Welcome to misalpav.com

जीवनगाणे - ३

लेखक: सुधीर कांदळकर | प्रसिद्ध:
रोझलिंड फ्रॅंकलीन विज्ञानातल्या काही शोधांमुळे विज्ञानाला नवे परिमाण लाभले, नवे वळण मिळालेले आहे. दृष्टीच्या, पंचेंद्रियांच्या क्षमतेच्या मर्यादा मानवाच्या बुद्धीने ओलांडल्या आणि अजोड अशा कल्पनाशक्तीच्या, सर्जनशीलतेच्या जोरावर काही शोध लावले. खरे तर काही वेळा वैज्ञानिक सत्याचा शोध हा आंधळा आणि हत्ती या कथेतल्या आंधळ्यांच्या तर्कासारखा असतो. तरी मानवाने आपल्या अथांग प्रज्ञेच्या जोरावर हे शोध लावलेले आहेत. सूर्यकेंद्री विश्वाचे प्रारूप, न्यूटनचे गतीविषयक नियम, आईनस्टाईनचा व्यापक सापेक्षतेचा नियम, अणूच्या रचनेचे प्रारूप, क्वॉंटम सिद्धांत, ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.


चिकन कबाब

लेखक: आयुर्हित | प्रसिद्ध:
चिकन कबाब: चिकन कबाब झटपट साहित्य : २०० ग्राम बोनलेस चिकन(ब्रेस्ट)चे छोटे तुकडे, ताजे दही: ४ चमचे, अर्ध्या लिंबाचा रस, हळद: १ चमचा, तिखट: १/२ चमचा, गोडामसाला:१/२ चमचा धनेपूड: २ चमचे, मिरीपूड: पाव चमचा मीठ: अर्धा चमचा/ चवीप्रमाणे तेल: ३ चमचे


आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - अंतिम

लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे.


काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)

लेखक: सर्वसाक्षी | प्रसिद्ध:
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.


... तुझ्यासाठी बहर होते

लेखक: drsunilahirrao | प्रसिद्ध:
कुठे वस्ती न घर होते.. मला सारे शहर होते तुझ्यासाठी र्रुतू सारे,तुझ्यासाठी बहर होते दिला तू कोणता प्याला, फुटे हा प्राण म्रुत्यूला.. कळेना काय ते होते: दवा होती, जहर होते.. घरांचे बंद दरवाजे, कुणी माणूसही नाही.. सुन्या गावात म्रुत्यूचे किती वेडे कहर होते ! नको कोठेच अश्रूंना मिळू दे माझिया थारा तुझी दुःखे सुखी होती : तुझे अश्रू अमर होते जरा पाहून घे राणी र्रुतूंच्या जिर्ण तसबीरी कधी येथे फुले होती, कधी येथे भ्रमर होते अता मी वेचतो आहे तुझ्या विरहातले मोती मला स्मरते युगे होती ..तुझ्यासाठी प्रहर होते ! डॉ.सुनील अहिरराव


फावल्या वेळेतली फोटोग्राफी….

लेखक: मेघनाद | प्रसिद्ध:
खाली दिलेली सर्व छायाचित्रे ही मायक्रोमॅक्स A90s मोबाइल च्या ८ मेगापिक्सेल कॅमेरामधून टिपलेली आहेत. हि सर्व छायाचित्रे सर्व मिपा करांना दाखवण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून हा खटाटोप. काही छायाचित्र थोडीफार सुधारलेली आहेत. कलादालन श्रेणी मध्ये हा धागा टाकायचा बराच प्रयत्न केला पण काहीतरी समस्या येत होती म्हणून इथे प्रकाशित केला.


चिंता

लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
असाच आणखी एक प्रवास. रस्त्यावरचं गाव. नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे. माझं काम कधी वेळेत संपत नाही - कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात. ते तितकेच महत्त्वाचे असतात. त्यावर बोलत राहतो आम्ही. पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही. इथं काही मीटिंग वगैरे नाही. तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत. नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने. ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे. म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड. पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते.


संस्कृतचे अनोखे अभ्यासक

लेखक: मंदार दिलीप जोशी | प्रसिद्ध:
मागल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत. आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक.


पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?

लेखक: psajid | प्रसिद्ध:
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत. या गोष्टीने मनास फार दुःख होतंय. आज सगळीकडे पाश्चात दिवसांचे स्तोम माजले आहे, जिकडे पाहावे तिकडे - हा डे - तो डे ह्या इंग्रजी डे ने आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका अगदी भरून गेली आहे. आता त्या लोकांनी आपण आपल्या जन्मदात्या आईवर वर्षातल्या कोणत्या एका दिवशी ममता करायची, बापाला कोणत्या दिवशी आनंदात ठेवायचे हे ठरवायचे का काय ? त्या लोकांनी प्रेम करण्याचा सुध्दा एक दिवस ठरवून टाकला आहे म्हणे ! ज्याला आज सगळीकडे "व्हेलेण्टाईन डे " म्हणतात. जो उद्याच आहे.


आय लव्ह यू (२)......

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
मागील दुवा: आय लव्ह यू .....http://misalpav.com/node/26966 रश्मीचा अचानक फोन आला आणि मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या......... पुढे.
"ओक्के..... शुअर... बाय..... " अन तेच ते मस्त जीवघेणे स्माईल..... गोखले मास्तरांच्या क्लासमधे आज वसंत फूललाय. मस्त श्रावण बरसतोय....... शरदाचे चांदणे पसरलय. गोखलेसर " एच एफ ई./ एच आय ई, थॅरिस्टर , झीनर ब्रेकडाऊन करंट , करंट लिमीट " हे शिकवण्या ऐवजी ऐवजी एक बोट नाचवत "देवा कीती सुंदर आकाश सुंदर चांदणे चंद्र देई.सुंदर प्रकाश सूर्य देतो" शिकवताहेत. क्लास संपला.....