Welcome to misalpav.com

नाना ची मनी ( सनी)

लेखक: नानीचा नाना | प्रसिद्ध:
नाना ची मनी ( सनी) आम्ही सनी घेतली तेव्हा ती आमच्या सोसायटीतील ४८ सभासदांपैकी ३ री स्कूटर होती . यथासांग पूजा करून आम्ही आमच्या सनीचे स्वागत केले . त्यावेळी माझी मुलगी ७ - ८ वर्षांची असेल . तिला आमच्या सनी बद्दल अतिशय अभिमान होता . दर शनिवारी तिला मी स्नीवरून शाळेत सोडत असे. तेव्हा इतर मुलांसमोर स्वतः च्या सनी वरून चढण्या - उतरण्याचा तिचा रुबाब काही औरच होता . यथावकाश मला मुलगा झाला . तो तर सनीच्या मधल्या भागात धरून हरून उभा राहायला शिकला आणि इयत्ता ६ वीत जाईपर्यंत तो सनी चालवू लागला आमची सनी म्हणजे ' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' अशी होती .


महाभारतातील “चलाख” महापुरुष - अंतिम

लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
mahabharat तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.


हिंदी चित्रपटांचा "जॉय"

लेखक: मंदार दिलीप जोशी | प्रसिद्ध:
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने एप्रिल-जून २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे. ----------------------------------------------------------------------------------- जुन्या हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी २०११ हे साल दु:खद आठवणी ठेऊन गेलं. आधी शम्मी कपूर आणि मग देव आनंद यांना आपल्यातून हिरावून नेत त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का दिला.


माझी मिठि अद्याप खुली आहे..........

लेखक: पंडित मयुरेश न… | प्रसिद्ध:
कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तुच आली असे कित्येकदा होत असते तुच सगळीकडे दिसत असते वार्याची एखादी झुळुकही तुझ्या येण्याची चाहुल भासते तु दूर जातेस जेव्हा परतीची मी वाट बघतो ज्या वाटेने गेलीस तु त्याच वाटेवर उभा राहतो तुझे निघुन जाणे नेहमीचेच माझेही वाट पाहणे नेहमीचेच जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे आपले भांडण होणे नेहमीचेच तु परत येण्याची खात्री आहे तरी अजुन रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तु? माझी मिठि अद्याप खुली आहे.......... - कवि म.ना.दे.


पंजा माझा

लेखक: मंदार दिलीप जोशी | प्रसिद्ध:
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर तोच हल्ली घाबरवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा असे म्हणून धमकावतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून हळुच इंधनाचे दर वाढवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो ९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत ५०% वाल्याला डोक्यावर बसवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो नार


....................... पोटदुखी...........

लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:
मी माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम घेऊन इथे आलो आहे. कृपया मार्गदर्शन करावे... . ;). परवा मी माझा ट्रक घेऊन दिल्लीला चाललो होतो, माझ्या मागे आणखी एक ट्रक होता, ज्याचा ड्रायवर नवशिका होता. वाटेत घाटातून जाताना त्या नवशिक्या ड्रायवरने मला मागे टाकले. त्या ट्रकवर मागच्या बाजूला मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेले होते. -- .. -- "बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !" :) तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे.


मास्तर, जरा नैतिकतेने र्‍हावा....!!!

लेखक: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | प्रसिद्ध:
रामराम मंडळी. मंडळी काल रात्री ठरवलं होतं की रविवारच्या सकाळ पर्यंत विनाअडथळा मस्त ताणून द्यायची.. पण हाय रे दुर्दैव. पहाटे चारलाच डोळे उघडले. अर्थात तसं व्हायला दोन कारणं होती पैकी एक खासगी होतं आणि दुसरं खासगी आठवणीला जोडून पतंगाच्या शेपटीसारखं दुसरं एक सरकारी कारण चिकटलं होतं. आता मनात आलेल्या विचारांचं शेअरींग केलं की मनावरचं ओझं कमी होतं, काही एक उत्तम विचार आपल्या देता घेता येतो, असे म्हणतात म्हणून मास्तर, जरा नैतिकतेने राव्हाची ही एक गोष्ट. मंडळी, महाराष्ट्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलं आहे.


ब्रेकफास्ट रेसीपी ..... अंडा पाऊच (बिहारी स्टाईल)

लेखक: कैलासवासी सोन्याबापु | प्रसिद्ध:
ब्रेकफास्ट त्यात ही तराईच्या थंडीत (किंवा अगदी दिल्ली की सर्दी सुद्धा), अंडे इज मस्ट!!! सदरहु प्रकार मी एकदा बिहारात (मोतीहारी) इथे एका गाड्यावर खाल्ला होता आज घरात साहीत्य अन मुख्य म्हणजे बनवायचे नेमके भांडे (उपकरण ) सापड्ले सो म्हणले बनवुन बघावे, काहीसा हाफ फ्राय पल्टी मारके सारखा प्रकार आहे पण शेप मुळे मस्त वाटतो!!!! साहित्य :- १. २ अंडी २. सरसों तेल (ह्यात चव जब-या येते, तुम्ही वास आवडत नसल्यास रिफाईंड वापरु शकता) ३. २ कांदे बारी चिरुन ४. ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन (आपल्या गरजे नुसार अ‍ॅडजस्ट करणे) ५.


स्ट्रॉबेरी सेवबा

लेखक: टक्कू | प्रसिद्ध:
स्ट्रॉबेरी सेवबा / Strawberry Sevba लाल चुटुक गोळे हिरव्या रंगाच्या गोंड़यावर! ओळखा बर मी कोण? अशी लहानपणी ओळख झालेली स्ट्रॉबेरी थंडीची खास ओळख. नाजूक पिवळ्या कणात गुंफलेली लाले लाल स्ट्रॉबेरी महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी फार्म मध्ये जाऊन खाण्यात वेगळीच मजा आहे. नुकतेच mapro च्या फार्म मध्ये फ्रेश स्ट्राबेरी मेलबा चाखले. ती अप्रतिम चव जीभेवर रेंगाळत असतानाच सुचले त्याचे variation. ताबडतोब try केले आणि एक hit dish यादीमध्ये add झाली.


सिंहगड व्हॅली

लेखक: नांदेडीअन | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी, सिंहगड व्हॅलीला कसे जायचे याबद्दल माहिती हवी होती. वन विभागाच्या चेकपोस्टजवळ (जिथे प्रवेश शुल्क आकारल्या जाते) कुठे तरी आहे ती पायवाट असे ऐकले आहे. फॉन्ट साईझ वगैरे गंडले तर माफ करा, मोबाइलवरून आलोय हाटेलात. धन्यवाद. :)