Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट

स
सन्घमित्रा
Fri, 06/23/2017 - 17:00
🗣 361 प्रतिसाद
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
वर्गीकरण
फिनान्स

प्रतिक्रिया द्या
124754 वाचन

💬 प्रतिसाद (361)
स
सही रे सई Fri, 06/23/2017 - 17:09 नवीन
व्वा .. एक गहन, न कळणारा विषय या धाग्यामुळे माझ्यासारख्या अडाण्याला कळणार.. भारीच.. अभ्यासू मिपाकरहो .. सांगा बघू लवकर लवकर ..
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 06/23/2017 - 20:15 नवीन
सामन्यांना कळला नाही तरी चालेल, तो कळण्यासारखाही नाही आणि कळून उपयोग ही नाही. व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
स
सुबोध खरे Sat, 06/24/2017 - 15:09 नवीन
व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही या सरकारचा विरोध समजू शकतो परंतु जी एस टी हा मोदी साहेबानी आणला म्हणून त्यांच्या यावर आगपाखड करण्याचा अंतस्थ हेतू समजला नाही. जखम कुठे तरी खोल झालेली आहे असे वाटते. जी एस टी चा प्रवास १९८६ पासून सुरु झाला आहे आणि २००४ मध्ये श्री विजय केळकर समितीने हि प्रक्रिया सुरु केली त्यात सर्व पक्षांची (कम्युनिस्ट सुद्धा) सरकारे आणि त्यांचे आर्थिक सल्लागार यांचा अंतर्भाव होता. ज्यात डॉ मनमोहन सिंह किंवा श्री चिदंबरम सारखे अर्थ मंत्रीही होते जी एस टी लागू करण्याची तारीख १ एप्रिल २०१० हि सुद्धा ठरवण्यात आली. आता सुद्धा लागू झालेला जी एस टी हा सर्व पक्षांच्या सहमतीने झाला आहे जम्मू काश्मीर सोडल्यास सर्व राज्यांनी आपल्या विधानसभेत तसा कायदा पास करून घेतला आहे. या प्रवासाचा एक थोडक्यात वृत्तांत या दुव्यावर मिळू शकेल. http://indianexpress.com/article/explained/looking-back-at-gsts-journey-how-an-idea-is-now-near-reality-arun-jaitley-4593103/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
N
Nitin Palkar Fri, 06/23/2017 - 17:56 नवीन
१ जुलै पासून जकात बंद होईल. हा एक कर तरी नक्की कमी होईल. GST चे अभ्यासक इतर फायदे तोटे सांगू शकतील. प्रत्येक गोष्टीला केवळ विरोधच केला तर आपण आणि 'पप्पू ' मध्ये काय फरक?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 06/23/2017 - 19:08 नवीन
१ जुलै पासून जकात बंद होईल. हा एक कर तरी नक्की कमी होईल? जकात हा लोकल टॅक्स आहे. त्याचा आणि जिएसटीचा काहीएक संबंध नाही. जकात चालू राहू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
व
विजुभाऊ Fri, 06/30/2017 - 15:13 नवीन
जी एस टी आल्यावर कोणतेही लोकल टॅक्स चालु रहाणार नाहीत. इतकेच काय त उत्पादन कर ( अबकारी) देखील रदबातल होणार आहेत. जकात थांबणार आहे. त्यामुळे मुंबई महापालीकेला उत्पन्नाचा नवा मार्ग शोधावा लागेल. घर पट्टी आणि तत्सम स्थानीक करांचे काय करायचे ते अजून ठरवत आहेत. तेही सम्पले तर महानगरपालीका चालवायच्या कशा हा प्रश्नच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अभिजीत अवलिया Fri, 06/30/2017 - 15:20 नवीन
जकात थांबणार आहे. त्यामुळे मुंबई महापालीकेला उत्पन्नाचा नवा मार्ग शोधावा लागेल.
जकात बंद झाल्याने राज्य सरकार मुंबई महापालिकेला जकातीतून जेव्हढे उत्पन्न मिळत होते तितकी आर्थिक मदत करणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/30/2017 - 18:49 नवीन
जीएसटीमुळे नाहीसे होणारे कर : स्त्रोत : http://www.moneycontrol.com/news/business/economy/goods-and-services-tax-all-that-you-wanted-to-know-2315465.html Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
क
कुंदन Sat, 07/01/2017 - 15:28 नवीन
हे पण वाचा , http://www.saamana.com/no-security-at-toll-naka/ जीएसटी लागू होताच मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेलाच पडले भगदाड * म्हणजे या पुर्वी सगळे समाज कंटक मुंबईत जकात भरुन येत होते काय , असा प्रश्न पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ध
धर्मराजमुटके Sat, 07/01/2017 - 16:38 नवीन
ख्खीक ! मुंबईवर यापुर्वी अतिरेकी हल्ले झाले, दंगली झाल्या तेव्हा जकात नाके बंद होते वाटतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
श
श्रीगुरुजी Sat, 07/01/2017 - 17:40 नवीन
शिवसेनेच्या महामूर्ख नेत्यांना कधीच अक्कल येणार नाही. हे असेच मूर्खासारखे बरळत राहणार. एअर इंडियाचे निर्गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परवा उद्धव ठाकरे बरळले "आज एअर इंडिया विकताय, उद्या काश्मीर विकाल.". इतक्या मूर्ख व्यक्तीला शिवसैनिक कसे काय नेता मानतात खुदा जाने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
N
Nitin Palkar Fri, 06/23/2017 - 17:59 नवीन
या ३७ ची यादी द्या. ही ३७ रिटर्न्स केवळ GST मुळे भरावी लागणार का ते सांगा.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 06/23/2017 - 19:18 नवीन
जिएसटीआर १/२/३ अशी तीन मंथली रिटर्न्स = ३६ रिटर्न्स + जिएसटीआर ९ हे एक वार्षिक रिटर्न =३७ रिटर्न्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
स
सुबोध खरे Sat, 06/24/2017 - 06:27 नवीन
एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू लागलात तर यात काहीही कठीण नाही. सर्व केमिस्ट आज हे करत आहेत. मी माझ्याकडे होणाऱ्या सोनोग्राफीचे रिटर्न रोजच्या रोज सरकारला अपलोड गेली चार वर्षे करत आहे.( वर्षात ३०० रिटर्न शिवाय दार महिन्याला महापालिकेला आणि सरकारला मासिक रिटर्न म्हणजे ३४८) गावागावात जर साधी माणसं व्हॉटस ऍप वापरू शकतात तर रिटर्न भरायला काहीही प्रश्न नाही. सुरुवातीला जड जाईल पण थोड्याच काळात सर्वाना सवय होईल. मूळ मुद्दा आता प्रत्येक व्यवहारावर पारदर्शकता आल्याने "छप्पन लप्पन" करणाऱ्यांची गोची होणार आहे याचा हा पोटशूळ आहे. आपण भारतीय लोक दांभिक आहोत. नियमाला फाटे फोडणे आणि नियमाविरुद्ध वागणे हा आपला लोकशाही आधारित हक्क आहे समजतो पण सरकारने काही नियम अप्रामाणिकपणा कमी होण्यासाठी केले तर मात्र कोल्हेकुई करतो. उदा सिग्नल तोडणे, पोलिसाला चिरीमिरी देणे, इतर उत्पन्न लपवणे आणि अशी अनेक शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हणून भाजपाची प्रसिद्धी असताना "जी एस टी आणला आणि शेटजींना नाराज केलं" हि धमक या सरकारने दाखवली आहे. त्यातून आता आयकराची तपासणी आपल्याच विभागात नव्हे तर भारतभर कुठेही होऊ शकेल असे प्रावधान येत आहे. त्यामुळे आयकर अधिकारी आणि अधिकाऱ्यांबरोबर साटे लोटे करणारे कर सल्लागार यांची पण गोची होणार आहे. त्यामुळे बरेच सी ए लोक या सरकार वर नाराज होताना आढळत आहेत. आपल्या कराची तपासणी त्रिपुराच्या अधिकाऱ्याने केली तर आगरताला येथे जाऊन "ऍडजस्ट" करणे कठीण होणार आहे http://economictimes.indiatimes.com/wealth/tax/jurisdiction-free-income-tax-assessment-of-taxpayers-on-the-anvil/articleshow/59094428.cms मुळात जी एस टी या सरकारने आणला नसून ती व्यापारी आणि व्यावसायिक लोकांची मागणी होती आणि तिची सुरुवात यु पी ए सरकारने केलेली आहे. तेंव्हा काहीही झाले तरी केवळ मोदींना दोष द्यायचा असेच डावपेच असणाऱ्या माणसांनी आरडा ओरड सुरु केली यात नवल ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
द
दशानन Sat, 06/24/2017 - 07:31 नवीन
सल्लागार
सल्ला'गार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/24/2017 - 09:59 नवीन
मूळ मुद्दा आता प्रत्येक व्यवहारावर पारदर्शकता आल्याने "छप्पन लप्पन" करणाऱ्यांची गोची होणार आहे याचा हा पोटशूळ आहे. आपण भारतीय लोक दांभिक आहोत. नियमाला फाटे फोडणे आणि नियमाविरुद्ध वागणे हा आपला लोकशाही आधारित हक्क आहे समजतो पण सरकारने काही नियम अप्रामाणिकपणा कमी होण्यासाठी केले तर मात्र कोल्हेकुई करतो. +++१,००,००० उर्फ लाखाची बात ! *clapping*

वरच्या नियमाची करॉलरी : या कोल्हेकुईची तीव्रता दांभिकतेच्या समप्रमाणात (डायरेक्टली प्रपोर्शनल) असते, यात आश्चर्य ते काय ?! ;) :)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Sat, 06/24/2017 - 11:28 नवीन
अबकारी कर, सेवा कर, मुल्यावर्धित कर, इतर स्थानिक स्वराज्य कर यांच्यातील चालू घडीला असणारी पारदर्शकता आणि येऊ घातलेल्या GST मधील पारदर्शकता या मधील फरक या संदर्भि कृपया मार्गदर्शन कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 12:00 नवीन
श्री म्हात्रे अक्षरं (गरज नसतांना) ठळक करणे किंवा फाँट (निष्कारण) मोठा करणे याविषयी निश्चित मार्गदर्शन करु शकतील. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतील काय हे पाहाणे नक्कीच रोचक ठरेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/24/2017 - 13:58 नवीन
@संक्षी : भोंचकपणाचा यापेक्षा चांगला दाखला कोठे मिळेल का ? =)) अंगी हिंमत असलेला खराखुरा तज्ञ असा भोंचकपणा न करता आणि मुख्य इतर व्यक्ती / संस्था / सरकार यांच्यासंबंधी केवळ स्व्तःच्या कपोलकल्पनांवर आधारीत हवेतली विधाने न करता सबळ पुराव्यासकट लेखन करतो. तसे करण्याचे धाडस तुम्ही एखाद्या वेळेस तरी केल्याचे याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा आहे !!! =)) =)) =)) बाकी मनोरंजन चालू आहेच, ते तसेच चालू ठेवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/24/2017 - 14:08 नवीन
भोंचक, असभ्य आणि अपमानास्पद भाषेचा वापर रस्तोरस्तीच्या फूटपाथवरही दिसतो ! ते अगतिकतेचे व स्वतःवरचा ताबा सुटल्याचे लक्षण असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 12:40 नवीन
प्रतिसादाचा खयाली पुलाव इथे सादर केला आहे. १) एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू लागलात तर यात काहीही कठीण नाही. सर्व केमिस्ट आज हे करत आहेत. जिएसटीची रिटर्न्स काय आहेत, ती कशी जनरेट होणार आहेत आणि त्यासाठी स्वतःचा व्यावसाय सोडून इतरांच्याच किती मागे लागावं लागणार आहे याची तुम्हाला सुतराम कल्पना नाही. २) मी माझ्याकडे होणाऱ्या सोनोग्राफीचे रिटर्न रोजच्या रोज सरकारला अपलोड गेली चार वर्षे करत आहे तुमची सोनोग्राफीची रिटर्नस आणि जिएसटीची रिटर्नस यात `इंटरनेट वापरता येणं', या एका गोष्टी पलिकडे काहीही साम्य नाही. ३) मूळ मुद्दा आता प्रत्येक व्यवहारावर पारदर्शकता आल्याने "छप्पन लप्पन" करणाऱ्यांची गोची होणार आहे याचा हा पोटशूळ आहे. आपण भारतीय लोक दांभिक आहोत. नियमाला फाटे फोडणे आणि नियमाविरुद्ध वागणे हा आपला लोकशाही आधारित हक्क आहे समजतो पण सरकारने काही नियम अप्रामाणिकपणा कमी होण्यासाठी केले तर मात्र कोल्हेकुई करतो. माझ्या या प्रतिसादातला पार्ट टू वाचलात की मुद्दा लक्षात येईल ४) त्यातून आता आयकराची तपासणी आपल्याच विभागात नव्हे तर भारतभर कुठेही होऊ शकेल असे प्रावधान येत आहे.......त्यामुळे बरेच सी ए लोक या सरकार वर नाराज होताना आढळत आहेत. हे तुमच्या पाहाण्यातले किंवा (बहुदा) कल्पनेतले सीए असावेत ! :) इ-असेसमेंट ही सर्वात पारदर्शक व्यवस्था आहे आणि त्यामुळे सीएंची नव्हे तर आयटी ऑफिसर्सची गोची होणारे. कारण स्पेसिफिक प्रश्नांना स्पेसिफिक उत्तरं दिल्यावर असेसमेंट संपणार आहे. असेसमेंटमधला `ऑफिसर काहीही विचारु शकतो' हा पर्सनल थ्रेट एलीमेंट शून्य होईल. ही व्यवस्था स्वागतार्ह आहे. तुमच्या पाहाण्यातल्या ज्या सीएंचा गैरसमज झाला असेल त्यांना माझा मुद्दा पोहोचवा, हॅपी होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 06/24/2017 - 14:57 नवीन
वा संक्षी तुमचा एवढा जळफळाट होतो आहे याचे कारण समजेल काय? कुठे वर्मावर डाग बसला आहे का? तसे असेल तर मी अगोदरच माफी मागतो. नाही म्हणजे सामान्यतः आपले प्रतिसाद सभ्य भाषेत असत म्हणून विचारले? म्हणजे मला "शून्य अनुभव" आहे. या न्यायाने पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञांनी आपले दवाखाने बंद करून घरी बसायला पाहिजे आणि "सुतराम माहिती नाही" असा एकांगी निवड करून मोकळे झालात. एखाद्याने आपला भाऊ शेती करतो म्हणून काही लिहिणे हे आपल्या न्यायाने १०० % चूक म्हणायला लागेल. माझ्या भावाचे तीन कारखाने आहेत. गेले तीन महिने जी एस टी बद्दल आमच्या घरात रोज चर्चा होत असते. पण आम्ही काही जी एस टी शी संबंधित नाही. त्यामुळे आम्हाला समजण्याची शक्यता नाहीच हे मूळ गृहीतकच बरोबर नाही असे वाटते सीएंची नव्हे तर आयटी ऑफिसर्सची गोची होणारे. स्क्रुटिनी केसेस कशा "सेटल केल्या जातात" आणि त्यासाठी सी ए लोक कसे पैसे घेतात आणि प्रत्यक्ष किती पैसे "वर पोहोचवले जातात" याच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या कट्ट्याला भेटल्यावर ऐकवीन. सामान्यतः आयकर अधिकारी भ्रष्ट आहेत याबद्दल कुणालाच शंका नाही. पण सी ए म्हणजे कसे धुतल्या तांदुळासारखे आहेत का ? या निश्चलनीकरणाच्या काळात किती सी ए नि "काय काय आणि कसं कसं ऍडजस्ट " केलंय याच्याहि अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकायला मिळाल्या/मिळत आहेत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/26/2017 - 06:15 नवीन
जीएस्टी म्हणजे काय याविषयी तुम्ही इथे लिहित का नाही. तुम्ही सीए असल्यामुळे हे विचारत आहे. आमच्या सारख्या अ-सीए लोकांना फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 06/23/2017 - 19:28 नवीन
काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहे. याविषयी खफवर चर्चा झाली आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/24/2017 - 07:43 नवीन
१) सामान्य ग्राहक: टिव्ही,फ्रिज कपट, अवन खरेदी याच्या पावतीवर किंमत अधिक कोणतातरी टॅक्स असतोच त्याचे फक्त नाव बदलले असेल. ही वस्तू कर धरून एवढ्याला इतकाच अर्थ. वस्तू घेतल्यावर वापरतान येणारा खर्च: उदा मोबाइल खरेदीनंतर बिलिंग प्लान असेल तर सर्विस टॅक्स होता तो जिएसटी दराप्रमाणे लावून येईल. डिटिएचला असेच. सुटका नाही. २) हॅाल ,केटरिंगवाल्याने बिल दिले तर नवीन टॅक्स लागेल. ३)इतर कारखाने वगैरे: कच्चा माल आणताना लागलेला आणि भरलेला टॅक्स ओफसेट करेलच. ४) नवीन जिएसटीचा मुख्य मुद्दा माल ट्रानस्पोर्टने पाठवताना जो वाटेत अडथळा असायचा तो निघून जाईल असा दावा आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 06/24/2017 - 08:31 नवीन
मुळात जी एस टी हा सामान्य माणसाला काही फायदा होईल यासाठी नाहीच तर व्यापार आणि उद्योगधंद्याला चालना मिळावी आणि त्यातील लाल फीत आणि भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून अप्रत्यक्ष पणे थोडा फार फायदा होईल तेवढाच.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/26/2017 - 06:17 नवीन
ग्रोसरीची किंमत कमी होणार आहे असे ऐकतो. निदान एवढे झाले तरी नक्कीच फरक पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी_माणूस Sat, 06/24/2017 - 08:35 नवीन
http://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-agralekh-on-gst-opinion-part-1-1477723/ http://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-agralekh-on-gst-opinion-part-2-1478421/
  • Log in or register to post comments
ह
होकाका Sat, 06/24/2017 - 08:56 नवीन
१. मी content marketing या क्षेत्रात काम करतो. आज माझ्या क्षेत्रातील व्यावसायिक १५% कर वसूल करून सरकारजमा करतात. १ जुलै पासून ती रक्कम १८% होईल. यामुळे होणारी भाववाढ जरी अपरिहार्य असली तरीही ती ग्राहक आस्थापनांना जाचक वाटण्याची शक्यता आहे. २. ३७ वेळा return filing ही सुद्धा व्यावसायिकांना त्रासदायक वाटू शकते. ३. आजच्या घडीला या नवीन करपध्दतीबाबत व्यावसायजगतात खूपच अनभिज्ञता आणि काळजी) आहे. या तीनही बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून निदान आमच्या क्षेत्रात एखादा quarter मंदी येण्याची शक्यता वाटते. अर्थात, यात भाजपा की काँग्रेस हा मुद्दा उपस्थित करणे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/24/2017 - 09:19 नवीन
>>२. ३७ वेळा return filing ही सुद्धा व्यावसायिकांना त्रासदायक वाटू शकते.>> याचे आउटसोर्सिंग होइल. एक मनुष्य निरनिराळ्या दुकानात जाऊन त्यांच्या बिलांची यादी करून त्यांच्या अकाउंटला अपलोड करून देईल. ( प्रत्येक मेडिकल दुकान एका कुणाच्या फार्मासिस्टच्या नावाने लायसन काढलेले असते तो मनुष्य कायम त्या दुकानात हजर असतो का?)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 06/24/2017 - 09:56 नवीन
इथे व्यावसायिक किती आहेत ? त्यादृष्टीने चर्चा करायची काय ? चर्चा भाजपा वि. काँग्रेस अशा नेहमीच्या वळणावर न्यायची आहे काय ? केवळ सामान्य जनतेच्या (म्हणजे ग्राहकाच्या) जीवनावरील परीणामांची चर्चा करायची तर "महागाई कमी होणार नाही" एवढे एक वाक्यातले उत्तर पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 12:12 नवीन
इथे जिएसटी रजिस्ट्रेशन किती जणांकडे आहे ?या एका प्रश्नासरशी सगळी चर्चा व्यर्थ होईल :) म्हणून मी जिएसटीवर पोस्ट लिहीली नाही. करदर तेच असल्यानं महागाई घंटा कमी होणार नाही आणि व्यावसायिक स्वतःला मिळालेला सेट-ऑफ बेनिफिट, किंमती कमी करुन कस्टमर्सना पास-ऑन करणार नाहीत, हे खफवरच्या चर्चेत आधी सांगितलं होतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
क
कंजूस Sat, 06/24/2017 - 10:13 नवीन
जिएसटी गोळा करण्याचा मूळ उद्देश केंद्राकडे पावर जावी आणि राज्यांच्या नाड्या आवळता याव्यात हा तर नसेल?
  • Log in or register to post comments
स
सन्घमित्रा Sat, 06/24/2017 - 10:32 नवीन
जि एस टी मध्ये सी जि एस टी हा केंद्र सरकार करीत तर एस जि एस टी हा राज्य सरकार करीत आहे. दोघांना वाटा मिळणार आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सन्घमित्रा Sat, 06/24/2017 - 10:35 नवीन
जि एस टी यावा ह्या साठी जागतिक बँक तसेच अश्या आंतरराष्टीय समूहानं कडून दबाव होता .
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 11:50 नवीन
नीट वाचा : १) मी स्वतः इनडिरेक्ट टॅक्सेशनची प्रॅक्टीस करत नाही आणि कधी करणारही नाही. व्यक्तिश: जिएसटी आला काय की बोंबलला काय, मला काहीएक फरक पडत नाही. तस्मात, ज्या विद्वान मंडळींना मी जिएसटीबद्दल व्यक्तिगत त्रासापोटी लिहीतोयं असं वाटत असेल, त्यांनी प्रथम स्वतःचा भ्रमनिरास करुन घ्यावा. आता भूमिका पाहा : (संपादित) सूचना : सभासदांनी आपली मते सभ्य व अपमानास्पद नसलेल्या शब्दांत व्यक्त करावीत, अशी अपेक्षा आहे. : संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 14:36 नवीन
आता भूमिका पाहा : कोणताही टॅक्स वसूल करतांना सरकारचा करदात्यावर विश्वास असणं आवश्यक आहे. तो नसेल तर करदाते सहकार्य करणार नाहीत आणि मग सरकारकडे इंप्लीमेंटशनची व्यवस्थाच नाही. करवसुली अशक्य होऊन अनागोंदी माजेल. प्रत्येक नागरिक चोर आहे असं समजलं तर जितके नागरिक तितके पोलीस उभे करावे लागतील. नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर जाईल अशी अपेक्षा होती पण काळा पैसा शंभरटक्के लोकांकडे नसून फक्त काही टक्के लोकांकडे आहे इतकं तारतम्य असायला हवं. त्यासाठी धाडी टाकून काळा पैसा उघड करणे हा मार्ग आहे आणि बहुतांश काळा पैसा राजकारण्यांनीच लाटला आहे आणि निवडणूकांचं फंडींग करणारे बिझिनेसमन बाळगून आहेत याची (सामान्यांना असली तरी) सरकारला बहुदा कल्पनाच नसावी असे दिसते. त्यामुळे सर्वच देश एकाच वेळी वेठीला धरला गेला. तद्वतच जिएसटी हा प्रकार आहे :) सगळे व्यासायिक बेईमान आहेत या चुकीच्या धरणेतून आख्ख्या देशाचा समग्र व्यावसाय वेठीला धरला गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/24/2017 - 13:38 नवीन
जीएसटीमुळे होणारे करबदल पूर्वांपार चालत आलेल्या अनेक भ्रष्ट चालीरितींना सुरुंग लावणारे आहेत. त्यामुळे अनेक राखीव भ्रष्ट कुरणे धोक्यात आली आहेत. अर्थातच, अनेक लोकांची प्रचंड घालमेल होत आहे आणि अनेक तथाकथित अर्थतज्ञ आणि अर्थसल्लागार जीएसटीसंबंधी गैरसमज पसरवून देत आहेत. सर्वसामान्य नागरिकाला घाबरवून सोडण्यासाठी "आता भाववाढ होईल. आणि / किंवा जीएसटी म्हणजे केवळ टॅक्सचे नाव बदलले आहे मात्र टॅक्स तेवढाच राहील", हा गैरसमज केवळ अज्ञानाने किंवा हेतूपुर्रसर पसरवला जात आहे. यासंबंधी खरी वस्तुस्थिती अशी आहे : १. नवीन कर ठरवताना, जीवनावश्यक, नेहमीच्या गरजेच्या, सर्वसामान्य वापराच्या, चैनीच्या, इत्यादी प्रकारच्या वस्तूंचे कर ०% पासून सर्वसाधारणपणे चढत्या भाजणीने वर जात कमाल २८% पर्यंत ठरविलेले आहेत. (http://www.thehindu.com/business/Economy/article18514302.ece/BINARY/Schedule%20of%20GST%20rates%20for%20services) यामुळे काही वस्तूंचे अंतीम करदर कमी-जास्त झाले असले तरी ते ग्राहकांच्या फायद्याचे व्हावे अशी काळजी घेतली गेली आहे. २. काही वस्तू जीएसटीच्या बाहेर ठेवलेल्या ठेवलेल्या आहेत, उदा. पेट्रोलियम प्रोडक्टस्, वीज, दारू, इ. व यांच्या कराचे स्थानिक दर ठरविण्याचा अधिकार तत्संबंधी कंपन्या/राज्यसरकारे यांना आहे. ३. GSTचे जाहीर केलेले दर हे कमाल दर आहेत आणि त्यांची 'केंद्र' व 'राज्य/केंद्रशासित सरकार' यांच्यामध्ये संगणकानेच वाटणी करण्यासाठी 'CGST उर्फ सेंट्रलGST' व 'SGST उर्फ स्टेटGST' अशी विभागणी करण्यात आली आहे. (उदा: १२% GST = ६% CGST + ६% SGST). ४. पूर्वीची आणि जीएसटी खालील टॅक्स आकारणी दाखवणारी दोन टेबले पाहिली तर वरचे दोन्ही गैरसमज सहज दूर होतीलः अ. उत्पादकाच्या करावर होणारा परिणाम : Image removed. यावरून असे दिसेल की, केवळ कर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे असेच नाही तर पूर्वीचे VAT, Service tax, Excise इत्यादी कर GST या एकाच करात समविष्ट झाल्याने त्यासंबधिचे वेगवेगळे हिशेब, करविवरणे, सरकारी कार्यालयांशी संबंध हे जाऊन केवळ एकच करप्रणाली आली आहे. अर्थातच, ओव्हरहेड्स कमी झाली आहेत. आ. एक राज्य-ते-दुसरे राज्य-ते-केंद्रशासित प्रदेशात वाहतूक होऊन विक्रीमध्ये असलेल्या करावरचा परिणाम : Image removed. या व्यवहारातही कर कमीच झालेला दिसेल. अजून काही महत्वाचे मुद्दे : १. पूर्वीच्या करप्रणालीत, जर उत्पादन प्रदेशाच्याबाहेर (दुसर्‍या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात) माल नेऊन विकायचा असेल तर त्याला केवळ केंद्र सरकारचे कर भरून परवानगी मिळत असे. माल दुसर्‍या ठिकाणी नेऊन विकल्यावर उत्पादक सचोटीने स्थानिक सरकारचे कर भरेल असे गृहित घरलेले होते. मात्र व्यवहारात काही (की बरेच काही ?) उत्पादक या पळवाटीचा फायदा घेऊन केंद्र सरकारचा कमी दराचा कर भरत असत आणि उत्पादनाच्या राज्यातच विक्रि करत असत. ही शुद्ध करचुकवेगिरी झाली, पण ती पकडण्यासाठीची यंत्रणा व करविभागातला भ्रष्टाचार यामुळे हे चोर मोकाट होते. ...आता नव्या GST प्रणालीमध्ये अश्या व्यवहारांचा संपूर्ण कर मूळ जागीच IGST (IGST = GST = CGST + SGST) या नावाने वसूल केला जाणार आहे. त्यातील CGST हा हिस्सा केंद्रसरकारकडे वळता होईल व SGST हा हिस्सा उत्पादकाच्या नावे संगणकप्रणालीत क्रेडिट राहील व उत्पादक तो विक्री केल्यावर भरायच्या करातून वळता करून घेऊ शकेल. हा काहीसा TDS सारखा व्यवहार आहे. मात्र, यामुळे पूर्वी होणार्‍या याप्रकारच्या मोठ्या प्रमाणावरच्या करचुकवेगिरीला आळा बसेल. २. "करबचतीचा मोठा हिस्सा सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचावा यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सजग राहील आणि याबाबत गडबड करणार्‍या व्यक्ती/कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद GST कायद्यात आहे." हे खुद्द वाणिज्य सेक्रेटरींनी राष्ट्रीय वाहिन्यांवर केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. ३. GST ची कार्यप्रणाली संगणकावर आधारलेली आहे. त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवला आहे. त्यामुळे, ओळखीने व इतर अमिषे वापरून टेबलाखालून होणार्‍या व्यवहारांवर टाच येईल. ४. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या जीएसटी गटाने कायदा व दर सर्वसंमत्तीने बनवले आहेत त्यात केंद्र सरकारसह सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसरकारांचा सहभाग होता (The following persons shall form composition of GST Council and its Meetings: The Union Minister of State, in-charge of Revenue of finance Finance Ministers of Each individual State in India) तसेच हे सगळे कायदे व कराचे दर संसद व कॉंग्रेससकट सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांनी पारीत केले आहेत. त्यामुळे आता जी राजकारण्यांची कोल्हेकुई चालू आहे तिच्या मागे लोकांची दिशाभूल यापलिकडे काही नाही. एकंदरीत, "अधिक पारदर्शकता व कमी कन्फ्युजन = ग्राहकाला व सरकारला शेंड्या लावून लोणी खाण्याच्या कमी संधी" हे परिचित भारतिय समिकरण वापरायच्या संधी कमीत कमी होतील. त्यामुळे, काही जणांची जी फारच घालमेल होत आहे, ती अपेक्षितच आहे, नाही का?! :D
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 14:59 नवीन
एक्साईज १२ % + वॅट १२.५% = २४.५ % असणारी वस्तू (निअरेस्ट नेक्स्ट या न्यायानं) २८% जिएसटी स्लॅबमधे क्लासिफाय झाली आहे. १२% जिएसटीमधे नाही. २४.५% ऐवजी १२.५% टॅक्स कलेक्ट केला तर एका वर्षात सरकार दिवाळखोरीत निघेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 15:01 नवीन
२४.५% ऐवजी १२% टॅक्स कलेक्ट केला तर एका वर्षात सरकार दिवाळखोरीत निघेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/24/2017 - 15:25 नवीन
हायला, तुमच्या सारख्या उच्च कोटीच्या अर्थसल्लागाराला, त्याप्रतिसादात... अ) वेगवेगळ्या वस्तूंकरता ०% ते २८% असे वेगवेगळे कराचे दर आहेत आणि आ) त्या उदाहरणातला करदर हा एका विशिष्ट वस्तू करिता नसून तो एक उदाहरण (example) म्हणून धरला आहे असा किंवा अश्या अर्थाचा असलेला मजकूर वाचता आला नाही ???!!! धन्य, धन्य, धन्य !!! अ) आता ध्यानात आलं ना की मला तुमच्यासारख्यांसाठीच महत्वाचे मुद्दे ठळक का करावे लागतात ते... आणि ते करूनसुद्धा काहीजणांमध्ये काडीचा फरक पडत नाहीच म्हणा ! अश्या हवेत वार करणाच्या मनोवस्थेला / विचाराला/ लिखाणाला "फ्लाईट ऑफ थॉट्स / फॅन्सी / इत्यादी" म्हणतात. आ) त्याविरुद्ध, ते वाचले आणि समजले असूनही वरचा प्रतिसाद लिहावासा वाटणे हे तद्दन दिशाभूल करणारे व व्यावसायिकताविरोधी लक्षण आहे ! वरच्या अ) आणि आ) दोन्ही मनोवस्था असणार्‍यांशी संवाद करणे केवळ अशक्य असते. वार्‍याशी कोण भांडणार ?!... तुमचे लेखन कितीही एकांगी आणि हवेतले असले तरीही त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष करतो. हे आतापर्यंत तुमच्या ध्यानात यायला हवे होते. नसल्यास आता तसे स्पष्टपणे सांगितले आहे. तेव्हा, सॉरी, माझ्याकडे फुकाच्या हवेतल्या मारामारीसाठी वेळ नाही... दुसरा दरवाजा पकडा. धन्यवाद ! टीप : शेवटचा परिच्छेद तुमच्या डोळ्यात भरावा यासाठीच केवळ ठळक केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/24/2017 - 20:41 नवीन
व्यावसायिकताविरोधी = अनप्रोफेशनल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Sat, 06/24/2017 - 21:29 नवीन
त्या उदाहरणातला करदर हा एका विशिष्ट वस्तू करिता नसून तो एक उदाहरण (example) म्हणून धरला आहे ते उदाहरणच चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. ठळक अक्षरानं चुकीचं उदाहरण बरोबर होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/24/2017 - 15:02 नवीन
अजून एक... वर सांगितलेल्या उपायांमुळे; काही वस्तूंच्या करदरात कपात होऊनही, अनेक प्रकारची करगळती कमी झाल्यामुळे, एकंदर करसंकलनात भर पडेल असा सरकारचा दावा आहे... जर नवीन कायद्यांची अंमलबजावणी ठरवल्याप्रमाणे केली गेली आणि वेळोवेळी त्यातील तृटी रोखण्यासाठी उपाय केले गेले, तर हे शक्य होईल असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अभिजीत अवलिया Sun, 06/25/2017 - 08:37 नवीन
ह्या उदाहरणात 'Assuming GST rate of १२%' आकडेमोड केलेले आहे. त्यामुळे ही आकडेमोड आणि त्यावरून तुम्ही केलेले 'कर पूर्वीपेक्षा कमी झालेला आहे' हे विधान किमान मला तरी पटत नाही. उद्या एखाद्याने २८% GST ह्या दराने एखादी आकडेमोड करून दाखवली तर कर वाढलेला दिसेल. त्यामुळे कोणत्याही वस्तूवर पूर्वी किती कर होता आणि GST नंतर किती आहे हे महत्वाचे ठरेल. तसेच आजच्या लोकसत्ता मध्ये एक पहिल्या पानावर एक बातमी आलेली आहे GST बद्दल. त्यात एक महत्वाची नमूद केली गोष्ट खालीलप्रमाणे - देशभरातून साधारण पावणेतीनशे कोटी उलाढालीच्या (इनव्हॉइसेस) नोंदी जीएसटी संकेतस्थळावर दरमहा सुमारे ९० लाख करदाते (सध्या नोंदणीकृत ६५ लाख) करतील. या इतक्या नोंदींची खातरजमा करून, त्यांचा दाखल विवरणपत्रांशी पडताळा करून, आठवडाभराच्या अवधीत इनपुट टॅक्स क्रेडिटरूपी भरपाई लक्षावधी खात्यांमध्ये वर्ग करण्याचे अगडबंब काम करणारी प्रशासकीय यंत्रणा सध्याच्या तुलनेत खूप मोठी असणे क्रमप्राप्त ठरेल. विधिज्ञ, सनदी लेखाकार, व्यय लेखाकार आणि कर सल्लागारांची मोठी फौज दिमतीला उभी राहणे भाग ठरेल. प्रत्यक्षात सध्या कार्यरत सनदी व व्यय लेखाकारांची संख्या जेमतेम लाखाच्या घरातच असल्याचे अधिकृत स्रोतांतून स्पष्ट होते. ‘टीमलीज’ या रोजगार संशोधन व सल्ला क्षेत्रातील कंपनीच्या अहवालानुसार, सध्याच्या तुलनेत किमान दसपटीहून अधिक १३ लाख लेखा व्यावसायिकांची रसद आवश्यक ठरेल. १३ लाख लेखा व्यावसायिकांची रसद सध्या तरी आपल्याकडे नाही असे बातमीवरून वाटतेय. त्यामुळे मला तरी थोडी धाकधूक वाटतेय GST बद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Sun, 06/25/2017 - 11:37 नवीन
देशभरातून साधारण पावणेतीनशे कोटी उलाढालीच्या (इनव्हॉइसेस) नोंदी जीएसटी संकेतस्थळावर दरमहा सुमारे ९० लाख करदाते करतील. या इतक्या नोंदींची खातरजमा करून, त्यांचा दाखल विवरणपत्रांशी पडताळा करून, आठवडाभराच्या अवधीत इनपुट टॅक्स क्रेडिटरूपी भरपाई लक्षावधी खात्यांमध्ये वर्ग करण्याचे अगडबंब काम करणारी प्रशासकीय यंत्रणा सध्याच्या तुलनेत खूप मोठी असणे क्रमप्राप्त ठरेल. आणि हे काम पुढेपुढे आणखी वाढतच जाईल. शिवाय व्यावसायिकांना स्वतःची कामं सोडून दुसरा त्याची बीलं बरोबर अपलोड करतो की नाही हे पाहावं लागणार आहे, कारण त्याचा सेट-ऑफ त्यावर अवलंबून आहे. या कामासाठी प्रत्येकाला लागणारा इंटरनेट सपोर्ट, इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता, लक्षावधी मॅन अवर्स या कॉस्टसची तर गणनाच नाही. थोडक्यात, एखाद्या कंपनीची १०,००० सेल्स बिल्स आहेत. पूर्वी केवळ काही ओळींची त्यांची समरी अपलोड व्हायची आणि काम फत्ते व्हायचं तिथे आता ही सर्व १०,००० बिलं एकेक करुन अपलोड करावी लागणार आहेत. ही असली २.७५ कोटी बिलं प्रोसेस करुन जिएसटी सिस्टम व्यावसायिकांची वेगवेगळी रिटर्नस २/३ दिवसात तयार करणार. ती पुढच्या २ दिवसात म्हणजे १५ तरखेच्या आत व्यावसायिकांनी तपासायची. त्यातल्या व्यावसायिकांनी केलेल्या मॉडिफिकेशन्स वर पुन्हा नवी रिटर्न्स तयार होणार. ती १७ तारखेच्या आत व्यावसायिकांनी पुन्हा तपासायची आणि ...... इतका घोळ घातल्यावर २० तारखेच्या आत रिटर्न भरायचं ! समंजस माणूस नुसत्या कल्पनेनं भंजाळून जाईल. आता हे सगळं का ? तर सरकारचा व्यावसिकांवर अविश्वास आहे म्हणून ! आणि अगदी स्पष्टच बोलायचं तर सरकार स्वतः बेईमान लोक शोधायला असमर्थ आहे म्हणून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभ्या.. Sun, 06/25/2017 - 11:55 नवीन
थोडक्यात, एखाद्या कंपनीची १०,००० सेल्स बिल्स आहेत. पूर्वी केवळ काही ओळींची त्यांची समरी अपलोड व्हायची आणि काम फत्ते व्हायचं तिथे आता ही सर्व १०,००० बिलं एकेक करुन अपलोड करावी लागणार आहेत. ही असली २.७५ कोटी बिलं प्रोसेस करुन जिएसटी सिस्टम व्यावसायिकांची वेगवेगळी रिटर्नस २/३ दिवसात तयार करणार. ती पुढच्या २ दिवसात म्हणजे १५ तरखेच्या आत व्यावसायिकांनी तपासायची. त्यातल्या व्यावसायिकांनी केलेल्या मॉडिफिकेशन्स वर पुन्हा नवी रिटर्न्स तयार होणार. ती १७ तारखेच्या आत व्यावसायिकांनी पुन्हा तपासायची आणि ...... इतका घोळ घातल्यावर २० तारखेच्या आत रिटर्न भरायचं !
रिअली ही प्रोसीजर आहे? अवघड आहे मग. :( पेंटरकी सुरु केलेली उत्तम ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 06/25/2017 - 12:22 नवीन
इक्झॅक्टली हीच प्रोसिज्यर आहे ! दादा, मी पूर्ण आभ्यास केल्याशिवाय लिहीत नाही. त्यामुळे एकदा सुरु झाल्यावर मागे हटत नाही. आता हे तुला काय सांगायचं ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/25/2017 - 12:45 नवीन
दादा, मी पूर्ण आभ्यास केल्याशिवाय लिहीत नाही. हे वाक्य, "श्री अरविंद केजरीवाल" यांच्या संदर्भात पूर्वी मिपावर काय काय लिहिले होते त्याच्या पार्श्वभूमीवर तपासून पाहिले तर बरे होईल ! मात्र, एकदा सुरु झाल्यावर मागे हटत नाही. ह्याला लाखवेळा सहमती... वर सांगितलेल्या वेळेसही या वाक्याचे नेहमीप्रमाणेच १००% पालन झाले होते ! मात्र, त्याबाबत हल्ली काही लिहिलेले दिसून येत नाही (कदाचित ते मागे हटायला लागू नये यासाठी असावे) ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 06/25/2017 - 13:10 नवीन
अरविंदच्याबाबतीत अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि माझ्यासारख्या अनेकांना त्याचा खेद आहे. पण निदान संपादकानं, केवळ बाजू पडली म्हणून इतर सदस्यांसारखा कुठलाही विषय कशाशीही जोडू नये इतपत तारतम्य अपेक्षित आहे. पण आता विषय निघालाच आहे म्हणून लिहीतो. अरविंदच्या बाबतीत माणूस ओळखण्यात झालेली चूक आणि १२% एक्साइज आणि १२.५% वॅट असलेली वस्तू १२% जिएसटीमधे नेऊन स्वस्ताई आली असा डांगोरा पिटणारी भोंगळ चूक यात जमीनास्मानचं अंतर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा