Welcome to misalpav.com

तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …

लेखक: घन निल | प्रसिद्ध:
तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता … तुझा हात जेंव्हा माझ्या हातून सुटला होता …. तू थांबवलीस असावे तुझी , पण बांध तरीही फुटला होता … ऊन पिऊन अंगणात सुकला पारिजात माझ्या, निळा कोवळा पाऊस मी नियतीस विकला होता … ओंजळीत भरलेस तू श्वास तुझे सुगंधी, मी हात त्यावरी एक झाकला होता … मी न थांबलो तिथे , न वळून बघितले निघताना, विश्वास तुझा तरीही न थकला होता … मी चेतविल्या पुन्हा तुझ्या आठवणी, मी विझलो तेंव्हा त्यांचा उजेड फाकला होता …


( चला नांगरूया शेत सारे )

लेखक: मोदक | प्रसिद्ध:
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर


चट्पटीत शंकरपाळे (दिवाळी स्पेशल)

लेखक: अनन्न्या | प्रसिद्ध:
साहित्यः अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट, ओवा, हळद, मैदा, तळण्यासाठी तेल. कॄती: प्रथम अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट (चवीनुसार), थोडीशी हळद हे सर्व एकत्र करून उकळावे. आणि गार करण्यास ठेवावे. ओवा थोडा बारीक करून घ्यावा. आणि तयार पाण्यात मिसळावा. पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात मावेल एवढा मैदा मिसळावा. गोळी करून त्याची पोळी लाटावी. शंकरपाळे कापावेत. तेलात तळून घ्यावेत. मस्त कुरकुरीत होतात. shankarpale


सारु अहमदावाद; सारु गुजरात

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
नमस्कार, सद्ध्या मोदी चा काळ आहे. पंतप्रधानपदाच्या दिशेने त्याची चालू असलेली वाटचाल जबरदस्त आहे. शिवाय त्या माणसाने गुजरात मधे केलेल्या कार्याच्या जोरावर त्याला लोकांचं पाठबळही भक्कम मिळतंय. त्याच्याच या कार्यक्षेत्री जाण्याचा योग गेल्या वर्षी आला होता. तेंव्हा तिथे काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतोय. खरं तर वर्णनही लिहायचं होतं, परंतु 'वेळ' मिळत नाही ... नेहमीचं रडगाणं. असो.