Skip to main content

कविता

स्वप्नांचे पान मुंबई . . .

लेखक गणेशा यांनी सोमवार, 06/09/2010 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे

पावसांत वडवानल ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 06/09/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
पावसांत वडवानल ! ! ! बरसत होता श्रावण अगणित, ऋतू प्रेमाचा होता फुलला, विद्युलतेसम प्रकटलीस तू, इंद्रधनूहि स्वागतास अवतरला. पाऊस रिमझिम, तू ओलेती, तन-मन माझेहि ओलेती, केस झटकणे तुझे त्या क्षणी, बरसले अगणित माणिक मोती. उधळीत रंग असे लावण्याचे, आलीगिले तू अवचित मजला, पावसांत जर वडवानल पेटला, मी दोषीन पावसाला.. निरंजन वहाळेकर
काव्यरस

भारत माझा देश आहे...........

लेखक संदीप परांजपे यांनी रविवार, 05/09/2010 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक दुसरयाला लावतात ठिगळं, पण स्वतःच्या खिशाला भोक तूरडाळ भिडली गगनाला, सिमकार्ड फुकट गावतंय ह्यांच्या बापसाची स्वप्नपूर्ती, पोरांचं उगाचंच फावतंय ए.सी. शोरूममध्ये, पायीची वहाण ,बसली शेल्फावरी, फळं आणि भाज्या, आजही बसलेत, विकत रस्त्यावरी.. कारण.. पिइझा पोचतोय वेळेत पण पोलिस येतात लेट कारण त्यांचा कोणीच ठरवला नाही, वेळेत येण्याचा रेट तंत्रद्यान पोचले घरोघरी, मोबाईलमध्ये टी.व्ही. अन नेट घरच्यांसाठी वेळ नाही पण विसरत नाहीत क्रिकेट...

प्रेमाचा आयकर

लेखक स्पा यांनी शनिवार, 04/09/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाचा आयकर मिसळपाव पाव टाकलेल्या आधीच्या धाग्यामुळे .... बऱ्याच जणांचा टिंगल करण्याचा विषय बनलो.... पण जे माझ्याबरोबर घडलं ते ... माहित नसल्याने हि प्रतिक्रिया अपेक्षित होती...... एकदा मिळालेल्या या चटक्याने.... पूर्ण कोलमडून गेलो होतो ... असो ... त्यावेळी असाच काहीतरी सुचलं ... कविता नाही म्हणून शकत... कारण मी कवी नाही... पण तरीही असंच मांडावस वाटतंय.... समजून घ्या ..... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... कारण....कारण....
काव्यरस

अवचीत यावं कुनी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 04/09/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी हातामदी हात धरावा तुम्ही ||धृ|| आठवनीचे पाखरू उडती कंटाळ्यामधी रातदिस जाती सोबतीला कुणी असावं "कसं चाललं तुझं" पुसावं असं वाटत मनी ||१|| कालपासनं लवतो डावा डोळा नजर जायी दारी कितीक वेळा कुनीतरी भेटाया का येईल का रात अशीच एकटी जाईल वेडी शंका येई मनी ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/०९/२०१०
काव्यरस

नि:शब्द ……! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 03/09/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द ……! ! ! प्रीतीची आब अपुल्या, तू कधी ना राखली, अर्पिले सर्वस्व तुजला, परी प्रीत तू ना जाणली. होता कधी अधिकार तुजवर, तोहि अता ना राहिला, आसवाचा हक्क माझा, तोहि तू ना ठेवला. विरहाचे दुखः माझे, सांगू कुणा, आणिक कसे ? अंतरीचे शब्द शब्द, नयनांत मी आणू कसे ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

गण: माझ्या गणाला गणपती आले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/09/2010 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: आमच्या गणाला गणपती आले
आमच्या गणाला गणपती आले वंदन करूनी मस्तक झुकले ||धृ|| रिद्धीसिद्धीचा स्वामी तू गणपती शरण आलो आम्ही अल्पमती कार्यारंभी दावूनी उपस्थीती दयाबुद्धीने आम्हा पाहीले आमच्या गणाला गणपती आले ||१|| कलाकारां होवोनी स्पुर्ती जगावेगळी मिळण्या किर्ती कला आगळी सादर करण्या कलाकार सारे एकच झाले आमच्या गणाला गणपती आले ||२|| सारी विघ्न
काव्यरस

चाललो मी....

लेखक स्वानंद मारुलकर यांनी बुधवार, 01/09/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्याकूळसे उसासे टाकीत चाललो मी आवेग आसवांनी झाकीत चाललो मी माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे हा भार सोसवेना वाकीत चाललो मी हा देह दग्ध होतो वणव्यात अंतरीच्या वाटेवरी निखारे फेकीत चललो मी मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ? हा क्रूर जीवघेणा रस्ता मला हवासा होऊन पूर्ण त्याच्या अंकीत चाललो मी -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस

सही

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 01/09/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी कोपर्‍यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा हातात एक पत्र अन् प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले जरी आज ती श्रीमती अन् विख्यात अभिनेत्री जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री 'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा उभा क्षणभ
काव्यरस

गंमतीची गोष्ट

लेखक नीधप यांनी बुधवार, 01/09/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहायचं तुम्ही नावाजायचं मी आनंदायचं परत लिहायचं हा आपलातुपला गंमतनाच! नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा. लिहिण्याचा हात धरून पळून गेली. खूप विनवलं तिला थांब म्हणून. पण ऐकेना. तिचं टुमणं एकच आळस सोड कष्ट कर कसं जमावं? जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला! पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड. 'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं कल्पना तरी कशी करू शकतेस तू?' गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!! गेलीच निघून आता मी नाही लिहायचं तुम्ही लिही ना म्हणायचं माझी मान वर तुम्ही परत लिही ना म्हणायचं आता माझी कॉलरच ताठ!! स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!! -इतिश्री निर्जाबाई उवाच!!