शब्द चिमुकले सांडत होते ...
- Read more about शब्द चिमुकले सांडत होते ...
- 32 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4771 views
त्या इवलुश्या पानावरती
शब्द चिमुकले सांडत होते
फुलपाखरापरी फडफडणारे
कवितेचे मन भासत होते
अलगद कागद हातावरती
हाताच्याही बोटावरती
मन बोटासंगे बोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते
बरेच काहि अवती भवती
भोवतालीच्या ओठावरती
सार तयाचे मांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते
मी न माझी, माझे न काहि
माझ्यासाठी मीपण नाहि
नाहि नाहि म्हणता म्हणता
कवितेला मी सांगत होते
ओळी ओळीवर अक्षरांचे
पुंजकेच जणु साठत होते
शब्द म्हणुनी शब्दासंगे
कवितेचे मन डोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते...