Welcome to misalpav.com

आत्मूबाबा स्माईलीवाले बाबांच्या आश्रमात

लेखक: सू डोकू | प्रसिद्ध:
‘आत्मूबाबा स्माईलीवाले’ या नावाच्या पाटीची तीनदा खात्री करुन आम्ही त्या आश्रमात शिरलो. आतील वातावरण टिपीकल म्हणजे सर्वच आश्रमात असते तसे आध्यात्मिक, सुवासिक वासाने भारावलेले आणि प्रसन्न होते. समोरच बाबा प्रशस्त अशा लाकडी व्यासपीठावर मांडी घालून बसलेले होते. गौरवर्ण, फिकट भगव्या रंगाची सॅटीनची कफनी, खाली त्याच रंगाची लुंगी, हातात गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, भाळी चंदनाचा लेप, त्यावर मध्यभागी केशरी टिळा असे दृष्ट लागण्यासारखे तेजस्वी रुप. त्यांच्या पुढ्यात लॅपटॉप होता, आणि त्यावर ते काहीतरी टंकण्यात मग्न होते. आम्ही त्यांच्या शेजारी एका बाजूला जाऊन उभे राहिलो.


मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:
आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले.


मिपा दंगा धागा क्र. २..... मिपावरील बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?

लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
इथे दर आठवड्याला कुणी ना कुणी रेसीपी देत असतो. पण चव आणि वास न समजल्याने कुठला पदार्थ चांगला. हे काही समजत नाही. तर, आपण एक "बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?" परीक्षक म्हणून सुबोध खरे,पैसा ताई,सर्वसाक्षी,रामदास काका,अजया इ. तयार असतीलच. ६/७ महिने आधीपासूनच आयोजन केले तर उत्तम. पा.क्रु. देणारी बरीच मंडळी अनिवासी भारतीय असल्याने, त्यांच्या सवडीला प्राधान्य देण्यात यावे. ठि़काण कुठलेही चालेल. हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये.... चूकून मापून पा.क्रु. कलाकारांचे संमेलन झाल्यास त्यास, धागाकर्ता जबाबदार नाही......


गिलक्या (घोसाळी) चे भजी

लेखक: आरोही | प्रसिद्ध:
bhaji साहित्य :1 गिलके ,१ वाटी बेसन ,एक चमचा लाल तिखट,अर्धा चमचा हळद,एक चमचा ओवा ,थोडी कोथिम्बिर चिरून,मीठ चवीनुसार ,तळण्यासाठी तेल, पाणी . कृती : गिलके धुऊन पुसून घ्या . त्याच्या गोल गोल बारीक चकत्या करा आता बेसनात लाल तिखट,हळद, मीठ,ओवा,कोथिम्बिर घालून भाज्यांचे पीठ भिजवून घ्या . आता कढाई मध्ये तेल तापायला ठेवा. तेल तापल्यावर त्यात गिलक्याचे काप बेसन मध्ये घोळवून तळून घ्या . मस्त गरम गरम गिलक्याचे भजि खायला द्या.


पालक कढी

लेखक: दिपक.कुवेत | प्रसिद्ध:
kadhi साहित्यः १. पालकाची जुडी - १.५ २. आलं/लसूण पेस्ट - १ चमचा ३. बारीक चिरलेला कांदा किंवा कांद्याची पेस्ट - १ मध्यम ४. ताक - १/२ लि. ५. बेसन - २ चमचे ६. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २ ७. कढीपत्ता - १ काडि ८. तेल २ पळ्या ९. चवीनुसार मीठ/साखर १०. फोडणीसाठी २ पळ्या साजुक तूप, चिमूटभर हिंग, १ चमचा जिरं आणि २ सुख्या लाल मिरच्या कॄती: १. पालकाची पाने स्वच्छ धुवुन त्यांची देठे खुडुन घ्या.


अमिताभ वि. विनोद खन्ना, एक जबरदस्त रंगलेला सामना

लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
films हिन्दी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले कि ते जेव्हा कधी काळी एकत्र आले, रसिकांना जबरदस्त रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र कुठले कलाकार एकत्र आल्यावर ही आग पेटणार होती याचं गणित फक्त परमेश्वरालाच ठाऊक असणार. दिलिपकुमार राजकपुर प्राचिन काळी “अंदाज” मध्ये एकत्र आले तेव्हा एक पडद्यावर युद्ध घडलं होतं. मात्र ही चकमक “इन्सानियत” मध्ये देव आणि दिलीपकुमार एकत्र आल्यावर झडली नाही. “संघर्ष” मध्ये संजीव कुमार विरुद्ध दिलीपकुमार असा सामना होता. त्यात पुन्हा बलराज साहनी.


जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला

लेखक: रमताराम | प्रसिद्ध:
ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्‍यांची, आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची, विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही, तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही, खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती, सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी, दगड खडकांशी झुंजणारे ते आकांताने वर येतात, काठावरचे 'बघे' त्यांना पुन्हा खाली लोटून देतात थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड.


आय लव्ह यू (३)......

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
मागील दुवा आय लव्ह यू .....http://misalpav.com/node/26966 आय लव्ह यू (२).... http://misalpav.com/node/27011
ढगाळलेल्या आकाशात सोनेरी सूर्य प्रकाश पडलाय. एकाच वेळेस सोळासतरा इंद्रधनुष्ये दिसायला लागलीत गेटजवळचा गुलमोहोर बहरुन फुललाय . प्राजक्त पांढर्‍या फुलांचे चांदणे ल्यायलाय. सोनचाफ्याच्या फुलांचा सडा पडला असावा असा उत्फुल्ल सुगंध दरवळतोय. सकाळनगरचे गेट फुलांनी मढवून टाकयला हवे. आनंदाने मला पिसे लागेल असे वाटतय. मला रश्मीला कडकडुन मिठी माराविशी वाटतेय. मी वेड्यासारखा नुसताच हसत उभा आहे. साला आपल्याला भावना सुद्धा व्यक्त करता येत नाहीत. रश्मी....


नाते आपुले तसेच आतून...

लेखक: आनंदमयी | प्रसिद्ध:
जसे फुलावे रंग साजिरे श्यामनिळ्याच्या मोरपिसातून मुके तरी मोहाहुन मोहक नाते आपुले तसेच आतून.. मी मुरली तू सूर खुळासा मी यमुना तू माझी खळखळ तू कविता, मी तुझ्या आतली आर्त खोल दडलेली तळमळ तू कान्हा मी अधीर राधा राघव तू मी तुझी मैथिली नर्तक तू मी नुपुर नादमय छुमछुमणारे तुझ्या पाऊली भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. © अदिती जोशी