Welcome to misalpav.com

मोर पंखी कावळा

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
एक काळा कावळा, मोरांच्या देशी गेला. मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला. ‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली. पोरांसाठी वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली. जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली. पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती. ‘त्यागण्या’ साठी बांधले, टॅायलेट चकाकी. सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट आवडत होते त्याला, त्याचेच शिवाम्बू कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले? मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली? तुज्याच पूर्वजाने, केली होती विहीर अशुद्ध.


कृष्ण नाही गोकुळी

लेखक: जुईचे फूल | प्रसिद्ध:
रंग नाही गंध नाही रास नाही गोकुळी विरह वेड्या गौळणीचा श्वास नाही गोकुळी गोपिकांचे लक्ष भारी दूध लोणी लपविती दूध लोणी चोरण्याची आस नाही गोकुळी सांज वेळी कृष्ण जाई वाजवूनी बासुरी अधर वेड्या बासुरीचा वास नाही गोकुळी मोहनाने मोहलेल्या गौळणीला गाठली कृष्ण प्रेमी गुंगण्याचा भास नाही गोकुळी आठवांचे लोट येती नंदराणी सांगते गोकुळीला जगविणारा त्रास नाही गोकुळी


ज्योती

लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:
अंतरीचा दिवा मालवू देऊ नको , प्रज्वलित ठेव ती ज्योत अंतापर्यत I तिच देईल तुला आधार, कार्य करण्या तत्पर होशील तू तयार I अंधारातून मार्ग दाखवते , प्रगतीपथावर ती नेते ,वाट ती किती बिकट , खाच खळगे किती असती त्यावरी I प्रयत्न कष्ट ,आत्माविशासाचा मार्ग दाखवते ती आम्हास, असाध्य ते साध्य कराया सायास , तू जा या वाटेवरुनी उज्वल भविष्याची ती वाट मोकळी I कवी म्हणतो , चालून आली नामी संधी , नाही दवडणार मी कधी , प्रकाश पडला अंतरीच्या मन चक्षुवरी , योग्य दिशा ,मार्ग सापडे त्यास, तेवत राहू दे अंतरीचा दिवा अंतापर्यत I


गुलाब

लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:
गुलाब तू राजा असे सर्व फुलांचा, मानही मिळतो तुझ्या गुणांना। सौंदर्याची बरसात करतो आवडतो तू सर्वांना सर्व रूपांत। फूल होता, तू सुकुमार दिसे। साठवता सौंदर्य तुझे, सौंदर्याचा वरदहस्त तुला पहिला मान गुलाबाला, विविध रंग रूप तू घेऊन येतो। आम्हांस तू चकित करतो - प्रसन्न होऊनी आम्ही वाहतो, तुला `श्री' चरणी, दिमाखात, तू कोठेही विराजतो, सौंदर्याने बघणारायाचे मन जिंकतो, किती रंगात रंगून जातो तू, स्वरक्षण करण्या काटे आणतोस तू, जीवनाचे सत्य जाणण्या, काटेरी वाट करतोस तू, तुझ्या सौंदर्याने घायाळ आम्ही, बोचवितो तो काटा तू। आधी काटे मग गुलाब, आधी कष्ट मग सुख हेच शिकवतो आम्हांस तू।।


आई

लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:
आई असा एकही दिवस नाही,तुझी आठवण येत नाही, सतत डोळ्यासमोर असते तू ,भू लोकी नसूनही करते पाखरण आमची I मनात हूर हूर दाटून येते ,तू असतीस तर किती बरे वाटले असते, मार्ग दर्शन तुझे लाभले असते ,काही वेळा काही सुचतच नाही I चलबिचल मनाची होई ,तुझ्या फोटो समोर येऊन मी उभा राही, तू गेल्याने झालेले नुकसान कसे बरे भरून येई? मनातील पोकळी कशी बरे भरून येणार ? तुझ्यावर भार टाकून अश्रूंना मोकळी वाट करून कशी देऊ ? प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आई तू , दुरून का होईना पाखरण करतेस तू , माया ,ममता प्रेमाचा तुझा स्पर्श , आठवणीत जपून ठेवला तो, सुरक्षित असे आशीर्वाद रुपी कवच ,सौरक्षण करते आमचे , निर्भय पणे वावरतो आम्


बाबा

लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:
बाबा चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो , स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो । असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो, उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो। माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो , आद्य कर्तव्याची कास धरतो । घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो, दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता, सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो। उच्च अधिकारी होतो तो, गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो। जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।