Welcome to misalpav.com

आज पुन्हा उडावेसे वाटले

लेखक: पल्लवी मिंड | प्रसिद्ध:
आज पुन्हा उडावेसे वाटले पंखाना जरा विहारावेसे वाटले दगदग काय रोजचीच आज उसंतीला चाखावेसे वाटले घोटभर शांततेसाठी हे मायाजाल हटवावेसे वाटले आज पुन्हा उडावेसे वाटले आकाशात हरवावेसे वाटले धावपळीत विरघळलेल्या मला अलगद ओढावेसे वाटले आज पुन्हा उडावेसे वाटले नभीचे तरंग वेचावेसे वाटले विस्मृतित गेलेल्या बालपनाला परत जगावेसे वाटले त्या निरगसतेत झोकून द्यावेसे वाटले उंचावरच्या जगात मला आजमावेसे वाटले अंहपणाचा जप सोडून आज पुन्हा उडावेसे वाटले फार झाली आता अस्तित्वाची लढाई त्या गोड पाखरसारखे आज जगावेसे वाटले..... जगावेसे वाटले.......


अभय

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
या अवघ्या चराचरी व्यापलास तू हरी तरी आत बाहेरी शोध फसवा असा ll १ ll चालतसे देणी घेणी जीवा नित्य जन्मांतरी चिंता लागतसे मनी होईन पार कसा ll २ ll तूच बाप जननी येई पहा धावुनी या संसार काननी बाळ हाका मारीतसा ll ३ ll काळाचिये भक्ष आम्ही तिथे नाही विनवणी अभय मिळो शेवटी पायी तुझ्या लागतसा ll ४ ll - सार्थबोध


शिळी जिलेबी - १

लेखक: धन्या | प्रसिद्ध:
१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणी