Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

क
कोंबडी प्रेमी
Fri, 07/21/2017 - 14:17
🗣 445 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
143577 वाचन

💬 प्रतिसाद (445)
अ
अजया Fri, 07/21/2017 - 14:24 नवीन
कशाला बघता? उगाच डेटा वाया जातो. हे सोडून बरेच काही वाचनीय ,श्रवणीय ,प्रेक्षणीय आहे जगात!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/25/2017 - 14:23 नवीन
जगात खुप घडामोडी आहेत, तिथेच कशाला अटकायचं. विषय संपवून टाकायचा. मला वाट्सपवर अनेकदा प्रवचन येत असतं. काहीही न म्हणता डिलीट करून मोकळा होता. लोक ते आपल्या गळी उतरवतात, काही बोलायला जावं तर हमरी तुमरी वर येतात. अवघड झालंय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Fri, 07/21/2017 - 15:24 नवीन
पांडुरंग पांडुरंग
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Fri, 07/21/2017 - 18:29 नवीन
या मॅडम मुलींना म्हणतात ,चंद्रावर जा पण भाकरी करता आली पाहीजे. एक बाई असून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रोत्साहन देताना या बाईंना लाज वाटली पाहीजे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 14:58 नवीन
एक बाई असून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रोत्साहन देताना
काय हो, बायकांची पुरुषांशी अशी कोणती पुरानी दुश्मनी आहे जे त्यांनी पुरुषांच्या व्यवस्थेचा पाडाव करावा? उद्या मुलांच्या संघाविरुद्ध मुलींचा अशा खेळात अपवाद म्हणून एक गडी म्हणून तुम्हाला मुलांच्या टिममधे टाकले तर ते हारावेत असे तुम्ही खेळणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ग
गामा पैलवान Fri, 07/21/2017 - 22:48 नवीन
कोंबडीप्रेमी, तुम्ही म्हणता तसं आईचं म्हणून ऐका असं काही दिसलं नाही या चलचित्रात. बहुधा दुसरीकडे असेल. मात्र ३ मिनिटं २० सेकंदांनी एक अत्याधुनिक क्रांतिकारी घोषणा करतात. त्या म्हणतात की माझ्या वयाच्या (=म्हाताऱ्या) एकही बाईने देवीकडे अहेवपणी मरण मागायची प्रार्थना करायची नाही. कारण हल्ली वृद्धाश्रमात पुरुषांची संख्या कमालीची वाढती आहे. घरचं करायला सासू चालते, पण सासरा चालंत नाही. काळानुसार मागणं बदलण्याचा लवचिकपणा रामतीर्थकर बाईंत आहे. बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 07/22/2017 - 07:02 नवीन
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे. "वंचित" हा शब्द पण लिहा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कोंबडी प्रेमी Sat, 07/22/2017 - 18:36 नवीन
त्यांचा तो अहेवपणा चा मुद्दा पटला ... अस बघा कि त्यांचे निरीक्षण कदाचित खरे असतीलही (माझ्या बघण्यात नाही म्हणून 'कदाचित' हा शब्द) तथापि त्या जे निष्कर्ष मांडत आहेत आणि जे उपाय सांगत आहेट ते, खाली पिलियन रायडर म्हणताहेत त्याप्रमाणे, प्रश्न सोडवणारे वाटत नाहीत. स्त्रीला मुग गिळून, माजघरात परत पाठवण्याची त्यांची मानसिकता दिसते. आपण समाजकार्य करतो म्हणजे आपल्याला काही विशेष अधिकार आहेत आणि मी म्हणेन तेच बरोबर ते विनातक्रार ऐका प्रश्न विचारू नका हा आग्रह चुकीचा आहे .. बाय ड वे : मी त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप्स ऐकून धागा टाकलाय ..एक दीड तास त्यांना ऐकणे शक्य नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 21:20 नवीन
स्त्रीला मुग गिळून, माजघरात परत पाठवण्याची त्यांची मानसिकता दिसते.
मी किति गावचं पाणी प्यालेय, किती जणांना जाउन किती जणांना समजावते चे किस्से त्या सांगत होत्या तेव्हा तुमचा ऑडिओ म्यूट झाला होता का?
मी त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप्स ऐकून धागा टाकलाय ..एक दीड तास त्यांना ऐकणे शक्य नाही
त्यांचे १-७ व्हिडिओ आहेत. सगळे नीट ऐका नि मग धागा काढा. त्यांना काय म्हणायचं आहे किंवा त्या कशा आहेत याबद्दल तुम्ही अवास्तव घाई करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांचा अप्रोच तो टिपिकल आधुनिक पुरोगामी स्त्रीवादी इ इ नाही, मात्र धार्मिक, पारंपारिक आणि स्त्रीशक्तीवादि आहे. तुम्हाला त्यांचा अप्रोच मान्य नाही म्हणून त्यांच्या विधानांचा अनर्थ केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 15:35 नवीन
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे.
खाली हे मी अक्षरक्षः सतरा (१७) प्रकारे सांगितलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
शाली Wed, 05/16/2018 - 08:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मी कोण Sat, 07/22/2017 - 05:47 नवीन
काही वास्तवि कता --- १. पुर्वी काही प्रमाणात स्त्रियांवर अन्याय झालाही असेल पण आजच्या जमान्यात अन्याय सहन करणारी स्त्रि? भारत सरकार ची आकडेवारी -- स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या खुप जास्त आहेत कौटुंबिक कारणामुळे चांगल्या कमावत्या नवर्याला व सासुला ( सासु सासर्याच्या कमाईने घेतलेल्या) घरातुन बाहेर काढणारी उच्च शिक्षीत स्त्रि मागच्याच महीन्यात बघितली कारण घरात काहीतरी कमी पडले ( त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ) . स्वतः चा अहंकार पोसण्यासाठी पोटच्या लहान मुलांनाही यात सामी ल करुन घेतले जाते इमोशनल ब्लकमेलींग करून. हे फारच दुखःद आहे. बापाविरुध्द भडकावले जाते,त्याच्या पासुन तोडले जाते. पण मुलांच्या बालसुलभ भावनां चे काय? अजुन भरपुर प्रसंग लिहीता येतील सर्व सामाजिक थरातील - त्यामुळे " समझनेवाले को इशारा काफी है" २.कोणताही नेता बघा, त्याला कणखर रहावेच लागते, मग नेता स्त्रि असो वा पुरुष. स्वतः घाबरणार्याला कोणीही नेता म्हणुन स्विकारीत नाही. निसर्गानेच पुरुषाला घराबाहेच्या बाबींमध्ये कणखर बनविले आहे. स्त्रि व पुरुषांमधील भावनिक, शारीरीक, मानसिक, रासायनिक फरक आपल्याला माहीत असेल अशी अपेक्षा. ३."काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया" चला हे आपण पुर्वीच मान्य केले, फार बरे झाले. जाणिवपुर्वक दुसर्याला त्रास द्यायचा व त्याला सामाजिक प्रतिक्रीया म्हणायचे, वा छान!! ४. प्रश्न अपर्णाताईच्या भाषेचा -- भाषाही रांगडी असते हे ही आपल्याला माहीत असेलच. आपल्या वातावरणावर हे अवलंबुन असते. पण ताईंचा उद्देश्,भावना, तळमळ व विचार यांच्याबद्द्ल त्यांच्या शत्रुलाही खात्री आहे. पुढे आपण डाटा जाळण्यापेक्षा अपर्णाताईंच्या सर्व विचारांचा व्यवस्थित अभ्यास करावा ही नम्र विनंती. (एकाच व्हिडीओ मध्ये सर्व विचार येत नाहीत.) विचार समजुन घ्यावेत व अंमलात आणावे हे महत्वाचे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 07/22/2017 - 08:49 नवीन
भारत सरकार ची आकडेवारी -- स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या खुप जास्त आहेत कौटुंबिक कारणामुळे चांगल्या कमावत्या नवर्याला व सासुला ( सासु सासर्याच्या कमाईने घेतलेल्या) घरातुन बाहेर काढणारी उच्च शिक्षीत स्त्रि मागच्याच महीन्यात बघितली कारण घरात काहीतरी कमी पडले ( त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ) . स्वतः चा अहंकार पोसण्यासाठी पोटच्या लहान मुलांनाही यात सामी ल करुन घेतले जाते इमोशनल ब्लकमेलींग करून. हे फारच दुखःद आहे. बापाविरुध्द भडकावले जाते,त्याच्या पासुन तोडले जाते. पण मुलांच्या बालसुलभ भावनां चे काय? अजुन भरपुर प्रसंग लिहीता येतील सर्व सामाजिक थरातील - त्यामुळे " समझनेवाले को इशारा काफी है"
आकडेवारी द्या, वैयक्तिक निरीक्षणं नकोयत. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही निरीक्षण वरती मांडले आहे, ते पाहून प्रश्न पडतो, भारत सरकार काय फक्त मध्यमवर्गीय सुखवस्तू लोकांचेच आकडे काढते का ?

थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)

===================
२.कोणताही नेता बघा, त्याला कणखर रहावेच लागते, मग नेता स्त्रि असो वा पुरुष. स्वतः घाबरणार्याला कोणीही नेता म्हणुन स्विकारीत नाही. निसर्गानेच पुरुषाला घराबाहेच्या बाबींमध्ये कणखर बनविले आहे. स्त्रि व पुरुषांमधील भावनिक, शारीरीक, मानसिक, रासायनिक फरक आपल्याला माहीत असेल अशी अपेक्षा.
इथं लष्कर स्त्रियांना लढाऊ पलटणी, लढाऊ वैमानिक , मेडिकल अश्या सगळ्या क्षेत्रांत एंट्री देतंय अन वरचे तुमचेच रीग्रेसीव विचार पहा. निसर्गानेच पुरुषाला 'घराबाहेरच्या' कामांत कणखर बनवल्याचे वैद्यानिक दृष्ट्या सिद्ध करायचं बघा. स्त्री पुरुषांतील शारीरिक मानसिक रासायनिक (?) फरक तुम्हाला तरी नीट माहिती आहेत का ? कारण ते परत एकदा नीट वाचायची गरज तुम्हालाच आहे असे प्रकर्षाने जाणवले.

थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)

================== मुद्दा क्रमांक ३ लक्षात घ्यायच्याही लेवलचा वाटत नाहीये. अन मुद्दा क्रमांक चार अपर्णाताई ह्यांच्या संवैधानिक हक्कांशी संबंधित आहे, जोवर त्यांची भाषा संसदीय आहे तोवर त्यांना वाटेल त्या स्वरात, वाटेल ते (संसदीय कंटेंट) बोलायचं त्यांना स्वातंत्र्य आहे. कोणी कश्याचा कश्याला अभ्यास करावा हे सांगायची तुम्ही गरज नाही अन तुम्हाला तो हक्कही नाही इतकं (तूर्तास) लक्षात घेतलं तरी पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी कोण
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 07/22/2017 - 09:39 नवीन
हा
कोणी कश्याचा कश्याला अभ्यास करावा हे सांगायची तुम्ही गरज नाही अन तुम्हाला तो हक्कही नाही इतकं (तूर्तास) लक्षात घेतलं तरी पुरे.
आणि हा
थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)
जरा विरोधाभास होत नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Sat, 07/22/2017 - 10:38 नवीन
हे तुमचं सगळंच एकंदरीत वांझ शब्दप्रामाण्य होत नाहीये का? तो डायलॉग पहिले मी कोण ह्यांनी वापरलाय , मी तोच रिपीट केलाय, हे तुम्हाला कळत नसावे का वळत नसावे हातोळकर? बाकी अगदीच शब्द/कायदा प्रामाण्य पाळायचंच असलं तर वरच्यांनी केलेली पिरपिर कामी येणारी नाही, सरकारी आकडे म्हणून त्यांनी काहीही फेकावं अन आम्ही वाचावं इतकं भोळेपण तुमच्यात असेल आमच्यात नाही, क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 07/22/2017 - 11:03 नवीन
गल्लत होतेय वांडसाहेब! मी वरच्या मतांशी सहमत आहे हा अर्थ तुमचं तुम्हीच काढत आहात! माझा मुद्दा एवढाच होता की एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्यांनी करू नये अशी तुमची अपेक्षा आहे ते तुम्हीच करत आहात. नसेल पटत तर सोडून द्या, आणि त्यावर आमची दिलगिरी घ्या! बाकी त्यांनी त्यांची मते मांडली आहेत त्याला पिरपीर म्हणण्याचं वांझ शब्दप्रामाण्य माझ्यात नक्कीच नाहीये. तुम्ही त्यांना आकडे मागीतलेत, त्यांनी आकडे देईपर्यन्त तुमचाच काय कोणाचाही त्या वक्तव्यावर विश्वास बसणार नाही असे मला वाटते. पण त्यांच्याकडे आकडे असतील तर ते टाकण्याची वाट बघायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
म
मी कोण Sat, 07/22/2017 - 05:59 नवीन
"बरेच बोधामृत पाजतांना दिसतात" "अक्कल शिकवतात" " ह्या बाई"
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Sat, 07/22/2017 - 18:19 नवीन
ह्यात खटकणार काय आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी कोण
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 07/22/2017 - 08:14 नवीन
अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांच्या भाषणांचे केलेले आकलन एवढंच या लेखाचं वर्णन करता येईल. त्यांच्या भाषेवर टीका करताना स्वतःच्या भाषेकडे दुर्लक्ष झालेले दिसते. समाजातील सरसकट स्त्रियांबद्दल त्यांची भाषणे नसतात एवढे समजून घेतले असते तर पटले असते. आज समाजातील एक मध्यमवर्ग साधारणपणे लग्न न जमणे, सासू सुनांचे भांडण, नवरा बायकोतील दुरावा या समस्यांनी ग्रस्त आहे. या समस्या ५० टक्के पुरुष आणि ५० टक्के स्त्रिया यांमुळे होत असतील असं गृहीत धरलं तरी त्या ५० टक्के प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत असतील तर वाईट काय त्यात? त्यांच्या कार्याची माहिती घ्यायला हरकत नसावी, अनेक जोडप्यांचे संसार सुरळीत करण्याचे "पातक" आहे त्यांच्या नावावर. अनेक जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांना घटस्फोटापासून प्रवृत्त करण्याचे काम दुर्लक्ष करण्याजोगे आहे काय? एक स्त्री असून त्या स्त्रियांवर बोट ठेवत ठेवतात म्हणून त्या टीकेच्या धनी ठरत असाव्यात पण स्त्री असून पुरुषावर टीका केली तरी स्त्रीवादी म्हणून टीका झालीच असती म्हणा! काही मते आत्यंतिक वाटली तरी मतितार्थ लक्षात घेऊन अशी मते दुर्लक्ष करणे मी वैयक्तिकरित्या पसंत करेन!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/22/2017 - 08:39 नवीन
वेल सेड प्रसादराव, तुमच्या तटस्थ, सुजाण भूमिकेचे अन मुद्देसूद प्रतिसादाचे कौतुक वाटते. किपीटप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
न
नगरीनिरंजन Sat, 07/22/2017 - 10:10 नवीन
ह्या बाई तुमच्या टीकेला पात्र असतीलही कदाचित; पण समाजात आज ज्यांच्यावर भावनिक व कधीकधी शारीरिक अत्याचारही होतात असे मध्यमवर्गीय पुरुष आहेत हे आपण मान्य करणार की नाही हा खरा प्रश्न आहे. स्त्रियांबद्दलचे स्टिरिओटाईप दूर करताना पुरुषांबद्दलचेही पूर्वग्रह दूर करणार की नाही? स्त्रियांवर पूर्वी अन्याय झाला व काहींवर अजूनही होतो हे मान्य; परंतु अन्याय झालेल्या स्त्रियाही वेगळ्या आणि अन्याय करणारे पुरुषही वेगळे. त्यांच्या नावाखाली स्वतःला कसलीही तोशीस न पडलेल्या भलत्याच स्त्रिया मिळालेल्या प्रिव्हिलेजेसचा गैरवापर करत आहेत हे सत्य आहे की नाही?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 07/22/2017 - 10:42 नवीन
त्यांच्या नावाखाली स्वतःला कसलीही तोशीस न पडलेल्या भलत्याच स्त्रिया मिळालेल्या प्रिव्हिलेजेसचा गैरवापर करत आहेत हे सत्य आहे की नाही? चार दोन उदाहरणं द्या की हातासारशी, तुमचा मुद्दा समजायला सोपा पडेल इतकंच. पुरुषांकवर अत्याचार होणे ह्याला नाकारत नाही, पण पुरुषांना एक्सट्रा ज्युडिशयल/कांगारू मेथड उपलब्ध असतात, स्त्रियांना नसतात, म्हणूनच सिस्टिम ऑफ पोजिटीव्ह बायस नुसार त्यांना संस्थात्मक संरक्षण जास्त असावं काय?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 07/22/2017 - 11:37 नवीन
हे एक उदाहरण पुरेसं आहे. तेही संस्थात्मक संरक्षणाच्या दुरुपयोगाचं. http://www.bbc.com/news/magazine-38796457 बाकी नाचक्कीच्या भीतीने सहन करत राहणार्‍या मध्यमवर्गीय पुरुषांची संख्या किती आहे त्याचे अधिकृत आकडे मिळणे अवघड आहे. आता तुम्हीही मध्यमवर्गीय पुरुषास कोणत्या एक्स्ट्रा ज्युडिशियल/ कांगारु मेथड्स उपलब्ध असतात त्याची उदाहरणे द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
अ
अनुप ढेरे Sat, 07/22/2017 - 11:50 नवीन
एक डाक्युमेंटरी आहे मार्टिर्स ऑफ मॅरेज नावाची. खोट्या कौटुंबिक हिंसाचार तक्रांरींचे बळी पुरुंषांबद्द्ल. ही डाक्युमेंटरी दीपिका भारद्वाज नावाच्या पुरुषांच्या हक्काबद्द्ल लढणार्‍या स्त्रीने बनवली आहे. यात अशा कायद्यांचा कसा दुरुपयोग होतो आणि अनेक पुरुषांच आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं उध्वस्तं होतं याचा मागोवा घेतला आहे. हा ट्रेलर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Sat, 07/22/2017 - 11:52 नवीन
आर एक्ससेप्शनस बिंग कोटेड ऍझ एगझॅम्पल्स हियर?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 07/22/2017 - 12:03 नवीन
४९८ च्या सर्व केसेसमध्ये कंव्हिक्शन रेट १५% आहे फक्तं म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
N
nanaba Mon, 07/24/2017 - 03:14 नवीन
आर एक्ससेप्शनस बिंग कोटेड ऍझ एगझॅम्पल्स हियर? >> You nailed it!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ए
एमी Mon, 07/24/2017 - 03:27 नवीन
+१ त्या बातमीतच लिहिलंय की What she did not find was any cases like Yogesh Gupta's, where a woman had filed a case maliciously or to extort money. "In some cases it would be the argument of the defence that the woman was trying to abstract money," she says. "But I cannot think of a case where this was proven."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
न
नगरीनिरंजन Mon, 07/24/2017 - 16:25 नवीन
होय एक्सेप्शनच. ह्या बाईसुद्धा एक्सेप्शनच आहेत आजच्या काळात. मुद्दा असा आहे की एकीकडे अतिरेक झाला की त्याची प्रतिक्रिया म्हणून विरुद्ध बाजूने अतिरेक होणारच. ह्या बाईंना जो काही प्रतिसाद मिळतो ते देणारे लोक सरसकट मूर्ख आणि मागासलेले आहेत असे म्हणता येणार नाही. टोकावरच्या समाजाचे वर्तमान ह्या लोकसत्तातल्या अग्रलेखातही कुबेरांनी तोच मुद्दा मांडायचा प्रयत्न केला आहे. लंबक मध्यावर न थांबता इकडे-तिकडे झुलत राहतो समाजाचा. ह्या बाईंची किंवा फेमिनाझींची खिल्ली उडवून काहीही होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
प
पिलीयन रायडर Sat, 07/22/2017 - 14:26 नवीन
ह्या बाईंचा विषय आला की बोलायचंच नाही हे माझं मीच ठरवलं होतं खरं तर, पण... असो.. बाईंच्या भाषणांमध्ये "मी आई आहे, माझं ऐकलंच पाहिजे" ही सुरूवात पाहिली आणि तर्कशास्त्राने तिथेच पहिली गटांगळी खाल्ली. इतक्या टोकाच्या एकांगी विचारांनी काहीही साध्य होऊ शकत नाही. मला आश्चर्य ह्याचं वाटतं की लोक सुद्धा ह्यांचे विचार अत्यंत मनोभावे पुढे पाठवत असतात. अर्थात ते कुणाला तरी "सुनवायचं" असतं म्हणुनही असतं बर्‍याचदा.. तर हे बघा, ह्या जगात केवळ स्त्रियाच व्यवस्थेचा बळी आहेत आणि पुरुष अत्यंत प्रिव्हिलेज्ड आहेत असं कुणीही म्हणत नाहीये. डोकं ताळ्यावर असणारे स्त्रीवादी सुद्धा असं म्हणत नाहीत. पुरुषांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि कैकदा शाररिक त्रासालाही सामोरं जावं लागतंच. बायका प्रचंड स्वार्थी असु शकतात, त्या नवर्‍याला त्याच्या आई वडीलांपासुन तोडु शकतात, कायद्याचा दुरुपयोग करुन मनमानी करु शकतात.. करतातच. अनेक बाबतीत बायकांना बाई असल्याचाही फायदा मिळतोच. तिथे पुरुषांवर अन्याय होतो. सगळं खरंय आणि मान्य आहेच. पण पण पण..... म्हणुन कुणी हे म्हणत असेल की बायकांनी आपले डोके वापरु नये, चंद्रावर गेलात तरी घरात भाकर्‍या बडवाच, मुलीच्या घरच्यांनी ढवळा ढवळ करु नये वगैरे वगैरे.. तर सर, ही पुरुषांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्या मुदलात स्त्री काय पुरुष काय, कुणाचेच प्रश्न सोडवत नाहीयेत. त्यांच्या पद्धतीने वागायचं म्हणलं तर उलट प्रश्न वाढतील. संसारात एका जोडीदाराने गपगुमान दुसर्‍याचे ऐकुन घ्यावे हा फॉर्म्युला हिट होणारच ना? त्यात नवल ते काय? मागच्या काही शतकात नाही का मुलींना सतत सांगितलं जायचं की जे होईल ते मुकाट सहन कर, तुझं माहेर आता संपलं, बाईला कुंकवाचाच आधार.. तेच ह्या बाईसुद्धा सांगत आहेत. फक्त वेगळ्या शब्दात. आशय हाच. बायकांना सुखी संसारासाठी इतके उपदेश करत असताना, दोन शब्द पुरुषांनाही सांगायला काय जातं? चला आपण असं म्हणु की ज्या बायका वैट्ट आहेत, नवर्‍याला छळतात, त्यांच्यासाठी ही भाषणं आहेत (हे असं सार्वजनिक भाषण, एकाच कॅटेगरीसाठी फिल्टर करुन कसं ऐकायचं देव जाणे!) तरीही स्वयांपाकाची तयारी नसलेल्या बायकांसाठी - "चंद्रावर गेलात तरी घरी येऊन भाकरी बडवायची" हे काही उत्तर नाहीये. मुलीच्या घराच्यांची ढवळाढवळ हा मुद्दा अ‍ॅड्रेस करताना सरळ मागच्या शतकात जाऊन वधुपित्याची अक्कल चव्हाट्यावर मांडणं ही काही पद्धत नाही. एक स्त्री स्त्रीच्या विरोधात बोलतेय म्हणुन त्यांना विरोध आहे असं प्लिझ म्हणु नका, अशाने त्यांना उगाच एक ग्लोरी मिळतेय. त्या काहीही महान काम करत नाहीयेत की तत्कालीन समाजाचा विरोध तर होणारच वगैरे. त्यांच्या भाषणांमध्ये कुठेही स्वतंत्र मतांच्या, सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रियांचा विचारच नाहीये. २०व्या वर्षी मुली सुंदर दिसतात म्हणुन त्यांचं लग्न लावुन द्यावं असं म्हणणार्‍या व्यक्तिकडे तो नसतोच. त्या स्त्रियांना (चांगल्या असो वा वाईट) सरळ दुय्यम भुमिका घ्यायला सांगत आहेत आणि म्हणुन त्यांना विरोध आहे. त्यांच्या भाषणात संसार ह्या "दोघांनी" करण्याच्या गोष्टीचा सर्वांगिण विचार नाहीये म्हणुन हा विरोध आहे. नेहमीप्रमाणे स्त्रियांना उपदेश होतोय आणि पुरुष माना डोलावत आहेत हे काही फार दुर्मिळ दृष्य नाही. काल परवाच इरफान पठाणच्या बायकोचे हाताचे पंजे का उघडे आहेत आणि नखांना नेलपेंट का लावलं आहे ह्यावरुन लोकांनी त्याच्या एका फोटोवर धुमाकुळ घातला. बाईंचे विचार हे ह्या विचारसरणीहुन फार वेगळे नाहीत. इतके टोकाला अजुन पोहचले नसतील, पण वाटचाल तीच आहे. एक गैरसमज हा ही आहे की ह्या भाषणांमधुन त्या पुरुषांचे प्रश्न सोडवताएत, तर नाही. त्या स्त्रियांना शरणागती पत्करुन गपगुमान नवर्‍याच्या चरणांशी वाहुन घ्यायला सांगत आहेत, जेणेकरुन कुणालाच प्रश्न पडु नयेत. आणि अगदी कुणाला शांततेचा नोबेल पुरस्कार जरी मिळालेला असला, तरीही त्या माणसाची अशी मतं चुकीचीच आहेत. ग्रामिण भागात स्त्रियांचे प्रश्न फार जास्त गंभीर आहेत. तिथे आधीच स्त्रियांना चपलेखाली दाबुन ठेवण्याची वृत्ती असतेच. आता कुठे त्यांचं जग बदलत असताना अशा व्हिडीओंचा प्रसार ही गंभीर बाब आहे. जे विचार स्त्री आणि पुरुषाला समान वागवत नाहीत, स्टिरिओटाईप्सचाच उदो उदो करतात (स्त्रियांनी चुल आणि मुलच पहावे, घरासाठी कमावणे हे पुरुषाचेच काम इ.) ते स्त्री आणि पुरुषातले कोणतेही प्रश्न कधीही सोडवु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चष्मेबद्दूर Sun, 07/23/2017 - 17:06 नवीन
पि.रा. तुमचे दोन्ही प्रतिसाद अगदी माझ्या मनातलेच. पडलो तरी माझीच शेंडी वर अशा वृत्ती ला काहीच करू शकत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सुचिता१ Sun, 07/23/2017 - 18:47 नवीन
१०० % सहमत.. पुरुषांचे प्रश्न हिच्या मार्गाने कधीही सुटु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
N
nanaba Mon, 07/24/2017 - 03:18 नवीन
अगदी योग्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रीत-मोहर Tue, 07/25/2017 - 08:42 नवीन
पिरे अगदी योग्य शब्दात लिहिलय्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कोंबडी प्रेमी Sat, 07/22/2017 - 18:23 नवीन
म्हणुन कुणी हे म्हणत असेल की बायकांनी आपले डोके वापरु नये, चंद्रावर गेलात तरी घरात भाकर्‍या बडवाच, मुलीच्या घरच्यांनी ढवळा ढवळ करु नये वगैरे वगैरे.. तर सर, ही पुरुषांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्या मुदलात स्त्री काय पुरुष काय, कुणाचेच प्रश्न सोडवत नाहीयेत. त्यांच्या पद्धतीने वागायचं म्हणलं तर उलट प्रश्न वाढतील. संसारात एका जोडीदाराने गपगुमान दुसर्‍याचे ऐकुन घ्यावे हा फॉर्म्युला हिट होणारच ना? त्यात नवल ते काय? मागच्या काही शतकात नाही का मुलींना सतत सांगितलं जायचं की जे होईल ते मुकाट सहन कर, तुझं माहेर आता संपलं, बाईला कुंकवाचाच आधार.. तेच ह्या बाईसुद्धा सांगत आहेत. फक्त वेगळ्या शब्दात. आशय हाच
आपल्या प्रत्येक मुद्याशी शतश: सहमत .... वरचा परिच्छेदाशी तर फारच सहमत . किंबहुना हाच धागा पुन्हा लिहायचा ठरवला तर फक्त तुमचा हा प्रतिसाद चोप्यपस्ते करीन एवढच म्हणेन !!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 07/22/2017 - 23:40 नवीन
पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
बाईंच्या भाषणांमध्ये "मी आई आहे, माझं ऐकलंच पाहिजे" ही सुरूवात पाहिली आणि तर्कशास्त्राने तिथेच पहिली गटांगळी खाल्ली.
हे सगळ्या बायकांच्या बाबतीत होतं. आईसमोर तर्क आणि युक्तिवाद चालंत नसतात. तिच्यावर जसा विश्वास टाकता तसा माझ्यावर टाका म्हणून अपर्णाबाई सांगताहेत. २.
तर हे बघा, ह्या जगात केवळ स्त्रियाच व्यवस्थेचा बळी आहेत आणि पुरुष अत्यंत प्रिव्हिलेज्ड आहेत असं कुणीही म्हणत नाहीये.
मात्र तरीही विवाहांतर्गत पुरुष जास्त सुविध (=प्रिव्हिलेज्ड) असतात. स्त्रीपुरुषांच्या मनोरचनाच मुळी अशा असतात की लग्नाच्या बाजारात पुरुष वरचढ ठरतो. स्त्री ज्या कारणासाठी लग्न करते त्या कारणासाठी पुरुष लग्न करंत नसतो. त्यामुळे पुरुषाला नैसर्गिकरीत्या जास्त पर्याय उपलब्ध असतात. ३.
म्हणुन कुणी हे म्हणत असेल की बायकांनी आपले डोके वापरु नये, चंद्रावर गेलात तरी घरात भाकर्‍या बडवाच, मुलीच्या घरच्यांनी ढवळा ढवळ करु नये वगैरे वगैरे.. तर सर, ही पुरुषांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत.
नाहीच्चेत मुळी. चंद्रावर जाऊन भाकऱ्या बडवणं म्हणजे तुम्ही बाहेर कितीही कर्तृत्ववान असलात तरी तुमच्या घरी तुमची भूमिका स्पष्ट पाहिजे. जर घरी भाकऱ्या बडवायच्या नसतील तर लग्नंच करू नये हे उत्तम. अशा वेळेस करियरवर लक्ष केंद्रित केलेलं बरं पडेल. हा गर्भितार्थ आहे. असं असलं तरीही नवरा जर सांभाळून घेणारा असेल तर चंद्रच काय मंगळावर खुशाल जायला हरकत नाही. पण नवऱ्यानं सांभाळून घ्यायला हवं ही अपेक्षा ठेवू नका. ४.
संसारात एका जोडीदाराने गपगुमान दुसर्‍याचे ऐकुन घ्यावे हा फॉर्म्युला हिट होणारच ना?
हो. नेमकी हीच तर युक्ती आहे संसार टिकवून ठेवायची. ती वापरायची नसेल तर लग्न करू नये. खुल्या सहजीवनाचा (=लिव्ह इन) पर्याय खुला आहेच. पण त्याचेही तोटे आहेतंच. ५.
मागच्या काही शतकात नाही का मुलींना सतत सांगितलं जायचं की जे होईल ते मुकाट सहन कर, तुझं माहेर आता संपलं, बाईला कुंकवाचाच आधार.. तेच ह्या बाईसुद्धा सांगत आहेत. फक्त वेगळ्या शब्दात. आशय हाच.
अगदी बरोबर. फक्त लग्नावर बेतलं तरच काडीमोड घेऊन परत ये. जिवावर बेतेपर्यंत वाट पाहू नकोस. एव्हढं वगळता तुझं तू बघायला शिक. हे जर मान्य नसेल तर लग्न न करणेच उत्तम. ६.
बायकांना सुखी संसारासाठी इतके उपदेश करत असताना, दोन शब्द पुरुषांनाही सांगायला काय जातं?
कारण की पुरुष त्यांच्या मनोरचनेमुळे अपर्णाबाईंचा उपदेश ऐकणार नाहीत. पुरुष फक्त त्यांच्या पत्न्यांचंच ऐकतात. पत्नीला आपलं नवऱ्याने ऐकावं असं वाटंत असेल तर अपर्णाबाईंचा सल्ला तिनं अंमलात आणायला हवा. आणि जर तो आवडला नाही तर स्वत:च्या मनाने प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. ७.
तरीही स्वयांपाकाची तयारी नसलेल्या बायकांसाठी - "चंद्रावर गेलात तरी घरी येऊन भाकरी बडवायची" हे काही उत्तर नाहीये.
अगदी बरोबर. अशांसाठी खुल्या संबंधांचा (=लिव्ह इन) पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्यातून घर उभं रहात नाही. फक्त लॉज निर्माण होतं. ८.
त्यांच्या भाषणांमध्ये कुठेही स्वतंत्र मतांच्या, सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रियांचा विचारच नाहीये.
तेच तर बरंय की. स्वतंत्र मतांच्या, सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रिया आपापला विचार करण्यास समर्थ आहेत. अपर्णाबाईंनी त्यांच्यासाठी विचार करण्यात काही अर्थ नाही. ९.
त्या स्त्रियांना (चांगल्या असो वा वाईट) सरळ दुय्यम भुमिका घ्यायला सांगत आहेत
यू सेड इट. लग्नाच्या बाजारात स्त्री तिच्या मनोरचनेपायी दुय्यम भूमिकेतंच असते. हा निसर्गाने तिच्यावर केलेला अन्याय आहे. १०.
त्यांच्या भाषणात संसार ह्या "दोघांनी" करण्याच्या गोष्टीचा सर्वांगिण विचार नाहीये म्हणुन हा विरोध आहे. नेहमीप्रमाणे स्त्रियांना उपदेश होतोय आणि पुरुष माना डोलावत आहेत हे काही फार दुर्मिळ दृष्य नाही.
तुम्ही ज्याला दोघांनी करायचा संसार म्हणताहात, त्याला पुरुष लोकं वेगळंच काहीतरी म्हणतात. ते 'घर बाईचं असतं' असं काहीतरी म्हणतात. मात्र तरीही तुमचा मूळ मुद्दा मान्य. घर दोघांचं हवं. नवराबायकोंनी एकमेकांचा आदर राखायला हवा. बायकोला उपदेश केला तर ती ऐकून घेते. पण नवरे लोकं ऐकून घेत नसतात. सवय नसते त्यांना. बायकोने नवऱ्याचा आदर केलाच पाहिजे. मात्र या बदल्यात नवऱ्याकडून जो आदर मिळवायचा आहे, तो सर्व स्त्रीजातीसाठी असावा असा बायकोने प्रयत्न करायला हवा. मग पाहिजे तेव्हढा आदर तिच्यापर्यंत बरोब्बर पोहोचतो. ११.
इरफान पठाणच्या बायकोचे हाताचे पंजे का उघडे आहेत आणि नखांना नेलपेंट का लावलं आहे ह्यावरुन लोकांनी त्याच्या एका फोटोवर धुमाकुळ घातला.
इरफान पठाणला त्याचं सोयरसुतक आहे का? नसल्यास कोण विचारतो फालतू टीकेस! १२.
बाईंचे विचार हे ह्या विचारसरणीहुन फार वेगळे नाहीत. इतके टोकाला अजुन पोहचले नसतील, पण वाटचाल तीच आहे.
असहमत. नवऱ्याकडून युक्तीने आपल्याला पाहिजे ते कसं काढून घ्यावं याची पूर्वतयारी अपर्णाबाई करून घेताहेत. १३.
जे विचार स्त्री आणि पुरुषाला समान वागवत नाहीत, स्टिरिओटाईप्सचाच उदो उदो करतात (स्त्रियांनी चुल आणि मुलच पहावे, घरासाठी कमावणे हे पुरुषाचेच काम इ.) ते स्त्री आणि पुरुषातले कोणतेही प्रश्न कधीही सोडवु शकत नाहीत.
स्त्री आणि पुरुष समान नाहीत. भूमिका (= स्टिरिओटाईप्स ) उपलब्ध असणे ही एक चैन आहे. ही नवराबायकोंची चैन नाही. तर त्यांच्या मुलाबाळांची चैन आहे. भूमिका स्पष्ट नसतील तर मुलं गोंधळतात. असो. माझ्या मते अपर्णाबाईंच्या भाषणांकडे नवऱ्यास कसं शहाणा/मूर्ख बनवावं, त्याच्याकडून हवं ते कसं काढून घ्यावं याची पूर्वतयारी म्हणून पाहणे इष्ट ठरावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 07/23/2017 - 01:32 नवीन
आपली मते कळाली. इतक्या पुरातन आणि एकांगी मतांचा प्रतिवाद सुद्धा करण्याची इच्छा नाही. स्त्रियांनी संसार जपावा, नसेल जमत तर लिव्ह इन मध्ये जावे आणि दुय्यम भुमिका घ्यावीच आणि पुरुषांना सवयच नसते ऐकण्याची वगैरे मतांना तर माझ्याकडे प्रतिवाद सुद्धा नाहीये. बायको चंद्रावर जाणारी असेल तर नवर्‍याने अत्यानंदाने भाकर्‍या बडवाव्यात ह्या मताची मी आहे. मुदलात "भाकरी बडवणे" ही लग्नाची एकमेव इतिकर्व्यता नाही. सहजीवन ही एक बरीच अर्थपुर्ण आणि गंभीर गोष्ट असते. त्यात दुय्यम भुमिका घेऊन नातं जपत रहाण्याची वेळ येत असेल तर ते सहजीवन काय कामाचे? असो.. मला खरंच ह्यावर अधिक काही बोलायचे नाही. आपली मते अत्यंत वेगवेगळी आहेत हे तर स्पष्ट आहे. स्वतःचे मन मारुन का होईना पण नवर्‍यास गोडीगुलाबीने कसे जपावे वगैरे गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटत असतील, मला बिनडोक वाटतात. तेव्हा उगाच कशाला एकमेकांचा वेळ घालवायचा? धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 07/23/2017 - 15:04 नवीन
पिराताई, त्याचं काये की स्त्री जात्याच अन्यायाने सतत भरडली जात असते. फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की तू 'पुरुषासारखं' वागलीस तर 'पुरुषासारखी सुखी' होशील. अपर्णाबाई हा बुरखा फाडून टाकतात. विवाह न करणे हा एक स्तुत्य पर्याय आहे. शेवटी आपापली मर्जी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 07/23/2017 - 19:37 नवीन
फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की तू 'पुरुषासारखं' वागलीस तर 'पुरुषासारखी सुखी' होशील.
याच्याशी बऱ्याच अंशी सहमत! मुळात अपर्णाजींच्या भाषणातील मुद्दा हा स्त्री विरुद्ध पुरुष असा नाहीचाये मुळी! कुटुंब आणि त्यातील स्त्रीचा सहभाग यावर त्यांची भाषणे बेतलेली असली तरी टोकाला पोहोचलेल्या संबंधांना सुधारताना त्या याच गोष्टी सांगत असतील हे गृहीतक झाले. त्यांचा स्त्रियांनी चंद्रावर जाण्यास विरोध नाहीये, तर चंद्रावर गेलात तरी कुटुंबातला तुमचा सहभाग विसरू नका असा त्यांचा सल्ला आहे. बाकी "भाकऱ्या बडवण्याचा" जेवढा तिरस्कारजनक उल्लेख वरील प्रतिसादांमध्ये दिसतोय तेवढा त्यांच्या भाषणातील उल्लेख नाही वाटला. घरातील कामे किंवा "भाकऱ्या थापणे" कमी दर्जाचे काम आहे असा ग्रह पुरुषांपेक्षा स्त्रीमुक्तिवाद्यांनीच पसरवला नसेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
थ
थिटे मास्तर Sun, 07/23/2017 - 22:45 नवीन
"भाकऱ्या थापणे" कमी दर्जाचे काम आहे असा ग्रह पुरुषांपेक्षा स्त्रीमुक्तिवाद्यांनीच पसरवला नसेल काय? स्वयंपाक (सैपाक नव्हे) करणे हि एक कला आहे त्याचप्रमाणे चपात्या पोळ्या नाहि होउ शकत. स्त्रीमुक्ति म्हणजे काय ? 498 A ? बरेच प्रश्न आहेत, Depends on the reply. बैल तो बैल होता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
प
पिलीयन रायडर Mon, 07/24/2017 - 02:00 नवीन
"भाकर्‍या बडवणे" थोडक्यात स्वयंपाकघर सांभाळणे हे कमी दर्जाचे काम आहे असा उल्लेख ना माझ्या प्रतिसादात आलाय ना अपर्णाबै असं म्हणताएत. तसं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे हे नमुद करु इच्छिते. प्रश्न स्वयंपाक करण्याचा नसुन, तो "बायकांनीच" केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे. विरोध स्त्रीने बाहेर कोणतेही क्षेत्र गाजवले तरी तिची किंमत घरात स्वयंपाकघरात काय करते ह्यावरुन करण्याला आहे. चंद्रावर जाणार्‍या बाईला सुद्धा "तू घरातला सहभाग (तोही पारंपारिक पद्धतीनेच) ठेवलाच पाहिजेस" ह्या दुराग्रहाला आहे. आणि ह्या सगळ्यात चंद्रावर जाणार्‍या बाईच्या नवर्‍याला मात्र काहीच सल्ला नाही? त्याने काहीच तडजोड करु नये? अजुनही तुम्ही "स्त्रिया नैसर्गिकरित्याच दुय्यम असतात, पुरुषांचा बाई स्वभावच तसला, त्यांना बै समजुन घ्यावं" हेच डायलॉग मारणार? किती दुर्दैव आहे पहा, ती बाई सामाजिक समजुती, पद्धती, परंपरा आणि न जाणे काय काय स्टिरीओटाईप्स तोडुन चंद्रावर जाण्याइतकी प्रगती करतेय, आणि लोकांना चिंता तिच्या घरात स्वयंपाक होतोय ना ह्याची! आजतागायत यशस्वी पुरुषाला "कितीही मोठा झालास तरी कुटुंबातला सहभाग जप" हा सल्ला देताना कोणाला पाहिलेले नाही. बाई यशस्वी झाली की मात्र कुटुंबव्यवस्था शेवटच्या घटका मोजायला लागल्यासारखे सल्ले सुरु होतात. आई शप्पथ सांगते, आजघडीला "आपल्याहुन यशस्वी बायकोशी सुखाने संसार कसा करावा" ह्या भाषणाची समाजाला जास्त गरज आहे. खरंतर जगात यशस्वी स्त्रिया आज घडीला कमी नाहीत. सी.ई.ओ किंवा एखाद्या देशाच्या प्रमुख पदावर असणार्‍या बायका आपापली घरे सांभाळत नसतील का? मुलांना वेळ देत नसतील का? आजुबाजुला नीट पाहिलेत तर करिअर आणि संसार ह्यात तारेवरची कसरत करणार्‍या असंख्य बायका तुम्हाला दिसतील. पण लग्न झाले म्हणुन, मुल झाले म्हणुन "आता माझे घर आणि करिअर एकत्र कसे सांभाळु" असा प्रश्न पडलेला पुरुष मला तरी अजुन भेटायचा आहे. बाळाचा जन्म ही एक घटना सोडली तर मुल बापाचेही तेवढेच असते जेवढे आईचे, संसार पुरुषाचाही तेवढाच असतो जेवढा स्त्रीचा. त्यामुळे सहभाग त्याचाही तेवढाच हवा जितका तिचा. त्याच प्रमाणात सल्ले त्यालाही द्यावेत जसे तिला. हा प्रश्न फक्त अपर्णाबैं पुरता नाहीये. ही समाजाची वृत्ती आहे जी अगदी लहान मुलीच्या मनात बिंबवायला सुरु करते की चुल-मुल-संसार हे तुझ्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. कधी कुणा घरात मुलाशी स्वयंपाक कसा करावा, बायकोशी कसे वागावे, सासरी कसे रहावे इ चर्चा करताना कुणी दिसत नाही. तुम्ही दुय्यम आहात हे सांगत सांगत तुम्ही पालकांनाही हेच सांगताय की स्त्री संतती दुय्यम आहे. कुणाला हवी मग ही मुलगी? वरकरणी साध्या वाटणार्‍या अपर्णाबैंच्या ह्या मतांचा परिपाक ही स्त्री आणि पुरुषातली सामाजिक दरी आहे. अपर्णाबै त्या ती वाढवायला छान हातभार लावत आहेत. आणि हो.. पुरुषासारखं सुखी कुणाला व्हायचंय इथे? माणसासारखं राहु द्यात इतकी साधी मागणी आहे. स्त्री म्हणुन मी पुरुषाहुन फार वेगळी आहे हे कुणी मला सांगायची गरज नाही.. माझं स्त्रीत्व मला प्रिय आहे. माझ्यातलं स्त्रीत्व सोडून मला पुरुष होण्यात काही रस नाही. सुखी होण्याचा तो मापदंडही नाही. पण मी कुणाहुन कमी नाही, मी स्त्री म्हणुन समाजाने माझी कर्तव्ये ठरवयाची नाहीत, तुमच्या मापदंडांनी माझी किंमत करायची नाही. ह्या अपेक्षांना फेमिनाझी होणे म्हणायचं असेल तर..... ..म्हणा बापडे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
सुबोध खरे Mon, 07/24/2017 - 06:39 नवीन
पिरा ताई स्त्री आणि पुरुष हे समान आहेत हे उच्चरवाने म्हणणाऱ्या किती "मुली" आपल्यापेक्षा कमी पगार ( आणि खालच्या हुद्द्यावर) असलेल्या मुलाशी लग्न करायला तयार होतात. कदाचित १ % सुद्धा नाही. नवरा आपल्यापेक्षा हुद्द्याने किंवा पगाराने कमी चालत नाही हि वस्तुस्थिती आहे इतकेच नव्हे तर "गृहिणी" असणाऱ्या बायकोसुद्धा लग्न झाल्यावर मात्र नवरा आणि बायको समान याचा धोशा लावून नवऱ्याने घरात माझ्या बरोबरीने काम करायला पाहिजे असा आग्रह धरताना आढळतात. अनंत काणेकरांची एक सुंदर कथा आहे सावकाशीने टाकतो. मीच काढलेल्या एका धाग्याची जाहिरात करतो समजा http://www.misalpav.com/node/37185 पण यात अशी मनोवृत्ती दिसून येते. जाता जाता -- अपर्णा रामतीर्थ बाईंची भाषणे किंवा वरील व्हिडीओ मी पाहिलेला नाही हे कबुल करतो त्यामुळे त्या "बरोबर कि चूक" यावर माझे ( सध्या तरी) काहीच म्हणणे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 08:13 नवीन
आजघडीला "आपल्याहुन यशस्वी बायकोशी सुखाने संसार कसा करावा" ह्या भाषणाची समाजाला जास्त गरज आहे पुन्हा एक्दा पी रा ताई ....१००% सहमत ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 07/24/2017 - 08:49 नवीन
परत गल्लत होतेय! बायकांनी"च" केला पाहिजे असे मत आपण स्वतः मांडत आहात. बायकांनी केला पाहिजे असं अपर्णाजीचं मत दिसतंय याच अर्थ पुरुषांनी करू नये असं त्यांचं मत असेल हे गृहीतक कशाला? अपर्णाजींची मते स्त्रीची किंमत कशावरून केली जायला पाहिजे यावर नसून एक सुखी संसार करताना काय रोल असला पाहिजे याभोवती आहेत हे परत एकदा नमूद करू इच्छितो! त्या पुरुषांच्या बाजूने स्त्रियांबद्दल बोलत नसून कुटुंबातील एक घटक म्हणून दुसऱ्या घटकाबद्दल बोलताना दिसतात. म्हणूनच त्या सुरुवातीला मी तुमची आई बोलतेय असं समजा असं म्हणताना दिसतात. त्यांनी त्यांच्या वकील म्हणून आलेल्या अनुभवांतून कौटुंबिक कलहातील काही केसेसना तरी त्यांच्या पद्धतीने सल्ला द्यायचा प्रयत्न केला तर त्यात चुकीचं काय? कुटुंब म्हणजे स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व आणि पुरुषांचं स्वतंत्र अस्तित्व (फक्त) हेच समजणाऱ्यानी पुढील प्रतिसाद दुर्लक्षित करण्यास हरकत नसावी. इथे कुणीही घरात स्वैपाक होतोय कि नाही याची चिंता करण्यासाठी हा मुद्दा मांडत असतील असे अजिबात वाटत नाही. कितीही उत्तम शेफ जेवण देत असला तरी अजूनही आपल्यातील अनेक लोक " माके हाथ के खानेका जवाब नहीं" म्हणताना दिसतात ते आई भाकऱ्या बडवते ह्या भावनेतून नक्कीच नसेल. निसर्गानेच स्त्रीला दिलेले ममतेचे वरदान तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीत उतरत असल्याने त्याची एक गोडी आहे. एका स्त्रीमध्ये कुटुंबव्यवस्था धरून ठेवण्याची जेवढी ताकद आहे तेवढी पुरुषामध्ये दुर्दैवाने नसते असे मला वाटते आणि म्हणूनच अपर्णाजींचे मुद्धे कुटुंब धरून ठेवण्यासाठी स्त्रीचा काय रोल याभोवती फिरताना दिसतात. उगाच स्त्रीमध्ये चंद्रावर पोहोचण्याची ताकद असताना तिला भाकरी बडवण्यात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न वगैरे मुद्दे तकलादू वाटतात. वरील एका प्रतिसादात त्यांच्या वाक्यांची तुलना इरफान पठाण फोटो प्रकरणाशी केलेली बघून तर आश्चर्यचकित झालो. पुरुषाला सल्ले दिले जात नाहीत किंवा पुरुषांची उदाहरणे दिसत नाहीत वगैरे वैयक्तिक अनुभव असू शकतात. याउलट स्त्रीमुक्तीवाद्यांच्या प्रभावामुळे याघडीला पुरुषाला जेवढे सल्ले दिले जात असतील तेवढे स्त्रीलाही नसतील हो! मुलांना काही सांगितले जात नाही वगैरे गोड गैरसमज आहे आणि खरेतर याच गोष्टीला विरोध करायला हवा. पुरुषाला सांगत नाहीत म्हणून स्त्रीलाहि सांगू नका यापेक्षा स्त्रीलाही सांगा आणि पुरुषालाही सांगा जेणेकरून एक सुदृढ कुटुंबव्यवस्था टिकून राहील असे माझे मत आहे. अपर्णाताई त्यातील स्त्रीला सांगायचा भाग हाती घेत असतील तर पुरुषांना सांगायचा भागही कोणीतरी हाती घ्यावा (किंबहुना घेतही असतील). पण म्हणून अपर्णाताईचा भाग चुकीचा हे तत्व पटत नहीं. शेवटी परत एकदा - त्यांची भाषणे हि कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीचा सहभाग यावर आहेत स्त्री विरुद्ध पुरुष यावर नाही. जोपर्यंत त्या भाषणामधला मतितार्थ लक्षात घेता येणार नाही तोपर्यंत त्यांची भाषणे स्त्रीमुक्तीविरोधी समजण्यास हरकत नसावी. आपल्या घरात भाकऱ्या बडवणाऱ्या स्त्रियांना चंद्रावर पाठवल्यावर किंवा सीईओ झाल्यावर त्यांची किमंत कळण्याआधी त्यांच्या भाकऱ्या बडवण्याची किंमत कळायला लागणे म्हणजे खरी स्त्रीमुक्तीची सुरुवात नसावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 07/24/2017 - 09:45 नवीन
निसर्गानेच स्त्रीला दिलेले ममतेचे वरदान तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीत उतरत असल्याने त्याची एक गोडी आहे. एका स्त्रीमध्ये कुटुंबव्यवस्था धरून ठेवण्याची जेवढी ताकद आहे तेवढी पुरुषामध्ये दुर्दैवाने नसते असे मला वाटते हे कोणी ठरवले. ममतेचे वरदान, आईचे माहात्म्य वगैरे गोष्टींचे अवडंबर माजवून बायांना उगाचच देवता समान बनवून ठेवले आहे. जणू कुटुंबे फक्त बायाच धरुन ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 07/24/2017 - 10:06 नवीन
कोणीतरी ठरवले आहे असे मी म्हणालोच नाही, असे मला वाटते असे मी लिहिले आहे. तसेही याला माझ्याकडे प्रतिवाद नाहीये, मी तरी लहानपणापासून हे बघत आलो आहे. आजकाल सहजसहजी उपलबध इंटरनेटमुळे माणूस तर माणूस प्राण्यांच्याबाबतीतही हि गोष्ट विडिओजमुळे बघायला मिळते. शिवाय "च" फार महत्वाचा आहे हो, मी बाया"च" असे म्हणालो नाही, जेवढी ताकद बायकांकडे आहे तेवढी पुरुषांकडे नाही हे माझे मत मी मांडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
प
पिलीयन रायडर Mon, 07/24/2017 - 15:55 नवीन
केवळ तुम्हाला उत्तर देताना नुसत्या स्मरणशक्तिवर अवलंबुन लिहायचे नाही म्हणून अपर्णाबैंचा "चला नाती जपुया" हा व्हिडीओ बघण्याचा प्रयत्न केला. चला एक आढावा घेऊया की त्या विषय कसा मांडतात. सुरुवात स्वतःबद्दल बरेच गौरवोद्गार काढुन झाली. मी खूप फिरतेय (४५८ दिवस सलग) असा उल्लेख झाला. का फिरतेय? कारण एक आवाज ऐकु येतोय. कसला? कुटुंबव्यवस्था, संस्कार आणि संस्कृतीच्या मृत्युघंटांचा. मग त्या आजुबाजुला किती विदारक परिस्थिती आली आहे ह्याचे वर्णन करतात. का आली आहे? "बायकांसाठी केलेल्या कायद्यांनी". असे का? कारण बायका कायद्यांचा दुरुपयोग करतात. (सरसकटीकरण टु बी नोटेड मिलॉर्ड! आणि नवर्‍याने मरुस्तोवर मारलेल्या बाईला नक्की ऐकवा हे वाक्य.खरं तर दरवेळेस दुरुपयोगच होत नसतो. पण जिथे होतो त्याने डायरेक्ट कुटुंबव्यवस्था मरायलाच टेकते?!! ) मग मी आता तुम्हाला सांगणारे आणि आई म्हणुन माझं ऐकुन घ्यायचंच ही धमकीवजा सूचना. आजकाल मुलींना मुलासारखं वागवत आहेत म्हणे. हे करणं कसं चुकीचं आहे हे ठासुन सांगितलं. तिला "दुसर्‍याच्या" घरी जायचंय हे ही. (आम्ही ह्यांच्या भाषणात सिंबॉलिझम शोधायचा आणि ह्यांनी मात्र "मुलीला मुलासारखं वागवणे" ह्याला अगदी शब्दशः घ्यायचं. मुलगा मुलीत फरक न करणे. दोघांनाही शिक्षणाछ्या, करिअरच्या समान संधी देणे, प्रॉपर्टीत समान वाटा देणे वगैरे अध्याहृत अर्थ समजुन घ्यायचेच नाहीत.) माझ्या आईने कसं मला प्रचंड बंधनात वाढवलं ह्याबद्दल भाष्य. "बायकांनी कसे वागावे" ह्यावर ४ ओळी. "आजकालच्या बायका कुठेही कंगवा काढतात आणि "पुरुषांसमोर" केस मोकळे सोडतात, विंचरतात, स्लिव्हलेस ब्लाउज काय घालतात, हात वर जातात, पुरूष बाजुला असतात " ही टिपण्णी. बसमध्ये बायका कशा अस्ताव्यस्त झोपलेल्या असतात ह्यावर भाष्य. "भान पाहिजे ग भान पाहिजे. बलात्काराच्या खटल्यामध्ये काढताएत मग मुद्दे, पण आधी भान नको का?" हे त्यांचे वाक्य आहे. (बलात्काराच्या केस मध्ये आधी स्त्रीयांनी भान ठेवले पाहिजे? सार्वजनिक ठिकाणी बायकांनी कसे कपडे घालावेत, पुरुषांसमोर कसे वागावे ह्यावरुन त्यांचे भान जात आहे असे म्हणणे आणि अलगद त्याचा संबंध बलात्काराशी जोडणे हे योग्य आहे?? कुठेच पुरुषांचा काही दोषच नाही. पुरुषांना बायका भाग पाडताएत हा एक हिडन सुर. आता असं म्हणु नका की ह्यात पुरुषांची चुक नाही असं कुठे म्हणलंय. पण सर, बायकांच्या कपड्याचा, वावराचा बलात्काराशी तर संबंध जोडलाय ना? ही कारणं असतात बलात्काराची? बस मध्ये हात वर करुन केस विंचरले हा मुद्दा बलात्काराशी जोडला जावा? असा? तुमची मतं अशी असतील की बुवा हिर्‍याला नाही का लॉकरमध्ये ठेवावेच लागते तसे बायकांना कपड्यात गुंडाळुन ठेवावे, तर आपण इथेच बोलायचे थांबवुया. माझ्यामते रस्त्यावर काहीही कपडे न घालता जरी बाई फिरत असली तरी तिच्यावर बलात्कार करण्याचे जस्टीफिकेशन पुरुषाला मिळत नाही.) मी व्हिडीओ पहाता पहाता लिहीतेय, १७ वे मिनिट सुरु आहे. बाई कुटूंबव्यवस्थेचा कणा आहे, ती प्रतिष्ठा आहे, श्वास आणि विश्वास आहे वगैरे सांगितलं. सध्या "हल्लीच्या मुली जरा काही कमी पडलं की वकिल घेऊन भांडायला तयार" असे एक विधान ठामपणे करत आहेत. ही माझी लिमीट आहे. "चला नाती जपुया" नावाच्या व्हिडीओ मध्ये पहिले २० मिनिटे बायकांवर धुवांधार आरोप आणि उपदेशाचा मारा ह्याव्यतिरिक्त काहीही बोलल्या गेलेले नाही. मी हे भाषण आधीच ऐकलेले आहे. मला आठवते त्याप्रमाणे १-१.५ तास साधारण हेच बोलले जाते. बायका कुंकु लावत नाहीत, बांगड्या घालत नाहीत वगैरे मुद्देही आहेत. कुठेही पुरुषाने काय करावे ह्यावर एक वाक्यही बोलल्या गेलेले आठवत नाही. हो पण पुरुषांचे कसे हाल आहेत हे नक्की सांगितले जाते. थोडक्यात बायकांचे भान सुटणे आणि मग व्हाया संस्कृती, धर्म बुडणे ह्यावर हे विवेचन आहे. ह्याला सुखी संसारासाठीचे सल्ले म्हणत नाहीत. हे सगळं संसारासाठी आहे, हाच तुम्हा सर्वांचा एक मोठ्ठा गैरसमज आहे. ह्या व्हिडिओला ३ लाख व्ह्युज आहेत. अनेक लोक हा शेअर करतात. त्यांना हे कळत नाही हो की समाजातल्या सिलेक्टेड लोकांना नीट अर्थ काढुन तो पहायचा आहे. लोक काय शब्दश: अर्थ घेऊन बायकांनी घरी येउण स्वयंपाक करावा आणि सांजवेळेला केस विंचरु नयेत वगैरे लक्षात ठेवतात. ह्याने संसार सुरळीत होणारेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
प
प्रीत-मोहर Tue, 07/25/2017 - 08:48 नवीन
__/\__ तु चक्क त्या बाईचा विडियो पुन्हा पाहिलास!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
रेवती Sun, 07/23/2017 - 22:06 नवीन
एक महिला या नात्याने एक सांगू इच्छिते की नैसर्गिकरित्या एखादी बाई जरा पुरुषी असली तर ठीक पण माझ्यासारख्या सर्वसामान्य बाईला हा सुखी होण्याचा मार्ग नाही हे लवकरच कळेल. मी तशीही सुखी होईनच पण बाई असताना, बाई म्हणून. तसं होता येतं हे प्रत्येक बाईला माहित असतं. संघर्ष सुरु होण्याची वेळ ती असते, जिथे तिला बाई म्हणून जाऊ दे, माणूस म्हणून जगू दिले जाण्यात अडचणी येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अप्पा जोगळेकर Mon, 07/24/2017 - 07:30 नवीन
बायको चंद्रावर जाणारी असेल तर नवर्‍याने अत्यानंदाने भाकर्‍या बडवाव्यात ह्या मताची मी आहे. अहो, चंद्रावर जाणार्‍या बाईला किती पगार असेल. ठेवायचे चार- दोन नोकर. अगदीच सूड उगवायचा असेल तर पुरुष स्वयंपाकी ठेवा. बायका चंद्रावर जायला लागल्या तर खरेच मौज होईल. घरात पैसे भरपूर आणि बायको २-४ महिने चंद्रावर. वॉव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा