Welcome to misalpav.com

स्वप्न

लेखक: पद्मश्री चित्रे | प्रसिद्ध:
माझ्याच आसवांना मी रोखुनी पहावे ह्रुदयात गुंफ़लेले ते गीत मी पुसावे समजाविते मला मी, ते एक स्वप्न होते काट्यात गुन्तलेले ते एक फ़ुल होते माझ्यासमोरुनी तो मार्गस्थ सुर्य झाला माझी दिशा तरिही तम होवुनीच उरली फ़सवेच हे तरन्ग मी मानले जीवाचे नजरेसमोर माझ्या,हे स्वप्न भग्न माझे गुंतेल जीव असला मज वाटले ही नव्हते खोटाच तो जिव्हाळा, ते बेगडीच नाते का व्यर्थ दोष द्यावा, सारी अशीच नाती ह्रुदयी विसावली ती , माझी कट्यार होती उधळुनी स्वत्व आता, झाले रिती मनाने तु वाट वेगळी ती ,बघ चालशी सुखाने


कृष्णलीला..

लेखक: किसन शिंदे | प्रसिद्ध:
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती.. कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं.. कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या... कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे.. कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार.. कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं.. कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी.. कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी.. कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली.. उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकर


सुदामा

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
काय वर्णन करू, त्या पामराचे सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll दशा वाईट, भविष्य होय अंध उदर भरण्या, रोजचा आक्रंद स्मरणात तरी, होता गोपालवृंद इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll करुनी विचार, निश्चय केलासे मनोमनी स्मरण, माधवाचे भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे? कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll घरात नाही, एकही उपलब्ध दाणा कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा ! शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll आला द्वारकेस, उपाशी थकलेला काम टाकून, माधव भेटीस धावला धरिले पाय, हतबल सुदाम्याने तो सावळा मित्र, आलिंगन


अजाणता

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
अजाणता जाणले कसे इप्सित शब्दांनी मनातले भातुकलीने लक्ष्य वेधले गतकाळात विखुरलेले चिमणी पोपट बुलबुल आदी सवंगडी सारे जमले चित्त हरखले हरली चिंता वय उरले शैशवातले बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले …………… अज्ञात


राधेचा कन्हैया -

लेखक: विदेश | प्रसिद्ध:
इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी .. फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी .. पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी .. लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी .. मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी .. पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी .. लिपटे जैसी वृक्षास लता, एकरूप होऊनी गाली लाली क्षणात येई कन्हैयास बिलगुनी .. .