राजकारण

ताज्या घडामोडी- डिसेंबर २०२१

Primary tabs

नमस्कार मंडळी,

नोव्हेंबर महिन्यातील ताज्या घडामोडींच्या धाग्याच्या गाभ्यात भविष्यात तृणमूल काँग्रेस विरूध्द काँग्रेस हा छुपा किंवा उघड संघर्ष होईल असे म्हटले होते. तसे होताना काही प्रमाणात दिसत आहे. मागच्या आठवड्यात ममता बॅनर्जी दिल्लीला गेलेल्या असताना सोनिया गांधींना भेटणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर- "मी कशाला सोनियांना भेटू? दिल्लीला आल्यावर सगळ्यांनी सोनियांना भेटलेच पाहिजे असा नियम आहे का?" असे उलटे प्रश्न ममतांनी पत्रकारांना विचारले. तसेच राज्यसभेत १२ विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खार्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला तृणमूलचा कोणी प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.

त्याप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुका ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत असे दिसते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यानंतर गोव्यात ममतांनी पोस्टर-फ्लेक्सचा धुमधडाका लावला आहे अशा बातम्या आहेत. मागच्या महिन्यात त्या गोवा भेटीला गेल्याही होत्या. तेव्हा विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी तृणमूल आघाडी करायचे संकेत मिळाले होते. पण गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आपल्या पक्षाच्या अन्य दोन आमदारांसह काल दिल्लीत राहुल गांधींना भेटले आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-गोवा फॉरवर्ड ही आघाडी होणार असल्याची घोषणा झाली. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत तसेच कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडुरावही उपस्थित होते.

1

ममतांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांना आघाडीत इतरांबरोबर जुळवून घेणे वगैरे प्रकार जमतील असे वाटत नाही. आपले म्हणणे ऐकून घेणारे मित्रपक्ष मिळाल्यास त्याला ममतांची ना असेल असे वाटत नाही पण आघाडीचा धर्म वगैरे गोष्टी त्यांना झेपणार्‍यातला आहेत असे वाटत नाही. काल त्यांनी मुंबईत येऊन शिवसेना नेत्यांचीही भेट घेतली. शिवसेना-तृणमूल आघाडी झाली तरी त्यामुळे फार फरक पडणार्‍यातला नाही. शिवसेनेचे बंगालमध्ये बळ शून्य आणि तृणमूलचे महाराष्ट्रातील बळ शून्य. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले तरी त्यामुळे फार काही फरक पडेल असे नाही. २०२४ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली तरी त्यात काँग्रेस नसेल तर ती आघाडी मोदींना आव्हान देण्याइतकी सक्षम नसेल हे पूर्वीच लिहिले आहे. अशी आघाडी झाली तरी त्यात राज्यपातळीवरील पक्षांची आघाडी असेल. पण हे नेते आणि हे पक्ष त्या त्या राज्यात मते फिरवू शकले तरी राज्याबाहेर त्यांची ताकद शून्य आहे. उदाहरणार्थ द्रमुकचे स्टालिन किंवा देवेगौडा उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे राज्यात दहा मते तरी प्रभावित करू शकतील का? बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर ममतांना विरोधी पक्षांचे नेतृत्व करायची स्वप्ने पडायला लागलेली आहेत असे दिसते आणि त्या मार्गात काँग्रेसचा अडसर त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. लुईझिनो फालेरो, मुकुल संगमा वगैरे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. ममतांनी अधिक आक्रमक नेतृत्व दिल्यास इतरही काही काँग्रेस नेते तृणमूलमध्ये जाऊ शकतील. बहुतेक ही गोष्ट लक्षात आल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसही परिस्थिती सावरायच्या मागे लागलेले दिसत आहेत असे वरकरणी वाटते. बघू पुढे काय होते ते.

गोव्यात कालपासून काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

१. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. ही आश्चर्याची गोष्ट आहे. या युतीतून तृणमूलला भरपूर फायदा झाला तरी मगोपला काय फायदा होणार आहे समजले नाही. मगोपचे वैभवाचे दिवस खूप पूर्वीच मागे पडले आहेत. पक्षाने शेवटची विधानसभा निवडणुक तब्बल ४४ वर्षांपूर्वी म्हणजे १९७७ मध्ये जिंकली होती. नंतरच्या काळात पक्षाची बरीच पडझड झाली तरी पक्षाला पूर्ण राज्यात ११% म्हणजे बर्‍यापैकी मते मिळतात. पक्षाचा बराचसा मतदारवर्ग भाजपकडे गेला आहे तरी पक्षाचा स्वतःचा निष्ठावान मतदार आहे. काही मतदारसंघांमध्ये पक्षाला २०% पेक्षा जास्त मते मिळतात. त्याउलट तृणमूलचा गोव्यात स्वतःचा आधार काहीही नाही. असे म्हटले जात आहे की तृणमूल ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे वळवायचा प्रयत्न करत आहे. पूर्वी युनायटेड गोवन्स डेमॉक्रॅटिक पार्टी हा ख्रिश्चनांचा पक्ष होता. तो पक्ष जशी ख्रिश्चनांची बर्‍यापैकी मते घ्यायचा तशी घ्यायचा तृणमूलचा प्रयत्न असेल. जरी या दोन मतपेढ्या एकमेकांशी सुसंगत नसल्या तरी युती केल्याने दुसर्‍या गटाची मते आपल्याला मिळतील ही ही अपेक्षा आणि प्रयत्न असेल. तरीही या युतीतून मगोपपेक्षा तृणमूलचा फायदा होईल ही शक्यता जास्त. भाजप सरकारला १० वर्षांच्या अ‍ॅन्टी इन्कबन्सीचा सामना करावा लागत आहे. अशावेळेस भाजपच्या विरोधात जाणारी पण काँग्रेसकडे न जाणारी मते आपल्याकडे वळवायचा या युतीचा प्रयत्न असेल असे दिसते.

२. गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे आणि ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये गेल्यावर काँग्रेसकडे केवळ माजी मुख्यमंत्रीच आमदार बाकी राहिले होते. त्यात दिगंबर कामत, लुईझिनो फालेरो, रवी नाईक आणि प्रतापसिंग राणे हेच चार माजी मुख्यमंत्री राहिले. त्यापैकी लुईझिनो फालेरो आधीच तृणमूलमध्ये गेले आहेत. प्रतापसिंग राणे ८० च्या घरात असल्याने ते निवडणुक लढवतील ही शक्यता कमी. रवी नाईक पण पक्ष सोडून गेल्यावर काँग्रेसकडे दिगंबर कामत हेच राहतील.

गोव्यात पक्षांतरे करणे ही अगदी नेहमी घडणारी घटना आहे. मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर वगैरे मुळचे संघाचे असलेले नेते कायम भाजपमध्ये राहिले. पण बाकी सगळे नेते कधीनाकधी पक्षांतर केलेले आहेत. दिगंबर कामत पूर्वी काँग्रेस मग भाजप मग परत काँग्रेस, प्रतापसिंग राणे मगोपमधून काँग्रेस, रवी नाईक मगोपमधून काँग्रेस मग भाजप मग परत काँग्रेस आणि आता परत भाजप असा प्रवास करत आहेत (ते २००२ मध्ये पर्रीकरांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री होते). गोव्यात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्या रमाकांत खलप यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही मगोपमधून काँग्रेस असे पक्षांतर केले होते. एकूणच सगळे चित्र फार उत्साहवर्धक नाही.

जेम्स वांड

प्रकृती गंभीर म्हणले आहे, मृत्यू नक्की झालेत का ?

Trump

अजुन बातम्या येतच आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या आहेत.
पण ४ मृत्यू बहुतेक सर्वच ठिकाणी आहेत.

कलम ३७० हटवल्यापासून एकाही काश्मिरी पंडिताचं वा हिंदूचं विस्थापन नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती

https://www.loksatta.com/desh-videsh/366-terrorists-and-96-civilians-ki…

भाजप हा एकमात्र हिंदू हितवादी पक्ष आहे, असेच वाटायला लागले आहे...

शाम भागवत

अरे काय हे?
चक्क तिसरे पान सुरू झाले तरी नवीन धागा कसा काय काढला नाही?
:)

जेम्स वांड

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल विपीन रावत ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मदनबाण

सर्जिकल स्ट्राईक करुन नापाकिस्तानच्या छाताडात धडकी भरवणारे जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाले आहेत. जानेवारी २०२० मध्ये तैवानचे लष्करप्रमुखही असेच हेलिकॉप्टर अपघातात मारले गेले होते. https://www.bbc.com/news/world-asia-50970369 तैवानचे आणि चीनचे संबंध नक्की कसे आहेत हे वेगळे सांगायलाच नको. चीन आपल्याही भूमीवर दावा सांगत आहे. मधूनमधून चीनी सैन्य भारतात घुसल्याच्या बातम्या येत असतात. चीन्यांबरोबर गलवान खोर्‍यात दीड वर्षापूर्वी मोठी चकमक झाली होती. तेव्हा या घटनेमागे चीन आहे का हा प्रश्न विचारणारा व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड बघितला. शक्यता नाकारता येणार नाही.

Trump

चंद्रसूर्यकुमार, वेगळा धागा काढा.
खुप धक्कादायक बातमी आहे. माहीती जमवायला हवी.

मदनबाण

#COMMENTThis view is like suspecting the US played a role in the crash because India and Russia are moving forward with the delivery of a Russian S-400 missile defense system, which the US strongly opposed. @Chellaney pic.twitter.com/cGgEhNrukT— Global Times (@globaltimesnews) December 8, 2021

व्हॉट्सअ‍ॅपवर एक हेलिकॉप्टर क्रॅश होतानचा व्हिडियो व्हायरल केला आहे. तो या अपघाताच वाटत नाही,पण अशी कृती कोणी या घटकेला का केली असेल ?

मदनबाण.....

मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ज़िंदगी की दौड़ मे कच्चा रह गया,नही सीखा फ़रेब बच्चा रह गया।

lakhu risbud

दृश्यमानता एकदम कमी असतानाही जनरल रावत आणि त्यांचा जवळपास सगळा महत्वाचा स्टाफ यांना या उड्डाणासाठी परवानगी कशी दिली गेली ?
त्या हेलिकॉप्टर ला दोन इंजिने असतात,ते जगातील सर्वात सुरक्षित अशा हेलिकॉप्टर पैकी एक मानले जाते.तरीही अपघात झालाय असे सांगण्यात येते.

घातपाताची शक्यता जास्त वाटत आहे.

गामा पैलवान

रशियन बनावटीची मिग विमानं म्हणजे उडत्या शवपेटिका होत्या. या नवीन हेलिकॉप्टर अपघाताने रशियन बनावटीवर ठळक प्रश्नचिन्ह लागलं आहे. नुकतीच भारताने एस-४०० ही क्षेपणास्त्रप्रणाली खरेदी केली. तिच्या गुणवत्तेवरही शंका उपस्थित होणार.

-गा.पै.

मानवी चूकही असू शकते. मिलिटरी आणि सरकार नक्कीच चौकशी करेल. Mig 21 विमाने मात्र नक्कीच उडत्या शवपेट्या आहेत. पण ती 1960 साली पहिल्यांदा तयार झालेली आहेत आणि सध्याच्या काळात ती उपयोगी नाहीत. त्यामुळे दोष फक्त विमानाचा नसून आत्ताच्या काळात आपल्याला ती जबरदस्तीने वापरावी लागतात ह्याचा आहे. परंतु आत्ता अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आणि S400 क्षेपणास्त्रप्रणाली मात्र अत्याधुनिक आहे. पण पुढील ५०-६० वर्षात हे दोन्ही पण निरुपयोगी असतील.

गामा पैलवान

लेनिन व स्टालिनच्या काळी सोव्हियेत तंत्रज्ञानावर अमेरिकेचा जबरदस्त प्रभाव पडला होता. आजही तसाच प्रकार रशियन तंत्रज्ञानावरही पडलेला असोउ शकतो. अशा वेळेस रशियन तंत्रावर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्नंच आहे. शेवटी, भारताला स्वदेशी तंत्राशिवाय पर्याय नाही.

-गा.पै.

हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या वसीम रिझवींना जीवे मारण्याची धमकी; शीर धडावेगळं करणाऱ्याला काँग्रेस नेते लाखोंचं बक्षीस देणार

-------
https://www.loksatta.com/desh-videsh/issue-is-disrespect-of-islam-congr…

--------

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे ....

अर्थात, आमच्या सारख्या अशिक्षित माणसांना जे समजते, ते घराणेशाहीची पुजा करणार्या, सुशिक्षित जनतेला समजेलच असे नाही...

भाजपाला देशात ऐक्य नको आहे हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वीच सांगितले होते, आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी लक्षात आले – संजय राऊत

https://www.loksatta.com/mumbai/sharad-pawar-25-years-ago-said-bjp-does…

काय सांगता?

म्हाडाची आज होणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द करण्याचा आली आहे. जीतेंद्र आव्हाडांनी रात्री २ वाजता ट्विट करून ही माहिती दिली. आरोग्य विभागाची परीक्षा अशीच 2 वेळा रद्द करूनही तिसऱ्यांदा जेव्हा झाली त्यावेळी पेपर फुटला होता. म्हाडा ची आजची परीक्षा आत्तापर्यंत पुढे दोन वेळा पुढे ढकललेली आहे.

घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचं जंगी स्वागत; विमानातून फुलांचा वर्षाव
नीट समजले नाही. विमानातून असा एखाद्या वस्तूचा वर्षाव करता येतो काय ? साधारण असे करण्यासाठी किती खर्च येत असेल ?

सुक्या

छान आहे ..
विमानातुन वर्षाव करण्याईतपत पैसा आहे शेतकर्‍यांकडे. आत त्यांनी उगा वीज बिल माफी / कर्ज माफी वगेरे वगेरे फालतु मागण्या करु नये.
शेतीतुन बक्कळ पैसा कमवावा .. फोर्चुनर घ्यावी .. उगा रडगाणे गाउ नये.

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-rokhtok-congr…

बुधवारी 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी भेटलो. ‘‘तुम्ही सध्या इथेच राहता?’’ यावर प्रियंका म्हणाल्या, ‘‘सध्याच्या मोदी सरकारने मला घरातून बाहेर काढल्यापासून मी खान मार्केटजवळच्या एका इमारतीत राहते, पण लोकांना तेथे भेटता येत नाही. त्यामुळे येथे येऊन भेटीगाठी घेते.’’ इंदिरा गांधींची नात, पंडित नेहरूंची पणती, राजीव गांधींची कन्या मला हे सर्व सांगत होती. तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली. जिची आजी आणि पिता अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले त्या कन्येस सुरक्षेच्या कारणास्तव एक सरकारी घर भाजप सरकार देऊ शकले नाही. उलट राहत्या घरातून बाहेर काढले.

---------
गांधी घराण्याला, अजून किती घरे हवी आहेत?

'शरद पवारांनी मुस्लिमांना आरक्षण दिलं, भाजपने ते रोखलं' - नवाब मलिक

https://www.esakal.com/maharashtra/nawab-malik-said-that-sharad-pawar-g…

ह्या माहिती बद्दल धन्यवाद....

बाय द वे, "जिझिया कर", ह्या बद्दल उदारमतवादी हिंदूंचे काय मत आहे?

https://streams7news.com/maharashtra/foreign-liquor-became-cheaper-50-r…

--------

इंधनावरील कर कमी केले नाहीत तरी चालेल, पण दारू मात्र स्वस्त व्हायला हवीच... असेही काही लोकांचे म्हणणे असेलच...

फ्रान्स मधली राणी पण म्हणाली होतीच की, "ब्रेड नसेल तर केक खा..."

बरं झालं की, मी जास्त शिकलो नाही...

दुसर्याने केले की नावे ठेवायची ....

कितीतरी हिंदूंची कत्तल करणार्या, टिपू सुलतान जयंती साजरी करण्यापेक्षा, भाजप नक्कीच उत्तम....

प्रदीप

तसे असलेच तर त्यात गैर काय आहे?

आणि एव्हढच नव्हे, त्यांनी तेथे केलेल्या भाषणात, छ्त्रपति शिवाजी महाराजांचेही नाव घेतले. ते बहुधा महाराष्ट्रांत पुढील काही वर्षांनी होऊ घातलेल्या निवडनूकांवर डोळा ठेऊन केले असावे, नाही?

अलिकडेच अरविंद केजरीवालांच्या हिंदू उड्या पहायच्या आहेत काय? आणि खुळचट राहूल व प्रियांका गांधींचे हिंदूचाळे?

ही दोन्ही व्यक्तीमत्वे, परमपूज्य आहेत... घराणेशाहीचे पाईक, ह्यांनाच नेते मानतात.....

केवळ, गांधी घराण्यात जन्माला आले, इतकीच यांची पुण्याई...

ज्याला धड, विश्वेश्वरैया म्हणता येत नाही,

कुंभारामच्या ऐवजी कुंभकर्ण म्हणतात

धड आकडेमोड येत नाही, ढाई हजार पाच सौ क्विंटल, हा नविनच आकडा दिला आहे

अशिक्षित माणूस असल्याने, मी तरी घराणेशाही टाळतोच

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली...

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/central-board-for-…

-----

अतिशय उत्तम निर्णय... कारण तसेही हे सरकार ढकलंपंची करत आहेच की .....

कपिलमुनी

नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.

मुस्लिम आरक्षण द्या, MIM महापालिका निवडणूक लढणार नाही, खा. जलील यांची ठाकरे सरकारला मोठी ऑफर

------
https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/give-muslim-reserva…

सरकारने अजूनही मुस्लिम आरक्षण जाहीर केलं नाही तर, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्ही विधानभवनावर धरणे आंदोलन करू, असा इशारा जलील यांनी दिला आहे.

निनाद

चीनची एव्हरग्रांदे शेवटी दिवाळखोरीत गेली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.
चीनमधील गुंतवणुकीची समस्या केवळ चायना एव्हरग्रांदे ग्रुपपुरती मर्यादित नाही. संपूर्ण चिनी रिअल इस्टेट क्षेत्र संकटात सापडले आहे असे मानले जाते. चीनमधील रिअल इस्टेटचा बबल कदाचित फुटण्याच्या क्षणावर आला असावा.

निनाद

मल्याळी चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी घर वापसी केली आहे. त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर काही धर्माच्या लोकांनी असंवेदनशील टिप्पण्या आणि प्रतिक्रियांमुळे ते संतप्त झाले. अली अकबर आणि त्यांची पत्नी लुसियाम्मा यांनी घोषणा केली की ते इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. हे मल्याळी चित्रपट दिग्दर्शक आता राम सिंह नावानी ओळखले जाणार आहेत.

निलंबित खासदारांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी आंदोलनस्थळी; गळाभेट घेत संजय राऊत म्हणाले, “आप…”

https://www.loksatta.com/desh-videsh/aap-aaye-bahaar-aayi-says-sanjay-r…

आजपर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता”, असं ते म्हणाले.
--------

माझ्या दृष्टीने, आणीबाणी जाहीर करणे, ही लोकशाही न्हवती

बाय द वे,

महाराष्ट्र राज्यात, काही आमदारांना पण, कधी तरी, निलंबित केले असेलच.....

अनन्त अवधुत

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूकीत भाजपने ६ पैकी ४ जागा मिळवल्या आहेत.
नंदुरबार - धुळे (१ जागा- भाजप), कोल्हापुर (१- काँग्रेस), बृहन्मुंबई (२ (१ भाजप, १ शिवसेना)) मतदारसंघात बिनविरोध निवडणूक झाली.

अकोला-बुलढाणा- वाशिम (१) आणि नागपुर (१), या दोन जागांवर मात्र मविआ वि. भाजप निवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला.

निनाद

१३ डिसेंबर रोजी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भैरव मंदिरात प्रार्थना केली, काशी विश्वनाथ मंदिरात संकल्प घेतला. आता ज्ञानवापी मंदिराची विहीर आता मंदिर संकुलात आली आहे. आता औरंजेबाने ज्ञानवापी मंदिर पाडून तेथे उभारलेली मशीद हटवून ज्ञानवापी मंदिराचे जीर्णोद्धार कार्य त्यांनी हाती घेतले पाहिजे.

निनाद

प्रत्येक कृतीचे परिणाम असतात आणि त्यासाठी तयार राहावे लागते. फॅबिंडियाच्या सध्याच्या परिस्थितीत हा कोट अगदी चपखल बसतो . कपड्यांच्या ब्रँडच्या महसुलात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याची नोंद आहे. फॅबिंडियाने चुकीच्या जाहिराती दिवाळीत दाखवण्याचा फटका बसला आहे.

Trump

हि माहिती कोठे मिळाली तुम्हाला?

मोदींच्या 'औरंगजेब-शिवाजी' वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं धारेवर...

https://www.esakal.com/desh/supriya-sule-took-the-government-by-storm-o…

थोडक्यात सांगायचे तर, एका स्त्रीला, हरामखोर म्हटले तरी चालेल, चुतिया हा अपशब्द जाहीर रित्या उच्चारला तरी चालेल, पण कायदेशीर मार्गाने कारवाई केली की मात्र, हिंदू हितवादी भाजपला
जबाबदार धरायचे....

बरे झाले की मी घराणेशाहीचा गुलाम पण नाही आणि भरपूर शिकलेलो पण नाही ....

जेम्स वांड

.

ही अजून एक बातमी आली आहे बघा. एकंदरीत मी तुमच्यापेक्षा थोडा जास्त सुशिक्षित असलो तरी मला अशिक्षित समजायला हरकत नाही कारण घराणेशाही मलाही आऊट ऑफ सिलेबस वाटते, पण तुमच्या अडाणीपणाचे प्रखर तेज पाहता ह्या मॅटरमधील खाचाखोचा आपण मला उत्तमरीत्या समजवून सांगाल अशी आशा अन विनंती करतो.

समजा हाच वाझे म्हणाला की मी मनसुख हिरेन ची हत्या केलीच नाही तर खरं मानुन सोडायचा का त्याला?

जेम्स वांड

तुमच्यालेखी सगळ्या कोर्ट प्रोसिजर सरधोपट एकाच साच्यातून काढलेल्या असतात का ? चांदीवाल आयोगासमोर असलेली केस एक आहे, अश्या अनेक केसेस आहेत, मनसुख हिरेन केस चांदीवाल आयोगासमोर इन हियरिंग आहे का ? आयोग का स्थापन होतो ? सेक्शन ३०२ आयपीसी सह सेक्शन ३४ आयपीसी आणि चांदीवाल आयोगासमोर सुरू असलेल्या केसचा तुलनात्मक अभ्यास तुमचा भरपूरच झालेला दिसतोय तेव्हा जमल्यास वरील प्रश्नांची कायद्याच्या चौकटीतली उत्तरे देता आली तर पहा बुआ सर आपण.

टीप - चांदीवाल आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणी बद्दलच बोलणे झाले ह्या संदर्भात तर बरे होईल.