उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
भोगाच्याही पदरी उरते,
वेदनेचे गाणे
मखमलीच्या दाव्याला,
जीवा बांधणे.
उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
कुणी गावे उद्याच्या,
आशेचे गाणे
उगवतीच्या पोटी लपले,
अंधाराचे लेणे
उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
बेधुंद होऊन छेडावे,
उगीच का तराणे
भैरवीचे सूर घेते,
अखेरीचे गाणे
उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
-- सागरलहरी
आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच आपल्या भेटीला येतोय. आपण सर्वजण त्याला नैवेद्य दाखवतो त्याच्या आवडत्या पदार्थाचा म्हणजेच मोदकांचा!
तुम्हाला सर्वांना सांगायला मला खूप आनंद होतोय कि मी मोदक कार्यशाळा घेत्ये या रविवारी १ सप्टेंबर ला ठाण्यामध्ये. जर तुम्हाला किंवा तुमच्या माहितीपैकी कुणाला मोदक शिकण्यात रस असेल तर कृपया मला reshma.oka@in.com वर संपर्क करा. या कार्यशाळेत उकडीचे, उपासाचे व तळणीचे असे तीन प्रकारचे मोदक शिकविले जातील.
धन्यवाद!
http://takkuuu.blogspot.in/2013/08/ganpati-special-modak-workshop.html
13 August 2013 सकाळी ०७:०० वाजता डोंबिवली पनवेल बस ने पनवेल ला पोहचलो. काही जण अंबरनाथ,कल्याण येथून येणार होते तर काही जण ठाणे येथून,पोहोचताच बस स्थानकासमोरील "हॉटेल विसावा" येथे गरमागरम कांदेपोहे आणि चहाचा समाचार घेतला, आलात कि लगेच" विसावा त " या असा फोन सर्वाना केला होता, आमचा सरदार संजय पाटील आधीच विसावात विसावला होता. या ट्रेक ला विशेष उपस्थिती होती अमरावती युनिट ची सदस्य प्राची, श्रीकांत आणि अनिरुद्ध यांची, विशेष यासाठी कि हि तिघही YHAI च्या वेगवेगळ्या युनिट ची सदस्य आहेत(एकाच कुटुंबातील असूनही ) डोंबिवलीचे डॉक्टर वसंत भूमकर हे सुध्दा आमच्याबरोबर पहिल्यांदाच ट्रेक ला आले होते.