एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________
💬 प्रतिसाद
(1265)
प
प्यारे१
Fri, 10/16/2015 - 18:10
नवीन
ओये बापुसाब, का कर रहा ससुरा? काहे अपने गुरुजनोंसे जबान लडा रहाहो?
कह दिया ना उत्पाद कम है तो है. बातही खतम.
हमार गांव मा घर का पडोस मे बडा ब्यापारी है. इत्ता बडा गोदाम है उसका. राजमा, मूंगफली, दाल ना जाने का का भर के रखता है. किसानोंसे खरीद खरीद कर रख देता है और पता नहि कब अचानक से बडा बडा गाडी लाकर भेज देता है.... लेकीन गुरुजी ने कहा ना उपज कम है तो है बुडबत.
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 10/16/2015 - 18:13
नवीन
पहले कहा गायब थे भैबा!ससुरे पहिले बताइबे करते तो हम पहले ही माफ़ी मांग कर कन्नी न काट लेते रे!
प
प्यारे१
Fri, 10/16/2015 - 18:21
नवीन
:)
D
dadadarekar
Sat, 10/17/2015 - 02:43
नवीन
सुप्रीम कोर्ट तसेच देशातील २४ हायकोर्टांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने संमत केलेला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने घटनाबाह्य ठरविला. त्यामुळे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी २२ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली कॉलेजियम पद्धत पुनर्स्थापित झाली आहे
स
सव्यसाची
Sun, 10/25/2015 - 10:40
नवीन
भाजपला दणका?
दोन्ही सभागृहात भाजपचे २/३ बहुमत आणि २० राज्यात भाजपची सरकारे??
अ
अभिजित - १
Sat, 10/17/2015 - 15:38
नवीन
तूर डाळ पिक कमी येणार हे सरकारला आधीच माहित होते. मग आयात का केली नाही वेळेत ? आणि आत्ता तरी कुठे करतायत ? पाच हजार टन आयात . फक्त इतकीच ? हे म्हणजे दर्या मी खसखस आहे. बहुतेक आयात न करण्या मागे काही तरी ठोस विचार असलाच पाहिजे. जसा - निवडणूक फंड ची परस्पर परतफेड .. जनतेच्या खिशातून ..
श
श्रीगुरुजी
Sat, 10/17/2015 - 19:56
नवीन
India set to import tur dal from Africa amid high domestic prices
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-08-19/news/65592393_1_tur-dal-bimal-kothari-indian-pulses
क
कपिलमुनी
Fri, 10/23/2015 - 11:33
नवीन
D
dadadarekar
Sat, 10/17/2015 - 15:48
नवीन
लेबल
------------------------------------------------------------------------------
मेक इन इंडियाचं स्वप्न केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या उद्योजकांना दाखवणा-या नरेंद्र मोदींच्या लाडक्या म्हणजे जगातल्या सगळ्यात उंच ठरणा-या १८२ मीटरच्या सरदार पटेलांच्या पुतळ्याचे काम चिनी फाउंड्रीला देण्यात आल्याचे आउटलूक मॅगेझिनने म्हटले आ
अ
अभिजित - १
Sat, 10/17/2015 - 15:48
नवीन
Govt inaction, commodity trading behind spiraling prices of pulses
Prajakta Kunal Rane, Hindustan Times, Mumbai |
Updated: Oct 17, 2015 00:23 IST
http://www.hindustantimes.com/mumbai/govt-inaction-commodity-trading-behind-spiraling-prices-of-pulses/story-V21dCkQFohii0DpsWj2rMK.html
श
श्रीगुरुजी
Sat, 10/17/2015 - 20:14
नवीन
वरील प्रतिसाद व त्यात दिलेली लिंक वाचून आआपभक्त नांदेडिअन यांची आठवण आली. ते अशाच लिंक्स न वाचता फक्त शीर्षक वाचून देतात आणि आतल्या लेखात नेमकं त्यांच्या अपेक्षेविरूद्ध लिहिलेलं असायचं.
या लेखात खालील परिच्छेद आहेत.
People reeling under the skyrocketing prices of essential commodities can blame the state government. The reason: its failure to extend the stock limit validity. Prices of tur dal and urad dal, two of the most commonly consumed pulses, have significantly increased.
Experts blamed this on commodity trading and the state government’s failure to revive the stock limit.
The state government failed to revive the stock limit for pulses even after receiving three circulars from the Union government in June and July.
In the first circular dated June 17, Surendra Singh, deputy secretary to the government of India, asked the state chief secretary to revive stock limits and take effective steps against hoarding under Essential Commodities Act, 1955 with respect to pulses, edible oil and oil seeds. Hindustan Times was the first to report about these circulars and the state government’s inaction.
अर्थ उघड आहे.
अ
अभिजित - १
Mon, 10/19/2015 - 17:17
नवीन
घाईत असल्याने पेज पूर्ण वाचले नव्हते. तरी हि खालील भाग जो गुरुजीनीच लेखातून टाकला आहे तो सरकारची अकार्यक्षमता दाखवायला पुरेसा आहे. commodity trading हे केंद्राच्या अखत्यारीत येते. आणि देवेंद्र किवा नरेंद्र हे शेवटी एकच पक्षाचा भाग आहेत. त्या मुले देवेंद्र ची चूक असली तरी तुम्ही सुटू शकत नाही. कि तुमची सुपारी फक्त नमो करताच आहे ?
आणि हो अजून एक. हे वेब पेज आता गायब आहे. मानले गुरुजी तुम्हाला .. गुरुजी के हात बहोत लंबे है !!
" Experts blamed this on commodity trading and the state government’s failure to revive the stock limit.
The state government failed to revive the stock limit ..."
त
तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 18:20
नवीन
दुवा इथे आहे.
अ
अभिजित - १
Mon, 10/19/2015 - 18:25
नवीन
ठीक आहे. पण राज्य सरकारचा दोष / कमोडीटी ट्रेडिंग हे मुद्दे टाकून पळ काढू नका.
त
तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 18:47
नवीन
आपणांस असे का वाटले कुणास ठावूक... तुमचा दुवा गंडला नाही हेच सांगायला आलो होतो राव... जिसका करो भला वो कहता माझंच खरा...
(तर्राट तर हम है पण दुनिया क्युं झूम रही है रे मौला.....)
अ
अभिजित - १
Tue, 10/20/2015 - 08:15
नवीन
ते तुम्हाला नव्हते. राज्य सरकारचा दोष असे सांगून गुरुजी तिथून पळ काढतायत . त्यांना आहे ते.
त्यांनी हाय लाईट केलेय वरच्य प्रतिसादात - "the state government’s failure to revive the stock limit."
बहुतेक गुरुजीची सुपारी नमो आणि केंद्र सरकार इतकीच आहे. भाजप राज्य सरकारशी त्यांना काही देणेघेणे नाही.
ग
गामा पैलवान
Tue, 10/20/2015 - 08:28
नवीन
अभिजित - १,
मोदींचा पाठीराखा असणे आणि भाजपचा पाठीराखा असणे या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. मी मोदींचा चाहता आहे भाजपचा नाही. तसेच श्रीगुरुजी असावेत. १९७७ च्या निवडणुकींत मतदान करणारे लोकं इंदिरा गांधींचे चाहते असतीलही, पण ते इंदिरा काँग्रेसचे चाहते नव्हते.
आ.न.,
-गा.पै.
अ
अभिजित - १
Tue, 10/20/2015 - 08:58
नवीन
ते त्यांनाच सांगू दे ना .. आणि राज्य सरकारचा म्हणजे राज्य भाजप चे पाप आहे डाळी चे भाव वाढण्यात हे कबूल करू दे. पण मी आत्ताच सांगतो, ते वेगवेगळे शब्दच्छल करून या सगळ्या तून पळ काढणार ..
बाकी मन मोहन पण खूप ज्ञानी आणि स्वच्छ होतेच नाही का ?
बाकी तुम्ही कधी शिवसैनिक / कधी भाजप वाले असताच नाही का ( नाही तर मग इथे समर्थन कशाला करता भाजपचे ) ? टोपी फिरवावी तर ती अशी ..
आणि हो .. मी नेहमीच भाजप ला मत देत आलो आहे. लोकल आणि राज्य पातळी वर नेहमीच भाजप ला मत देणार हे नक्की.
श
श्रीगुरुजी
Tue, 10/20/2015 - 09:08
नवीन
मी कोठेही पळून जात नसतो. मिपावरचा एकतरी धागा दाखवा जिथून प्रतिसाद न देता मी पळून गेलो आहे. बाकी भागाबद्दल म्हणजे डाळीचे भाव वाढण्यात राज्य सरकारची जबाबदारी यावर मी आधीच्या प्रतिसादात उत्तर दिले आहेच.
त
तर्राट जोकर
Tue, 10/20/2015 - 08:47
नवीन
वोक्के सा'र... गाट यीट...
श
श्रीगुरुजी
Tue, 10/20/2015 - 09:06
नवीन
मी पळ बिळ काढत नसतो. राज्य सरकारचा दोष हे मी म्हणत नसून तुम्ही दिलेल्या बातमीतच हे ३-४ ठिकाणी लिहिलेले आहे. बातमी न वाचताच तुम्ही बातमीची लिंक इथे दिली हा माझा दोष आहे का? असणार बहुतेक, कारण माझे हात बहोत लंबे है असं तुम्हीच वर लिहिलं आहे.
आधीच्या प्रतिसादात यावर स्पष्टीकरण दिलेले आहे.
श
श्रीगुरुजी
Tue, 10/20/2015 - 09:01
नवीन
ते मला माहितच होतं. इथे काहीजण इतके कट्टर मोदी/भाजप विरोधक आहेत की ते कोणत्यातरी बातमीचे नुसते शीर्षक वाचतात आणि आत काय लिहिलं आहे ते न बघताच घाईघाईत इथे येऊन ती लिंक देतात. माध्यमे बातम्यांचा मथळा कसा फसवा देतात हे यांच्या का लक्षात येत नाही ते समजत नाही.
उदा. एखाद्या बातमीचा मथळा असा असतो. "प्रथमदर्शनी मोदींचा भ्रष्टाचारात हात असल्याचे दिसते : न्यायालय". लगेच ही मंडळी बातमी न वाचतात "मोदींचा भ्रष्टाचारात सहभाग सिद्ध झाला" अशी प्रतिक्रिया देऊन इथे लिंक देतात. प्रत्यक्षात आतील बातमी ही ललित मोदी संदर्भात असते. असो.
आणि हो अजून एक. हे वेब पेज आता गायब आहे. मानले गुरुजी तुम्हाला .. गुरुजी के हात बहोत लंबे है !!
बापरे! हे अति होतंय. तुम्ही दिलेल्या लिंकवरील वेब पेज गायब झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार ते मीच केले कारण माझे हात खूप लंबे आहेत म्हणून!!!!!
काय बोलायचं आता.
श
श्रीगुरुजी
Tue, 10/20/2015 - 09:03
नवीन
वरचा प्रतिसाद जरासा गंडला. मधला भाग असा हवा होता.
भारतात महाराष्ट्र हे एकच राज्य आहे का? आणि तूरडाळीची भाववाढ फक्त महाराष्ट्रातच झाली आहे का?
अवांतर - मी कोणाची सुपारी बिपारी घेतलेली नाही आणि घेणार नाही..
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/17/2015 - 16:22
नवीन
नाही नाही निसर्गच् आहे! :D
अ
अभिजित - १
Sat, 10/17/2015 - 16:26
नवीन
एकदा का गुरुजी नि ठरवलं म्हणजे ठरवलं च .. मग ते कोणालाही मूर्ख ठरवायला मागे पुढे बघत नाहीत .. आता या हिंदुस्तान times ला कसे ते चुकीचे ठरवतील ते बघण्या सारखे असेल !!
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/17/2015 - 16:43
नवीन
तरी कपिलमुनी अन प्यारे बोलले होते राव! आमचेच हात दाखवून अवलक्षण!
D
dadadarekar
Sat, 10/17/2015 - 16:45
नवीन
चतुर गुरुजी मोड ऑन ...
मनुष्य हाही निसर्गाचाच भाग आहे.
गुर्जी मोड ऑफ !
त
तर्राट जोकर
Sun, 10/18/2015 - 21:06
नवीन
क्या रे ये घोडा-चतुर, घोडा-चतुर बोला,
एक पे रहना या घोडा बोलो या चतुर बोलो... गाओ
शब्दार्थः घोडा=निसर्ग, चतुर = व्यापारी
त
तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 17:07
नवीन
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));
न
नंदन
गुरुवार, 10/29/2015 - 11:20
नवीन
कुठला पिच्चर आहे म्हणे हा? :)
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 11:52
नवीन
बहुतेक 'तेजस्विनी', विजयाशान्तीचा.
न
नंदन
गुरुवार, 10/29/2015 - 12:24
नवीन
'तेजस्विनी'च आहे.
प
प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 11:24
नवीन
सनी देओल पायजे होता. राष्ट्रीय पुरस्कार नक्की होता.
अ
अभिजित - १
Mon, 10/19/2015 - 17:21
नवीन
सरकार आता जागे झाले. घाऊक बाजारात भाव १६ हजार वरून ११५०० पर्यंत आला.
http://www.loksatta.com/maharashtra-news/major-fall-in-prices-of-all-pulses-in-maharashtra-1151932/
केंद्र आणि राज्य सरकारकडून साठेबाजांवर कडक कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे या डाळींचे भाव वेगाने उतरले.
तूरडाळीच्या भावात सोमवारी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांची घट झाली. शनिवारीही या डाळीचे भाव अडीच हजारांनी उतरले होते. काही दिवसांपूर्वी तूरडाळीचा भाव प्रतिक्विंटल १६००० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. तो आता ४५०० रुपयांनी घटल्यामुळे ११५०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोहोचला आहे.
कृत्रिम कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या भावात वेगाने वाढ होत होती.
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/22/2015 - 13:05
नवीन
इंधनाच्या भावामागचे गौडबंगाल....
ऑगस्ट २०१४ मध्ये क्रुडचे भाव ११०-१२० डॉलरच्या मधे होते. तेव्हा पेट्रोल ७८-८० रुपये लिटर होते.
आता क्रूडचे भाव ४५ डॉलर झालेत. पेट्रोल फक्त १० रुपयांनी कमी झाले. ही लूट कोणाच्या घशात जात आहे? इथेही पेट्रोलकंपन्या चतुर म्हणून गणल्या जाव्या का?

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/22/2015 - 19:18
नवीन
यात नवीन काय आहे? अनेक वृत्तपत्रांमधून अनेक वेळा या विषयावर लिहिलं गेलं आहे.
भारत सरकार पेट्रोल व डिझेलवर अनेक वर्षे अनुदान देत होते. त्यासाठी सरकारला मोठी किंमत मोजावी लागत होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ओएनजीसी ने ५६,३८४ कोटी रूपयांचे अनुदान दिले होते. २०१४ पासून जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सरकारने आपल्यावर अनुदानामुळे येणारा भार कमी करण्यासाठी डिझेलवरील अनुदान कमी केले. जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात भाव कमी झाले आहेत त्या प्रमाणात भारताने स्थानिक बाजारपेठेत भाव कमी केलेले नाहीत त्यामागे २-३ कारणे आहेत.
(१) जागतिक बाजारपेठेतील तेलाचे भाव डॉलरमध्ये असतात. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जागतिक बाजारपेठेत भाव बर्याच प्रमाणात कमी झाले असले तरी भारतात डॉलर किमान १०% महाग झाल्याने खर्या अर्थाने ते भाव वाटतात त्यापेक्षा काहीश्या कमी प्रमाणात उतरलेले आहेत.
(२) सरकार स्थानिक बाजारपेठेत भाव थोडे जास्त ठेवून आजपर्यंत दिलेल्या अनुदानाची व अंदाजपत्रकातील तुटीची काही प्रमाणात वसुली करीत आहे. अनेक वेळा निवडणुक जवळ आली की मते जाऊ नयेत यासाठी सरकार जबरदस्तीने भाव वाढू देत नाही. त्यामुळे तोटा संचित होत रहातो. त्यामुळे जागतिक भाव उतरले की त्या प्रमाणात सरकार भाव कमी करीत नाही कारण हा तोटा भरून काढायचा असतो.
(३) तिसरे कारण म्हणजे, भविष्यकाळात जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा भाव वाढले तर त्या प्रमाणात स्थानिक बाजारपेठेत भाव वाढवायला लागू नयेत यासाठी आतापासूनच थोडे कुशन ठेवले आहे. स्थानिक भाव थोडेसे जास्त ठेवल्याने सरकारला जो महसूल मिळणार आहे तो नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी व उत्पादनासाठी वापरला जाईल. स्थानिक उत्पादन हे जागतिक बाजारपेठेतून आयात करण्यापेक्षा खूपच स्वस्त पडते. त्यामुळे स्थानिक उत्पादनावरच जास्तीत जास्त भर देण्याची गरज आहे. यासाठी येणारा खर्च हा वाढीव किंमतीतून मिळणार आहे.
(४) भारतात इंधनावर असंख्य कर आहेत. अबकारी कर, केंद्राचे कर, वेगवेगळ्या राज्यांचे कर, जकात असे अनेक कर लावल्यामुळे पेट्रोल/डिझेल मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट किंमतीला मिळते. यातील काही कर मूळ किंमतीवर अवलंबून नसून प्रति लिटर एक ठराविक रक्कम कर म्हणून लावली जाते. त्या करात भाव कमीजास्त झाले तरी बदल होत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात इंधनाचे मूळ भाव वाढतात किंवा कमी होतात त्या प्रमाणात कर कमीजास्त होत नाहीत.
अशा अनेक कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात इंधनाचे भाव कमी झाले आहेत, तितक्या प्रमाणात भारतातील स्थानिक बाजारपेठेत भाव कमी झालेले नाहीत.
श
शलभ
Fri, 10/23/2015 - 11:04
नवीन
१० पैकी ८ गुण..;)
त
तर्राट जोकर
Fri, 10/23/2015 - 11:18
नवीन
फक्त ही कारणे काँग्रेसचे राज्य होते तेव्हा सापडत नव्हती इतकेच.... बाकी काही नाही.
श
श्रीगुरुजी
Fri, 10/23/2015 - 17:32
नवीन
काँग्रेसच्या राज्यात बहुसंख्य काळ भाव चढेच होते, त्यामुळे भाव कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. निवडणुक जवळ आली की काँग्रेस मतांसाठी कृत्रिमरित्या भाव कमी करायचे आणि निवडणुक संपल्यावर वाढवायचे.
क
कपिलमुनी
Fri, 10/23/2015 - 11:25
नवीन
ऑगस्ट २०१४ मध्ये क्रुडचे भाव ११०-१२० डॉलरच्या मधे होते. तेव्हा पेट्रोल ७८-८० रुपये लिटर होते.
आता क्रूडचे भाव ४५ डॉलर झालेत. पेट्रोल फक्त १० रुपयांनी कमी झाले. ही लूट कोणाच्या घशात जात आहे? इथेही पेट्रोलकंपन्या चतुर म्हणून गणल्या जाव्या का?
हिशोबासाठी आपण
क्रुड ऑईल ११०$ * ६० = (६६००) धरू आणि पेत्रोल ७८ ! आणी सध्या
क्रुड ऑईल ४५$ * ६५= (२९२५) धरू आणि पेत्रोल ६८!
दुपटीहूनही किमती कमी होउन सरकार त्याच्या फायदा जनतेला देत नाहिये .
१.डॉलर रेट
Oct 01, 201३ 62.522598
Jan 01, 2014 : 62.685
Jan 01, 2015 62.020
Oct 01, 2015 64.955
( दुवा)
यात कुठेही १०% वाढ नाहिये.
२. अनेक वेळा निवडणुक जवळ आली की मते जाऊ नयेत यासाठी सरकार जबरदस्तीने भाव वाढू देत नाही. त्यामुळे तोटा संचित होत रहातो.
ही शुद्ध फसवाफसवी किंवा मतांसाठी केलेला हलकटपणा आहे. जो की मुक्त अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहे (आता मागच्या सरकारने ६० वर्षे तेच केला तेव्हा भाजपालाही तसाच्च वागण्याचा अधिकार आहेच)
३. तिसरे कारण म्हणजे, भविष्यकाळात जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा भाव वाढले तर ??
डिझेल आणि पेट्रोलचे भाव नियंत्रणमुक्त केलेले आहेत त्यामुळे कुशनचा प्रश्नच येत नाही. हे म्हणजे तुमच्या पोराची इंजिनीरींगची फी जास्त आहे म्हणून आतापासूनच जास्त फी भरायची सवय ठेवा . सध्या स्वस्त तर स्वस्त द्या आणि जेव्हा महाग होइल तेव्हा महाग ! तसेही डिझेल आणि पेट्रोलचे भाव नियंत्रणमुक्त केलेले आहेतच
४) भारतात इंधनावर असंख्य कर आहेत. हे कर पूर्वीही होतेच आणि आताही आहेतच. त्यामुळे दुप्पट दराने इंधन विकणे जस्टीफाय होत नाही.
राहिला प्रश्न अनुदानाची तूट भरून काढण्याचा , तर पूर्वी ती तूट करदात्यांच्या पैशातूनच भरली जायची. त्यामुळे आता स्वस्त पेट्रोल डिझेल मिळणा आमचा हक्कच आहे.
बाकी किती तूट भरली गेली आणि कुठे भरली गेली ??
श
श्रीगुरुजी
Fri, 10/23/2015 - 17:29
नवीन
वर पुरेसे सविस्तर उत्तर दिलेले आहे. जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आहेत त्या प्रमाणात भारतात भाव उतरलेले नाहीत त्याची ४ मुख्य कारणे वर दिली आहेत. तरीसुद्धा वरील मुद्दा क्र. (१) का आला आहे ते समजले नाही.
भाजप सरकार मे २०१४ मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर लोकसभेची निवडणुक झालेली नाही. काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. परंतु केंद्र सरकारने निवडणुक आहे किंवा नाही याचा विचार न करता इंधनाच्या भावात हस्तक्षेप करायचे टाळले आहे. सध्या बिहार विधानसभेची निवडणुक सुरू आहे. मतांवर डोळा ठेवून सरकारला इंधनाची भाववाढ रोखून धरता आली असती. परंतु १५ ऑक्टोबरला डिझेलचे भाव कंपन्यांनी १ रू. ९० पै. ने वाढविले. भाजप कॉंग्रेससारखे वागत नाही हे स्पष्ट आहे.
२००९ ची लोकसभा निवडणुक जवळ आली होती तेव्हा प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते. एप्रिल-मे २००९ मध्ये निवडणुक होती. डिसेंबर २००८ मध्ये पेट्रोल प्रति लिटर ५८ रू. होते. जानेवारीत अचानक पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ५ रू. ने कमी केले गेले. नंतर २८ फेब्रु च्या अंदाजपत्रकात अजून ५ रू. ने भाव घटवून प्रति लिटर ४८ रू. हा भाव केला गेला. निव्वळ मतांवर डोळा ठेवून भाव कृत्रिमरित्या घटविले होते. नंतर २९ मे पर्यंत (निकाल १६ मे ला लागला) हा भाव स्थिर ठेवला गेला आणि ३० मे ला भाव पुन्हा एकदा ५ रू. ने वाढविले. नंतर भाव वाढत जाऊन एकवेळ ८४ रू. पेक्षा जास्त भाव गेला होता. त्यावेळी मतांसाठी केंद्र सरकारने ५ महिने तोटा करून घेतला व नंतर त्याची भरपाई केली.
ही शुद्ध फसवाफसवी किंवा मतांसाठी केलेला हलकटपणा फक्त काँग्रेसने केला आहे.
तुमच्या पोराची इंजिनीरींगची फी जास्त आहे म्हणून आतापासूनच नियमित बचत करायला शिका म्हणजे त्यावेळी एकदम भार येणार नाही हे त्यामागचे लॉजिक आहे. भाव एकदम वाढले तर तो भार एकदम ग्राहकांवर टाकण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने टाकावा हा हेतू आहे.
अंदाजपत्रकीय तूट ही अनेक वर्षांपासूनच आहे. ही तूट काही प्रमाणात नवीन चलन छापून कमी केली जायची, परंतु त्यामुळे चलनफुगवटीचा धोका होऊ शकत असल्याने या उपायावर मर्यादा आहेत. सरकारला आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी करांच्याच माध्यमातून महसूल गोळा करता येतो. निर्यात, पर्यटन व्यवसाय इ. अजून काही माध्यमे आहेत, परंतु कर हेच सर्वात जास्त महसूल मिळवून देतात. त्यामुळे निव्वळ इंधन नव्हे, तर जवळपास सर्व वस्तूंवर आणि सेवांवर कर असणारच.
म
मोगा
Sat, 10/24/2015 - 02:03
नवीन
असे आहे तर मग काँग्रेसच्या काळात कर वाढवले तर भाजपा विरोध का करत होती ?
क
कपिलमुनी
Fri, 10/23/2015 - 11:07
नवीन
एखाद्या ठिकाणी कोणीतरी कुत्र्याला दगड मारल्यास सरकारला जबाबदार धरता येणार नाही.
याची सर्व कुत्र्यांनी नोंद घ्यावी.
न
नाव आडनाव
Fri, 10/23/2015 - 11:32
नवीन
.
म
मोगा
Sat, 10/24/2015 - 03:46
नवीन
म
मोगा
Sun, 10/25/2015 - 02:57
नवीन
मोदी सर्कार अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देणार आहे म्हणे.
हेच काँगेसन केले असते तर किती थयथयाट झाला असता.
पाकिस्तानचे नागरिक असाल तर इथे गाणी गाउ नयेत.
आधी भार्तीय नागरिक. व्हा व मग गाणी म्हणा !
अ
अभिजित - १
Mon, 10/26/2015 - 05:54
नवीन
http://economictimes.indiatimes.com/industry/transportation/railways/et-edit-why-railways-shouldnt-take-debt-of-rs-1-lakh-crore-for-bullet-trains/articleshow/49513862.cms
ET Edit: Why railways shouldn't take debt of Rs 1 lakh crore for bullet train
न
नाना स्कॉच
Mon, 10/26/2015 - 07:01
नवीन
मसणात घाला ती बुलेट ट्रेन म्हणे मी! पेंडिंग प्रोजेक्ट्स वर पैसा लावा म्हणे फ़क्त मी आधी! इलेक्ट्रिफिकेशन साठी प्रायोरिटी द्या!
(सात्विक संतापी) नाना
ग
गामा पैलवान
Mon, 10/26/2015 - 08:15
नवीन
नाना, तुमच्याशी सहमत आहे. भारतीय रेल्वेने अतिद्रुत गाडीवर पैसे खर्च करू नयेत. त्याऐवजी खाजगी आस्थापन उभारावे.
आ.न.,
-गा.पै.
म
मार्मिक गोडसे
Tue, 10/27/2015 - 12:28
नवीन
हे तुम्हीच म्हणताय ना ? मग हे अनुदान कसं ठरतं. माझ्याच एका लेखावरील माझाच हा प्रतिसाद वाचा.
.
काय म्हणता? खरोखरंच असं करण्याचा सरकारचा मानस आहे की तुमचा अंदाज आहे. नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी खाजगी कंपन्यांनापण हा महसूल मिळणार आहे की फक्त सरकारी कंपन्यांना? फक्त सरकारी कंपन्यांना मिळणार असेल तर ह्या कंपन्यांकडून मिळणारा घसघशीत लाभांश ह्या सरकारने न घेता तो पैसा नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी कंपन्यांना वापरायला द्यावा. नफ्यात असणार्या ह्या कंपन्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे का?
.
excise सोडल्यास असे दुसरे कोणते specific tax इंधनावर लावले जातात? बाकीचे सगळे कर हे ad valorem प्रकारचे असतात.ह्या करांमुळे ज्या प्रमाणात इंधनाचे मूळ भाव कमी होतात किंवा वाढतात त्या प्रमाणात सरकारचा महसूल कमी किंवा जास्त होतो. परंतू वर्तमान सरकारने एका वर्षात इंधनावरील exciseचे दर ४ वेळा वाढविले, तुम्ही म्हण्ता त्याप्रमाणे हे दर स्थिर नव्हते व एक वर्षात ह्या वाढीव दरामुळे केंद्र सरकारला ३०००० कोटीचा महसूल मिळाला. हा अप्रत्यक्षरीत्या वर्तमान सरकारचा इंधनाच्या दरांवर नियंत्रन ठेवण्याचाच प्रकार आहे.
इंधनांच्या मूळ किंमतीत होणार्या बदलामूळे राज्य सरकारांच्या ad valorem प्रकारच्या करांमूळे महसूलावर परिणाम होऊ नये म्हणून मागील सरकारने २०१३ साली सर्व राज्यांना इंधनावर ad valorem ऐवजी specific tax लावावा असे आवाहन केले होते. सगळ्या राज्यांनी हे मान्य केले असते तर आज जनतेला जागतीक बाजारातील कमी झालेल्या इंधनाच्या दराचा संपूर्ण लाभ मिळाला असता.
इंधन दरवाढीचे समर्थन करताना तुम्ही ह्यापुर्वीच्या सरकारच्या इंधन धोरणाचे समर्थन करत आहात. मागील सरकारने राज्यांना इंधनावर ad valorem कर लावावेत असे आवाहन केले होते त्याचा पाठपुरावा ह्या सरकारने करावा.
- «
- ‹
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- ›
- »