Welcome to misalpav.com

तू उत्तर नाही दिलंस मला

लेखक: वडापाव | प्रसिद्ध:
तू उत्तर नाही दिलंस मला मी एक प्रश्न विचारला का तुझ्यातल्या नव-याने आज माझ्यावर हात उगारला? तू उत्तर नाही दिलंस मला हवं तर पुन्हा विचारते तुझ्या चुकांचं खापर मी का डोक्यावर माझ्या मारते? तू उत्तर नाही दिलंस मला मी केव्हाची वाट पाहत्येय संसार अधोगतीच्या प्रवाहात जातोय आणि मीही त्यात वाहत्येय तू उत्तर नाही दिलंस मला उलटून बोलतोयस तू फक्त तुझ्यासारखाच मीही जाब विचारला तर का खवळतंय तुझं रक्त? तू उत्तर नाही दिलंस मला आता वाट पाहून मी थकले तुझा विश्वास मिळालाच नाही आज तुझ्या प्रेमालाही मी मुकले


आली सुमधूर संमोहक दिवाळी

लेखक: निमिष सोनार | प्रसिद्ध:
ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... दूर करून अंधार कृष्णछायेच्या कपाळी ! आशा घेऊन अश्विन सुमंगल सकाळी !! घेऊनी सोनप्रकाश ओजस्वी आश्वासक ओंजळी ! लख्ख करण्यास अनंत आकाशगंगेच्या ओळी !! ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... समग्र संकट समूळ सारीत ! सर्वसमावेशक सण सोहळा सुशोभित !! अंधार होऊनी निसंशय पराजित ! प्रकाश येऊनी मनात विराजीत !!


'वाढदिवस'

लेखक: अमेय६३७७ | प्रसिद्ध:
रोजच्याच राघववेळी, उठण्याची घटिका झाली  दिवसाचे विझले डोळे, रात्रीस नीज ना आली वडिलांच्या कानी बोले, आवाज आज आईचा, "पुत्राच्या वाढदिनाचा, सोहळा खास घाईचा" "पाहता पाहता सरली, परि कैशी इतकी वर्षे?"  बाळाचे कौतुक दाटे, डोळ्यांतुन श्रावण बरसे औक्षणास उठते माता, वडिलांचा धरुनी बाहू  "उठवाया सोनूल्याला, दोघेजण मिळुनी जाऊ"   थरथरत्या हातांवरती, सावरती हार फुलाचा भिंतीवर सैनिकवेषी, हसतो चेहरा मुलाचा -- अमेय


परिपक्व

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
जाणीव एक कोण्या बीजापरीस असते संवेदना फळाची शाखेस भार नसते गंधास स्वाद जेंव्हा परिपक्व फूल होते शब्दात भावना अन सारीतेसामान झरते त्या ओढ अर्पणाची समिधा समर्पणाची व्हावा तृषार्थ कोणी आकंठ तृप्त ह्याची ………………… अज्ञात