Welcome to misalpav.com

काही दिवसांनी "अरे चूप कर, आब रूलायेगा क्या?" असे म्हणायची वेळ येईल असे वाटते.

लेखक: विदेशी वचाळ | प्रसिद्ध:
आप ने केन्द्र सरकारवरच निशाना साधला हे काय वाचतो आहे मी. आप ने फ आई आर दाखल करून त्यात दोन केंद्रीय मंत्री आणी अंबानी साहेबांना गुंतावले आहे? काल पार्यंत आप च्या चळ्यांना माकड चाळे म्हणून मजेत पाहत होतो. आता वाटत आहे की माकडाच्या हातात कोलित दिले की काय? जवू देत म्हणा. अती झाले आणी हसू आले. पण व्यवस्था नीट लावायला निघालेली ही माणसे स्वताहा अगदीच अव्यवस्थित आहेत असे वाटते. निर्णया घेण्याचा घटनाडत्त अधिकार ज्या पदास आहे, त्या पदावरच्या व्यक्तीस असे कोर्टात खेचता येते का? आता आधीच गजबजलेल्या कोर्टात आणखीन केस येतील. मग मी तुला, तू त्याला आणी तो मला असे करत साखळी केस तयार होतील.


पुन्हा टोलचा घोळ!

लेखक: हुप्प्या | प्रसिद्ध:
राज ठाकरे पुण्यात गरजले ते निव्वळ टोलचा मुद्दा घेऊनच. त्या सभेचे कवित्व सभेच्या जागेपासून सुरु झाले होते. कुण्या वरिष्ठ राष्ट्रवादी नेत्याच्या मध्यस्थीमुळे सपचे पटांगण सभेला मिळाले अशी कुजबूज होती. सरकारी टाळक्यात नारळ हाणण्याची रांगडी भाषा केली गेली तरी शिवसेनेला असेच वाटते आहे की सरकारने फूस देऊन मनसेला हे खोटे अवसान आणायला सांगितले आहे. ह्यात काही अर्थ नाही असे शिवसेनेला वाटते. http://saamana.com/2014/February/11/agralekh.htm दुसरीकडे मनसेने मोठी आश्वासने देऊन काहीही केलेले नाही (विकासाची ब्लू प्रिंट वगैरे). निव्वळ उत्तम भाषणबाजी. त्यामुळे मनसेला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.


Autism - लक्षणे व Evaluation

लेखक: स्वमग्नता एकलकोंडेकर | प्रसिद्ध:
आधीचे लेख : पहिला लेख : Autism.. स्वमग्नता.. दुसरा लेख : ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये? पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.

खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).


काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)

लेखक: सर्वसाक्षी | प्रसिद्ध:
प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :) तर मंडळी, आम्ही पुढे सरकलो आणि लगोलग स्टेट बँकेच्या इमारतीला अडकलो. बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे ठिकाणी दिसणार्‍या दगडी इमारती मला अतिशय आवडतात. स्टेट बँक म्हणजे पूर्वीची ईंपिरियल बँक. ही बहुधा भारतातील सर्वात जुनी वाणीज्य बँक. स्टेट बॅंकेची स्थापना १९२१ सालची असली तरी तिचा उगम आहे तो १८०६ सालच्या बँक ऑफ कलकत्ता मध्ये. १९५५ साली राष्ट्रियीकरणात इंपिरियल बँक ऑफ ईंडिया चे नाव भारतिय स्टेट बँक - स्टेट बँक ऑफ ईंडिया असे झाले.


नवीन चारोळ्या

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
राख नदीत अर्पिली वाहत शेतात गेली तेथे बीज अंकुरले ऐसेच जीवन जगते. रेशमी कोशात शोधले मधाचे मोहोळ त्याने श्वास त्याचा कोंडला गुदमरून जीव गेला.


मन रे

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
मन रे धाव रोखुनी घे सरती मागे सोस वयाचे निजलेले ना अजुनी जागे रोज सकाळी सायंकाळी काळ सरकतो मागे मन रे धाव रोखुनी घे……. असलेले ओंजळीतले जग श्वास तयास लगडलेले बघ घे पिउनी अमृत भरलेले ते जितके तितकेच पुरेसे जगण्या अधिक न लागे मन रे धाव रोखुनी घे……. मरण अखेरी शून्य सोबती झुळुक वादळे येती जाती वातीविण तेवे ना पणती धर छाया कळवळते ज्योती व्यर्थ मानवी दंगे मन रे धाव रोखुनी घे……. ……………. अज्ञात


गणेशा मोड

लेखक: राजो | प्रसिद्ध:
मिसळपाव चा सभासद झाल्यापासून (वाचनमात्र असताना सुध्दा) अनेक लेखांच्या प्रतिसादांमधे "माझा गणेशा झालाय" आणि अशाच प्रकारचे कोड्यात पाडणार्‍या कमेंट्स असायच्या.. नंतर लक्षात आले कि गणेशा या आयडी ला लेखांमधील चित्रे दिसत नसत, त्यामुळे हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला आहे.


"यू अ‍ॅटीट्यूड" संकल्पनेकरीता मराठी शब्द हवा

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. "you attitude" सुयोग्य चपखल मराठी शब्द हवा आहे. सोबतच केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील जमलेतर भारतीय सांस्कृतीक आणि मराठी भाषेच्या भाषिक अंगाने सुद्धा "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" संवाद कौशल्य या बाबत अधिक चर्चा करावयाची झाल्यास हरकत नाही.


"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास......

लेखक: psajid | प्रसिद्ध:
मी.पा. च्या दिवाळी अंकामध्ये शिवोssहम यांनी "तालीम" ही खूप चांगली कथा लिहली. एकेकाळी राजाश्रय मिळालेल्या या उपेक्षित कुस्ती प्रकाराबद्दल त्यांनी खूप चांगले लिहून पुन्हा ते सोनेरी क्षण डोळ्यापुढे उभे केले. आजही "महाराष्ट्र केसरी" "हिंद केसरी" या सारख्या स्पर्धा इथे भरतात. यातील "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न ! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन हि संस्था मामासाहेब मोहोऴ यांनी स्थापन करून ''महाराष्ट्र केसरी '' या कुस्तीक्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली.१९५३ साली हे अधिवेशन सुरु झाले.