गंधांच्या स्मृती स्मृतींचे गंध.
- Read more about गंधांच्या स्मृती स्मृतींचे गंध.
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4377 views
अबोल प्रीत बोलली...
- Read more about अबोल प्रीत बोलली...
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 5027 views
मिहीत रात्र रंगली
कमल पुष्पे फुलली...
अबोल प्रीत बोलली
हळूच गाली हसली...
नभी धुंद चांदणे
फुलाफुलांत हिंडले...
प्रीत आपुली पहिली
अबोल प्रीत बोलली ...
नवे रंग उमटले
अश्रु पुसून गेले...
उगवली पहाट
थांबली चंद्रकोर...
विसावली सागरी
झोपली गाढ कुशीत...
विसरली निळ्या आभाळास
अबोल प्रीत बोलली...
अबोल प्रीत बोलली...
फितुरी ( त्या सावळ्या तनुचे वर आधारीत )
- Read more about फितुरी ( त्या सावळ्या तनुचे वर आधारीत )
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1127 views
त्या काळ्या मनीचे मज लागले पिसे ग
न कळे मनास आता कोठे शोधू त्यास ग
येते ऐकण्यास जेंव्हा गोड म्याव-म्याव
चोही कडे बघे मी, पकडण्यास घेते धाव ग
हलते शेपटी ही लडीवाळ करते चाळा
दुध पिउन तट्ट ती, माझ्यावर फिस्करी ग
खुपते मनास माझ्या ती मटण खाई शेजारी
डोळ्यात दिसते मग तिच्या, मलाच फितुरी ग
चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी
- Read more about चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी
- 35 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 24860 views
न्याय
- Read more about न्याय
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 859 views
काहिंच्या अस्तीत्वाच्या विळख्यात
गुदमरायला होते
सहवासाच्या वणव्यात
होरपळायला होते
काही जणांना पेटत्या आगपेट्या
बनायला आवडत
भाजलेल्या व्रणावर खोटे मलम ही
बनायला आवडत
उपदेशाचे कोरडे पाऊस
ही बरसतात
पावसात कोरडे रहायचे की ओले
हे ही तेच ठरवतात.
न्याय अन्यायाच्या परिभाषा
बदलल्या आहेत
अन्याय करणार्यांची लोकप्रियता
वाढतच आहे
आरोपीच्या पिंजर्यात
न्याय उभा आहे
अन्यायाच्या काळ्या कोटासमोर
उलट तपासणी होत आहे.
टाहो फोडुन सांगत आहे मी
आहे हो खरा
पण कोणास ठाऊक देवतरी देईल
का त्याला थारा?
क्षण
- Read more about क्षण
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1334 views
क्षण
क्षण हातातुन निसटुन जातात
काही क्षण क्षणिक तर
काही रुतून बसतात.
सुखाची झुळुक
तर दुखाची वादळ
झुळुक क्षणिक
तर वादळ रेंगाळतात.
क्षण हातातून निसटुन जातात
मागे पाहताच क्षण ओळख विसरतात
काही मात्र मानगुटीवरची
भूत बनतात.
क्षण हातातून निसटुन जातात
काही दिवाळी असतात
काही होळी असतात
काही सुखाची मोळी बांधतात.
क्षण हातातून निसटुन जातात....
तेल तिखटाचे झटपट चटकदार पोहे
- Read more about तेल तिखटाचे झटपट चटकदार पोहे
- 27 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 14504 views
ही एक अतिशय सोपी व झटपट होणारी (जास्तीत जास्त १० मिनिटे) पाककृती आहे. मी अनेकवेळा मुलांना संध्याकाळी ५-६ वाजता भुकेच्या वेळी असे पोहे चटकन करून दिले आहेत.
साहित्यः- (अंदाजे २ माणसांसाठी)
२-३ मुठी कच्चे कोरडे पोहे, २-३ चमचे गोडेतेल, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, १ चमचा साखर, चवीपुरते मीठ, १ चमचा तिखट, थोडेसे भाजलेले दाणे, थोडी चिरलेली कोथिंबिर, गरज भासल्यास थोडेसे फरसाण
कृती:- पोहे मावतील एवढे एखादे स्टीलचे पातेले पाण्याने विसळून घ्यावे. विसळल्यानंतर ते पुसु नये. त्यामुळे कच्च्या पोह्यांना किंचित ओलसरपणा मिळेल. त्यात कच्चे पोहे टाकावे.
काही पालुपदे...
- Read more about काही पालुपदे...
- 29 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 7674 views
अथांग
- Read more about अथांग
- Log in or register to post comments
- 1018 views
ऋणात आहे; …. ऋण काटेरी
तरी वाट ती माहेरी
लाघव ओळी हळव्या लहरी
अभंग संचित गाभारी
ठाव न लागे अथांग सारे
उचंबळे कधी मौन उरी
प्रजक्तासम सण एकेरी
एकांताची कास धरी
स्पर्श दंवाचा चित्त थरारे
ओघळ किंचित; बंड करी
म्हणे सवे ये श्रावणात अन
फिरव मला गत माघारी
…………… अज्ञात