ओदिशा - ४ : झुकलेले शिवमंदीर आणि हिराकूड धरण
ओदिशा - १
ओदिशा - २
ओदिशा - ३
१९-११-२०११.
संबळपूरला काय पाहायचे ते ठरले होतेच. हिराकूड धरण आणि हुमा येथले झुकलेले शिवमंदीर. ते पाहून लौकरात लौकर कटक किंवा भुवनेश्वरला पोहोचायचे होते. त्या गाडीची किंवा बसची व्यवस्था देखील करायची होती. सकाळी न्याहारी मुख्य शहरातच करायची. मग फिरायला गाडी ठरवून बसेसची चौकशी करायची असे ठरले. ‘टेंपो’तून उतरलो तिथे ट्रॅव्हल कंपन्यांची कार्यालये हारीने लागलेली होती.