Skip to main content

कविता

Seezens (seasons)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 27/01/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा मी एक कविता म्हणून दाखवू?"काल रात्री आमच्या चिरंजिवांनी (वय वर्षे ७) एक विचारणा केली. मी विचारले की शाळेत शिकवली का तर म्हणाला, "नाही, मीच केली." मी चकित! त्याला म्हणालो लिहून काढ. "मला कोणीही स्पेलिंग सांगू नका मला येईल तसे मी लिहीन नंतर सांगा." अशी आज्ञा करुन चिरंजीव लिहायला बसले. आता हा काय लिहिणार अशा आश्चर्यात मी होतो. त्याने झटपट लिहून ती मला दाखवलीन.

एकमन

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 27/01/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांचे तण आठ्वांचे रण माजले हे रान माझिया मनी !! धरीले रींगण पुरते झींगुण जाहले करुण माझिये मन !! तुझीच आन नको तुजविन काही अजुन माझिया मना !! कितीक क्शण गेले निवटुन मोहात गुंतुन माझिया मना !! नको येणंजाणं तुजठायी ध्यान व्हावे एकमन माझ्या गुरुराया !! सुचेता सुळे
Taxonomy upgrade extras

(ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन...)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 27/01/2009 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...' ही सुंदर गजल कालपासून मनात रुंजी घालत होती आणि आज शेवटी समर्पक शब्द सापडताच आम्ही कान पकडले!
Taxonomy upgrade extras

ही तशी माझीच आहे गोष्ट पण...

लेखक घाटावरचे भट यांनी सोमवार, 26/01/2009 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण....' ही ग़झल. आज मी सारे खरे ते सांगतो मी अताशा नवकवींना टाळतो ते गळी पडणार अंती जाणतो पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो संकटे साहीन मी अन वादळे नवकवी पण धैर्य माझे भेदतो तो पहा मी चाललो वाटेवरी शत्रू माझा वाट माझी रोखतो ऐकताना काव्य त्याचे का मला काळ पुढती जाईनासा वाटतो जांभया देऊनही मी एवढ्या काव्य साला तेच आहे वाचतो सूड म्हणुनि गोष्ट माझी ही कधी मुक्तछंदी मी कुणाला सांगतो टाळती का लोक पण मज ना कळे कालचा मी नवकवी ना आज तो - भटोबा

जय जय भारत ! जय जय भारत !

लेखक आचरट कार्टा यांनी रविवार, 25/01/2009 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
धवलगिरीच्या हिमशिखरांतुन सह्याद्रीच्या उंच कड्यांतुन गंगा-यमुना-गोदावरीच्या शुभ्र स्फटिकसम शीत जलातुन घोष एक हा घुमू लागला जय जय भारत ! जय जय भारत ! भेदातीत गर्जना होतसे जय जय भारत ! जय जय भारत ! सूप्त अग्नि तो फुलून उठला क्रांतीच्या कुंडात प्रकटला पाश तोडण्या परदास्याचा तृतिय नेत्र शंकरे उघडिला पितृभूमी ही मुक्त कराया सुपुत्र रणसागर हा आला कोटिकंठरव कानी येई जय जय भारत ! जय जय भारत ! स्वप्राणांच्या असंख्य ज्योती स्वयें अर्पिल्या या देशाप्रति निर्भय योद्धे रणात पडले देउनि निज प्राणांच्या आहुति क्रांतिवीर ते अमर जाहले विसरुनि घर अन्‌ विसरुनि नाती तख़्तावरही गर्जुन गेले जय जय भारत !
Taxonomy upgrade extras

भारत माझा एक रॆ

लेखक राजा यांनी रविवार, 25/01/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
भारत माझा एक रॆ ---- ( दॆशभक्ती) जाती धर्म वेश भुषा भाषा जरी अनेक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥ ध्रु ॥ ईथली गीता कुराण बायबल ग्रंथ जरी अनेक रे , संदेश त्यांचा एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥१॥ ईथली गंगा गोदा र्नमदा तापी नदी अनेक रे , पाणी त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥२॥ ईथले गांधी नेहरु भिमराव शिवबा हे नेते अनेक रे , कार्य त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥३॥ ईथला माणुस पक्षी प्राणी सजीव जरी अनेक रे , रक्त त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥४॥ ईथले मंदिर मज्जिद चर्च गुरुद्वारा अनेक रे ,भक
Taxonomy upgrade extras

गुलबचा सण

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 25/01/2009 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
Taxonomy upgrade extras

भयस्वप्न

लेखक धनंजय यांनी शनिवार, 24/01/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
भयस्वप्न * स्वप्नातल्या रेल्वे प्रवासात भेगाळ ओस माळरानावर दिसले प्रचंड सबस्टेशन विजेचे....... .......अकस्मात त्यावर अगदी स्लो मोशनमध्ये पडतय् क्षेपणास्त्र........ ................ म्हणेस्तोवर "बघा बघा!" पडलेही........ ................... धुकट धुराळ्यातून मनोर्‍यांवर विजेची चकचक......... .....

दिवा तेवतसे अंधारात... (देवद्वार छंद) [माझं इथलं पहिलंच पोस्ट :) ]

लेखक आचरट कार्टा यांनी शनिवार, 24/01/2009 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी कालच पहिल्यांदा या कट्ट्यावरची मिसळ खाल्ली, आणि प्रेमातच पडलो राव! अजुन सगळ्या सिस्टिमची नीट ओळख व्ह्यायची आहे, जमेल हळूहळू... छंदबद्ध रचना करायचीही आवड आहे, म्हटलं तुम्हा जाणकार लोकांच्या नजरेखालून जाऊदेत. [:)] अंधार आजचा राहतो गर्भार उघडते दार पहाटेचे ||१|| अंधाराची वाट अशी उजळते आणिक गळते भीती चिंता ||२|| क्षणात फुलतो मनात प्राजक्त मन हे आसक्त जगण्याला ||३|| एका आशेपोटी होती चमत्कार शरण हे जग श्रद्धावंता ||४|| आत्मविश्वासाचा उदय होतसे दिवा तेवतसे अंधारात ||५||
Taxonomy upgrade extras