Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३२

व
वामन देशमुख
गुरुवार, 05/03/2018 - 17:57
🗣 309 प्रतिसाद
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

प्रतिक्रिया द्या
67142 वाचन

💬 प्रतिसाद (309)
M
manguu@mail.com Fri, 05/04/2018 - 16:34 नवीन
परदेशात गेली ४ वर्षे पूर्वीचे पंतप्रधान , विरोधी पक्ष यांच्यावर टीका करत कुणीतरी फिरतय म्हणे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 13:40 नवीन
डॉक , तुमच्या प्रतिसादातील मतितार्थाशी सहमत, या बाबत आधीच्या एका धायात भूमिका मांडून झाली आहे.
कितीही पुढारलेला देश असला तरी, स्वीडनला भारतापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे, यात वाद नाही !
हे वाक्य उपरोधाने लिहिले असल्यास ठिक पण ऑदरवाईज आपल्याला कदाचित वेगळ्या अर्थाने / पद्धतीने लिहायचे असावे म्हणून लक्ष वेधले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/04/2018 - 17:20 नवीन
?! तो सगळा परिच्छेद एकत्रितपणे वाचला तर त्यात उपरोध सोडून इतर काही असेल असा संशय तरी कसा आला ?! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
आ
आनन्दा Sat, 05/05/2018 - 05:09 नवीन
:)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव Fri, 05/04/2018 - 13:51 नवीन
'पिंक' चित्रपट कर्त्यांना जगभरातुन कौतुकाचे मॅसेज आले होते, तसच चित्रपटात मांडलेली समस्या केवळ दिल्लीपुरती मर्यादीत नसुन सर्वत्र अनुभवायला मिळते असंही बर्‍याच जणांनी सांगीतलं त्यांना. विशेषतः स्वीडनमधुन बरच काहि ऐकायला मिळालं त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 12:41 नवीन
https://www.thequint.com/news/india/baahubali-writer-vijayendra-prasad-film-on-rss
KV Vijayendra Prasad, the writer behind blockbusters such as Baahubali: The Beginning, Baahubali: The Conclusion, Bajrangi Bhaijaan and Mersal is now busy scripting an ambitious film on the history and journey of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). बाहुबली या सिनेमाचे लेखन श्री विजयेंद्र हे आर एस एस वर एका सिनेमाची स्टोरी लिहित आहेत. संघाच्या प्रवासाची ती रोचक समरी असेल. ======================= एका मेधावाम समीक्षकाने सदर चित्रपटाची प्रि-स्क्रिप्ट स्टेजची रिव्हू केली आहे. ती इथे पाहायला मिळेल. https://www.dailyo.in/humour/film-rashtriya-swayamsevak-sangh-rss-bollywood-hindutva-baahubali-screenwriter-kv-vijayendra-prasad/story/1/23858.html
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 05/04/2018 - 13:16 नवीन
https://www.financialexpress.com/india-news/amu-jinnah-prohibitory-orders-imposed-in-aligarh-internet-services-suspended-top-developments/1155888/
---------------------- हे चित्र उतरावले तर दुसरी फाळणी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी कोणी उरणार नाही ही साधी गोष्ट विरोधकांना समजत नाहीय.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 14:16 नवीन
स्वार्थ आणि हित्संबंध देशाच्या हिता विरोधी सांभाळले गेले तर भारतीयांची देशभक्ती भक्कम राहील याची हमी देणे अवघड -त्यामुळे देशविरोधी भूमिका घेण्यासाठी जीनाच पाहिजेत असे काही नसावे - आणि तसे म्हटले तर पाकीस्तानी बांग्लादेशी शेवटी त्याच भारतीय रक्ताचे. पण तरीही फाळणी पुर्वी जरी जीनाम्चे चित्र लावले असले तरीही फाळणी नंतर तो सन्मान चालू ठेवावा हे उचित नाही . आणि उचित नसाण्याच्या गोष्टॉ मोजायच्या तर अल्पसंख्यत्वाच्या नावा खाली वेगळ्या शिक्षणाची चूल मांडणे ते वेगळ्या लिपी जोपासणे साशंकतेचे असावे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 14:42 नवीन
हे चित्र उतरावले तर दुसरी फाळणी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी कोणी उरणार नाही ही साधी गोष्ट विरोधकांना समजत नाहीय.
खरोखर पोर्ट्रेट ,चित्र पाहून देश तोडायची प्रेरणा मिळते? अनेक देशवघातकांच्या घरी,गुन्हेगारांच्या गळ्यात साईबाबा,कुठलातरी स्वामी.. फोटो,लॉकेट्स असतात. त्यांना प्रेरणा कुठून मिळते?... असो. The University said portraits of all life members of the student union hang there. Jinnah, a founder member of the University Court, had also been given this honour before Partition. थोडक्यात ते पोर्ट्रेट पाकिस्तानचे संस्थाप़क म्हणून लावले नाही आहे. भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
व
विशुमित Fri, 05/04/2018 - 14:51 नवीन
<<भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.> ==>> त्यांना फक्त पाकिस्तानी केक बिर्याणी चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ड
डँबिस००७ Fri, 05/04/2018 - 15:12 नवीन
केक बिर्यानी चालत नाय, पण देशातल सरकार उलथवायला पाकिस्तानकडेच मदत मागण , चीनच्या सुरक्षा अधिकार्यांची गुपचुप भेट घेण जरा जास्तच होत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
उ
उगा काहितरीच Fri, 05/04/2018 - 14:54 नवीन
अनेक देशवघातकांच्या घरी,गुन्हेगारांच्या गळ्यात साईबाबा,कुठलातरी स्वामी.. फोटो,लॉकेट्स असतात
पूज्य व्यक्ती , आध्यात्मिक व्यक्तीचे फोटो व सामाजिक कर्तुत्व असलेले व्यक्ती याची तुलना अप्रस्तुत वाटते.
भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.
आत्यंतिक राष्ट्रवाद! मग तो दाखवण्यात थोडं जास्त होतंय कधीकधी . पण विरोधक संधी बनवत आहेत . किंवा आलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करू पहात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 15:07 नवीन
विजय मल्ल्या,नीरव मोदी ह्यांना पकडून सरकार जेलमध्ये घालेल का? ते दोघे कोठे आहेत, काय करता आहेत हे सरकारलाही माहित आहे.मे २०१९ पर्यंत पकडून येथे आणले तर राष्ट्रवाद वगैरे म्हणण्याला अर्थ उरतो. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
र
राघव Fri, 05/04/2018 - 16:02 नवीन
माझ्यासारख्या सामान्य माणसाला; ज्याची यांना व यांच्यासारख्या सर्वांना कायद्याने शिक्षा व्हावी अशी साधी अपेक्षा आहे, पण स्वतः पकडून आणत नाही; त्याला राष्ट्रवाद नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
उ
उगा काहितरीच Fri, 05/04/2018 - 19:10 नवीन
मे २०१९ पर्यंत पकडून येथे आणले तर राष्ट्रवाद वगैरे म्हणण्याला अर्थ उरतो. ..
हे एकच पॕरामीटर आहे का ? अजून पण अनेक कांगोरे असतील ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माहितगार Fri, 05/04/2018 - 16:06 नवीन
Jinnah, a founder member of the University Court, had also been given this honour before Partition.
१) बाकीच्यांच्या दहा चुकांमुळे प्रति पक्षाने केलेली अकरावी चूक चमर्थनीय असेलच असे नसते . २) ज्याचा आधी सत्कार केला गळ्यात ताईत घातला असा असा राम त्याच्या कृती अवैध ठरल्या नंतर कुणी त्याचा तरीही ताईत करुन घातला तर अभिव्यक्ती स्वातम्त्र्यात बसेल पण स्पृहणीय रहाणार नाही तसेच हे जीनाम्चे प्रकरण आहे , भले फाळणी पूर्वी तुम्ही त्याचा फोटो लावला असेल देशाच्या फाळणीच्या घृणास्पद कृतीनंतर त्याचा फोटो जपणे स्पृहणीय नाहीच पण त्या माणसाच्या कृतीने फाळणीच्या वेळी झालेली हिंसा नंतर झालेली युद्धे आणि स्वकियांशिच लढण्यावर होणार्‍या युद्ध सामग्रीवरचा खर्च पाहता अशा व्यक्तीचा फोटो अजूनही बाळगणे स्पष्टपणे सांगावयाचे झाल्यास निंदनीय आहे हे नक्की . ३) अर्थात या निंदेसाठी मी हिंसेचे समर्थन करणार नाही पण हा विषय पुन्हा पुन्हा आग्रहाने निंदा करण्या जोगा नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 17:34 नवीन
खरे आहे. मग नथुराम गोडसेचे जे उदात्तीकरण केले जाते तेही थांबवायला हवे. आत्ता आत्ता पर्यंत विकास्,डेवलप्मेंटची भाषा करणारे(व त्या दिशेने खरोखरीच प्रयत्न करणारे) पुन्हा ईतिहासाची उजळणी का करू लागले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बिटाकाका Sat, 05/05/2018 - 05:21 नवीन
माईसाहेब, फक्त अलिगढ युनिव्हर्सिटी म्हणजे भारत नव्हे आणि तिथे निषेधाची भाषा करणारेच फक्त विकासाची भाषा वापरणारे आहेत असे नव्हे. उगाच सरसकटीकरण करून विकासाची आणि निषेधाची भाषा करणारे एकच आहेत दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न नको. ------------------------------------ प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच परत एकदा आझादीचे नारे लावायची संधी मिळाली, एएमयु ते जेनयु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माहितगार Sat, 05/05/2018 - 06:18 नवीन
१) बाकीच्यांच्या दहा चुकांमुळे प्रति पक्षाने केलेली अकरावी चूक चमर्थनीय असेलच असे नसते . * जे निंदा जनक वाटते त्याची निंदा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
थ
थॉर माणूस Fri, 05/04/2018 - 20:32 नवीन
नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रंप यांचे नामांकनपत्र भरण्यात आले. https://www.telegraph.co.uk/news/2018/05/03/donald-trump-formally-nominated-nobel-peace-prize-tireless-work/
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 05/04/2018 - 21:06 नवीन
चिकनगुनिया या विषाणूजन्य आजारावर प्रतिविषाणू ठरू शकेल असा रेणू शोधण्यात भारतीय संशोधिकेला यश आले आहे. सध्या तरी प्री-क्लिनिकल फेजमध्ये असले तरी ह्या संशोधनाचा उपयोग करून या आजारावर औषध शोधले गेल्यास ती फार मोलाची घटना ठरू शकेल. https://www.news18.com/news/india/iit-roorkee-researchers-discover-molecule-that-fights-chikungunya-1738743.html मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा मुख्यत्वे विकसनशील देशांत जास्त आढळणाऱ्या आजारांवर प्रतिबंधक लशी लवकरात लवकर शोधल्या गेल्या पाहिजेत. परंतु औषधनिर्मिती कंपन्यांना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी उच्छ आणि मध्यम उत्पन्न गटांना जास्त भेडसावणाऱ्या आजारांवर लक्ष केंद्रित करून नफा मिळवण्यात जास्त रस आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/04/2018 - 22:11 नवीन
माईसाहेब,
खरोखर पोर्ट्रेट ,चित्र पाहून देश तोडायची प्रेरणा मिळते?
हाहाहा! याविषयी माहित नाही. पण क्वेट्टानजीकचं जिनाचं घर बघून बलुची मुस्लिमांना ते पेटवून द्यायची प्रेरणा नक्की झाली. आस्वाद घ्यावा म्हणतो मी : https://www.youtube.com/watch?v=hsy2La6tpi4 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 05/05/2018 - 09:10 नवीन
Old video of PM Modi rally in Varanasi shared as Udupi rally ahead of Karnataka elections. Desperate BJP tries to influence voters with old videos. https://www.altnews.in/old-video-of-pm-modi-rally-in-varanasi-shared-as-udupi-rally-ahead-of-karnataka-elections/ कर्नाटकातील जनता मोदी व भाजपला नाकारत असल्याने भेदरलेली भक्त मंडळी आता वाराणसी मधील मोदीजींच्या रॅलीचा जुना व्हिडिओ पोस्ट करुन तो कर्नाटकातील उडुपी येथील रॅलीचा असल्याचे भासवत आहेत. असे खोटे व्हिडिओ पसरवून लोकांची दिशाभूल करुन मते मागण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर यावी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 05/05/2018 - 09:51 नवीन
मंगूसाहेब, घोडामैदान लै लांब नाय, जनता कुणाला नाकारतेय ते कळेलच. शिवाय कोण भेदरलेले आहे तेही कळेलच. उडुपी मध्ये मोदींना खूप सपोर्ट मिळाला, हा बघा विडिओ इंटरनेटवर, आता भाजप ला मतदान करा. लैच मज्जा! ------------------------------ उगाचच इकडचे तिकडचे तथाकथित भक्तांचे फॉर्वर्डस पाहण्यापेक्षा उडुपीच्या सभेचा ओरिजिनल विडिओ पण पहा. स्वतः बघितलेलं बरं असतं. ----------------------------- उत्तरे देता येत नाहीत म्हणून जोडून तोडून विडिओ बनवायच्या शोकांतिकेपेक्षा हि शोकांतिका बरीच म्हणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 05/05/2018 - 09:56 नवीन
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय तसातसा प्रचारही आक्रमक होत चालला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमाकुरू येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस गेल्या अनेकवर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे पण त्यांना गरीबांसाठी काहीही करता आलेले नाही. काँग्रेस पक्ष भारतातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता त्यांनी गरीब बोलणे बंद केले आहे कारण आता लोकांनीच गरीब कुटुंबातून पंतप्रधान निवडला आहे असे मोदी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 05/05/2018 - 16:35 नवीन
इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले. मोदीजी अगदी बरोबर बोलत आहेत. देशातल्या जनतेने निर्धार करुन धर्मावर, जातीवर समाजाला वेगवेगळ्या गटात वाटणार्या राजकीय पक्षाला सत्तेच्या स्पर्धेतुन बाद करावे व मोदीजींचे हात बळकट करावेत, तसेच कोणत्याही छोट्या व्यवसाय करणार्यां उद्योजकांनी पुढे येऊन सरकारला लागु असलेले वेगवेगळे कर देऊन सहकार्य करावे व देश उभारणीत आपला वाटा उचलावा !! मोदीजींनी आधार कार्डला असलेला सर्व विरोध मोडुन काढून सर्व स्तरावर आधार कार्ड सक्तीचे केले पाहीजे. प्रत्येक काम, व्यवहार आधार कार्डला संलग्न झाला पाहीजे , कॅश पैश्याचे व्यवहार कमीत कमी करुन जे कोण कॅश मध्ये काम करतात त्यांच्यावर कडक नजर ठेवायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 05/05/2018 - 17:57 नवीन
काँग्रेसने गरीब केले म्हणे. १९४७ साली आपला पणजोबा , २००० सालच्या पणतवापेक्षा जास्त उत्पन्न मिळवत होता, याचे प्रुफ देणारा एकही गरीब मला तरी दिसलेला नाही. १९४७ पासून चार पिढ्या झाल्या , तरी एखादा माणूस , तोही गुजरातेतला गरीबच ! चूक कुणाची काँग्र्सची ! आणि मग इतर काही लोक श्रीमंत झाले, ते कशाच्या जिवावर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ Sat, 05/05/2018 - 18:18 नवीन
चला म्हणजे आता कर्नाटक निवडणुका जिंकण्याच काँग्रेसचे स्वप्न स्वप्नच रहाणार आता ! बेंगळुरू कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ सातच दिवस उरले असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १२० कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात सोने, दारू आणि इतर साहित्याचा समावेश आहे. येत्या १२ मार्चला कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ५ लाख लीटर दारू जप्त निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ६७.२७ कोटी रुपयांची रोकड, २३.३६ कोटी रुपयांची पाच लाख लीटर दारू आणि ४३.१७ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. या व्यतिरिक्त या कारवाईत आता पर्यंत १८.५७ कोटी रुपयांचे प्रेशर कुकर, साड्या, शिलाई मशीन्स, गुटखा, लॅपटॉप आणि गाड्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 05/05/2018 - 19:16 नवीन
वाटणारे काँग्रेसवाले होते की भाजपे होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार Sun, 05/06/2018 - 06:43 नवीन
'सारे एका माळेचे मणी' नावाचा वाक्प्रचार माहिती आहे का ? जो पर्यंत दोनच्यावर वेळा निवडून येण्यावर बंधन घातले जात नै तो पर्यंत गोंधळ संपणार नाही. (राजकारणावर टिका करताना रंगांचा अनमान होऊ नये म्हणून काही रंगवाचक शब्द टाळले - )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ Sat, 05/05/2018 - 18:19 नवीन
कर्नाटक विधानसभा निवडणुकीला फक्त आठवड्याचा कालावधी उरला असताना भाजप आणि काँग्रेस अधिकच आक्रमकपणे प्रचार करू लागले आहेत. शिमोगाच्या गडम येथील आजच्या धडाकेबाज प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत वातावरण अधिकच तापवले. 'देशभरात झालेल्या पराभवामुळे काँग्रसला चिंता नव्हती, मात्र कर्नाटकात आपला पराभव होणार हे लक्षात आल्याने काँग्रेसला चिंता सतावू लागली आहे. याचे कारण म्हणजे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने इथे एक टँक बनवला आहे. या टँकद्वारे जनतेचा पैसा लुटला जातो. हा पैसा थेट पाइपने दिल्लीत पोचतो. जर सरकारचा पराभव झाला, तर काँग्रेससाठी पैसा कुठून येणार, हीच चिंता काँग्रेसला सतावत आहे', अशी गंभीर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेस पक्षावर केली आहे. काँग्रेसला वसुली माफियांची चिंता करप्शनचा टँक भरण्यासाठी काँग्रेसने राज्यात वसुली माफियांचे एक नेटवर्कच तयार केल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला. इथले सरकार गेल्यास या माफियांचे काय होईल, याचीही चिंता काँग्रेसला सतावत आहे. २०१४ पूर्वी कोळसा, हेलिकॉप्टर, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा झाले आणि याच पैशातून काँग्रेसचे काळी कृत्ये सुरू असल्याचा आरोप करत मोदींनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.
  • Log in or register to post comments
झ
झेन Sun, 05/06/2018 - 04:53 नवीन
निवडणूकीपूर्वी कुठलाही पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री गोष्टी जाहीर करतो जसे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, १ रूपयात तांदूळ वगैरे ...हे सगळे भ्रष्टाचारात का मोडत नाही ? ईलेक्षन कमिशनला यात काही चुकीचे वाटत नाही का पावर नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 05/06/2018 - 06:45 नवीन
:) आश्वासने काय दिली जातात यावर पूर्ण नाही पण अंशातः तरी बंधन हवे , किमान कोड ऑफ कंडक्ट असावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
M
manguu@mail.com Sun, 05/06/2018 - 14:56 नवीन
मध्य प्रदेशचे भाजपा आमदार गोपाल परमार यांनी लव्ह जिहाद आणि बालविवाह याबाबत विचित्र विधान केलं आहे. बालविवाहांमुळे लव्ह जिहादच्या घटनांवर आळा बसेल असा अजब दावा त्यांनी केला आहे. उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच लव्ह जिहादला बळ मिळतं, उशिरा होणारे विवाह लव्ह जिहादला जबाबदार असल्याचं परमार म्हणाले. पूर्वी कमी वयातच मुलामुलींची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुलं-मुली चुकीच्या मार्गावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच लग्न ठरवलं जायचं. मात्र आता मुलं कोचिंग क्लासला जातात. तिकडे ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात,’ असं गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. ‘मुली अतिशय संवेदनशील असतात. त्यांना कोणी मदत करत असेल, तर त्या सहज फसतात. मग त्या त्यांचं नाव आणि त्यांची ओळख बदलण्यासाठी तयार होतात,’ असं परमार म्हणाले.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 05/06/2018 - 15:59 नवीन
कर्नाटकात भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांची प्रचारादरम्यान एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना येडियुरप्पा म्हणाले, की जे मतदार मतदान करणार नाहीत अशांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रांवर आणा आणि भाजपाला मत देण्यासाठी भाग पाडा, हे विधान येडियुरप्पांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/07/2018 - 07:44 नवीन
मंगू, अरे तो जोशात केलेले विधान असणार. मागे शरद पवारांनीही सभेत "एकदा गावात मतदान केलेत के मग शाई पुसा व मग परत येऊन मुंबईत मतदान करा.." असे आवाहन केले होते. http://www.dnaindia.com/mumbai/report-sharad-pawar-asks-voters-to-erase-ink-vote-twice-1971676
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 05/06/2018 - 18:28 नवीन
अलिबाग: इंटिरियर डिझायनर अन्वय मधुकर नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 'रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णब यांनी पैसे थकविल्यामुळे नाईक निराश होते त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं.  अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी आहे. शुक्रवारी ते अलिबाग जवळील कावीर येथे आपल्या घरी आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या नोकरांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं. नाईक यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा आदींनी पैसे थकविल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी या तिघांविरोधात नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाईक यांच्या ७३ वर्षीय आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 05/06/2018 - 20:07 नवीन
'शुक्रतारा' या गाजलेल्या भावगीताने मराठी रसिकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे दुःखद निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/07/2018 - 08:35 नवीन
रात्री ९.३० ला कलर्स वर "आपल मराठी बीग बॉस' नामक कार्यक्रम पाहण्यात आला. आतापर्यंत हिंदी बीग बॉस हा सर्वात भीकार कार्यक्रम आहे अशी समजून होती ती खोटी ठरली. उषा नाडकर्णी,अनिल थत्ते हे दोन सोडले तर बाकी सर्व नविन कलाकार दिसत होते. आपण एक सेलिब्रिटी आहोत व आपणास लाखो लोक ओळखतात अशी सर्वांची समजून असावी. हा अनिल थत्ते माझ्या आठवणीप्रमाणे पूर्वी गगनभेदी नामक साप्ताहिक की मासिक चालवायचा. रंगीबेरंगी कपडे,वेशभूषेत तो विदूषकासारखा न दिसतो तर नवल. ७२ वर्षीय दमा,डायबेटीसने त्रस्त असणार्या उषा नाडकर्णी नक्की येथे का आल्या हा प्रश्न पडतो. एकेमेकांच्या अंगावर धावून्,लाथा मारेपर्यंत ही मंडळी गेली. कोणत्याच चॅनेलवर काहीच पाहण्यासारखे नसेल तर हा कार्यक्रम पहावा. Image removed.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 05/07/2018 - 12:21 नवीन
काँग्रेसने किमान कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी कर्नाटकच्या जामखंडी येथे काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर कर्नाटकात आढळणा-या मुधोल कुत्र्यांकडून काँग्रेसने देशभक्ती शिकावी असा सल्ला मोदींनी दिला. उत्तर कर्नाटकमध्ये आढळणा-या मुधोल कुत्र्यांचा नुकताच भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुधोल कुत्रे म्हणजे शिकारी कुत्र्यांची एक जात आहे. भारतीय लष्करामध्ये सामील होणारी मुधोल ही भारतीय कुत्र्यांची पहिली प्रजाती आहे. उत्तर कर्नाटकच्या जामखंडी येथील बागलकोटमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत मोदी बोलत होते. ”ज्यांना देशभक्तीच्या नावाने त्रास होतो, देशभक्तीच्या चर्चेविरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, अशा सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला दुसऱ्याकडून शिकायचं नाही तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. मात्र, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा”. मोदी पुढे म्हणाले, ”मला माहितीये की त्यांना (काँग्रेस) खूप अहंकार आहे. देशातील लोकांनी त्यांना नाकारलंय. त्यामुळे मुधोल कुत्र्यांकडूनही ते काही शिकतील अशीही मला अपेक्षा नाही”. काँग्रेसचा दर्जा इतका खालावला आहे की, पक्षाचा एक नेता ‘भारत के टुकडे होंगे’ अशी नारेबाजी करणा-यांमध्ये गेला आणि त्यांना समर्थन दिलं असं मोदी म्हणाले. जेएनयूमधील देशविरोधी नारेबाजीच्या प्रकरणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जेएनयूच्या परिसरात गेले होते, त्यावरुन मोदींनी राहुल यांना हे खडेबोल सुनावले.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 05/07/2018 - 12:25 नवीन
विरोधी पक्षाला कुत्रा म्हणणे निषेधास्पद आहे. भारतविरोधी घोषणा jnu , up त दिल्या अशा वावड्या भाजप उठवत असते, पण ऑडिओ , व्हिडीओ फेक का निघतात ? एकालाही अटक का होत नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/07/2018 - 13:00 नवीन
मंगू, अरे ते त्यांना देशभक्ती शिकायला सांगत आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसचे माजी नेते एस.एम.कृष्णा भाजपात डेरेदाखल झाले. त्यांनी कोणाकडून देशभक्तीचे ट्रेनिंग घेतले हे मोदी/शहांनी सांगायला हवे. गेल्या महिन्यात अफझलपूर(कर्नाटक)चे आमदार मलिकय्या गुत्तेदार हे देखील काँग्रेसमधून भाजपात सामील झाले. त्याना कोठून ट्रेनिंग मिळाले हे देखील स्पष्ट व्हावे. Image removed. https://en.wikipedia.org/wiki/Malikayya_Venkayya_Guttedar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 05/07/2018 - 14:41 नवीन
कर्नाटकात पाच दिवसांनंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. आपल्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, आता हेच आरोप त्यांच्या अंगलट आले आहेत. कारण, सिद्धरामय्या यांनी भाजपाच्या या तीनही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. माफी मागा किंवा १०० कोटींची नुकसान भरपाई द्या असे सिद्धरामय्या यांनी नोटिशीत म्हटले आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 05/07/2018 - 17:39 नवीन
ते स्वामी म्हणाले की मी असल्या नोटिसा फाडून कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतो, मोदी शहांनी पण असेच करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड Mon, 05/07/2018 - 14:51 नवीन
ताज्या घडामोडी धाग्यावर टेनिस सोडून स्क्वॅश खेळणे सुरू झालेले दिसते आहे, ते ही सिंगल्स, उचलली रॅकेट का हाणला भिंतीवर टोला !!!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 05/07/2018 - 14:58 नवीन
विशेष सूचनेचा जास्तच धसका घेतलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ट
ट्रेड मार्क Mon, 05/07/2018 - 15:48 नवीन
याचे कारण म्हणजे फक्त एका पक्षाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांवर कारवाई होणार आहे, विरोधात बोलणाऱ्यांवर नाही. त्यामुळे मंगुजींची (आदराने उल्लेख करायला पाहिजे! उगाच कारवाई व्हायची) काळजी मिटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
M
manguu@mail.com Mon, 05/07/2018 - 16:24 नवीन
एका पक्षाच्या बाजूने बोलणे आणि विरोधी पक्षाच्या आयडी ना अपमानास्पद बोलणे सुचनेतील महत्वाचा भाग हा असेल असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ज
जेम्स वांड Mon, 05/07/2018 - 16:26 नवीन
मंगुल्या वर्मावर बोट ठेऊन जातंय असं! म्हणून खूपसे वर्माजी लोक चिडून असतात त्याच्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड Mon, 05/07/2018 - 16:24 नवीन
कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन बोलायलाही मनाई हुकूम बजावण्यात आलेला नाहीये, तर हिरीरीने बाजू लढवल्यावर जर प्रश्न शंका वगैरे आल्या तर त्यांना शांतपणे प्रश्नकर्त्याची हुर्यो न उडवता उत्तरे न देणाऱ्याकरता ती सूचना आहे, संबंधितांना मंगुचा सतत पाणउतारा करणे, त्याला काहीबाही बोलणे हा धंदा थोडक्यात बंद पडलाय जणू. मंगुल्या आहे थोडा डॅम्बीस , पण पक्षीय राजकारणावर बोलतो, मुसलमानांची बाजू लढवतो, कोणावर वैयक्तिक झालेला दिसला तर दाखवा मंगुल्याचा पण उद्धार करून टाकू, हाकानाका तेवढं विकटीम कार्ड खेळून मिपा मालक अन चालकांवर अन्याय करीत भलते सलते आरोप करू नका, ही नम्र विनंती. आजवर जे वाटेल ते बोलायचा पास मिळाल्यावाणी बडबडत असत त्यांना फक्त आपण बोलतो त्याची उत्तरे द्यावी लागतील, अन कोणावरही हेटाळणी युक्त कॉमेंट्स करता येणार नाही इतकं फक्त सूचना म्हणते, वैयक्तिक बोलणाऱ्या कुठल्याही पार्टी समर्थकांस ते समसमान लागू होतंय. मिपा प्रशासन आम्ही तुमच्या मताला सहमत आहोत अन तुमच्या अभिनंदनीय कार्याचे आम्हाला कौतुक वाटते (रामशास्त्री मोड ऑन) वांडो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा