Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३२

व
वामन देशमुख
गुरुवार, 05/03/2018 - 17:57
🗣 309 प्रतिसाद
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

प्रतिक्रिया द्या
67142 वाचन

💬 प्रतिसाद (309)
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 04:25 नवीन
http://www.freepressjournal.in/mumbai/thane-private-coaching-classes-to-protest-against-maharashtra-governments-new-policy/1201837 नवे रुल्स आले ? खाजगी क्लासवाल्याना 10000 रु रजिस्ट्रेशन फी शिवाय उत्पन्नाच्य 5 % सरकारला द्यायचे म्हणे ! इन्कम Tax , GST वेगळाच . मोघल इंग्रजाही इतके tax लावत नव्हते.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 05:17 नवीन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार नाही तर सिधा रुपया सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. लाच म्हणून पैसे दिल्याशिवाय इथे कोणतेही काम होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलबुर्गी, बेल्लारी आणि बंगळुरू या ठिकाणी झालेल्या रॅलीत हजर होते. त्या दरम्यानच्या एका भाषणात त्यांनी ही घणाघाती टीका केली आहे. ------------ मग हे त्यांना अटक का करत नाहीत ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 06:13 नवीन
मोदी स्वतःच बोलतात .. सिद्ध रामय्या लाच खातात. तरीही ते action घेत नाहीत. म्हणजे मोदीनाही / भाजपालाही काही पोचत असेल का ? -------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे Fri, 05/04/2018 - 05:21 नवीन
खाजगी क्लासेस आता रेल्वे स्टेशन वर सुरू करावे. बऱ्याच अटींची पूर्तता होऊ शकेल. टॉयलेट, वेटींग रूम, पार्किंग... २ वर्षाच्या शिक्षेवर GST लावणार की नाही ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 05/04/2018 - 05:25 नवीन
मग हे त्यांना अटक का करत नाहीत ? २०२२ ला सगळे आत असतील. गेल्या ६० वर्षात एकही जेल बांधले गेले नाही. सध्या जोरात काम चालू आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 06:26 नवीन
प्रचाराला जोर येतोय. खाणसम्राट रेड्डींना बळ्ळारीमधून भाजपाने उमेद्वारी दिली आहेच.
The BJP has defended the move as a "compromise", claiming they are the party's best chances for a victory in the area. The Central leadership, which presumably approved the move, has been silent despite numerous Congress demands for an explanation.
कर्नाटकात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत असे मोदीनी म्हणायचे व त्याच्वेळी ह्या लोकांना तिकीटपण द्यायचे. https://www.ndtv.com/karnataka-news/karnataka-assembly-election-in-ballari-pm-shares-stage-with-corruption-charged-reddy-brother-1846737
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 05/04/2018 - 06:28 नवीन
सं. मं. नी फक्त सतत एखाद्या पक्षाच्या बाजूने लिहिण्यावर आक्षेप घेतलेला आहे, सतत एखाद्या पक्षाच्या विरोधात बोलण्यावर नाही. त्यामुळे दळण निवांत दळता येणार आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/04/2018 - 06:44 नवीन
जवारी संपली की गहू टाका, हाकानाका. कधीतरी स्वयंपाकाला बसावे लागेलच ना. आयुष्यभर दळण थोडीच चालणारे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 05/04/2018 - 06:57 नवीन
आपल्याला काही करालेच लागत नाय ना भौ! त्यांचेच गहू, त्यांचीच जवारी आणि त्यांचीच बाजरी. आपण निस्तं नीट दळलं का ते बघा लागते. सैपाक बी तेहींच करते आणि जेवालेबी तेहींच वाढतेत. आपण कंदीमंदी जेवण कसे ते सांगा लागते. लै मंजी लैच मजा येऊ राह्यली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विशुमित Fri, 05/04/2018 - 08:14 नवीन
<<<तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात.>> ==>>विशेष सूचनेत मला जेवढे समजले त्या नुसार संपादक मंडळाला यावर जास्त आक्षेप आहे. सरकारविरोधी सतत लिहीत राहणे मी समजतो लोकशाहीसाठी पूरकच आहे. ज्याला बाजू घायची आहे त्यांनी अवश्य घ्यावी, फक्त तिथे वादा ऐवजी संवाद असावा, प्रत्येक सदस्याची एवढीच माफक अपेक्षा असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 05/04/2018 - 08:25 नवीन
तेच तर! दोन्ही गटांना वाटतंय कि ती सूचना समोरच्या बाजूसाठी लिहिलीय. काहीजणांनी तर ती सूचना प्रतिसादात सुद्धा वापरली. --------------------------------- एकांगी, खोट्या आणि विशिष्ट हेतूने लिहिलेल्या बातम्या, सोशल मीडिया वरच्या ट्रोल पोस्ट (अर्थातच अधिकृत नसलेल्या) स्वतःचा विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी वापरणे हे लोकशाहीला पूरक आहे असे म्हणवत नाही. ------------------------------ "मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही." हे वाक्य जास्त महत्वाचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 05/04/2018 - 09:03 नवीन
<<<एकांगी, खोट्या आणि विशिष्ट हेतूने लिहिलेल्या बातम्या, सोशल मीडिया वरच्या ट्रोल पोस्ट (अर्थातच अधिकृत नसलेल्या) स्वतःचा विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी वापरणे हे लोकशाहीला पूरक आहे असे म्हणवत नाही.>> ==>> बहुतांशी बातम्या ह्या वृत्तपत्रीय असतात त्या एकांगी आहेत , खोट्या आहेत आणि विशिष्ट हेतूने लिहल्या आहेत हे सिद्ध करायचे काम कोणाचे आहे? ज्याचे त्या बातम्यांबाबत विरोधी/वेगळे मत आहे त्याने व्यक्त करावे. फक्त विषयाला धरून आणि सभ्य भाषेत एवढीच अपेक्षा. याने उलट एखाद्या घटनेकडे बघण्याचे विविध पैलू प्रत्येकाला समजेल आणि मला यामुळेच वाटते की हेच लोकशाहीसाठी पूरक आहे. आता कोणी विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, राजकीय नेत्यांचा एकेरी/ द्वेषयुक्त उल्लेख, फेकू, पप्पू, कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण असे काही उल्लेख करत असतील तर त्यांना समाज देणे महत्वाचे आहेच. मागे कदाचित मी देखील ह्या गोष्टी केल्या असतील पुढे त्या होणार नाहीत याची काळजी घेईन आणि इतरांनी देखील ती घ्यावी अशी आशा करतो. < ==== <<<"मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही." हे वाक्य जास्त महत्वाचे वाटते.>> ==>> काही सदस्यांच्या अँफेर डॉमिनन्स मुळे मिपाचे तसे चित्र दिसत होते, ते मोडीत काढणे जरुरीचे होते. मालकांनी केले ते उत्तम केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 11:18 नवीन
....आता कोणी विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, राजकीय नेत्यांचा एकेरी/ द्वेषयुक्त उल्लेख, फेकू, पप्पू, कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण असे काही उल्लेख करत असतील तर त्यांना समाज देणे महत्वाचे आहेच....
मी उलट्या दिशेने काही प्रतिसाद चाळण्यास घेतले त्यामुळे या प्रतिसादाचा काँटेक्स्ट माहित नाही. मी या चर्चांमध्ये सातत्याने डोके घालत नसल्याने मला कदाचित कमी त्रास जाणवत असेल , कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण टाळावे ; मिपा सदस्यांनी एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळावी या बाबत सहमत आहे . पण राजकीय नेते आणि राजकीय पक्षांचा राग येत असताना तो व्यक्त होऊ नये हे तेवढेसे पटले नाही. माझे असे डिफेंड करणे मिपा धोरणात बसत नसेल तर संपादकांनी डिलीट करावे पण फेकू, पप्पू, हे शब्द आदर्श नसले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत बसावयास हवे चुभूदेघे खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, हेही खपवून घ्यावे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुम्ही (म्हणजे तुम्ही नव्हे कुणीही ) हे शब्द दडपले तर नव्या शब्दांचा शोध लावला जाईल द्वैअर्थी लेखनात भारतीय लोक तरबेज आहेत. भारतींयांची डोकी आणि तोंडे एवढ्या सहज बंद करता आली असती तर भारतीय लोकशाहीचा एव्हाना चीन झाला असता . असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 05/04/2018 - 08:06 नवीन
<<जवारी संपली की गहू टाका, हाकानाका.>> ==>> ते करताना जातं बदललं पाहिजे ना ! ज्वारीवर गहूं टाकलं तर गव्हाचं पीठ वडाक येणारच. पण गव्हावर ज्वारी टाकली तर ज्वारीच्या पिठाला जास्त फरक पडत नाही. ज्वारी आणि गहू काय आहेत हे प्रत्येकाने आप आपले ठरवावे. (एके काळी अख्या गावाचे दळण दळण्याची चक्की चालवायचा अनुभव बोलतोय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
M
mayu4u Fri, 05/04/2018 - 09:02 नवीन
कोणत्या भागात वापरतात हा शब्द?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 05/04/2018 - 09:06 नवीन
वडाक म्हणजे ज्वारी/बाजरीमुळे गव्हाचे पीठ करा काळपट दिसते किंवा चपाती नीट लाटली जात नाही. भाकरीचा फील येतो. पुणे/सोलापूर ग्रामीण भागात वापरला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Fri, 05/04/2018 - 10:33 नवीन
नवीन माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पुंबा Fri, 05/04/2018 - 08:38 नवीन
http://www.thehindu.com/opinion/op-ed/into-the-brave-new-age-of-irrationality/article23763781.ece?homepage=true उत्तम लेख.
The vigour with which the government is making an assault on the scientific temper only confirms that it is actually frightened of it. This is the reason why authoritarian regimes are often intolerant of those who champion the spirit of science, but encourage scientists who will launch satellites and develop nuclear weapons — even as they break coconuts, chant hymns and press “Enter” with their fingers laden with auspicious stones.
हा परिच्छेद विशेष आवडला.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/04/2018 - 17:34 नवीन
लेखाखाली माझा प्रतिसाद दिलेला आहे. बघूया पेपरवाले छापतात का. Sanjay Rajoura is a fcuking idiot. In the very second sentence he equates science with rationality. What a balderdash! Many pathbreaking scientific discoveries were due to irrational thinking. Yeah, 'irrationality' is another name for 'out of the box' thinking. This comedian has made himself a laughing stock indeed! That's rationality, isn't it? :-D -Gamma Pailvan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अभ्या.. Fri, 05/04/2018 - 08:39 नवीन
बस झालं की राव आता, किती तो काथ्याकूट, चर्चा, उप-चर्चा, प्रतिसाद, प्रति -प्रतिसाद, धागे-दोरे, चऱ्हाटं, गुंता, गुंतवळ… कुठल्याही गोष्टीची एक हद्द असते राव! मागच्या पंधरा दिवसांपासून मिपा उघडलं की सारखे तेच तेच विषय पुढे येताहेत. इतक्या धाग्यांमधून आता सर्वांचं सर्वकाही सांगून झालंय असं वाटत असताना नवीनच एक धागा तोच विषय घेऊन येतो आणि जुन्या धाग्यांबरोबर फेर धरून बोर्डावर नाचत राहतो. पुरे झालं आता हे सगळं! चला, नवीन काही लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…
. सांगा बघु हे कुठले आहे?
  • Log in or register to post comments
झ
झेन Fri, 05/04/2018 - 09:25 नवीन
माझ्या मनातले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/04/2018 - 11:02 नवीन
झेनबाबा तुमच्या जे मनात, तेच ह्या धागालेखकाच्या जुन्या धाग्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 09:41 नवीन
अभ्या., अरे निवडणूकीचा काळ आहे.. तेव्हा ताज्या घडामोडींमध्ये असे वाद-विवाद असणारच ना? ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 05/04/2018 - 09:54 नवीन
काय बोललात माईसाहेब!! बाकी बायका म्हणजे...नाही नाही हुशारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 10:57 नवीन
...अरे निवडणूकीचा काळ आहे.. तेव्हा ताज्या घडामोडींमध्ये असे वाद-विवाद असणारच ना? ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..
माई , प्रतिसाद खालून वर चाळण्यास घेतल्यामुळे नेमका काँटेक्स्ट माहित नाही, पण ...ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..' हि कॉमेंट लै आवडली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 09:50 नवीन
केनद्रात भाजपा आणि राज्यात काँग्रेस असेल तर तिथल्या प्रश्नांना काँग्रेस राज्यशासन जबाबदार असते. केनद्रात काँग्रेस आणि राज्यात भाजपा असेल तर तिथल्या प्रश्नांना काँग्रेस केंद्र शासन जबाबदार असते. दोन्हीकडे भाजप असेल तर तिथल्या प्रश्नांना नेहरू जबाबदार असतात.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 10:54 नवीन
:)) व्यक्तिगत दृष्टीकोण दूर ठेऊन , टिपण्णी विनोद म्हणून आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 10:57 नवीन
https://rightlog.in/2018/05/dalit-group-tamil-nadu-stuns-nation-demand-withdrawal-sc-st-status/
In a move which is bound to stun the nation and upset a few political equations, members of the Devendra Kula Vellalars, who have the Scheduled Caste status, have made up their mind to relinquish the same. Yes, the Vellalars are all ready to give up the privileges that the Central, as well as the Tamil Nadu (where they hail from) governments provide them under the system of reservation.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/04/2018 - 11:44 नवीन
आरक्षणावर आधारलेले जातीपातींचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याच्या कारवाया करणार्‍यांच्या पायाखालचा गालिचा ओढून त्यांना धाराशायी करणार्‍या Devendra Kula Vellalars यांचे असंख्य आभार आणि अभिनंदन !!! दलित राजकारण नेहमीच केंद्रभागी असणार्‍या तामिळनाडूमध्ये असे घडावे, हे जेवढे आश्चर्यकारक आहे तेवढेच भविष्याबद्दल आशादायी आहे ! भारतिय सामाजिक व्यवस्थेच्या वाटचालीतला ही घटना नक्कीच मैलाचा दगड ठरेल. भारत हा जगातील फक्त एकुलता एक देश असावा जेथे विविध समाज (आणि विशेषतः त्यांचे नेते), "आपला समाज कसा इतरांपेक्षा जास्त मागासलेला आहे, त्याच्यात स्वतःच्या धमकेवर काही करण्याची कशी ताकद नाही आणि म्हणून सरकारने त्याला विशेष सोयी-सवलती-आरक्षण इत्यादी दिले पाहिजे" यावर आपली शक्ती खर्च करण्यात धन्यता मानत आहेत. या पार्श्वभूमीवर Devendra Kula Vellalars यांचींही कृती विशेष उठून दिसत आहे. सामाजिक दृष्ट्या अती-अविकसित समजल्या जाणार्‍या SC प्रकारातील एका समाजघटकाने हा "सामाजिक वैचारिक प्रगल्भतेचा" पायंडा पाडावा हे विशेष !!! इतर सर्व समाजघटकांनी त्यांचा हा स्वाभिमानी आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर भारतात खर्‍या अर्थाने उर्जितावस्था यायला वेळ लागणार नाही. त्या बातमीत त्या समाजाच्या नेत्यांची उद्धृत केलेले खालील वाक्य वाचून कोणाही स्वाभिमानी भारतियाला त्यांच्याबद्दल अभिमान आणि आदर वाटल्याशिवाय राहणार नाही... In their words, “…that the community is seen as just a vote bank. And as we want upward mobility and progress, the group has decided to pull out of the SC list.” Devendra Kula Vellalars समाजाचे परत एकदा असंख्य आभार आणि अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 11:22 नवीन
https://rightlog.in/2018/05/madrasa-rape-01/
In the aftermath of the Kathua rape case, we witnessed another phony outrage by the self-appointed moral guardians of society. However, none were as revolting as the placard carrying actors from Bollywood. When Bollywood did manage to muster its voice, it was only to malign an entire community and its religious symbols. One actress, who has named her son after a genocidal maniac who reveled in the sexual exploitation of women, was also seen carrying a placard. Another actress whose father can be seen beside Dawood, the dreaded underworld don, in pictures that were doing the rounds on social media, was also seen carrying a placard that appears to target the Hindu faith more than the actual perpetrators of the heinous crime. And there is a third one who felt reduced to female genitalia after watching Padmaavat. There is no outrage from their side, and considering their glorious track record, it will be worthless to expect anything from them.
भाषांतर: कठुआ येथील बलात्काराच्या घटनेनंतर, आपाल्याला स्वघोषित नितिमत्तेच्या रक्षकांचा एक लटका, दांभिक संताप बघायला मिळाला. तरी, फलकधारी बॉलिवूड अभिनेत्यांइतका उद्रेक कोणाचाच नव्हता. शेवटी बॉलिवूडकारांना जेव्हा आपली गर्जना करता आली तेव्हा ती केवळ एका विशीष्ट समुदायाचे प्रतिमाहनन करण्यासाठी नि त्याच्या धार्मिक चिन्हांचा अपमान करण्यासाठी होती. यात एक अभिनेत्री अशी होती जिने आपल्या मुलाचे नाव विकृत वंशविच्छेदकाच्यापाठी वा वासनांधापाठी ठेवलेले. दुसरीचा पिता दाऊद शेजारी दिसे. आणि तिसरीला राणी पद्मावतीची कथा पाहून आपण एक योनी उरलो आहोत (म्हणजे राणी = योनि) असे वाटलेले. त्यांचेकडून संताप व्यक्त झालेला नाही नि अतीत पाहता होणारही नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 11:56 नवीन
इतरांच्या नावानची इतकी चिंता करण्यापेक्षा स्वतःच्य पोरांना नरेंद्र देवेंद्र अर्जुन परशुराम नथुराम अशी सुंदर सुंदर नावे ठेवावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डँबिस००७ Fri, 05/04/2018 - 15:16 नवीन
इतरांना नावावरुन सल्ले देणार्यांनी , ईतरांच्या धर्मा बद्दल अर्वाच्च्य लिहीण्यापेक्षा स्वतःच नविन धारण केलेल्या ईस्लाम धर्माबद्दल लिहा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 11:31 नवीन
https://rightlog.in/2018/05/sikh-punjab-congress-01/ ============================
Twenty three chapters which include lessons on Sikh Gurus, their teachings, the struggle of the Sikhs against the Mughals, the Sikh empire including chapters on Sher-e-Punjab Maharaja Ranjit Singh, the Anglo-Sikh War are among the the deletions by the PSEB.
======================
Adding to the controversy, Professor Gurmeet Singh Sidhu, HoD, Religious studies, Punjabi University has stated that PSEB had omitted major parts of Sikh history and that the version present in the books was factually wrong and that there was a clear distortion of history. If this is the state of affairs in Punjab, where Sikhism was born and took shape, what can we expect the other states to be studying about Sikh history?
या वादंगात भर घालत, धर्म अभ्यासाचे प्राध्यापक श्री गुरमीत सिद्धू म्हणाले गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता. पंजाबात शिखांच्या इतिहासाची ही अवस्था आहे तर अन्यत्र काय होइल? ================
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 05/04/2018 - 11:59 नवीन
<<<या वादंगात भर घालत, धर्म अभ्यासाचे प्राध्यापक श्री गुरमीत सिद्धू म्हणाले गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता. पंजाबात शिखांच्या इतिहासाची ही अवस्था आहे तर अन्यत्र काय होइल?>> ==>> भावा नवनवीन साधने उपलब्ध झाली की इतिहासात बदल होऊ शकतो की ? गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता असे म्हणाऱ्या प्राध्यापकांनी पुरावे सादर करावेत आणि वादावर पडदा टाकावा. ==== यात मुघल आलेत म्हणून काही विवेचाना आली आहे का उजव्यांना आय मिन rightlog वाल्याना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 11:41 नवीन
https://rightlog.in/2018/05/cambridge-analytica-congress-india-01/
काँग्रेस पक्षास भारतीय लोकांबद्दलची विविध स्रोतांमधून मिळालेली माहिती (चांगल्या प्रकारे) वापरून सहाय करणारी केंब्रिज अनालिटिका ही कंपनी दुर्दैवाने बंद पडली आहे. ===========================
While he doesn’t deny that his employers might have worked with other political parties as well, the Congress party was nonetheless their biggest and most trusted client in India.
(भारत देशाच्या विकासास अत्यावश्यक अशी ही) सेवा अन्य कोणी घेत असेल वा नसेल, काँग्रेस हे कंपनीचे सर्वात मोठे आणि खात्रीचे गिर्‍हाईक होते असं कंपनीचे अधिकारी म्हणतात.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 12:01 नवीन
असेल नसेल नाही रे अरूण. सर्व पक्षांनी ह्या पद्धतीचा वापर केला आहे. Cambridge Analytica's Indian partner lists BJP, Congress, JD(U) in client list https://www.theweek.in/news/india/2018/03/21/cambridge-analytica-indian-partner-lists-bjp-congress-jdu-in-client-list-oveleno-business-intelligence.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 12:08 नवीन
However, the company's India partner Ovleno Business Intelligence (OBI) lists the BJP, the Congress and the JDU in its clientele.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 12:24 नवीन
http://www.panchjanya.com/Encyc/2018/4/30/dharmo-main-dikhawati-samanata.html
हमें समझना चाहिए कि हमारे मार्ग भिन्न होंगे। सभी एक ही मार्ग पर नहीं चल सकते, न ही एक ही धर्म का या तथाकथित 'शाश्वत मूल्यों' तक का पालन कर सकते हैं। नतीजतन, हमें एक-दूसरे के मार्गों का मूल्यांकन करने से, या जबरदस्ती उन समानताओं को ढूंढने से बचना चाहिए जो होती ही नहीं हैं। हमें भिन्नताओं का सम्मान करना सीखना होगा। यह कोई प्रतियोगिता नहीं है। हमें दूसरे धर्मों को केवल बर्दाश्त' ही नहीं करना चाहिए, उनका सम्मान भी करना चाहिए। मैं आपके मार्ग का सम्मान करता हूं और आप मेरे मार्ग का सम्मान करें (मगर जरूरी बात यह है: सम्मान दोनों ओर से होना चाहिए, किसी एक ओर से नहीं)।
भाषांतर - आपल्याला कळायला हवं कि आपले मार्ग भिन्न आहे. सर्व जण एकाच मार्गावर चालू शकत नाहीत आणि सर्व जण एकाच धर्माचे वा कोणा शाश्वत मूल्यांचे पालन करू शकत नाहीत. परिणामतः, आपण एकमेकांचे मूल्यमापन करणे वा ज्या मूळात नसतातच त्या समानता शोधणे हे प्रकार टाळले पाहिजेत. आपण विविधतांचा सन्मान करायला हवा. धर्मांत अशी कोणती स्पर्धा लागलेली नाही. आपण अन्य धर्मांना केवळ सहन करावे असे नव्हे तर त्याचा आदर केला पाहिजे. मी आपल्या मार्गाचा सन्मान करेन नि आपण माझ्या. एक मात्र आहे कि सन्मान दोन्ही बाजूंनी हवा, एकच नव्हे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 12:31 नवीन
खरे आहे पण हे सगळ्याना कळायला हवे- One may follow a different religion, different culture, philosophy, language and style of eating but everyone living in India is a Hindu, asserted the RSS chief Mohan Bhagwat http://www.thehindu.com/news/national/everyone-living-in-india-is-a-hindu-mohan-bhagwat/article22852200.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 13:29 नवीन
माई आजकाल प्रशस्तीपत्रे देण्याच्या घाईत दिसताय. प्रत्येक जण आपापली प्रार्थना आणि जिवन पद्धती चालू ठेऊन स्वतःस हिंदू म्हणून घेऊ शकतो - सर्वांना हिंदू म्हटल्याने काही नुकसान अथवा अपायकारक होत नसावे- इतपत हिंदू शर्माची व्याख्या व्यापक आहे - अनलेस हिंदू म्हणण्या बद्दल बागुलबूवा उभाकरणे महत्वाचे असल्यास - असा बागूल बुवा उभा करण्याचे फायदे बागूलबूवा उभाकरनार्‍यांना मिळतात हे मान्य. भारतात राहणारे तेवढे हिंदू हि व्याख्या परदेशात जाणार्‍या / राहणार्‍या हिंदूंसाठी तापदायक आहे. भारतात राहणारे सर्व हिंदू म्हणवता येत असतील तर अमीष त्रिपाठींनी जे काय भाषण लिहिले ते पाय परदेशातील अन्य धर्मीयांसाठी ? हा एक विरोधाभास पांचजन्यकरांनी सोडवाव्यास हवा असे वाटते. आम्ही अजोंजी क्वोट केलेल्या त्या अमीश त्रिपाठींच्या विचारांबद्दल साशंकता खाली व्यक्त केली आहे. आडून वीषमतेचे समर्थनाची शक्यता हि सर्वांना हिंदू म्हणण्या पेक्षा गंभीर असावी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 13:31 नवीन
* शर्माची एवजी धर्माची वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 15:25 नवीन
भारतात रहातात ते भारतीय पासपोर्टवर indian , भारतीय असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 16:12 नवीन
अ‍ॅडीषनल हिंदू हे विशेषण मिळाल्याने बागूलौवा उभे करण्या एवढे अंगाला भोके पडण्याचे कारण नसावे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 16:33 नवीन
नुसते भारतीय म्हणवून घेतले तरी कुणी आक्रोश करायचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 16:38 नवीन
सगळे भारतीय हिंदू आहेत म्हटल्यावर मुळीच कारण नाहीए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 16:45 नवीन
I = ( H , M , C ......... ) I is a name of a set H , M, C are the elements. Element ≠ set. सादं सोप्पं आकरावीचं गणित हाये. ( म्हण्जे आमच्या काळात ११ वीला हुतं. आता ९-१० ला आलं असंल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 13:17 नवीन
अमीश त्रिपाठींची मांडणी प्रथम दर्शनी लाजवाब वाटली तरी , या भूमिके बाबत काही साशंकता वाटतात. बेसिकली ज्या मुल्यांना तथाकथित म्हणवल जाऊ शकत त्यांना शाश्वत म्हणवल जाऊ शकत काही? हि पहिली शंका. 'सर्व धर्म समान नसतात' या वरुन पुन्हा एकदा दिवाकरांच्या जातीभेदाचे आडून समर्थन करणार्‍या नाट्यच्छटेची आठवण आली. हि मांडणी हाताची पाची बोट एकसारखी नसतातच्या धर्तीवरची असते. या वर सर्वात मोठी आशंका या अर्ग्यूमेंटच्या आडून विषमता, विषतेची वागणूक , हिनत्वाची वागणुक , सुधारणांना विरोधकरणार्‍या शब्दपुजेचे समर्थन होणार नाही ना ही वाटते . सर्वात अडचणीची बाब सर्व धर्मिय धर्मांध हमसब भाई भाई म्हणतील आणि शब्दपुजेस बाजूस ठेऊन सुधारणावादी पाऊले उचलणार्‍यांना एकटे पाडतील हि यातील मोठी भिती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्वेता२४ Fri, 05/04/2018 - 12:39 नवीन
भुजबळांना जामिन
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/04/2018 - 12:40 नवीन
#MeToo turmoil: 2018 Nobel Literature Prize postponed by a year सन २०१८ चा नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी न देता सन २०१९ मध्ये देण्याचे ठरले आहे. दुसर्‍या महायुद्धामुळे १९४३ साली असे घडले होते. त्यानंतरचा असा हा पहिला प्रसंग आहे. याबद्दल, पुरस्कारासाठी नाव/नावे निश्चित करणार्‍या Swedish Academy ने, जाहीर केलेले कारण : अ‍ॅकॅडेमीच्या सभासद/अधिकार्‍यांच्या अस्विकारार्ह कृतींपासून सावरायला आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी अ‍ॅकॅडेमीला काही वेळ आवश्यक आहे. या अस्विकारार्ह कृती म्हणजे अ‍ॅकॅडेमीच्या काही सभासद/अधिकार्‍यांची लैंगिक गैरकृत्ये आहेत. लैंगिक शोषणाविरुद्ध सद्या जगभर चाललेल्या #MeToo (पक्षी: माझ्यावरही लैंगिक अत्याचार झालेला/ले आहे/त, असे पिडितांनी उघडपणे सामाजिक माध्यमांत जाहीर करण्याच्या) मोहीमेमुळे जगभर उच्च्पदस्थ आणि ताकदवर लोकांनी (high and mighty) केलेली गैरकृत्ये मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. स्विडीश अ‍ॅकॅडेमीचे हे प्रकरण त्यापैकी एक आहे. त्या कृत्यांबद्दल अ‍ॅकॅडेमीच्या संबंधीत सदस्यांनी पश्चातापही व्यक्त न करता सारवासारव करण्याचे धोरण अवलंबिले आहे. अर्थातच त्याबद्दल, विशेषतः सर्वसाधारण स्विडिश जनतेत आणि एकंदरीत नोबेल पारितोषिकाशी संबंधित जगभरातील शास्त्रज्ञ/लेखक/संस्था/कार्यकर्ते/लेखक/इत्यांदींमध्ये प्रचंड रोष आहे. अ‍ॅकॅडेमीचे आजन्म सभासदत्व असलेल्या १८ पैकी (आत्तापर्यंत) ७ जणांनी राजिनामा दिला आहे. आंतरराष्ट्रिय स्तरावरच्या इतक्या मान्यवर संस्थेत स्वीडनची मानहानी करणारा गलिच्छ गैरप्रकार होऊनही, "परदेशी लोकांनी स्वीडनला भेट देऊ नये यासाठी" किंवा "स्विडन या देशाची नाचक्की करण्यासाठी", स्वीडनमध्ये अथवा जगभरात इतर कोठेही मोर्चे/लेख/मेणबत्ती मार्च/इत्यादी आयोजित केले गेलेले नाहीत. कितीही पुढारलेला देश असला तरी, स्वीडनला भारतापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे, यात वाद नाही ! :(
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 05/04/2018 - 13:23 नवीन
सही पकडे है आप , डॉ साहब ! भारताची नाच्चक्की जगभरात करणारे भारतीयच आहेत हीच देशाची मोठी खंत आहे !! सोशल मिडियावर , हिदु लोकच हिंदु समाजावर काहीही माहीती न घेता गरळ ओकत स्वतः मोठ्या पुरोगामी असल्याचा आव आ णत असतात ! हल्लीच कठुआ रेप केस नंतर, बेंगळुरुत रहाणारी एक केरळची हिंदु स्त्री म्हणते की ती उबर किंवा ईतर भाड्याच्या गाड्यांवर हिंदु देवतांची चित्रे लावणार्या गाड्यातुन प्रवास करणार नाही कारण हिंदु लोक रेप करणार्यांचे समर्थन करतात ! हीच्या स्वतःच्या केरळ राज्यात रेप करणार्या गुन्हेगाराला मुस्लिम व कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिलेला त्या प्रकरणाबद्द्ल तीला विचारल तर तिला त्याबद्दल काहीही माहीती नव्हती. सवंग प्रसिध्दी साठी सोशल मिडीयावर काहीही लिहीण्याची सध्या फॅड आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा