Skip to main content

कविता

गणपतीची आरती

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 12/09/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीची आरती जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा आरती स्विकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥ वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥ पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥ तुच बाप,माय तुची, आम्ही तुझी लेक एक आस जीवनास, पंथ दावी नेक अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥ गंगाधर मुटे ................................................

चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 12/09/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला
सिच्युएशनः गल्लीत सार्वजनीक मंडळाचा गणपती बसतोय. दोन हिरो अन दोन हिरवीनी आहेत. म्युझीक सुरू..... (सुचना: एक ओळ हिरो नं एक म्हणेल अन दुसरी ओळ हिरो नं २ म्हणेल असाही बदल करता येवु शकतो)
काव्यरस

श्री गणराया

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 11/09/2010 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
श्री गणराया कृपावंत व्हावे श्री गणराया भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥ चिंतामणी तू चिन्मय देवा अनुतापी मी, तू करुणा ठेवा व्दारी उभा मी नाम स्मराया ॥१॥ भवमोचक तव मंगलदृष्टी अनुदिन लाभो तारक वृष्टी हा भवबंध पार कराया ॥२॥ अनुष्ठान हे तव पुजनाशी क्षणभंगुर मी, तू अविनाशी साह्य होई मज अभय तराया ॥३॥ गंगाधर मुटे ......................................................... सर्व मीपाकरांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! .........................................................

कान्ह्याची बासुरी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 11/09/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या आठवांत माझा जीव चिंब झाला निथळत्या अंगणात गंध दरवळ ओला तगमग झाली शांत तृष्णा धरेची भागली काळी माझी माय पुन्हा कामाला लागली सृष्टी झाली झाली दंग गान वृक्षांचे आगळे साज मोत्यांचे लेऊन उभे पूजेला ठाकले असे भिजले गं मन जशा श्रावणाच्या सरी काया झाली हलकीशी निळ्या कान्ह्याची बासुरी....
काव्यरस

आयटम साँग: तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/09/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
आयटम साँग: तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना
हं..अं..अं..अं..अं..अं..अं.. तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना माझ्याबरोबर तुम्ही गाणं म्हणा कंबर हलवूनी एकसाथ गाणं गाना गाण्याच्या नशेमध्ये सारे चिंग व्हाना तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||धृ|| मासोळी ज्वानी माझी चमचम करी पाण्यात पडले पोहते तेजधारेतूनी राणी मी तुमची तुम्ही माझे राणा तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||१|| मी राणी हुकूमाची तुम्ही सारे गुलाम एक मारी ठुमका करी दुनीया
काव्यरस

मी त्या रक्ताच्या शोधात आहे....

लेखक पंचम यांनी शनिवार, 11/09/2010 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे. ज्यांनी अटकेपार झेंडे गाढले. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे. ज्यांनी मराठी मनगटांना स्वराज्याचे बळ दिले...... आज जो मराठ्यांना पुन्हा लढायला लावेल... हर हर महादेव पुन्हा गगन भेदून राहेल..... फूंकून रणशिंग ज्याने आकाशालाही आव्हान दिले.. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे... पूर्वी सारखे आज ही परकीय आक्रमण वाढत आहे.... माझ्याच मातीत आज माझी मराठी गाढली जात आहे..... सावरण्या तिचा हात मला बळ देणारा हवा आहे.. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे... -पंचम..
काव्यरस

मनतरंग...(पूर्वप्रकाशित उद्घोष - महाराष्ट्र मंडळ बे एरिआ - इ फ्लायर)

लेखक अथांग यांनी शनिवार, 11/09/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस म्हंटलं, की अडी-अडचणी, चिंता-काळज्या, ताण-तणाव हे सगळं ओघाने आलं....पण अशाही वेळांना आपण आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवला, तर त्या चिंता-काळज्यांची बोच जरा कमी होते. मला माझ्या एका मित्राने मध्यंतरी सहज एक नेहमीचाच प्रश्न विचारला...म्हणाला, "कशी आहेस सांग !" मी माझ्याही नकळत सगळे वैताग-पाढे वाचले. कविताही लिहीली...ती पण अशीच आयुष्याचे रडगाणे सांगणारी..बोचरी !! पण मग एकदम वाटले की मला त्याला असेही उत्तर देता आले असते की! थोडेसे सकारात्मक... शेवटी सुखं आणि दुःखं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्तं नाणे उलटे करून बघायची देरी असते.

आले गणपती माझ्या अंगणी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/09/2010 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
आले गणपती माझ्या अंगणी
आले गणपती माझ्या अंगणी वाट पाहीली गेल्या वर्षापासूनी मुकुट शिरावरी दिसे शोभुनी भरजरी पितांबर अंगी नेसूनी पुष्पमाला सुगंधी गळ्यात घालूनी शुंडेसहित एकदंत राखूनी आले गणपती माझ्या अंगणी कमळपुष्प हाती धरूनी दुसर्‍या हाती परशू घेवूनी एका हाती मोदक लेवूनी शुभ हाताने आशिष देवूनी आले गणपती माझ्या अंगणी वक्रतुंड हेरंब लंबोदर विकट विनायक विघ्नेश्वर गणेश महोदर विघ्नहर अगणीत असली नावे घेवूनी आले गणपती माझ्या अंगणी दहा दिवस गणपती येता दारी रोमहर्षक सोहळा घडतो भारी मुर्ती तुझी एक सदस्य हो
काव्यरस

नाचू या, गावू या, चला चला सारे या

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 10/09/2010 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
नाचू या, गावू या, चला चला सारे या
शेवटचा दिवस आहे परिक्षेचा दिवस आहे मजा करण्याचा कोणा नका सोडू सारे सामील होवूया कॉलेज, अभ्यास सारे काही विसरूया कोण आता कोठे दुर जाईल नोकरी धंदा कोण कोण पाहील विसरू नका एकमेकां पुन्हा भेटुया भेट घेवून पुन्हा आनंद लुटूया कॉलेजातली मस्ती तुम्ही आठवा मस्तीतले दिवस मनात साठवा मैत्री आपली सर्वकाळ टिकवूया विसरू नका काही सारे काही आठवूया - पाषाणभेद (दगडफोड्या) १०/०९/२०१०
काव्यरस

कविता - २

लेखक अथांग यांनी शुक्रवार, 10/09/2010 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
किती कथा, किती व्यथा..... इथून-तिथून, अशा तशा ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या चार भिंती, चार फरशा ! आत-आत खोल-खोल भिरभिर फिरता एक भोवरा... सांग ना आता कुठे-कसा शोधून सापडेल खरा चेहरा ? ? पापणीवर येवून थांबलेला थेंब ओठावर येवून लांबलेला शब्द... मन पछाडलेला एक प्रश्न, ही नियती, की प्रारब्ध ? ? ?