Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
प
पगला गजोधर Wed, 04/01/2015 - 08:41 नवीन
लेखनाच्या आशयामागील भावनेशी सहमत, कधी नव्हे ते एखाद्या पक्षात योगेंद्र यादवां सारखा सभ्य राजकारणी, पक्ष समितीवर असताना, निदान हा पक्ष तरी 'दहाव्या व्यक्तीची' भूमिकेत काम करेल असे वाटले होते, पण आता भ्रमनिरास झाल्यासारखं वाटत आहे.
प
पिलीयन रायडर Wed, 04/01/2015 - 08:45 नवीन
लेख नेहमीप्रमाणेच खुप आवडला!
व
वेताळ Wed, 04/01/2015 - 09:20 नवीन
या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
न
नांदेडीअन Wed, 04/01/2015 - 10:24 नवीन
निवडणुका संपल्या तरी अपप्रचार सुरूच आहे अजून !
"कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही."
केजरीवालला अन्ना आंदोलनाच्याही पूर्वीपासून डायबिटिज आहे हो. कुणाच्याही तब्येतीवर भाष्य करणे योग्य नाही या पहिल्या वाक्यानंतर पुढे सगळ्या पॅराग्राफमध्ये तब्येतीवरूनच नेत्याचे नेतृत्व ठरवले तुम्ही.

"दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच."
केजरीवाल बॅंगलोरमध्ये पोहोचण्याअगोदरच आप कर्नाटकाने केजरीवाल यांचा दौरा कसा असेल (itinerary) याची सगळी माहिती पोलिसांना दिली होती. आणि केजरीवाल यांना कसल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा VIP ट्रिटमेंट देण्यात येऊ नये असे स्पष्ट सांगितले होते. तरीही प्रोटोकॉल म्हणा किंवा ‘न्युज’ बनवण्यासाठी म्हणा, बॅंगलोर पोलिसांनी त्यांचा ताफा केजरीवाल यांच्या खाजगी गाडीसोबत ठेवलाच. Refusing security protocol at the airport, Mr. Kejriwal got into Aam Aadmi Party (AAP) leader Prithvi Reddy’s car to go to Jindal. However, the security vehicles followed Mr. Reddy’s car till the institute. - The Hindu बाय द वे, पंचतारांकित निसर्गोपचार केंद्र म्हणजे काय हो ? तिथल्या इतर रूग्नांसोबत उपचार घेत होता तो, वेगळी VIP ट्रिटमेंट मिळत नव्हती. हे त्या निसर्गोपचार केंद्राचे Tarrif Card. http://www.jindalnaturecure.org/accommodation-tarrif-card.htm आम आदमी म्हणजे भीक मागणारा आदमी ही एकच व्याख्या आहे का आपल्याकडे ?

"भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो."
तुम्ही त्यांना धुतल्या तांदळाप्रमाणे समजता हे पाहून छान वाटले. पण मी आणि माझ्यासारखे अनेक आप समर्थक त्यांना धुतल्या तांदळासारखे समजत नाही. ते सुद्धा तुमच्या-आमच्यासारखे मनुष्य कुळातलेच आहेत, त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात हे आम्हाला माहित आहे. पण आम्हाला हे सुद्धा माहित आहे की सध्या भारतीय राजकारणात सगळ्यात चांगला कोणता पक्ष असेल, तर तो म्हणजे आम आदमी पार्टी ! उद्या चालून भाजप किंवा कॉंग्रेसनेसुद्धा जनतेची कामं करायला सुरूवात केली, तर त्यांनासुद्धा सपोर्ट करण्याची सद्बुद्धी दिलीये देवाने. हां, ज्यांना असे वाटते की आपमध्ये सगळे देव-देवता आहेत आणि त्यांच्याकडून काहीच चुका होऊ शकत नाहीत, अशा लोकांना मात्र माझा साष्टांग दंडवत.

"केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले. बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले."
केजरीवालने सत्ता सोडली तरी प्रॉब्लम आणि टिका झाल्यावर परत सरकार स्थापन करायचे ठरवले तरी प्रॉब्लेम. एक तर केजरीवालने कॉंग्रेस-बीजेपीसारखे पैसे देऊन आमदार फोडायचा प्रयत्न केला नाही, आणि समर्थन बाहेरून घ्यायचे ठरवले होते. आणि मुस्लिम आमदारांबद्दल केलेल्या स्टेटमेंटमध्ये काय चूक बोलला केजरीवाल ? गल्लीतल्या शेंबड्या पोराला पकडून विचारले तर तोसुद्धा सांगेल की मुस्लिम लोकांचे आणि भाजपचे काय नाते आहे. भाजप करत होता तो घोडेबाजारच होता ! व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे त्याच्या युट्युबवर. सापडला नाही तर सांगा, शोधून देतो.

" बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले"
परत तेच. कॉंग्रेसने फक्त आणि फक्त वापर करून घेतलाय मुस्लिम मतदारांचा आणि भाजपाचे मुस्लिम प्रेम जगजाहिर आहे. अशा वेळी मुस्लिमांपुढे फक्त आप हा एकमेव पर्याय आहे हे सांगायला खरंच ज्योतिषाची गरज आहे का ?

"सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!!"
ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता. आणि असंही पार्टीच्या संविधानानुसार लोकपाल हे नॅशनल काऊंसिलच्या मिटिंगमध्ये येऊ शकत नाहीत. जो गदारोळ त्या दिवशी सुरू होता, त्यात खालील काही बातम्यासुद्धा खपून गेल्या असत्या. - योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला. - गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला. - प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले. बाय द वे, रामदास यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आपने नवीन लोकपाल नियुक्त केले आहेत. यावेळी फक्त एक लोकपाल न निवडता तीन लोकपाल निवडले आहेत. १. एन. दिलीप कुमार (भ्रष्टाचार्‍यांचा कर्दनकाळ ठरलेले माजी आयपीएस ऑफिसर) २. राकेश सिन्हा (सीआयएसएफ चे माजी उपमहानिरीक्षक) ३. एस. पी. वर्मा (शिक्षणतज्ञ)

"केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? "
योगेंद्र यादव अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ धरण्यावर बसले होते. असो. ज्यांच्याकडे वैध ओळखपत्रं होती, निमंत्रणाचे SMS होते, त्यांनाच प्रवेश दिल्या जात होता. आणि यावेळी दोन्हीकडच्या मंडळींकडून पक्षाशी किंवा कार्यकारणीशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिल्या जाऊ नये यासाठी प्रोसेस थोडी स्ट्रिक्ट केली होती आणि त्यामुळेच आत जायला जास्त वेळ लागत होता. हे स्वतः आनंद कुमार यांनी आज तकसोबत बोलतांना सांगितले आहे. योगेंद्र यादव स्वतः एका चॅनलला म्हणाले की बैठकीमध्ये कॅमेरे होते. मिटिंगचे दोन व्हिडिओ युट्युबर टाकले आहेत पक्षाने. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी मागणी केली तर कदाचित पूर्ण व्हिडिओसुद्धा देण्यात येईल त्यांना. कुमार विश्वास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की ज्यांना योगेंद्र यादव बाऊन्सर्स म्हणत आहेत, ते चळवळीतूनच वर आलेले कार्यकर्ते आहेत. हेच लोक नेहमी त्यांच्या पाया पडायचे म्हणे. मिटिंगमध्ये त्यांनी योगेंद्र यादव यांना फक्त मंचावर येण्यापासून अडवले होते म्हणे. कार्यकर्त्यांमध्ये मिसळता येत नसेल, त्यांना ओळखता येत नसेल तर ते चुकीचे आहे असे कुमार विश्वास म्हणत होते.

"पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. "
रमजान चौधरी असे त्यांचे नाव आहे. (माझ्या माहितीप्रमाणे यांना आत प्रवेश मिळावा म्हणूनच योगेंद्र यादव धरण्यावर बसले होते.) हे रमजान चौधरी हरियाना विधानसभेत अपक्ष म्हणून उभे टाकल्यावर पक्षाने त्यांची सदस्यता रद्द केली होती. यांना नॅशनल काऊंसिलमध्ये परत कुणी टाकले हे कोडेच आहे. ’मला मारहाण करण्यात आली, त्यात माझ्या पायाचे हाड मोडले.’ असा आरोप करत दोन दिवसांपासून मिडियापुढे फिरत आहेत हे महाशय. कदाचित फेविकॉलने चिटकवले असेल हाड.

"हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!!"
या राजेश गर्ग यांनी बिन्नीचे सगळे रेकॉर्ड मोडायचे असे ठरवले आहे बहुतेक. यांना म्हणावं पुरावे देऊन टाका आणि केजरीवालची विश्वासार्हता कमी करून टाका.

"कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही."
काडीमात्र इंटरेस्ट नसूनसुद्धा लिहिलेच की त्याबद्दल. http://www.firstpost.com/politics/exposingkumarvishwas-yet-again-twitter-khap-gets-it-horribly-wrong-2181243.html हा एक चांगला लेख आहे. जरूर वाचा. मोदींच्या स्नुपगेट प्रकरणाबद्दल बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मोदींच्या पत्नींबद्दल काही बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. कुमार विश्वास यांच्या बाबतीत मात्र कसलाही पुरावा नसतांना नुसती चिखलफेक करा, त्यांच्या पत्नीलासुद्धा यात ओढून आणा. काय आनंद मिळतो माहित नाही ब्वा !

"मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच."
दिल्लीच्या कारभाराचे काय तीनतेरा वाजले काही कळू शकेल का ? दिल्लीच्या जनतेची कामं त्याच वेगाने होत आहेत. आणि जोपर्यंत आम आदमी पार्टी जनतेची कामे करत राहिल, तोपर्यंत मी त्यांच्या कामाचे समर्थन करत राहिल. मी या पक्षाचे समर्थन योगेंद्र यादव किंवा केजरीवालसाठी करत नाही तर हा पक्ष जनतेसाठी जो करतो, त्यासाठी मी त्याचे समर्थन करतो.

"म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत."
नकार त्यासाठी दिलेला नाहीये. भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायला नकार दिलाय आप सरकारने. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर... - जवळपास २५,००० कामगारांना (जे अस्तित्वातच नाहीयेत) दरवर्षी पगार देणे. यातून दरवर्षी १०० करोडचा चुना. - दिल्ली महानगरपालिकेची वेबसाईट बनवण्यासाठी ७० करोडचे बजेट बनवून ठेवले आहे. आत्तापर्यंत १२ करोड रूपये खर्च केले आहेत भाजपने त्याच वेबसाईटवर. - डेंग्यु, मलेरियाच्या औषध फवारणीवर ३५ करोडचा खर्च. ह्या अशा ‘प्रामाणिकपणासाठी’ पैसे मिळणार नाहीत असे ठणकावून सांगितले आहे. तरी यातून काही मार्ग काढायचा असेल तर परत एकदा तीनही महापौरांसोबत चर्चेची तयारी असल्याचे आप सरकारने सांगितले आहे. राहिला प्रश्न कचर्‍याचा, तर आपचे सगळे आमदार आपापल्या भागात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतः कचरा साफ करत आहेत. अशा बातम्या नाही दिसणार तुम्हाला कुठेही.

"या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?"
या इथले बोलायचे असेल, तर मिपावरच मी हे बोललो होतो की पक्षात सध्या जे चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. फेसबुकवर, व्हाट्सऍपवर, मित्रांसोबत प्रत्यक्ष चर्चा करतांना सगळीकडे मी हेच बोललो आहे. आपच्या ऑफिशिअल फेसबुक ग्रूपवर जाऊन बघा. अक्षरशः दोन गट पडले आहेत. एक केजरीवाल समर्थकांचा आणि एक YY, PB समर्थकांचा. मी अजूनही दोघांपैकी एकाची बाजू घेऊ शकलो नाही, म्हणून कोण बरोबर आणि कोण खोटारडा हे सांगू शकत नाही. योगेंद्र यादव मितभाषी असल्यामुळे साहजिकच लोकांना त्यांचे म्हणणे खरे वाटू शकते, पण जे पुरावे केजरीवालांचा ग्रूप देतोय, त्यावरून त्यांची बाजूसुद्धा पटत आहे. अन्यथा बहुमत केजरीवालांच्या बाजूने नसते. बाय द वे, मिपावर भाजप समर्थकांनी NCP, PDP, मसरत आलम विषयांवर कुठे कुठे विरोध केला होता कळू शकेल काय ? फेसबुकवरसुद्धा मी ज्या समूहांमध्ये आहे, तिथेसुद्धा भाजपचा या गोष्टींवर विरोध करणारे दिसले नाहीत. तुम्ही ज्या ग्रूपमध्ये आहात त्यांची लिंक मिळेल का ? फेसबुकवर मराठी माणसांचा हा एक ग्रूप आहे. https://www.facebook.com/groups/kaustubhsgroup/ मिपावरचे अनेक सभासद तिकडे असतील. कुणी हा प्रतिसाद वाचत असेल तर कृपया मला सांगा तुम्ही तरी कधी या ग्रूपमध्ये भक्तांना भाजपच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करतांना पाहिले आहे का ?

"या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. "
ओह ! तुम्हाला (परत) काडीमात्रही इंटरेस्ट नाही ? काय राव, तुमचाही वेळ घालवलात अन्‌ माझाही वेळ घालवलात. :( केजरीवालांच्या कोणत्या रथाबद्दल बोलताय माहित नाही, पण जर दिल्लीच्या जनतेशी संबंधित असेल, तर परत सांगतो की त्यांची कामं त्याच वेगाने पार पडत आहेत. परत परत स्पूनफिडिंग करायची माझी मुळीच इच्छा नाही. ज्यांना आप करत असलेल्या कामाबद्दल माहिती हवी आहे, त्यांनी खालील लिंकवर जावे. - https://www.facebook.com/AamAadmiParty - https://www.facebook.com/AAPDelhiNCR - आपच्या आमदारांचे ट्विटर हॅंडल्स. ही त्यांच्या नावांची यादी. http://www.elections.in/delhi/assembly-constituencies/2015-election-results.html या तीन लिंक दिल्या कारण आप करत असलेल्या कामाबद्दल न्युज चॅनलवर तुम्हाला काही पाहायला मिळण्याची या जन्मात तरी शक्यता नाही. ज्यांना काहीही जाणून घ्यायचे नसेल किंवा ऎकिव माहितीवर विश्वास ठेवायचा असेल त्यांनी त्यांची दिनचर्या सुरू ठेवावी. मनःपूर्वक शुभेच्छा !

क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 10:46 नवीन
या वाटच बघत होतो तुमची. इतर मुद्दांना नंतर उत्तरे देतो. सध्यापुरते---
कुणाच्याही तब्येतीवर भाष्य करणे योग्य नाही या पहिल्या वाक्यानंतर पुढे सगळ्या पॅराग्राफमध्ये तब्येतीवरूनच नेत्याचे नेतृत्व ठरवले तुम्ही.
:) जर ताणतणाव सहन होत नाहीत म्हणून शुगर वाढत असेल तर तो मनुष्य ताणतणावांना सामोरा जाऊ शकत नाही हे नक्कीच.आणि नेतेपद किंवा मुख्यमंत्रीपद म्हटले की ताणतणाव आलेच.म्हणजे जो माणूस ताणतणावांना सामोरा जाऊ शकत नाही तो नेता बनायला अयोग्य आहे एवढे साधे म्हणणे आहे.
बाय द वे, पंचतारांकित निसर्गोपचार केंद्र म्हणजे काय हो ? तिथल्या इतर रूग्नांसोबत उपचार घेत होता तो, वेगळी VIP ट्रिटमेंट मिळत नव्हती. हे त्या निसर्गोपचार केंद्राचे Tarrif Card. http://www.jindalnaturecure.org/accommodation-tarrif-card.htm आम आदमी म्हणजे भीक मागणारा आदमी ही एकच व्याख्या आहे का आपल्याकडे ?
अहो तुम्ही नुसते रूमचे भाडे दिले आहेत वरच्या लिंकमध्ये.त्यापैकी नक्की कुठच्या रूममध्ये केजरीवाल होते? आणि खोलीभाड्याव्यतिरिक्त निसर्गोपचार केंद्रात विविध पॅक, डॉक्टरांचे कन्सल्टेशन या सगळ्यांचे मिळून दिवसाला २५ ते ३० हजार रूपये खर्च येणार असे इतरही अनेक लिंकांमध्ये म्हटलेले होते. आणि तरीही त्याला पंचतारांकित आश्रम म्हणायचे नाही? माझ्याच नात्यातले अनेक उरळीकांचनच्या आणि कर्नाटकातल्या घटप्रभा येथील निसर्गोपचार आश्रमांमध्ये अनेकदा गेले आहेत. तिथे दिवसाला ८००-१००० रूपयात होते हो सगळे. उगीच समर्थन करायचे म्हणून करू नका.केजरीवाल स्वतःला आम आदमी म्हणवत असतील तर त्या आम आदमीला दिवसाला २५-३० हजारांचा खर्च कसा काय परवडतो बुवा? की आम आदमी वगैरे नुसता मुखवटा? टिपीकल समाजवादी लोक करतात तसे गरीबीचे उदात्तीकरण मला अजिबात आवडत नाही.पण जर तुमचा नेता एका बाजूने आम आदमी असायचा घोषा लावत असेल आणि तरीही दिवसाला २५-३० हजार खर्च असलेल्या ठिकाणी १०-१२ दिवस जाऊ शकत असेल तर तो (भारतीय स्टॅन्डर्डप्रमाणे) आम आदमी नक्कीच नाही आणि आम आदमी असल्याचा दावा म्हणजे ढोंग आहे. यावर माहित आहे तुम्ही काय समर्थन करणार आहात ते-- बिइंग आम आदमी इज अ स्टेट ऑफ माईंड (राहुल गांधींच्या वक्तव्यावरून साभार). तसे असेल तर 'गिरा तो भी टांग उपर' सोडून दुसरे काय म्हणणार?
तुम्हाला (परत) काडीमात्रही इंटरेस्ट नाही ?
:) बरोबर कोण आहे--केजरीवाल की यादव/भूषण याच्यात काडीमात्रही इंटरेस्ट नाही हो. माझ्यासाठी दोन्ही गट एकाच माळेचे मणी. पण आम आदमी पक्ष आणि केजरीवाल जे ढोंग करत आहेत ते उघडे करण्यात मात्र मला अतोनात इंटरेस्ट आहे.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 11:33 नवीन
केजरीवालने सत्ता सोडली तरी प्रॉब्लम आणि टिका झाल्यावर परत सरकार स्थापन करायचे ठरवले तरी प्रॉब्लेम. एक तर केजरीवालने कॉंग्रेस-बीजेपीसारखे पैसे देऊन आमदार फोडायचा प्रयत्न केला नाही, आणि समर्थन बाहेरून घ्यायचे ठरवले होते.
सहा काँग्रेस आमदारांना फोडून त्यांचा वेगळा गट बनवून त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ असे केजरीवाल म्हणाले होते असे त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट आहे.आणि हेच केजरीवाल १६ जुलै २०१४ च्या ट्विटमध्ये म्हणत होते की भाजप काँग्रेस आमदारांना २० कोटी देत आहे.म्हणजे जे आमदार २० कोटीमध्ये विकले जात नाहीत त्यांना फोडायला आणखी जास्त रक्कम मागणार ही गोष्ट अगदी उघड आहे. तुम्हाला ती मान्य करायची नसल्यास गोष्ट वेगळी. आणि मोदींचा बागुलबुवा दाखवून आआप ती किंमत कमी करायचा प्रयत्न कशावरून करत नव्हता? आणि याउपरही या प्रकारामध्ये आणि त्याचवेळी नैतिकतेचे बुरखे परिधान करण्यात तुम्हाला काहीही गैर वाटत नसेल तर गोष्ट वेगळी. लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे: "भाजप करते तो घोडेबाजार आणि आआप करते ती political realignment" असे तुम्हाला वाटत असेल तर मग काय बोलणेच खुंटले.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
च
चिनार Wed, 04/01/2015 - 12:04 नवीन
वारंवार केजरीवाल आणि मोदी यांची तुलना का केली जाते हेच कळत नाही. मी मोदी समर्थक आहे पण केजरीवाल विरोधक नाही ! पुराव्यादाखल खालील दुव्यावरील माझा प्रतिसाद वाचावा http://www.misalpav.com/node/30156?page=२ http://www.misalpav.com/node/30568 मोदी आणि केजरीवाल दोघांच्याही सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावरच करायचे असं ठरवले आहे. पण सध्या घडत असलेल्या गोष्टी दुर्दैवी नक्कीच आहेत. आणि यामुळे आप वरचा जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो. या धाग्यावर पुढील लिंक दिली आहे. http://swarajyamag.com/politics/yadav-and-bhushan-deserve-no-sympathy/ ही वाचल्यावर असे लक्षात येते की भूषण आणि यादव यांच्याविषयी केजरीवाल यांचे मत कधीच चांगले नव्हते. तरीसुद्धा भूषण आणि यादव यांची जनमानसातली इमेज लक्षात घेता केजरीवाल त्यांच्यासोबत वाटचाल करत राहिले. असं करण्यात काही गैर नाही. पण याचाच दुसरा अर्थ केजारीवालांनी त्या दोघांचा उपयोग करून घेतला व डोईजड झाल्यावर दूर केले असा होत नाही का ? आप चे राजकारण इतर पक्षांपेक्षा काय वेगळे आहे
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 12:47 नवीन
ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता.
खरं की काय? स्वतः रामदास वेगळेच काहीतरी बोलत आहेत .
आणि असंही पार्टीच्या संविधानानुसार लोकपाल हे नॅशनल काऊंसिलच्या मिटिंगमध्ये येऊ शकत नाहीत.
म्हणजे आपल्याला सोयीच्या वेळी पार्टीचे संविधान आठवते वाटते? योगेन्द्र यादव यांचे म्हणणे आहे की रामदास हे त्यापूर्वीच्या सगळ्या बैठकांमध्ये हजर असत . म्हणजे एखादा माणूस केजरीवालांच्या डोळ्यात खुपायला लागला की मग पक्षाचे संविधान आठवते आणि त्यावर बोट ठेऊन मग त्यांना अटकाव करायचा? अशा गोष्टी सगळेच पक्ष कधीना कधी करत असतात.पण तसे असेल तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हा खोटा दावा करू नका.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
व
वेताळ Wed, 04/01/2015 - 14:18 नवीन
आता "इंसान का इंसान से हो भाईचारा " असे जाहिरपणे म्हणायचे आणि फोन वर "इनके **पे लाथ मारके निकाल देता कोई इन्हे" हा कसला भाईचारा?ह्यावर आपले काय म्हणणे आहे? परत नरेंद्र मोदींच्या नावाने खोटे फोन करुन पक्ष फोडायचा ह्याला काय म्हाणायचे?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 14:25 नवीन
आता "इंसान का इंसान से हो भाईचारा " असे जाहिरपणे म्हणायचे आणि फोन वर "इनके **पे लाथ मारके निकाल देता कोई इन्हे" हा कसला भाईचारा?
केजरीवालांनी फोनवर शिवीगाळ केल्याचे समजले.पण नक्की हाच शब्दप्रयोग केला होता का याची कल्पना नाही.समजा तसा शब्दप्रयोग केजरीवालांनी केला असेल तर---- उंटाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर केजरीवाल समर्थक त्या उल्लेखावर तुटून पडले होते पण माणसाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख स्वतः केजरीवाल करत असतानाही हे गुलाम गप्पच आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे.
↩ प्रतिसाद: वेताळ
ब
बॅटमॅन Wed, 04/01/2015 - 14:28 नवीन
समजा तसा शब्दप्रयोग केजरीवालांनी केला असेल तर---- उंटाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर केजरीवाल समर्थक त्या उल्लेखावर तुटून पडले होते पण माणसाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख स्वतः केजरीवाल करत असतानाही हे गुलाम गप्पच आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे.
आश्चर्याची नव्हे, सध्याच्या फ्याशननुसार 'रोचक' आहे.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 14:32 नवीन
आश्चर्याची नव्हे, सध्याच्या फ्याशननुसार 'रोचक' आहे.
म्हणजे गेल्या ४५ दिवसात मिपावर फ्याशन पण बदलली वाटते? :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 18:14 नवीन
मागे मिपावर वीज कंपन्यांच्या कॅग ऑडीटची चर्चा झाली होती तेव्हा या वीज कंपन्यांकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर त्या कॅग ऑडिटला का घाबरत आहेत अशा स्वरूपाचे विधान झाले होते.ठिक आहे.पण मग निवडणुक आयोगाने एकदा नाही दोनदा स्मरणपत्रे पाठवूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे हिशेब या क्रांतिकारी पक्षाने का दिलेले नाहीत?जर तुमचे पैसे सगळे वैध मार्गाने येत असतील तर तुम्हाला अकाऊंटमध्ये कोणतेच पॅचवर्क करायची गरज नाही. मग खरे तर सगळ्यात पहिल्यांदा आम आदमी पक्षानेच निवडणुक आयोगाकडे हिशेब द्यायला हवे होते नाही का? पण काय असते भ्रष्टाचार, सार्वजनिक जीवनातील साधनशुचिता यांची चाड केवळ आम आदमी पक्षाला आणि इतर अलम दुनिया भ्रष्ट त्यामुळे हिशेब इतरांकडे मागायचे यांच्याकडे नाही, बरोबर की नाही नांदेडीयन?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Mon, 04/06/2015 - 08:06 नवीन
मागे मिपावर वीज कंपन्यांच्या कॅग ऑडीटची चर्चा झाली होती तेव्हा या वीज कंपन्यांकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर त्या कॅग ऑडिटला का घाबरत आहेत अशा स्वरूपाचे विधान झाले होते.ठिक आहे.पण मग निवडणुक आयोगाने एकदा नाही दोनदा स्मरणपत्रे पाठवूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे हिशेब या क्रांतिकारी पक्षाने का दिलेले नाहीत?जर तुमचे पैसे सगळे वैध मार्गाने येत असतील तर तुम्हाला अकाऊंटमध्ये कोणतेच पॅचवर्क करायची गरज नाही. मग खरे तर सगळ्यात पहिल्यांदा आम आदमी पक्षानेच निवडणुक आयोगाकडे हिशेब द्यायला हवे होते नाही का? पण काय असते भ्रष्टाचार, सार्वजनिक जीवनातील साधनशुचिता यांची चाड केवळ आम आदमी पक्षाला आणि इतर अलम दुनिया भ्रष्ट त्यामुळे हिशेब इतरांकडे मागायचे यांच्याकडे नाही, बरोबर की नाही नांदेडीयन?
हाहा इथेसुद्धा माझ्या वतीने तुम्हीच उत्तर देऊन टाकले ? लोकसभा निवडणुकांसाठी केलेला खर्च पक्षाने अजून का सादर केला नाही हे मला माहित नाही. पण हे नक्कीच चुकीचे आहे. लवकरात लवकर ही माहिती सादर करायला पाहिजे. पण जेव्हा आपण आपच्या या (अजून न दाखवलेल्या) खर्चाबद्दल बोलतो, तेव्हा भाजपकडे ७ अब्ज १४ करोड (ऑफिशियल आकडा. बाकी आपण सुज्ञ आहात.) कुठून आले होते या प्रश्नावरसुद्धा चर्चा व्हायला हवी ना ? की नको ? काय करायचे आपल्याला भाजपाचे ? केजरीवालने नवीन मफलर घेतले ना ? चला मग त्याला शिव्या घालूया.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/06/2015 - 08:34 नवीन
नाही, नाही ! केवळ या दोन्हीच नाही तर सगळ्याच चुकार पक्षांना सज्जड शिव्या घालूया... "फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्‍यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया... मुख्य म्हणजे, तिथेच न थांबता दोन्ही पक्षांना त्यांचे हिशेब देण्याचे कायदेशीर आणि नैतीक कर्तव्य करायला पाहिजे याबद्दल ठाम राहूया आणि... एकाच्या चुकीचे समर्थन करण्यासाठी दुसर्‍याच्या चुकीचे उदाहरण देणे साफ चूक व घातक आहे असे सुद्धा म्हणूया !
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Mon, 04/06/2015 - 09:03 नवीन
फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्‍यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया...
हिशेब न देणार्‍यांना ^ या ऎवजी हिशेब द्यायला 'उशीर करणार्‍यांना' असे म्हणूया. मला एक कळत नाही. आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चिनार Mon, 04/06/2015 - 09:11 नवीन
मला एक कळत नाही. आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?
कारण आप आणि आप समर्थक यांचे वागणे म्हणजे, "आम्ही नाही जा ..आम्हाला काही म्हणू नका ..जा बा ..तुम्ही असेच करता " इतके बालिश असते .
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Mon, 04/06/2015 - 09:25 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बालिश या शब्दाची व्याख्या कळाली. :)
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Mon, 04/06/2015 - 14:16 नवीन
धन्यवाद ! तुम्ही अस्सल आप समर्थक आहात हे सिद्ध केल्याबद्दल ! तुमच्या मते ,आप ला समर्थन करतात ते "समर्थक ".. पंतप्रधान मोदींना समर्थन करतात ते "भक्त" !! आणि असं असून सुद्धा खालील विधान मला एक कळत नाही. आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ? आम्हाला असे काहीही वाटत नाही. आप हा अत्यंत सामान्य लोकांचा पक्ष आहे असं माझ मत आहे. काहीतरी चांगलं करून दाखवतील अशी आशा आहे . पण त्यांना देव्हाऱ्यात तुम्ही बसवले आहे. परत एकदा अधोरेखित करतो, मी मोदी समर्थक आहे पण केजरीवाल (किंवा आप ) विरोधक नाही. एखाद्याला समर्थन करताना दुसर्याला विरोध केलाच पाहिजे असं आवश्यक नाही. पण आप पक्ष आणि समर्थक यांचे गेल्या १.५ वर्षातील वर्तन फक्त बालीशच म्हणता येईल !
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 15:13 नवीन
एखाद्याला समर्थन करताना दुसर्याला विरोध केलाच पाहिजे असं आवश्यक नाही.
ही भूमिका नक्कीच पटण्यासारखी आहे. मी स्वतः जरी भाजप समर्थक असलो तरी अजूनही मी नरसिंह रावांना भारताचे आतापर्यंतचे सर्वात चांगले पंतप्रधान मानतो. म्हणजे भाजप समर्थक असल्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे असे अजिबात नाही.
पण आप पक्ष आणि समर्थक यांचे गेल्या १.५ वर्षातील वर्तन फक्त बालीशच म्हणता येईल !
+१. वैयक्तिक पातळीवर मी स्वतः अण्णांच्या उपोषणाच्या दिवसांपासून या प्रकारांचा विरोधक होतो.त्यामुळे त्या उपोषणांमधून जन्माला आलेल्या आम आदमी पक्षाविषयी माझे मत अगदी पहिल्या दिवसापासून वाईटच होते आणि अजूनही आहे. तेव्हा माझ्या आआपविरोधाला ही पार्श्वभूमी आहे. तरीही मिपावरील (आणि इतरत्रही) अनेक सदस्य सुरवातीला आआपकडून बर्‍याच अपेक्षा ठेऊन होते पण नंतर केजरीवालांनी जे एकेक प्रकार केले त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. याविषयी प्रत्येकाची मते वेगळी असू शकतातच आणि तशी मते ठेवायचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त फरक इतकाच की आआपच्या नेत्यांनाच ही गोष्ट कळत नाही आणि प्रश्न विचारणार्‍या सगळ्यांची ते अंबानी-अडानीचे एजंट, भाजपच्या पेरोलवरचे वगैरे शब्दांनी भलामण करतात. नेतेच असे असतील तर मग समर्थक वेगळे असतील अशी अपेक्षाच नाही.
↩ प्रतिसाद: चिनार
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/06/2015 - 14:54 नवीन
मला एक कळत नाही. आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ? खी...खी...खी...खी...खी...खी... असा विनोदी संशय आलाच कसा !!!??? "फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी सर्वजण भ्रष्ट आहेत" असा ढींढोरा वाजवत आप सतत प्रसिद्धीत राहिला आहे. अश्या पक्षाला निवडणूकीनंतर ९० दिवसात निवडणूकीचे हिशेब देता येऊ नयेत आणि इलेक्शन कमिशनला त्यांना नोटीस पाठवावी लागते यात काही गैर दिसले नसले अथवा ते दुर्लक्ष करण्याजोगे वाटले असेल तर आपभक्त अंधश्रद्ध आहेत हे सिद्ध होते नाही का ? ("आपले बाबाजी करतात ती सगळी त्यांची लिला आहे" या धर्तीवर ! :) ) कोणत्याही विचारी माणसाने कोणत्याही माणसाला किंवा पक्षाला देवपदावर पोहोचवण्याचा अंधश्रद्ध व्यवहार करू नये... आणि त्यांच्या चुकीचे परिमार्जन दुसर्‍याच्या चुकीकडे बोट दाखवून करण्याचा भोळसट/कांगावेखोर व्यवहारही करू नये. चूकीला चूक म्हणावे... मग ती आपण पाठिंबा/मत दिलेल्या नेत्याची/पक्षाची का असेना. तरच ती चूक भविष्यात सुधारली जाण्याची शक्यता असते... जे भारताच्या, आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याचे आहे.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 10:37 नवीन
"फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्‍यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया...
इस्पिक एक्केराव तुम्ही पण अंबानी आणि अडानीचे एजंट झालात की. असो. आपले या एजन्सीमध्ये स्वागत असो.
मुख्य म्हणजे, तिथेच न थांबता दोन्ही पक्षांना त्यांचे हिशेब देण्याचे कायदेशीर आणि नैतीक कर्तव्य करायला पाहिजे याबद्दल ठाम राहूया आणि... एकाच्या चुकीचे समर्थन करण्यासाठी दुसर्‍याच्या चुकीचे उदाहरण देणे साफ चूक व घातक आहे असे सुद्धा म्हणूया !
याविषयी दुमत असायचे काहीच कारण नाही. (आआपचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 10:19 नवीन
ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता.
यावरून एक गोष्ट आठवली. २५ एप्रिल १९७३ रोजी भारताचे सरन्यायाधीश एस.एम.सिकरी निवृत्त झाले. निवृत्त व्हायच्या आदल्याच दिवशी ते प्रमुख असलेल्या एका घटनापीठाने केशवानंद भारती केसमध्ये इंदिरा गांधींच्या सरकारला न आवडणारा निकाल दिला होता.त्यापूर्वीच्या काळात नवे सरन्यायाधीश नेमताना सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती केली जात असे.पण इंदिरा गांधींच्या सरकारने तीन वरीष्ठ न्यायाधीश-- शेलाट, ग्रोव्हर आणि हेगडे यांना डावलून अनील नारायण रे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली.कारण?त्या तीन न्यायाधीशांनी इंदिरा गांधींच्या सरकारला न आवडणारा निकाल दिला होता तर रे यांनी सरकारला अनुकूल निर्णय दिला होता.वरकरणी कारण दिले गेले की हे तीन न्यायाधीश लवकरच निवृत्त होणार होते. आता येऊ या आपल्या लाडक्या आआपकडे. अ‍ॅडमिरल रामदासांची उचलबांगडी तर केली गेलीच.त्याचे नक्की कारण काय होते हे कुणीही सांगू शकेल. तरीही वरकरणी कारण दिले गेले की त्यांचा कार्यकाळ पूर्वीच संपला होता.झालं तीन नवीन लोकपालांचे पॅनेल नेमले गेले.त्यात राकेश सिन्हा, एन. दिलीप आणि एस.पी.वर्मा यांचा समावेश होता . पुढे रामदासांनी केजरीवालांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आणि त्या प्रकरणात रामदासांची बाजू घ्यायचे घोर पातक राकेश सिन्हांच्या हातून घडले. त्याची शिक्षा त्यांना भोगायला लागलीच. म्हणजे काय की इंदिरा गांधींच्या सरकारला अनुकूल नसलेले न्यायाधीश नको होते त्याप्रमाणेच केजरीवालांना स्वतःला अनुकूल नसलेले लोकपाल नको होते.तरी एक फरक म्हणजे इंदिरा गांधी न्यायपालिकेचा किती सन्मान करतात याचे ढोल जगभर पिटत नव्हत्या.पण इथे आपले युगपुरूष मात्र लोकपाल-लोकपाल हा जप करत असतात.आणि सगळ्या दुनियेने यांच्याच लोकपालाच्या कल्पनेला सहमती दर्शविली पाहिजे अन्यथा इतरांना भ्रष्टाचाराची काही पडलेलीच नाही असा आविर्भाव. तुम्ही जर का तुमच्या स्वतःच्या लोकपालाला (एक नव्हे तर दोन) कस्पटासमान वागविणार असाल तर सगळ्या दुनियेने तुमच्या लोकपाल या कल्पनेला डोक्यावर घेतले पाहिजे ही अपेक्षाच कशी व्यक्त करतात हे युगपुरूष समजत नाही. की राकेश सिन्हांचाही कार्यकाळ संपला? की नियुक्त करतानाच त्यांना ३ दिवसांसाठीच नियुक्त केले होते?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 10:27 नवीन
नांदेडियनराव, आआप म्हणजे कसले बोगस आम आदमी आहेत हे तुम्ही बघितले असेल याची अपेक्षा नाहीच. तरी एकदा अजय माकन यांच्या ट्विटरवरील हे दोन फोटो बघा. कालच तालकटोरा स्टेडियममध्ये दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईनचे उद्घाटन तिथे झाले.आणि स्टेडियमच्या बाहेरच चक्क व्ही.आय.पी पार्किंग आणि व्ही.व्ही.आय.पी पार्किंगचे बोर्ड दिसत आहेत. म्हणजे इतर कुठेही व्ही.आय.पी हा शब्द दिसला की हे हिरवेपिवळे होणार पण स्वतः मात्र बिनदिक्कतपणे व्ही.आय.पी कल्चरचेच समर्थन करणार.कारण आता हे सत्ताधीश ना.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
म
मूकवाचक Mon, 04/06/2015 - 10:29 नवीन
http://misalpav.com/comment/564041#comment-564041
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 10:33 नवीन
योगी अरविंदांनी ७०-८० वर्षांनी आपलेच नाव (अरविंद) घेऊन असा कोणी माणूस भूतलावर अवतीर्ण होणार हे जाणून आधीच हे लिहिले होते की काय असे वाटावे इतके हे विधान सध्याच्या परिस्थितीत चपखलपणे लागू पडते.
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मिसळ Mon, 04/06/2015 - 23:11 नवीन
https://twitter.com/jalajboy/status/584693912272375808/photo/1
↩ प्रतिसाद: क्लिंटन
च
चिंतामणी Wed, 12/23/2015 - 12:53 नवीन
- योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला. - गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला. - प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले. बचाओ इस भारतवर्ष को केजरी के गुलामो से
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
म
मोहनराव Wed, 04/01/2015 - 10:25 नवीन
मुद्दे पटले.
या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे
............. अनुमोदन!
क
कपिलमुनी Wed, 04/01/2015 - 10:57 नवीन
आप मध्ये जे काही चालले आहे त्याला तमाशा , नौटंकी ई. म्हणावे लागेल. यश मिळवण्यापेक्षा यश पचवणं अवघड असता हे दिसला.
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 04/01/2015 - 11:01 नवीन
उत्तम प्रतिसाद रे नांदेडियना.कॉन्ग्रेस हरल्यावरही नरेंद्र भक्तांना होत नसेल असा असूरी आनंद सध्या भक्तांना होतोय. मोदी बारामतीत आल्यावर 'राष्ट्रवादी पक्ष व शरद पवार देशसेवेचे काम उत्तम पार पाडत आहेत' हे नरेंद्रने म्हंटल्यावर ह्यांनाही ताप भरला होता.
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 18:22 नवीन
कॉन्ग्रेस हरल्यावरही नरेंद्र भक्तांना होत नसेल असा असूरी आनंद सध्या भक्तांना होतोय.
हो नक्कीच होत आहे माईसाहेब आणि याविषयी तुमचे आक्षेप असले तरी होतच राहिल. तुम्हाला जसा आनंद १० फेब्रुवारीला होत होता ना अगदी तसाच आनंद आम्हाला आता होत आहे.काय करणार? मागे मिपावरच एक गोष्ट लिहिली होती.ती आता परत लिहितो. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी लोकसभेत बोलताना सोमनाथ चॅटर्जी म्हणाले होते---"What is our obligation to keep BJP in power?". त्याच धर्तीवर मी म्हणतो--"What is my obligation to support AAP?" जर का केजरीवाल समर्थक मोदी कधी चूक करतात म्हणून टपून बसले असतील तर केजरीवाल कधी चूक करतात यासाठी केजरीवाल विरोधक टपून बसणारच.त्याविषयी तक्रार करून उपयोग नाही. (दिल्ली विधानसभेतील मिपावरचा विरोधी पक्षनेता) क्लिंटन
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/01/2015 - 11:39 नवीन
हे नौटंकीवाल साहेब एकदातरी तोंडावर "आप"टावेत ही इच्छा आहे, ती बहुदा लौकर पुर्ण होणार अशी चिन्हे आहेत.
स
स्पा Wed, 04/01/2015 - 11:43 नवीन
मोडी भक्त आप ला श्या देणार आप वाले मोडी भक्तांना मधल्या मध्ये ना केजरू काम करतोय, ना मोदी. असो,, सगळे एका माळेचे मणी
म
मनीषा Wed, 04/01/2015 - 11:43 नवीन
कुणाचेही अंतर्गत वाद-विवाद अशाप्रकारे चव्हाट्यावर येणे हे दुर्दैवीच म्हणायला पाहिजे. आप मधे जे चालले आहे त्यात कुणाचा जय- पराजय झाला यावर कितीही बोलले तरी माझ्यामते हा शेवटी सर्व सामान्य लोकांचा पराभव आहे. निवडणुकी पूर्वी देखील आप बद्दल अनेक वावड्या उठत होत्या. पण तरीही लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.. त्या लोकांचे हे दुर्दैव आहे असेच म्हणावेसे वाटते. दुधाने तोंड पोळले की ताकही फुंकुन पितात तसेच , यापुढे कुणी उच्च नीती मुल्यांची टिमकी वाजवू लागला, तर लोक त्याच्याकडे संशयाने पहातील हे निश्चित ...
न
नया है वह Wed, 04/01/2015 - 11:54 नवीन
+१००
म
मनीषा Wed, 04/01/2015 - 11:59 नवीन
प्र. का.टा.आ.
प
प्रसाद१९७१ Wed, 04/01/2015 - 13:00 नवीन
खरे तर दिल्लीच्या लोकांना आप मधल्या ह्या वादावादीत काहीच घेणे देणे नाहीये. केजरीवाल जर काम करत असेल तर पुढच्यावेळेला पण केजरीवाल निवडुन येइल. @ क्लिंटन आणि आसुरी आनंद झालेले इतर - त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल. चांगले काम करत असतील तर एकमेकांच्या उरावर जरी आप चे लोक बसले तर मला तरी काही फरक पडत नाही. जनतेच्या उरावर बसण्यापेक्षा ते चांगले.
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 17:41 नवीन
@ क्लिंटन आणि आसुरी आनंद झालेले इतर - त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल.
अपेक्षा रास्त आहे.पण अशा रचनात्मक स्वरूपाच्या चर्चांना आम आदमी पक्षाने कधी स्थान दिले होते? हे सोडून सगळे जग अंबानी आणि अडानींचे एजंट आणि भाजपच्या पे-रोलवरचे अशा स्वरूपाची बकवास मात्र वारंवार होत असे.तेव्हा आआपवाले स्वत: भांडून भूस पाडत असतील तरी इतरांनी मात्र रचनात्मक चर्चा करावी अशी अपेक्षा करता येणार नाही.शेवटी करावे तसे भरावे.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
न
नांदेडीअन Mon, 04/06/2015 - 08:11 नवीन
त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल.
मिळाले ना तुम्हाला उत्तर ? त्यात त्यांना ‘काडीमात्र इंटरेस्ट’ नाहीये असं दिसतंय.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 13:29 नवीन
आआप सरकारने नेहमीप्रमाणे दरमहा प्रत्येक घरी २० हजार लीटर पाणी फुकटात देऊ ही घोषणा केलीच.यातला एक कळीचा मुद्दा हा की २० हजारच्या वर एक लीटर जरी पाणी जास्त वापरले गेले तर सगळ्या २०,००१ लीटरचे पैसे भरावे लागणार.दिल्लीची जुगाडू संस्कृती कशी आहे हे सगळ्यांना माहितच आहे. त्या जुगाडू संस्कृतीत पाण्याच्या मीटरमध्ये फेरफार करून पाणी जास्त वापरले गेले तरी ते २०,००० पेक्षा कमीच दाखवायचा लोकांचा कसा खटाटोप आहे हे विवेकपटाईत यांनी लिहिलेल्या या प्रतिसादात स्पष्ट आहेच. आणि आता २०,००० लीटरवरच्या वापराचे दर आणखी १०% ने वाढवले. म्हणजे असा जुगाडूपणा करायला आणखी एक कारण आणि प्रोत्साहनही मिळाले. दिल्ली आणि हरियाणामधील मुनक कालव्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. एकतर मोठ्या शहरातील लोकांच्या सोयीसाठी गावातल्या लोकांनी पाणी द्यायची ही अपेक्षा करणारे लोकच जमिन अधिग्रहण कायद्यालाही विरोध करतात हा थोडासा विरोधाभासच वाटतो. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा,वैतरणा तलावांच्या क्षेत्रातील गावांमध्ये मात्र तेच पाणी मिळत नाही ही सत्य परिस्थिती आहे.म्हणजे मुंबईतल्या लोकांची तहान भागावी म्हणून या गावकर्‍यांना मात्र त्रास सहन करावा लागतो.त्यातून मुंबई शहर आणि हे तलाव एकाच राज्यात येत असल्यामुळे हा मुद्दा जास्त पेटू शकला नाही.पण दिल्ली-हरियाणामध्ये मात्र मुनक कालवा हा नक्कीच कळीचा मुद्दा आहे. त्यातून कायमच पंजाबच्या तुलनेत सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार हरियाणामध्ये मुळातच आहे. सतलज-यमुना कालव्यामधील पाहिजे तितके पाणी हरियाणाला मिळत नाही ही तक्रार गेली अनेक वर्षे आहे.या मुद्द्यावरून हरियाणा सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार अशी बातमी मध्यंतरी आली होती. अशा परिस्थितीत हरियाणा मुनक कालव्यातले पाणी दिल्लीला सोडेल हे वाटते तितके सोपे नाही.अनेक वर्षे दिल्ली आणि हरियाणामध्येही काँग्रेसचेच सरकार असूनही हा प्रश्न सुटलेला नव्हता. केजरीवाल मोठ्या तोंडाने जाहिरनाम्यात म्हणून बसले आहेत की आम्ही ते पाणी आणून दिल्लीचा पाण्याचा प्रश्न सोडवू. पण जुगाडूपणाला प्रोत्साहन मिळत असेल आणि दिल्लीमध्ये अशी पाण्याची चोरी होत असेल तर हरियाणाने स्वतःचे हक्काचे पाणी दिल्लीसाठी का सोडावे? आणि परत ते पाणी हरियाणाकडून मिळाले नाही की हे केंद्रात आणि हरियाणातही भाजपचे सरकार असूनही दिल्लीला पाणी मिळत नाही म्हणून आकांडतांडव (कदाचित धरणेही) करायला मोकळे!!
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/01/2015 - 15:00 नवीन
या अवांतराबद्दल क्षमस्व. 'जनतेची कामे' हे शब्द कदाचित मी १७-१८ वर्षांपूर्वी प्रथम ऐकले तेव्हापासून मला त्यातली नकारात्मक अर्थछटा सर्वप्रथम दिसते. केवळ राजकारणी ते अप्रामाणिक अन सर्वसामान्य लोक प्रामाणिक असे कधीच नसते. अनेकदा गप्पागोष्टींमध्ये लोक असे बोलत असतात की स्थानिक आमदार, खासदार पालकमंत्री यांच्याकडे ओळखीच्या किंवा मध्यस्थांच्या मार्फत पोचणे व त्यामार्गे सरकारी अधिकार्‍यांवर दबाव टाकून आपली नियमबाह्य कामे करवून घेता येतील. म्हणजे हा अनेक सर्वसामान्य लोकांचा आवडता मार्ग असतो. अशी कामे करून देणारे लोकप्रतिनिधी पुढच्या निवडणुकीसाठी आपोआप लोकप्रिय उमेदवार बनतात. आपापल्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा गटांची नियमबाह्य कामे मंजूर करण्यात मदत करण्यापेक्षा तेथील स्थानिक प्रश्न जसे पायाभूत सुविधांबाबत, महत्वाची प्रशासकीय पदे दीर्घकाळ रिकामी किंवा त्यावर पूर्णवेळ अधिकारी नसणे याबाबत आवाज उठवणे अधिक महत्वाचे वाटत नाही का? तसेच स्थानिक प्रश्नांखेरीज सरकारी ध्येयधोरणांना अधिक सर्वसमावेशक बनवणे, काळानुरुप बनवणे यास राज्य किंवा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे. सर्वसामान्य जनतेची सोय होईल अशा प्रशासकीय सुधारणा (जसे सरकारी कार्यालयातल्या एक खिडकी योजना) यासाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्वाचे वाटत नाही का? कुठलाच लोकप्रतिनिधी अशी कामे करत नाही असे माझे म्हणणे नाही पण अशा कामांना आपण किती प्रोत्साहन देतो याबाबत विचार करणे गरजेचे आहे. (काही पटकन आठवणारी उदाहरणे म्हणजे ८०च्या दशकात शुन्याधारीत अर्थसंकल्पावर लोकजागॄती करणारे महाराष्ट्रातले तत्कालिन राज्यमंत्री, काही वर्षांपूर्वी कोळसा घोटाळा उघडकीस आणणारे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे खासदार). दुर्दैवाने राज्याच्या किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचे दीर्घकालिन नुकसान करणार्‍या लोकानुनयी योजना राबवणारे सत्ताधारी पक्ष आपल्याला अधिक जवळचे वाटतात.
स
संदीप डांगे Wed, 04/01/2015 - 16:09 नवीन
उत्तम प्रतिसाद. जशी प्रजा तसा राजा हा लोकशाहीचा मंत्र असतो. लोकांना सर्वकाही हवे तर असते पण ते आपोआप व्हावे, इतरांनी प्रामाणिकपणे करावे अशी अपेक्षा असते. पण नैसर्गिक सत्य असे नसते. प्रतिनिधींच्या मागे लागून कामे करून घ्यावी लागतात. अशावेळेस बहुसंख्य लोकांचा सुधारणावादी कल नैसर्गिकरित्या निर्माण झाला नाही तर जात, धर्म इत्यादींवर आधारित फालतू व कृत्रिम कल निर्माण केले जाऊन निवडणुका जिंकल्या जातात. मुळात जनता ह्या नागरी विषयांवर एक होऊ नये असेच वातावरण बनवले जाते. निवडणुकांचे विषय आणि नागरी सुविधेचे विषय कधीही एक नसतात. सामान्य मतदार निवडणुकांकडे 'आपला माणूस निवडून देणे' किंवा "प्रत्येक मताला किती देणार?" याच भावनेतून बघतो. तसेच त्याला प्रशिक्षीत केले गेले आहे. राजकिय प्रतिनिधी, नेता, पुढारी, समाजसेवक, समाजसुधारक, राजकिय कार्यकर्ता, आंदोलनकर्ता, विचारवंत या वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्या क्लिष्ट असल्याने सामान्यांचा फार गोंधळ होतो. त्यामुळे केजरीवालछाप लोक अधूनमधून उगवत राहणार. जनतेला मसिहा पाहिजे पण मसिहाला तुल्यबळ अनुयायीही पाहिजेत हे ती विसरून जाते. क्रांती घडायला बहुसंख्य जनतेच्या समस्या एकसारख्या असणे आवश्यक आहे. पण धुर्त राजकारणी जनतेतल्या वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळी गाजरे दाखवून त्यांची एकता भंग करण्यात पटाईत असतात. भ्रष्टाचार सामान्य जनतेच्या रक्तातच आहे. त्यामुळे तो थांबावा अशी जनतेची अपेक्षा म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. दुसर्‍याने माझ्याकडून लाच घेऊ नये पण मला लाच मिळालीच पाहिजे असाच विचार सर्वत्र बघितला आहे. हेच लोक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात हिरहिरीने भाग घेतात. हजारो तरूणांनी या आंदोलनात भाग घेतला फेसबुकवर आपले फोटो डकवून आपण कसे देशभक्त आहोत दाखवायला, एकानेही आपल्या आई-वडीलांच्या पापाच्या कमाईला 'नाही' म्हणून त्या पैश्यातून आणलेल्या आपल्या वस्तूंचा त्याग नाही केला. किती तरी मित्रांना मी असे आवाहन केले होते. पण.... असो. भगतसिंग जन्मावा तो दुसर्‍याच्या घरात. त्याने फाशी जाऊन माझ्या लेकराची अ‍ॅडमिशन विना-डोनेशन होईल अशी व्यवस्था करावी.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
सतीश कुडतरकर Tue, 04/07/2015 - 13:55 नवीन
वा डांगेजी. उत्तम प्रतिसाद!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
क्लिंटन Wed, 04/01/2015 - 18:27 नवीन
प्रतिसाद आवडला. एकूणच आपण स्वत: जरी प्रामाणिक नसलो तरी आपल्या लोकप्रतिनिधींनी मात्र प्रामाणिकच असले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
आ
आजानुकर्ण Wed, 04/01/2015 - 18:37 नवीन
किंबहुना बहुतेक जुने लोकप्रतिनिधी हे त्यांच्या प्रतिमेबाबत फारच कॉन्शस असतात. खुला भ्रष्टाचार करणे वगैरे त्यांना परवडणारे नसते. त्यामानाने 'जणतेतील' मंडळी करचुकवेगिरी, लाचखोरी, रांगा व इतर नियम (उदा. ट्रॅफिक रुल, नो पार्किंग वगैरे)मोडणे यात चांगलीच पटाईत असतात. मात्र आपण करतोय तोही भ्रष्टाचारच आहे हे त्यांना मान्य नसते.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अनुप ढेरे Mon, 04/06/2015 - 07:28 नवीन
अगदी अगदी. पूर्ण सहमत. हपिसात खोट्या पावत्या तयार करणारे लोक भ्रष्टाचारावर तावातावाने बोलताना ऐकले की डोक्यात जातात. 'आप'चे समर्थकदेखील असली कृत्ये करताना दिसतात.
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रतापराव Mon, 04/06/2015 - 09:11 नवीन
बहुसंख्य जनता अप्रामाणिकपणा करते हे मान्य पण ह्याला कारणीभूत आहेत ते लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार करणे थांबवले नि भ्रष्टाचारावर कडक कायदे केले कि फरक पडेल पण इथे कुंपणच शेत खाताना दिसतेय मग जनता तरी कशाला मागे राहील
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रतापराव Mon, 04/06/2015 - 09:14 नवीन
जणतेतील' मंडळी करचुकवेगिरी, लाचखोरी, रांगा व इतर नियम (उदा. ट्रॅफिक रुल, नो पार्किंग वगैरे)मोडणे यात चांगलीच पटाईत असतात. मात्र आपण करतोय तोही भ्रष्टाचारच आहे हे त्यांना मान्य नसते.>>>>>कुठला नेता ह्या गोष्टी करत नाही मागे संघ भेटीला गडकरी हल्मेट न घालताच गाडी पिटाळत होते नि त्यांच्यावर जबाबदारी आहे वाहतूक विषयी नियम बनवण्याची..
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Wed, 04/01/2015 - 18:41 नवीन
लेख एकसुरी वाटला जे काही होत आहे त्यावरचे विवेचन नसून फक्त आप पक्ष फुटतोय असा आसुरी आनंद दिसतोय. प्रसाद ह्यांचे म्हणणे पटतेय आपवाले एकमेकांच्या उरावर बसो त्याने काय फरक पडतोय मोदी सरकारसारखे शेतकऱ्यांच्या नि सर्व सामन्यांच्या उरावर बसले तर मात्र त्यांच्यावर टीका करता येईल. भाजपचा विजयाचा अश्वमेध केज्रीवालांनी दिल्लीत अडवला नि मोदी, शहा जोडगळीला टांग मारून तोंडघशी पडले ह्याचा आसुरी राग ह्या लेखात दिसतोय.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा