Welcome to misalpav.com

देव नावे भिक्षा चालुच राही....

लेखक: निश | प्रसिद्ध:
देव नावे भिक्षा चालुच राही पोटांस ह्यांच्या तडस नाही. ह्यांना झाला भस्म्या माणुसकीचा माणसांची श्रध्दा खात सुटती. देवही आता ह्यांच्या दयेचा भुकेला ह्यांच्या घरी सदा तुप आणी लोणी. देवही असा पराधीन झाला लागली नजर त्याला ह्या डोमकावळ्यांची. सत्तेचा ह्यांना अस माज आला माणसाचा ह्यांनी गुलाम हो केला. देवास नाही गरज पैशांची तो तर भक्तांच्या भक्तीचा भुकेला. भ़क्तीचा ह्यांनी बाजार मांडला देवासही ह्यांनी कैदेत डांबला. म्हणे दास निश जागे व्हा तुम्ही देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी. देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी. (देवाचा बाजार मांडुन तुंबड्या भरणार्‍या भोंदु लोकांचा निषेध करावा म्हणुन ही कविता


ओदिशा - ३ : नृसिंहनाथ आणि हरिशंकर

लेखक: सुधीर कांदळकर | प्रसिद्ध:
१७-११-२०११. चारच्या सुमाराला नृसिंहनाथ मंदिराच्या आवारापाशी पोहोचलो. राहायला इथे ओरिसा पर्यटन खात्याचे यात्री निवास आहे. अगदी गलिच्छ निघाले. मंदिराचे अतिथी निवास मात्र कमी वाईट निघाले. सकाळी गरम पाणी नाही पण विजेवरचा हीटर मिळेल म्हणाला. खोलीचे भाडे नाममात्र. रु. ३५०/-. मंदिराला देणगी पण द्या म्हणाला. जेवणाला हॉटेले नाहीतच. फक्त टपर्‍या. त्याही ग्रामीण. पण अगदीच गलिच्छ. स्वच्छतेचे तसे वावडेच. त्यापेक्षा मंदिरातच ‘भोग’ चे जेवण मिळते ते जेवा म्हणून अतिथी गृहाचा सेवक म्हणाला. जेवणाची वेळ दुपारी १२.०० आणि रात्री ८.००. मंदिरातल्या आवारात फलकावरही ही वेळ लिहिलेली होती.


अशीच आजची रात्र

लेखक: फुंटी | प्रसिद्ध:
गर्भपात होतोय तुझ्या आठवणीचा २-३ रात्रीची अखंड भेट आपली, आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो.. अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री.. मी टक्क जागा कोण कुठली तू कानी किणकिणतेय तुझी गझल... 'कसली आहेस ग तू' नुसती गझल.. आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही गेलीस??? नाहीच तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला... आरपार ...