Skip to main content

कविता

लावणी-प्रणयरातीला कुठ चालला

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 03/02/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
रात चांदण टिपूर सांडल वार्‍याचा बी साज नवा प्रणयरातीला कुठ चालला शृंगाराला सोडून या नथनी पैंजण दूर ठेवल कशास त्यांची भीड उगा प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका हाती माझ्या हात सख्याचा अन् फुललेली रात हवी नभांगणातील लाख चांदणी प्रीत बघुनी जळल मनी प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी
Taxonomy upgrade extras

कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 03/02/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
गुंजन करण्या का कष्ट विहंग घेई ही समस्या सदैव माझ्या मनी येई गीत लिहूनी कवी ते गाण्या देई सप्तसूरातून गायिका मग गान गाई कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी अपुले कवन सहजगत्या तो गाई प्रीति कशी एकमेकावरी करावी गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी अपुली प्रीति सहजगत्या व्हावी हीच कामना कवनातूनी मिळावी श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras

(( म्हणजे ))

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 03/02/2009 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते १ आयडी उडवल्यावर लगेच दुसरा काढल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते आपला आयपी ब्लॉक केला गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते हिट्स वाढवुन सर्व्हरवर ताण आणल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते तरीसुद्धा संकेतस्थळ चालु असल्याचे पाहिल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते दिवसातुन एकदातरी आंतरजालावर गजाल्या केल्याशिवाय समजत नाही. आधारीत : - म्हणजे आणि (म्हणजे) वास्तविक पाहता काव
Taxonomy upgrade extras

तू यावेस

लेखक trendi.pravin यांनी मंगळवार, 03/02/2009 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
तू यावेस प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात तळपत्या तेजस्वी सुर्यासारख॑ , शितल शान्त चन्द्रासारख॑ ! प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात हळूवार स्वप्नासारख॑ , सकाळच्या कोवळ्या ऊन्हासारख॑ ! प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात खळाळत्या निर्मळ झरयासारख॑ , विराण वाळव॑टात श्रावणासारख ! प्रिया तू र॑गवावेस माझ्या आयुश्यास एखादया सु॑दर चित्रासारख॑ , प्रिया तू ऊजळवावेस माझ्या आयुश्यास मन्दिरातल्या दिपासारख॑ ! तू रहावेस माझ्या आयुश्यात रेशीम बन्धासारख॑ तू रहावेस माझ्या ह्रुदयात स्पन्दनासारख॑

(म्हणजे)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 03/02/2009 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते जोर लावल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते माहेरी गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते सासरी आल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते दिवटी झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते विडंबन केल्याशिवाय समजत नाही. आधारीतः म्हणजे
Taxonomy upgrade extras

(फुकट सकाळ)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 03/02/2009 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
(आमच्या घरात दर शुक्रवारच्या मित्रमंडळी आयोजित 'पोकर नाईट' नंतर शनिवारी सकाळी सगळे काही/सगळे जण ठप्प होते/होतात. अशा एका शनिवार सकाळचे हे चित्र) फुकट सकाळ *** कुठे कोण पडले पहाटे बघितले कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते सुटीच्या सकाळी असावे तसे हे पहा फक्त पेले रिकामे रिकामे *** नि ओट्यावरी आकृत्या बाटल्यांच्या (नि सोफ्यावरी मित्रही सांडलेले!) अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत निघाले धुराचे किती लोट होते फुप्फुसातुनी? घाबरा जाहलो मी *** आधारीतः धुकट सकाळ

स्वप्नपरी

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 02/02/2009 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- जागती रात धुंदीत गात कसली पहाट मग होते जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती ---
Taxonomy upgrade extras

धुकट सकाळ

लेखक धनंजय यांनी सोमवार, 02/02/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धुकट सकाळ
(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र) picture (पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे.
Taxonomy upgrade extras

आठवण

लेखक शर्मीला यांनी रविवार, 01/02/2009 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण आपल्यापासून दूर राहिल्यावर आठवण अधिक सतावते फोन करून बोलता-बोलता बिल आडंव येत आठवणही मग पैशात तोलली जाते
Taxonomy upgrade extras

हुंडाबळी

लेखक शर्मीला यांनी रविवार, 01/02/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
हुंडाबळी मला लगीन कराव पाहिजे हुंडा देणारी मुलगी पाहिजे चिकनी असो वा चकणी असो शिक्षित असो वा अशिक्षित असो
Taxonomy upgrade extras