Welcome to misalpav.com

भ्रमंती : यमाई देवी मंदिर, औंध संस्थान

लेखक: स्पा | प्रसिद्ध:
चित्रगुप्त यांनी सुरु केलेल्या चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी धाग्यामुळे पाच सहा महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळील औंध येथे केलेल्या भ्रमंतीची आठवण झाली .
औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमूळपीठ देवीचे जागृत स्थान आहे.


मला झोप हवी

लेखक: वैभव कुलकर्नि | प्रसिद्ध:
म्हणल आज जरा शांत झोपावे पण छे झोपेण नाकच मुरडले आहे आताशा. बहुतेक डोळ्यावरची बुबुळ रुसलीत माझ्यावरती ...... आतल्या बाहुल्या नुसत्याच फिरत आहेत इकडून तिकडे एखाद्या निशाचरासारख्या आणि हि रात्रही काही थांगपत्ता लागून देत नाही.. मी रात्रीला विचारल , काही चुकलं काय माझे असा हा का आसूड या डोळ्यावरती नेहमीप्रमाणे उत्तर काही मिळाले नाही ...फक्त एक करडा कटाक्ष्य आणि उजव्या काखेत माझ्या झोपेला घेऊन ती देसिनाशी झाली... मग परत मी परत काहीतरी शोधत शून्य नजरेने त्या भिंतीकडे बघत गरगरणा-या पंख्याला सोबत घेऊन ...... मग मी पापणीच्या टोकाला थोडे बाहेर ओढत डोळ्यावरती झापड टाकायचा प्रयत्न केला , पण त्या पाप


रानपाखरं...

लेखक: psajid | प्रसिद्ध:
बांधलं मचाण वर गाण्यात गळा, मधुरता मंधी दुमला शेतमळा !! येऊन चोर जोंधळ्यात दडं, शिवार टिपीत चाललीत पुढं !! भिरभिरली गोफण सुटला दगड, चोर जोंधळ्यात त्येनं केलं उघड !! का म्हून सतावता सुखानं जगू द्याव, किती सोसलं पिकासाठी तुम्हा ते नाय ठावं !! घरी तान्हं ठिवून आलिया राखणीला, सोनं ठिवलं तरच वरीसभर पीठ भाकरीला !! मला पीठ भाकरीला !! श्री. साजीद यासीन पठाण


ती...

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
ऐकले जाहीर येथे, झुंड माणुसकी तुडवणारे वाचले जाहीर येथे, रत्न कन्या नाकारणारे ll १ ll जोडपे कैक नादान, येथे पालकत्वी रंगणारे तो असेल कि ती?, व्यर्थ शंका काढणारे ll २ ll माजले क्रूर बाजारी, गैर कर्मे रुजवणारे विवेक विसरून पालक, वाट आंधळी जोखणारे ll ३ ll अवैध पैसा अमाप, गर्भश्रीमंत मिरवणारे कष्टी भगवंत येथे, पाहून गर्भ चिरणारे ll ४ ll लिखित काही और तरीही, वंशदिवा शोधणारे हातचे टाकून पायी, कळ्या नाजूक तुडविणारे ll ५ ll विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll नका टाकू स्त्री उद्याची, घसे कोरडे बोलणारे हात कानावरी त्यांचे, ठार बहिरे ऐक