Welcome to misalpav.com

उपवासाचे आप्पे

लेखक: अनन्न्या | प्रसिद्ध:
साहित्यः दोन वाट्या वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, मिरची पेस्ट, आले पेस्ट, जिरे पावडर, कोथिबिर, दाण्याचे कूट, मीठ, आले पेस्ट, खायचा सोडा, तेल किंवा तूप. कृती: आप्पे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी वरी तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे. ७-८ तासांनी दोन्ही एकत्र मिक्सरवर वाटावे. मिश्रण इडलीच्या पिठाइतपत असावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी आप्पे करण्यापूर्वी या मिश्रणात अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे.), मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, २-३ चमचे दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबिर मिसळावी. पाव छोटा चमचा खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.


मॉरिशस सफरनामा (1) – प्लॅनिंग आणि प्रस्थान

लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:
डिप्लोमाला असताना, त्यावेळची ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर, आमच्या विरारचा छोकरा गोविंदा, ‘टारझन’ फेम किमी काटकर, अभिनयसम्राट अमिताभ बच्चन आणि दस्तूरखुद्द रजनीकांत असा सगळा मसाला ठासून भरलेला हिट चित्रपट, हम, त्यावेळी कैक वेळा पाहिला होता. खास आकर्षण अर्थात ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर. त्यात एक गाणे आहे ‘सनम मेरे सनम...कसम तेरी कसम’ . त्यावेळी, ते गाणे बघताना शिल्पा शिरोडकरच्या तोडीस तोड आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे निळेशार समुद्र आणि सफेद रेतीचे किनारे असलेला सुंदर मॉरिशस.


भूकंप....!

लेखक: psajid | प्रसिद्ध:
आज खूप दिसांनी पुन्हा त्या वास्तूत आलु, पडक्या पांढरीच्या इटा बघून काळूखात त्या हरवून गेलू !! माती सारता हातांनी डोळं उघडं निर्जीव धूड, नवलाईत सगळं डोळं वासं झोपल्याचं त्यात गूढ !! वाटतंय राहून राहून मना माती कृतघ्न नसावी झाली, आखीरपर्यंत आसंल थरथरली जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !! या मातीतच वलावा उभारा त्यावर निर्धास्त सोडला पसारा, दोन चिमुकली फळे संसारा झोपली गार ओढून ढिगारा !! दैव घालाच तिथं वास्तूचं काय ? बायको मुलांसंगती कारभारी जाय, पर मी आकारल्या मातीला वाटलं असावं समद्यासोबत माझा हात धरायचा नाय !! डोळ्यांतल्या पाण्याबरोबर पांढरी माय चमकत हुती, पाणी साचल्या डवंग्यात मातुर पानकणसं तुरय


आठवण

लेखक: वडापाव | प्रसिद्ध:
छोट्याशा या जगात माझ्या तू खूप मोठी कामगिरी केलीस मी जरा थोडं अजून जगावं म्हणून स्वतः झिजुन झिजुन मेलीस माझा हट्ट पुरवत आलीस नेहमी सगळी कामं पाठी टाकून सलगी केलीस माझ्याशी तू विश्वास ठेवलास डोळे झाकून ऐश-आरामात जगायची सवय होती, शून्य विकास फक्त विलास वाईट दिवस आल्यावर बिथरलो तेव्हा फक्त तूच आधार दिलास भावनिक ब्लॅकमेल करुन मी तुझ्याकडून घेतलं स्वतःला आंजारून गोंजारून तू दिलेला मैत्रीचा हात पकडून चान्सही मारला प्रेमाचा मी चोरून खरंय की मी खोटं बोलत आलोय खोटं बोलून मी खरंच खोटारडा झालोय पण एक खरी गोष्ट तुला सांगू पाहतोय तुझ्यावरच्या प्रेमात अगदी बुडून निघालोय कंटाळलोय मी दूरून प्रेम करून मला