक, शिस्तबद्ध, सामान्यांना कमीत कमी त्रासदायक ठरतील असे झाले आहेत. प्रत्येक वेळेस फडणवीसांनी तकलादू आश्वासने देऊन वेळ मारून नेली आहे. पुढे त्याचे काहीच झाले नाही, तो भाग सोडून द्या.
फक्त एक काळजी वाटते जर असे मोर्चे हिंसक प्रकारावर उतरले तर फडणवीसांची कसोटी लागेल. याची चुणूक कोरेगाव भीमा मध्ये पाहायला मिळाली आहे. यामध्ये सुद्धा दोन्ही समाजांनी समजूतदारपणा दाखवला म्हणून २-३ दिवसात सगळे आटोक्यात आले. राज्य सरकारचे यात कोणतेच कर्तृत्व नाही.
संभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांची मध्यस्ती निर्णायक ठरली होती, हे तुम्ही नाही मानले तरी वस्तुस्थिती आहे.
बाय द वे चातुर्य दाखवणे म्हणजे गाजरच दाखवणार ना. खालील बातमी मध्ये धावपळ कशी चालू आहे स्पष्ट दिसत आहे. "अभ्यासाचं" कारण देऊन वेळ नक्की मारून नेतील, यात काय वादच नाही.
https://www.loksatta.com/mumbai-news/akhil-bhartiya-kisan-morcha-long-march-live-farmers-march-reach-mumbai-azad-maidan-for-debt-waiver-and-various-demands-1643853/
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/12/2018 - 09:10
नवीन
सातत्याने अव्यवहारी मागण्या होत राहिल्या तर यमजूत काढावीच लागते.
>>> संभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांची मध्यस्ती निर्णायक ठरली होती, हे तुम्ही नाही मानले तरी वस्तुस्थिती आहे.
LLRC
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/12/2018 - 09:11
नवीन
समजूत
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 15:42
नवीन
<<<सातत्याने अव्यवहारी मागण्या होत राहिल्या तर यमजूत काढावीच लागते.>>>
==>> अव्यवहारी जुमल्यांसारख्या का ??
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/12/2018 - 16:53
नवीन
अव्यवहारी जुमले?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 18:02
नवीन
अडचणीचा प्रश्न विचारला की लगेच स्मृतिभ्रंश होतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/12/2018 - 18:10
नवीन
आमची कसलीही अडचण नाही व आम्हाला स्मृतिभ्रंश झालेला नाही. अव्यावहारिक जुमले हे शब्द ऐकिवात नसल्याने विचारलंय. माहिती नसेल तर तसं सांगा.
- Log in or register to post comments
क
कुंदन
Mon, 03/12/2018 - 20:14
नवीन
https://en.wikipedia.org/wiki/1994_Gowari_stampede
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 03/12/2018 - 21:10
नवीन
114 मृत्यू ??
शरद पवारांच्या कारकिर्द मधल्या बऱ्याच डागांपैकी हा खूप मोठा आहे. लिंक बद्दल धन्यवाद ! हे पूर्वी वाचले नव्हते.
कोणी ऑफिशियल येऊन मोर्चाच्या मागण्या ऐकून घेणे आणि आश्वासन देणे ही एक साधी कृती असते. ज्यातून असंतोषाची दखल घेतली आहे हा मेसेज जातो.
एवढी अक्कल पवारांना नव्हती की मुद्दाम दुर्लक्ष केले ??
हा कसला डोंबलचा जाणता राजा आणि महाराष्ट्राचा नेता
- Log in or register to post comments
श
शलभ
Tue, 03/13/2018 - 06:14
नवीन
पवारांनी नंतर मुंबईत येऊन जे statement दिलं, ते तर अजून असंवेदनशील होतं. "मोर्चेकर्यांना अनुभव नाही. त्यांनी मुले महिला व वृद्धांना आघाडीवर ठेवण्याची चुक केली म्हणून इतके बळी गेले".
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 03/13/2018 - 06:20
नवीन
आणि तरीही हा माणूस पुरोगामी, शेतकर्यांचा तारणहार, जाणता राजा..!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/13/2018 - 12:52
नवीन
तुम्हाला कोणता तरी नेता आवडतो का?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 03/13/2018 - 14:14
नवीन
कोणिही नेता आवडत नाही . व्यक्तीपूजक नाही. चांगले काम केले तर चांगले म्हणायचे नैतर हाणायचे
- Log in or register to post comments
आ
आलमगिर
Mon, 03/12/2018 - 06:10
नवीन
आजकाल सगंळ फुक्ट मागण्याची पद्धत आल्ये. मूळात कर्जमाफी ही करदात्यांच्या जिवावर झाली. आमच्याकडून पैसे उकळायचे आणी व्यर्थ द्यायचे हेच चालले आहे.
बर कर्जाचे पैसे शेतकरी कुठे वापरतो ते तपासायला याःचा विरोध. अन्नदाता वगैरे म्हणून डोक्यावर बसवणे नकौ.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 07:15
नवीन
आलमगीर साहेब तुम्ही वार्षिक टॅक्स किती भरता, कृपया सांगू शकाल का ?
म्हणजे माझे म्हणणे मी मांडतो.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 03/12/2018 - 11:10
नवीन
मी 5 लाख भरतो. तुम्ही तुमचं म्हणणं मांडा.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 15:40
नवीन
हे आलमगीर यांच्यासाठी होते. कृपया तुम्ही लोड घेऊ नका.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 07:47
नवीन
ऑ 'तेरी .. तुम्ही 'सकाळ'वरील स्मिता पटवर्धनचे फॅन आहात तर. तरीच म्हंटले कुठं तरी वाचल्या होत्या या ओळी.
चालू द्या चालू द्या...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/11/2018 - 17:55
नवीन
खांग्रेसचे स्वयंघोषित भक्त कुमार केतकर यांना अखेर आपल्या अनेक दशकांच्या गांधी घराण्याच्या निस्वार्थ सेवेचं फळ मिळालं आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 03/11/2018 - 19:53
नवीन
राणेंनी भाजपाची अशी काय सेवा केली की निष्ठवंताना डावलून त्यांना तिकीट दिले ?
एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तरी द्यायचे
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 07:20
नवीन
भाजप मध्ये ग्रामपंचायतीला देखील (बाटग्यांची मदत घेतल्याशिवाय) निवडून येऊ शकत नाहीत असे दस्तूरखुद्द गडकरी मागे म्हणाले होते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/12/2018 - 09:04
नवीन
संदर्भ द्यावा ही नम्र विनंती.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 03/12/2018 - 10:06
नवीन
https://www.youtube.com/watch?v=thA6BpyCnNU
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »