मला येणारी पाककृती म्हणजे पोळीचा लाडू
साहित्यः- घरात शिल्लक असलेली शिळी पोळी ( साधारण ४-५), गूळ किंवा पीठीसाखर, तूप
कृती-घरात जास्त झालेल्या पोळ्या घ्या. काही लोक याला चपाती असे देखील म्हणतात. त्या मिक्सरमधे टाकुन बारीक करुन घ्या. घरात मिक्सर नसेल तर हातानेच बारीक होईपर्यंत कुस्करा. त्यात विळीवर चिरलेला गूळ आपल्या चवीनुसार टाका. गुळ कुठलाही चालतो. विळी नसेल तर सुरी घ्या. ते ही नसेल तर हातानेच गुद्दे मारुन फोडा व बारीक करा.आता मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करा.गूळा ऐवजी पीठीसाखरही घेउ शकता. ती नसेल तर साधी साखरसुद्धा चालते. आता तुप घ्या. ते थोडे गॅसवर गरम करा. ते पातळ होईल.