Welcome to misalpav.com

मन म्हणते आहे !!

लेखक: psajid | प्रसिद्ध:
काळाच्या घावाने फरफटत जावे, धडपडून उठावे मन म्हणते आहे !! ती सोनेरी क्षणे जीवास ओलावे, डोळ्यात गुंतावे मन म्हणते आहे !! जे राहिले चित्र कोरे काही रंग भरावे, कुंचल्यास उचलावे मन म्हणते आहे !! तुला शौक सुगंधाचा विश्व गांधाळूनी यावे, चंदनासावे झिजावे मन म्हणते आहे !! भ्रमराचे ओठ अन कळीने खुलावे, गीत होऊन जगावे मन म्हणते आहे !! रात्रीस धास्तावले ते तुझ्या नजरेचे काजवे, पहाट बनून जावे मन म्हणते आहे !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली (महाराष्ट्र)


अशी वाहने येती - ( विडंबन )

लेखक: विदेश | प्रसिद्ध:
(चाल - अशी पाखरे येती - ) अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ... खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ... पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ... हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला- देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ... पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ... .


वेदना

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
अस्त सूर्याचा पाहुनी मी किरणांसाठी झुरतो ll १ ll ती वेळ सुरु परतीची थवा घरट्यास उडतो ll २ ll सांजेचा दीप तोही एकलाच गाभारी जळतो ll ३ ll दिव्यास सोबत माझी तो वातीत काजळतो ll ४ ll भाव दाटला नयनी अलगद गाली ओघळतो ll ५ ll जणू सन्यस्त होऊनी मी ओठी दु:ख थोपवतो ll ६ ll गोठली वेदना एकांती मी स्मृतींमागे पळतो ll ७ ll झाकून दर्दभावना सारी मी मलाच रे सावरतो ll ८ ll आरशास पाहता फिरुनी तो नकळत काही सुचवतो ll ९ ll वाटे चेहराच मला माझा काय असा फसवतो ll १० ll - सार्थबोध


आव्हान

लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
खेळ मांडलेला तेव्हा त्याचे खुळखुळे झाले, ललाटीच्या भग्न रेषा पायतळी ठसे ओले, इथे तिथे व्यर्थ व्यर्थ सारे सारे क्षुद्र झाले, नाही सुटले काहीही त्याने भलतेच केले, खोळ काही काळ पुन्हा मी टाकते गहाण, आता त्याच्या पुण्याईला उरे त्याचेच आव्हान!


मुगाच्या डाळीची पानकी

लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:
पानकी हा गुजराथी पदार्थ आपल्य मराठमोळ्या पानगी सारखाच आहे. आपण पानगी बनवताना तांदूळाच्या पिठीत चवीपुरते मीठ घालून भाकारीपेक्षा थोडे पातळ पिठ दुध घालून भिजवून घेतो. केळीच्या पानावर थापून, पानासकट तव्यावर टाकून, वरुन दुसरे पान लावून भाजून घेतो.


(गड गड गड)

लेखक: मिसळलेला काव्यप्रेमी | प्रसिद्ध:
(गड गड गड) पाऊस थांबायचे नाव घेईना खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस गूढ, अनाकलनीय भाषेत (गड गड गड) ----- धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट कौलांवरची टीपटीप थेंबांची लय चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात (गड गड गड) ------ खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर त्यात हसणारी तू आणि तुला हसतांना बघून हसणारा मी (गड गड गड) ------ रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये चमचमणारे ते चिंचेचे ओघळ डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु स्स...