Welcome to misalpav.com

घरे उजळती सारी

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
एका मित्राने मला परवा सांगितलं की त्याच्या मुलाला (म्हणजे त्याला स्वतःलाच) शाळेने दिवाळीसाठी एक `प्रोजेक्ट' दिलंय `प्रोजेक्ट'. ज्यात दिवाळीचे `गुड इफेक्ट्स आणि बॅड इफेक्ट्स' (मुळात हे आधी मला काय ते समजलं नाही) लिहून द्यायचे होते. बॅड इफेक्ट्स म्हणाला मी गूगल वरून काढले. (:D बर... म्हटलं मी) गुड साठी काही बघ ना जमतं का लिहायला, एखादी लिस्ट, एखादं ग्राफिक किंवा एखादी कविता. तेंव्हा सहज सुचली ही कविता काम करता करता.


चीत्कला

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
चीत्कला चपळ चमके गगनी स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी थरकापे अवनी तपोवनी डोळ्यात आंसवे विद्ध मनी काळीज तळी अवखळ पाणी जळ खळाळे विकल होवोनी अस्वस्थ मेघ धावे कोणी चातक चोचीत शुष्क रमणी वेदना सखी मिरवे अंगी श्रम दाह शमे ना एकांगी शिडकावा तनभर भावुकसा व्हावा अमृतमय शतरंगी ……………. अज्ञात


बीट सूप : घरातील खाद्यक्रांतीचा साक्षीदार

लेखक: अमेय६३७७ | प्रसिद्ध:
बालपणीचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत खरेच सुखात गेला. मिसळ, वडे, भजी यांसारख्या जिभेचे चोचले पुरवणार्‍या 'जहाल' पदार्थांवर बालवयातच श्रद्धा बसल्याने वरण-भात, कच्च्या भाज्या, सलाड्स वगैरे गोष्टी एकदम 'ह्या' वाटायच्या. त्यातून डाएट बिएटचे फॅड घरात शिरलेले नव्हते. मायाजालाची क्रांतीही दूर होती त्यामुळे कॅलरीज, मेटाबॉलिझम, लीन मीट, लो फॅट असे शब्द घराघरात अजून मुरलेले नव्हते. दुधातून साय काढून टाकणारा 'येडा' वाटावा असे दिवस होते. बासुंदीला लावण्यासाठी पेढ्यांचे पाकीट फोडताना 'कॅलरीच्या' भीतीने गृहिणीचा हात थरथरत नसे.