Skip to main content

कविता

<घोगरा>

लेखक नाटक्या यांनी बुधवार, 01/09/2010 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या विडंबनाचा कच्चा माल इथे आहे: हा घोगरा नक्की चोंबडा आहे माझी पक्की खात्री आहे तू जेव्हा कधी कॅफेत येतोस माझ्याशी गुजगोष्टी करतोस हा घोगरा पचकतो नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो चोरून ऐकतो वरून बोंबलतो लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो अंगोपांगी आरस्पानी निरखतो टप्पोर्‍या पोरी 'बरोब्बर' घुमवतो सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो नक्कीच!! नक्कीच!! कारण आजकाल हा रोज बहकतो आजकाल घोगरा रोज पचकतो ....!!!
काव्यरस

मोगरा

लेखक शुचि यांनी बुधवार, 01/09/2010 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
हा मोगरा नक्की चोंबडा आहे माझी पक्की खात्री आहे तू जेव्हा कधी स्वप्नात येतोस माझ्याशी गुजगोष्टी करतोस हा मोगरा बहरतो नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो चोरून ऐकतो अन मोहरतो लक्षलक्ष चांदणकळ्या मिरवतो अंगोपांगी सौंदर्यानी ऊतू जातो टप्पोर्‍या फुलांनी डवरून धुमसतो सुगंधी निश्वास उसासे टाकतो नक्कीच!! कारण आजकाल हा रोज बहरतो आजकाल मोगरा रोज बहरतो ....!!!
काव्यरस

“( अ ) द्वितिय ” प्रेम

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 31/08/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
“( अ ) द्वितिय ” प्रेम प्रीतीत संगत तुझी, मज कधी ना लाभली, साथ संगत नव्हती कुणाची, पण वेदनांनी मज दिली. खेद नाही, राग नाही, प्रेम तव जरी ला लाभले, वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. निरंजन वहाळेकर
काव्यरस

देवा तु चुकलास

लेखक प्रीत-मोहर यांनी सोमवार, 30/08/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
देवा तू चुकलास.... माणसाला बनवताना मन का दिलेस? सगळं साठवण्याची कुवत का दिलीस? टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात... न कळते तर बरं झालं असतं.... आता केलीस ती चूक केलीस पुन्हा मात्र चुकू नकोस..... माणसासारखा बनू नकोस.... माणूस काय......
काव्यरस

केव्हा तरी पहाटे..

लेखक इला यांनी रविवार, 29/08/2010 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना एका मैत्रिणीने केव्हा तरी पहाटे हे गाणं म्हटलं...तर त्यावरून एका मैत्रिणीला याच गाण्यासाठी काही ओळी सुचल्या. मग त्यानंतर सगळ्यांनाच हा फीवर चढला...हे माझेही काही प्रयत्न - ही कडवी चालीत बसत नसली तरीही त्यातील भावार्थ गाण्याला अनुरूप असा आहे या शांतशा क्षणांनी मागितली साथही कुणाची ती साथ मागताना ही रात सरून गेली.. शब्द माझे भिजताना सजवून रात्र गेली हे शब्द वेदनांचे सुचवून रात्र गेली.. बघा तुम्हालाही अजून काही सुचतंय का?

हे खेळ संचिताचे .....!

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 29/08/2010 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
हे खेळ संचिताचे .....! काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू" हस्त माझा रेखतांना का असा भांबावला हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला गंगाधर मुटे ..................
काव्यरस

आले आले गणपती माझ्या घरी आले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/08/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आले आले गणपती माझ्या घरी आले
आले आले गणपती माझ्या घरी आले आगमनाने...त्यांच्या... आगमनाने त्यांच्या हो... घर माझे पवित्र झाले...
काव्यरस

प्रणयाचा पाऊस!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 28/08/2010 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले!
काव्यरस

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/08/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते: ">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!! खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं >>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१ चला यमकं जमवुया" मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड म्या जवा भेटाया जातो काशीला.... तवा... तवा...
काव्यरस

प्रेमाची बँक

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/08/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? माझे अकाउंट उघडतेस का? माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ|| खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का? तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
काव्यरस