Skip to main content

कविता

मर्यादा

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 09/09/2009 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
रौद्र तांडवे अंगे घुसळीत चंद्रमोहीत श्वासा सोडीत युगायुगांचे जीवन पेरीत सांभाळली मर्यादा कोटी कोटी मस्त्य थवे एक दुजांचे जीवन नवे मनुजही घेती थोडे बरवे सांभाळूनी मर्यादा नद्या मुखींचा गाळ गळोरा त्यामधूनी ये विश्व आकारा खाडी बनली मस्त्य धुमारा सांभाळूनी मर्यादा खोल तळाशी भुतल क्रंदन ज्वालांचेही रसमय नर्तन सागर अद्भुत खेळ चिरंतन सांभाळूनी मर्यादा जसा होतसे मानव सक्षम सागर भासू लागे धनसम कसे लुटू दोनच कर मम यंत्रे वाढवू मर्यादा अगडबंबशी जाल रोवीली मस्त्यथव्यांची रास खेचली कोटी तृणागत मृत फ़ेकली उधळण अमर्याद खाडीप्रत जाती मस्त्यथवे धारून अंतरी बीज नवे विषमयी गटारे तेथ मिळे हत्याकांड अमर्

आणि त्यावर म्हणा..

लेखक शाहरुख यांनी बुधवार, 09/09/2009 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
मरा मारा आणि त्यावर म्हणा भारत माझा देश प्यारा खा खिलवा आणि त्यावर म्हणा या भ्रष्टाचाराला घालवा थुंका पचका आणि त्यावर म्हणा सगळ्यांनी स्वच्छता राखा पाडा ढकला आणि त्यावर म्हणा सगळ्यांनी रांगेतनं चला मी तर म्हणतोयच आणि त्यावर तुम्हीही म्हणा.. -- कवी शाहरुख

सर्व काही आत आहे

लेखक अजिंक्य यांनी मंगळवार, 08/09/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
सहजसोपे भासते कविता प्रसवणे, गोषवारा माझिया डोक्यात आहे ||१|| असूदे भारी कितीही लेखणी ही, पेलण्याची शक्ति या हातात आहे ||२|| कल्पनाविश्वात करितो मी विहार, दौडण्याची शक्ति या पायात आहे ||३|| जे न देखे रवी तेही पाहतो मी, दूरवरची चमक या डोळ्यात आहे ||४|| अडचणी येती कितीही अन कशाही, सोसण्याची धमक या धमन्यांत आहे ||५|| पाहिली सृष्टीत या दुःखे कितीक, तरीही आनंद या हृदयात आहे ||६|| प्रश्न का बाहेरचे पडतात मजला, पाहिजे ते सर्व काही आत आहे ||७||

'नव'कविता

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 08/09/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या मनुची नवी माणसे, नवहृदयाची नवभाषा नवे रंग हे नवीच आशा, नवक्षितिजे अन नव्या दिशा नवजीवनाच्या रांगोळीत हे, भरून टाकशी रंग नवे सुखदु:खाच्या ठिपक्यांमधली, जागा भरूनी काढू सवे शरद नको अन ग्रीष्म नको हो, वसंत तो झालाच जुना नव्या ऋतुची नवी पालवी, त्यावर अपुल्या पाऊलखूणा गाऊ आपण गीत नवे, तो राग नवा, हा ताल नवा नव्या बंदीशी, नवीन भाषा, अपुला गावा ख्याल नवा अपुले असतील प्रश्न नवे, उत्तरे नवी, अन चुका नव्या नव-वाटेचे नवीन फाटे, ध्येय नवी अन दिशा नव्या वळूनी बघता पाठीमागे, आठवणींचा गोफ दिसे किती भासले सुंदर तरीही, गोफ नसे ते जाल असे हातामध्ये हात देऊनी, चल टाकू पाऊल पुढे नवपर्वाच्या सुरवातीला

समिधा

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 07/09/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
उभ्या जन्मात मी बहुधा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी मी सावली झाले तुला ग्रीष्मात जपणारी तुझ्या बहरात मी झाले कळी गंधात रमणारी बहरले धुंद मी कितीदा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी अभिसारिका झाले, प्रिया झाले, सखी झाले रमा नारायणाची, शंकराची पार्वती झाले कधी कृष्णा तुझी राधा तुझ्या यज्ञातली समिधा || तुला पाहून माझ्या अंतरी प्राजक्त दरवळतो कुठेही जा, तुझ्यासाठीच माझा जीव घुटमळतो प्रिया, तू सूर्य मी वसुधा तुझ्या यज्ञातली समिधा ||
काव्यरस

ओढ

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 07/09/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगणार्‍याला मरणाची ओढ अन मरणार्‍याला जगण्याची ओढ नास्तिक म्हणुन जगलो आयुष्यभर म्हातारपणी आता मला देवघराची ओढ नाही साधले काहीच फिकट जगुन कापसाला आता मात्र वातीची ओढ आयुष्य गेलो मुडद्यासारखे जगत अन माझ्या मुडद्यालाही आता जिवणाची ओढ दु:खेच आली सदैव नशिबी माझ्या सुखांना सुद्धा दु:खाची ओढ सहन नाही होत हे जगणे असले माझ्या मढ्याला मात्र आता सरणाची ओढ आठवणींचा किती हा पसारा, का माझ्या वर्तमानाला भुतकाळाची ओढ भुतकाळातच रुतुन पडलोय वर्तमानाला मात्र भविष्याची ओढ गेल्यावर जगातुन काय उरेल मागे माझ्या मरणाला आता मागे उरण्याची ओढ

मी बदलणार नाही

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/09/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
कॉंन्क्रिटच्या भल्यामोठ्या इमारती बांधीन त्यावर काचेचे आवरण बसवेन आत भट्टी झाल्यावर येसी बसविन भरमसाठ वीज वापराने लोडशेडींग झाले तरी पण मी बदलणार नाही मोठ्या शहरात राहून प्रगती करेन स्टायलिश सोसायट्यांमधे राहीन ब्रॅडेड वस्तू वापरुन नद्या-नाले घाण करेन तरी पण मी बदलणार नाही सहापदरी रस्ते बांधेन ते लहान गावात आणून सोडेन गावाच्या मागे ५-स्टार औद्योगिक वसाहत बांधेन ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले तरी पण मी बदलणार नाही माझे विचार तेच इतरांचे असे गृहीत धरेन कशाला खुलासा करायचा प्रश्न विचारुन माझेच विचार पुढे रेटून काहीच साध्य झाले नाही तरी पण मी बदलणार नाही मला घाई आहे

बाबासाहेब ते भैय्यालाल...

लेखक हृषीकेश पतकी यांनी शुक्रवार, 04/09/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता दि. ४-१२-२००६ रोजी केली आहे... या कवितेतील काही जातीवाचक शब्द कुणाच्याही भावना दु़खावण्याच्या हेतूने वापरले नाहीयेत... महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नैतिक मूल्यांची होळी होत असताना... मीही तुमच्यासारखाच निद्रिस्त... तेव्हा तुमच्या आमच्यातल्याच चार जीवांना समाज दूर सारत होता | आणि रिकामं डोकं नसलेला प्राणी म्हणून आपली ओळख जपणारा...
काव्यरस

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/09/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते. (पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.) स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा.
काव्यरस

मन इंद्रधनू

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 01/09/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे
काव्यरस