ताज्या घडामोडी - भाग ३२
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय.
राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का?
आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार
यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.
२०१४ काही इ.स पूर्व वगैरे नाहीयेम्हणून तर तसा डेटा मिळवणं फारसं अवघड नसावं!सरकार कोणतेही असो त्याने लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत ही अपेक्षा आहे.हित हे सापेक्ष आहे. अगदी ज्वलंत उदाहरण द्यायचं तर ट्रिपल तलाकवर बंदी मुस्लिम स्त्रियांना हितकारक आहे पण पुरुषांना अहितकारक वाटतेय. आरक्षण हे ज्यांना मिळतंय त्यांना हितकारक वाटतंय पण ज्यांना नाही मिळत त्यांना.... तर या केस मध्ये एका उद्योगसमूहानं साखर आयात केली आहे. ती कधी आणि कोणत्या परिस्थितीत केली, तसेच स्थानिक साखर न घेता आयात खर्च करून बाहेरून, त्यातून पाकिस्तान कडूनच, का घेतली याची कारणमीमांसा करण्याइतका डेटाच उपलब्ध नाहीये. पण आरडाओरडा मात्र सरकारने आयात केली असा होतोय. हा तुमचाच प्रतिसाद बघा.