Welcome to misalpav.com

मोबाईल वाली ती/ शतशब्द कथा

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
रस्त्याच्या काठावर एका झाडाखाली बेंच वर बसलो होतो. येणारी-जाणारी *हरियाली निहारीत डोळ्यांना तृप्त करत होतो. तेव्हड्यात तिच्याकडे लक्ष गेलं. कानात हेडफोन, हातवारे करीत कुणाशी गुलगुल बोलत होती. निरखून बघितले ती गुलाबाच्या कळी सारखी सुंदर दिसत होती. बोलताना सारखी हसत आणि खिदळत होती. प्रेमाचा रंग तिच्या गालावर खुलून दिसत होता. रस्त्याच्या पलीकडे तिचा प्रियकर असावा. कदाचित त्याचाच स्वप्नात दंग, ट्रफिकची चिंता न बाळगत बेपर्वा ती तिच्याच धुंदीत रस्ता पार करू लागली. अरररे... अचानक मी किंचाळलों. डोळे बंद केले. क्षणभर शांतता, मगच एकच गदारोळ.


भविष्य

लेखक: drsunilahirrao | प्रसिद्ध:
कुठूनतरी सरकावी वाळू, भुकंपासारखी धसावी जमीन आतल्याआत. सार्या आसमंताने ढुंगण हलल्यासारखे हेलकावे द्यावे.


कॉस्ट कटिंग

लेखक: अत्रन्गि पाउस | प्रसिद्ध:
कॉस्ट कटिंग हा एक परवलीचा शब्द झालाय सगळीकडे. अनावश्यक खर्च कमी करावेत हे खरंच आणि अनुत्पादक खर्च कमी = नफ्यात वाढ हा ढोबळ अर्थ मला मान्य आहे. पण त्याचा सरसकट वापर आणि मूर्ख अंमलबजावणी वर चर्चा हा ह्या धाग्याचा उद्देश. (सगळ्यात महत्वाचे : हे सगळे जेव्हा भारतीय लोकं भारतीय लोकांसाठी करतात तेव्हा हि पार्श्वभूमी) तथापि कॉस्ट कटिंग at what cost असा एक प्रश्न आहे .. उदा : १.


मटार कचोरि

लेखक: आरोही | प्रसिद्ध:
matar kachori साहित्यः १ कप मैदा १/४ कप तेल चवीपुरते मिठ ३/४ ते १ कप हिरवे मटार फोडणीसाठी १ टेस्पून तेल + १/४ टीस्पून हळद ओवा, १ इंच आले ७-८ लसुन पाकळ्या आणि ४ हिरव्या मिरच्या ठेचून. कृती: मैद्या मध्ये थंड तेलाचे मोहन घालून मीठ ,ओवा आणि पाणी घालून घट्टसर माळून घ्या आणि काही वेळ झाकून ठेवा . मिक्सर मध्ये मटार थोडे जाडसर भरडून घ्या. आता एका भांड्यात थोडे ते घालून त्यात आल लसुन मिरची तेच टाका ,मग हळद आणि शेवटी भरडलेले मटार टाका.


ढोल पुण्याचा वाजतो...

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
पुणेरी ढोल म्हटलं की कान न टवकारणारी माणसं क्वचितच भेटतील. त्यातून पुण्यात, ठाण्यात, डोंबिवलीत वगैरे तर नाहीच. त्याची मजा काय आहे, बाज काय आहे, तो रोमांच काय आहे हे अनेकांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पणे अनुभवलं असेल. विशेषतः गणपतीच्या दिवसात तर अ़ख्खं पुणं ढोल ताशांनी निनादत असतं. तीन वर्षांपूर्वी मी एक दिवस पुण्यावरून ठाण्याकडे येत होतो. अनंत चतुर्दशी चा दिवस होता. स्वारगेटवरून शिवनेरी पकडली होती आणि खिडकीतून ढगाळलेलं संध्याकाळचं आकाश बघता बघता माझा डोळा लागला होता. आणि मग जाग आली ती जाणवणा-या कंपनांमुळे. बसच्या काचेला, सीटला, आणि माझ्या छातीत एक तालबद्ध कंपनं जाणवायला लागली आणि मला जाग आली.


देव आनंद

लेखक: मंदार दिलीप जोशी | प्रसिद्ध:
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------


लांगूल चालनाची हद्द!

लेखक: उडन खटोला | प्रसिद्ध:
दहशतवादाला प्रोत्साहन देणारा एक घातक आणि विषारी निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. देशात मुस्लिम समुदायाचे जे आरोपी दहशतवादाच्या गुन्ह्यात दोष नसताना पकडले गेले असतील, त्यांच्यासाठी खास विशेष न्यायालये स्थापन करण्याचा हा निर्णय आहे. कसाब आणि अफजल गुरूला अनेक वर्षे बिर्याणी खाऊ घातल्यानंतर जनमताच्या रेट्यामुळे सरकारने त्यांना फासावर लटकविले. आता मुस्लिम गुन्हेगार वेगळे करून त्यांची सुटका सरकारच करणार आहे.


ऑरेंज लिक्युअर केक

लेखक: स्वाती दिनेश | प्रसिद्ध:
. साहित्य- २५० ग्राम साखर,५ अंडी,२५० ग्राम बटर/मार्गारिन, २ चमचे ऑरेंज इसेन्स, २०० मिली ऑरेंज लिक्युअर ,१ चहाचा चमचाभर ऑरेंज कलर (ऑप्शनल) १५० ग्राम मैदा,१०० ग्राम पोटॅटो स्टार्च/कॉर्न स्टार्च/आरारुट, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ कृती- साखर,अंडी, ऑरेंज इसेन्स एकत्र करणे व भरपूर फेटणे. त्या मिश्रणात २०० मिली ऑरेंज लिक्युअर घालणे व फेटणे.


मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे. ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल. तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा. नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.


कै. भाऊसाहेब पाटणकर

लेखक: शरद | प्रसिद्ध:
श्री. भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरील लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी भाउसाहेबांचा पहिला शेर-ओ-शायरीच्या वाचनाचा कार्यक्रम पुण्यात साहित्य परिषदेच्या सभागृहात झाला. प्रा. क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. आम्ही २५-३० ऐकावयास. काय बहार आली. सर्वजण मंत्रमुग्ध. पण वाहवा म्हणावयास आम्ही पोरेच. थोडे ज्येष्ठ खुश होते पण दाद देण्यास थोडे मागेच. लगेच दुसर्‍या दिवशी शोधून "मराठी शायरी" मिळवळी. बहुतेक दुकानदारांना पुस्तकाचे नावच माहीत नव्हते.. वाचून झाल्यावर लगेच परत जाऊन १२ रु. खर्च केले व ४ प्रती विकत घेऊन मित्रांना वाटल्या. नच तरी माझी प्रत नाहिशी होणार होतीच.