माझा पहिला ट्रेक : चकदेव
- Read more about माझा पहिला ट्रेक : चकदेव
- 7044 views
रत्नागिरी जिल्यातील खेड हे माझे गाव. लहानपण याच गावात गेले. खेड च्या आसपास काही ट्रेकिंग locations आहेत. रसाळगड,सुमारगड,महीपतगड,चकदेव,पर्बत,नागेश्वर,चिपळूण जवळचा भैरवगड. राजांचा रायगड.कोयना back water. इत्यादी.
कारखान्यातील काही सहकार्यांबरोबर एकदा कोयनेच्या back water च्या परिसरात भटकंती आणि वस्ती केली होती. साधारण १९८८ मध्ये. तेव्हा असा काही छंद असतो हे प्रथम माहित झाले. त्या नंतर गो.नि दां च्या पुस्तकांमधून या विषयाची माहिती झाली. १९९० च्या दरम्यान गावतील काही मित्रांकडे स्वयंचलीत दुचाक्या आल्या होत्या.