शुक्रवारचा दिवस . नेमकी त्यादिवशी ईद. म्हण्जे सुटीचा दिवस. . चौ राला म्हण्जेच धागाकर्त्याला वाटले. चला नवीन स्कूटर घेतलीय. आज जरा मोठी चक्क्कर मारून येऊयात. आता म्हातारं कितीसं लांब जाणार ? उगीच भरकटू नये म्हणून सौ, चौ ला घेतले .( म्हणून पुणे परिसरातील एक रम्य ठिकाण नक्की केले.) " रामदरा" हे स्थान पुण्यापासून साधारण पणे २४ किमी वर आहे.मी चिंचवड, खडकी, येरवडा पूल, कोरेगाव पार्क, हडपसर ओव्हर ब्रीज या मार्गाने गेलो. हा मार्ग मिनयापोलीस, कॅरोलेना, मस्कत, दुबई, मुंबई डोंबिवली ठाकुरली या गावाकडून येणार्या यात्रेकरूना ही सोयीचा आहे. ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली समजणे) .