Skip to main content

कविता

तू

लेखक प्रेरणा यांनी शनिवार, 31/01/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
कळलेच नाही मन गेले हळूच गुंतुन साध्यासुध्या डोळ्यांनीही नेले कधी भुलावून तुझ्या श्यामल रंगाचे झाले डोळ्यात आभाळ आणि तुझ्या नावानेच ओठ विलगे सकाळ तुझ्या पाहण्याने फ़ुले येती अंगांगी फ़ुलुन तुझ्यासाठी नजरेत मीही बहर तोलून असे मोकळे हसुन जाशी सहज निघोन ईथे काळ्जाच्या माझ्या ठोका जातो ना चुकून ३१.०१.०९

तुला हसताना पाहिलं की.......

लेखक अनंतसागर यांनी शनिवार, 31/01/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुला हसताना पाहिलं की वठलेल्या झाडाला पालवई फुटते आणि वर्षभर कोरडी असणारी नदी दुथडी भरुन वाहू लागते तुला हसताना पाहिलं की भर ग्रिष्मात वसंत अवतरतो पावसाची चाहूल लागण्या आधीच मोर पिसारा फुलवून नाचतो तुला हसताना पाहिलं की त्या मेघालाही पाझर फुटतो इंद्रधनू तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो तुला हसताना पाहिलं की फुलं हसू लागतात सर्व पक्षी जणू तुझ्यासाठीच गाणे गातात तुला हसताना पाहिलं की तो चंद्र तुझ्या रुपावर जळू लागतो आणि मी मात्र तुझ्या प्रेमात चिंब होऊन भिजून जातो.
Taxonomy upgrade extras

प्रियेच्या भेटी---

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 30/01/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी
Taxonomy upgrade extras

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 29/01/2009 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.

मृगजळ

लेखक सचिन यांनी गुरुवार, 29/01/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मृगजळामागे धावत राहिलो वाळूचे इमले बांधत राहिलो लाटेकडे दुर्लक्ष झाले अन् चुकले हिशेब मांडत राहिलो सुखांच्या बेरजा करता करता समाधान वजा करत राहिलो पत्त्यांचा बंगला सावरण्यासाठी वार्‍याला विरोध करत राहिलो पुढे जायचे अन् पुढेच जायचे मागचे सारे विसरत राहिलो काय सापडले माहीत नाही खूप काही हरवून बसलो

तू

लेखक सचिन यांनी गुरुवार, 29/01/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे येणे अन् ही सर काही संबंध असावा चोहीकडे सप्तरंग पसरले--कधी ? कसे ? तुझी पावले की भाग्य काही संबंध असावा सारे ऋतू माझे सदा असे बहरले कसे ? तुझा स्पर्श वा परीस काही संबंध असावा क्षण अन् कणही माझे उजळले तरी कसे ? तुझे हसणे की फुले काही संबंध असावा घरभर ताटवे हे मग उमलले कसे ? तुझे प्रेम नि सागर काही संबंध असावा या लाटा तो किनारा दोन्ही लाभतात कसे ?

मन कसे वेडे-पिसे

लेखक पल्लवी यांनी बुधवार, 28/01/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मन कसे वेडे-पिसे कधी हसे कधी रुसे कल्लोळात भावनांच्या कधी अलगद फसे ! मन कसे वेडे-पिसे कधी असे कधी तसे बोलघेवड्या मनात मूक आठवांचे ठसे ! मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! मन कसे वेडे-पिसे सप्तरंगी वस्त्र जसे शुभ्र-सुखाच्या सोबती दु:ख काळे शोभतसे ! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! ~पल्लवी~
Taxonomy upgrade extras

गुलाबाचे काटे

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 28/01/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे
Taxonomy upgrade extras

साद

लेखक सुचेता यांनी बुधवार, 28/01/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
घालावी तुज साद अव्याहत हाच नाद आवरता आवरेना थोपवू कसे मना क्शणोक्शणी तुझे भास भेटायाचे हिच आस कसाबसा सरे दिस रात उरे स्मरणास पुसण्यास नाही कोणी गालावर सुकले पाणी एकदाच तुज भेटावे मनीचे भाव जुळावे हिच शेवटली आस जिवाने घेतला ध्यास सुचेता सुळे

आताही प्रेम तसेच आहे का?

लेखक धनंजय यांनी बुधवार, 28/01/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आताही प्रेम तसेच आहे का? ********** नवे होते प्रेम जे वर्षांपूर्वी काही सांग आहे आताही ते तसेच का? भेटतो रोजच तुला सकाळ-संध्याकाळी काळीज प्रत्येकवेळी धडधडते का? सदाचा तोच तंटा भांडून झाल्यावरती होतो खालीवरती जीव तसाच का? तुझ्यासाठी झुरत नाही पूर्वीसारखा तरी नाही पारखा प्रेमाला मी आहे माझी खात्री असशील माझ्यासाठी घट्ट होतात गाठी ओढल्या तरी ********** (वाचलेल्या कवितेचा एम् पी ३ दुवा)
Taxonomy upgrade extras