Welcome to misalpav.com

फोल

लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
आवर्तनात भिरभिरताना एका क्षणी गेला तोल; वेळ उथळ तळ नाही म्हणून जमेना बुडी खोल; कवच बापडे गळून पडले आत-बाहेर उरले फोल.


गुंता

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
का उदास, आज वाटे मला श्वास श्वासात, जीव हा कोंदला ll १ ll हृद्य आठवांचा, काय हा उमाळा नेत्रातूनी अश्रूंचा, हाय तोल गेला ll २ ll विराण स्मृती, करिती मनी गलबला का दिशा नित्य, गवसेना पाखराला ll ३ ll जुनाच गुंता, न सोडवी मनाला मिळे संकेत, असा नव्या वादळाला ll ४ ll अडकलो पुन्हा, जुन्या कड्या कपारीला बुजेना चिरा, जो जो मी सांधला ll ५ ll मागतो आधार, फिरुनी त्या अंबराला मज दाखवी, नव्याने निरभ्र चांदण्याला ll ६ ll - सार्थबोध


चल परत नव्याने सुरू करू सारे

लेखक: पल्लवी मिंड | प्रसिद्ध:
चल परत नव्याने सुरू करू सारे ओळख नव्हती कधीच आपली असे पुन्हा भेटू डोळ्यात येईलच पाणी माझ्या त्या अश्रुं समेच आपले अहं पण विरघळून टाकू खूप पहिले आपण हिशोबचे जगणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त आपल्यासाठी जगू असेल अजूनही अल्लड बालपण आपल्यातही त्या निरागस पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून चालू जरासे हृदयातील स्वप्नापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू आयुष्यात असणारच वळणे थोडीशी गहिरी त्यातूनच आपल्या प्रेमाचा अर्थही नव्याने उमजू